Skip to main content

Posts

इंदापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून प्रभाग सात मधून नगरसेवक उमेदवारी साठी मोहम्मद रफी सय्यद प्रबळ दावेदार उमेदवार

 इंदापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून प्रभाग सात मधून नगरसेवक उमेदवारी साठी मोहम्मद रफी सय्यद प्रबळ दावेदार उमेदवार  इंदापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून प्रभाग सात मधून नगरसेवक उमेदवारी साठी मोहम्मद रफी सय्यद प्रबळ दावेदार उमेदवार  इंदापूर – इंदापूर नगरपरिषद निवडणुकीचे वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर व्यंकटेश नगर येथील रहिवासी तसेच काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोहम्मद रफी सय्यद यांनी प्रभाग क्रमांक ७ (ब) मधून सर्वसाधारण पुरुष या गटातून निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास सय्यद हे उमेदवार जनतेच्या विश्वासाचे सोने करून दाखवतील, असा ठाम विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. शहरातील विविध भागात त्यांचा वाढता जनसंपर्क, सर्व समाजघटकांशी सुसंवाद आणि अल्पावधीत उभे केलेले सामाजिक कार्य यामुळे त्यांची प्रतिमा जनतेच्या मनात दृढ झाली आहे. शहरात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, तसेच युवकांच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा...
Recent posts

गॅस एजन्सीतील कामगारांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिक ‘गॅसवर’; इंदापूरकर त्रस्त! गॅस एजन्सीतील कामगारांची ‘चहापेक्षा किटली गरम’; !

 गॅस एजन्सीतील कामगारांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिक ‘गॅसवर’; इंदापूरकर त्रस्त! गॅस एजन्सीतील कामगारांची ‘चहापेक्षा किटली गरम’; ! इंदापूर प्रतिनिधी – जावेद शेख) इंदापूर शहरातील नागरिकांना घरगुती गॅस मिळवणे म्हणजे आता एक मोठे आव्हान ठरत आहे. गॅस एजन्सीतील काही कामगारांच्या मनमानी व बेफिकीर कार्यपद्धतीमुळे नागरिकांना गॅससाठी अक्षरशः “गॅसवर बसण्याची” वेळ आली आहे.तर नागरिकांचा ‘धैर्याचा गॅस’ संपणार हे निश्चित!  गॅस एजन्सीतील कामगारांची मनमानी; सामान्य ग्राहक त्रस्त – ‘तुम घर कब आओगे’ स्थिती! इंदापूर शहरात गॅस एजन्सींच्या कामकाजात “चहापेक्षा किटली गरम” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गॅस एजन्सीतील कामगारच मालकांपेक्षा जास्त प्रभावशाली बनले असून, त्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना गॅससाठी अक्षरशः वाट बघत बसावे लागत आहे. शहरातील अस्मिता गॅस एजन्सी आणि विनय गॅस एजन्सी या दोन प्रमुख एजन्सींमधील काही कामगार ग्राहकांना दुर्लक्षित करून व्यावसायिक हॉटेलधारक व व्यापाऱ्यांना चढ्या भावाने गॅस पुरवत असल्याचे समोर आले आहे. या मनमानीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले असून, “आम्ही ऑनलाईन गॅस ...

डॉ.परवेज अशरफी यांची अहमदनगर शहर मधून एमआयएम तर्फे उमेदवारीची पक्षाकडे मागणी

 डॉ.परवेज अशरफी यांची अहमदनगर शहर मधून एमआयएम तर्फे उमेदवारीची पक्षाकडे मागणी  अहमदनगर / प्रतिनिधी: महाराष्ट्र सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे. सर्व इच्छुक आप आपल्या पक्षाकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याच अनुषंगाने एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खा. इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजपच्या नितेश राणे यांच्यावर कारवाई ची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्य...

भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजयभाऊ सुभाषशेठ कांबळे यांची निवड

 भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजयभाऊ सुभाषशेठ कांबळे यांची निवड  (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजयभाऊ सुभाषशेठ कांबळे यांची निवड सर्वानुमते  करण्यात आली. इंदापूर ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या कार्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये   विजय भाऊ सुभाष शेठ कांबळे यांची निवड संस्थापक प्रदेशाध्यक्ष पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आली. शासन प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराची लागलेली कीड संपूर्णपणे समूळ  पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करेल व माझ्या हातून जे काही नागरिकांचे व जनतेची निस्वार्थ सेवा करता येईल ती मी करण्याचा प्रयत्न करीन व विना लाच विना भ्रष्टाचार या मार्गाचा अवलंब करून शासन प्रशासन दरबारी असलेली नागरिकांची कामे मी मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर कांबळे यांनी सांगितले.    जे अधिकारी खरेच भ्रष्ट कारभार करतात त्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी पुढे...

ईद ए मिलादून्नबी* समतावादी दृष्टिकोनातून एक चिंतन

 *ईद ए मिलादून्नबी* समतावादी दृष्टिकोनातून एक चिंतन ईद ए मिलाद उन नबी हा इस्लाम धर्मात साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण आणि पवित्र सण आहे, ज्यामध्ये प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस उत्सवात साजरा केला जातो. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक आणि सर्व मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या शिकवणींनी जगाला एकत्व, बंधुभाव आणि सामाजिक समता या मूलभूत तत्वांची जाणीव करून दिली. ईद ए मिलाद उन नबी ही संधी आहे, ज्यामध्ये हजरत मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यातील समतावादी दृष्टिकोनावर विचार करणे आणि त्यांच्या शिकवणींमधून प्रेरणा घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मोहम्मद पैगंबर यांचा समतावादी दृष्टिकोन होता, हजरत मोहम्मद पैगंबरांनी कायम समाजातील दुर्बल घटकांसाठी आवाज उठवला आणि त्यांच्या सन्मानासाठी संघर्ष केला. त्यांच्या शिकवणींच्या केंद्रस्थानी सर्व मानवांना समान हक्क देण्याची भावना होती. जेव्हा हजरत मोहम्मद पैगंबरांनी इस्लामची सुरुवात केली, तेव्हा समाजात वर्ग, वर्ण, लिंग, आर्थिक स्थिती यावर आधारित भेदभाव सामान्य होता. त्या काळात अरब जगतात गुलामगिरी, स्त्रियांवरील अत्याचार...

"सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने....!

 "सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई  शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने....! श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई शेख यांचा आज ५६ वा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांच्या कार्यांविषय हा थोडासा आलेख....! आज शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते "शौकतभाई शेख" यांचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्म बुधवार दि.३० ऑगस्ट १९६७ रोजी झालेला असून आज ते आपल्या वयाची ५६ वर्ष पुर्ण करुन ५७ व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्यांनी १९८४ साली आपल्या वयाच्या १६ व्या वर्षीच पत्रकारीतेत पाऊल टाकले, १९८५ / ८६ साली एका  साप्ताहिकाचे सहसंपादक पद भुषविले,१९८९ साली राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांच्या साप्ताहिक भडकत्या ज्वाला चे अस्तगांव परिसर प्रतिनिधीत्व केले, १९९२ साली प्रथमच ते दक्ष पोलिस समाचार या साप्ताहिकाचे संपादक झाले, पुढे दैनिक विजयसत्ता,साप्ताहिक प्रशासक, साप्ताहिक पद्मश्री,असे विविध वर्तमानपत्राचे त्यांनी संपादन केले आहे,आणी सन २०१० साली प्रथमच शिर्डी शहरातून त्यांनी दैनिक साईसंध्या नामक सायं दैनिकाची सुरुवात केली. सध्या दै.साईल...

माळी महासंघाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी विकास शिंदे यांची निवड

 माळी महासंघाच्या  पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी  विकास शिंदे यांची निवड (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख )  सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ इमानदारी म्हटलं की सामाजिक कार्यकर्ता म्हणून विकास शिंदे यांचे नाव आग्रहाने पुढे येते . तसेच सामाजिक बांधिलकी जपत शासकीय योजनां लोकांपर्यंत पोचवून त्याचा लाभ मिळवून देणे    तसेच अंधश्रद्धेवर देखील लोकांच्या मनात जागृती निर्माण करणे समाजातील सर्व घटकांसोबत मिसळून  जात धर्म न पाहता हॉस्पिटल शासकीय शालेय आरोग्य किंवा इतर काही अडचणी च्या वेळी  प्रत्येकाच्या मदतीला एक माणुसकी म्हणून दिवस रात्र अपरात्र जवळचा लांबचा न पाहता निस्वार्थपणे धावून जाणे. त्यांना बऱ्याच वेळा खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला परंतु ते डगमगले नाहीत गरिबांना मदत करणे त्यामुळे वन्स मोर माळी महासंघ अध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण विकास शिंदे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन करण्यात आली या निवडीनंतर आमदार योगेश टिळेकर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच ही निवड होत असताना माजी आमदार दीप्ती चौधरी राष्ट्रीय उपाध्यक्ष...