माळी महासंघाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी विकास शिंदे यांची निवड
(इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख )
सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ इमानदारी म्हटलं की सामाजिक कार्यकर्ता म्हणून विकास शिंदे यांचे नाव आग्रहाने पुढे येते . तसेच सामाजिक बांधिलकी जपत शासकीय योजनां लोकांपर्यंत पोचवून त्याचा लाभ मिळवून देणे तसेच अंधश्रद्धेवर देखील लोकांच्या मनात जागृती निर्माण करणे समाजातील सर्व घटकांसोबत मिसळून जात धर्म न पाहता हॉस्पिटल शासकीय शालेय आरोग्य किंवा इतर काही अडचणी च्या वेळी प्रत्येकाच्या मदतीला एक माणुसकी म्हणून दिवस रात्र अपरात्र जवळचा लांबचा न पाहता निस्वार्थपणे धावून जाणे. त्यांना बऱ्याच वेळा खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला परंतु ते डगमगले नाहीत गरिबांना मदत करणे त्यामुळे वन्स मोर माळी महासंघ अध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण विकास शिंदे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन करण्यात आली या निवडीनंतर आमदार योगेश टिळेकर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच ही निवड होत असताना माजी आमदार दीप्ती चौधरी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष लोंढे सचिव नानासाहेब कांडलकर प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे काळूराम अण्णा गायकवाड.नगरसेवक संतोष लोंढे. प्रदेशाध्यक्ष महिला अध्यक्ष शुभांगी लोंढे. विभागीय अध्यक्ष चंद्रकांत वाघोले. साहेब वनिताताई लोंढे. दीपक जगताप. आजी माजी ,आमदार नगरसेवक, माळी महासंघाचे चंद्रशेखर दरोडे. मुरलीधर भुजबळ. सावता सावित्री संस्थेचे अध्यक्ष मारुती भुजबळ व चंद्रकांत वाघोली साहेब,तसेच इतरही माळी महासंघाचे सर्व राजकीय संघटना पक्षा चे माळी समाजाचे पदाधिकारी यांनी निवडीनंतर टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले भावी कार्यास सर्व माळी महासंघाच्या व राजकीय पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच यानंतर पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष यांना बोलण्याची विनंती केली असता विकास शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की पद हे जाहिरात बाजी किंवा मिरवण्यासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी मोठेपणासाठी नसते तर ते सामाजिक कार्यामध्ये गोरगरीब अडचणी मध्ये सापडलेल्या माणसांच्या कामाच्या वापरा साठी असते तसेच ते पुढे म्हणाले की आम्ही माळी महासंघ आणि भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत खूप मोठे मोठे कार्यक्रम घेतले त्यात रक्तदान असेल आयुष्यमान कार्ड चे वाटप असेल अरण वरून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी दिवसभर जेवणाचा कार्यक्रम असेल असे अनेक कार्यक्रम घेतले जातात तसेच समाजात जागृती करण्यासाठी आम्ही माळी समाजासाठी सत्यशोधक पिक्चर हा फ्री मध्ये पाहण्यासाठी ठेवला होता की जेणेकरून त्यातून समाज काहीतरी ज्ञान घेईल.भाषण झाल्यानंतर या कार्यक्रमात निवडीचा त्यांना अधिकार असताना देखील त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्याचा आग्रह धरला व नियुक्तीपत्र त्यांच्या हस्ते देण्यात आले व लवकरच पदाचे वाटप केले जाईल असे त्यांनी सांगितले यावरूनच त्यांचे मन लक्षात येते की मनाचा मोठेपणा किती आहे तो तसेच ते पुढे म्हणाले आज मला महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांसमोर जी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आणि आज जो मी काही आहे तो सर्व माळी महासंघामुळे आहे आणि माझी ओळख ही माळी महासंघामुळे आहे आणि हे फक्त साधा कार्यकर्ता मोठा बनवायचे काम माळी महासंघच करू शकतो असे बोलून राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांचे व बाकी सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. व इथून पुढे हि अशीच कामगिरी पदाला शोभेल अशी कामगिरी करेल अशी त्यांनी ग्वाही दिली व विश्वासास पात्र राहील असे देखील त्यांनी आपल्या भाषणात उदगार काढले केले सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललेल्या कार्यक्रमात सर्वांचे त्यांनी स्वागत देखील केले की माळी समाजाचा अभिमान मान सन्मान म्हणून तुम्ही दिवसभर थांबला राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की महाराष्ट्रात देखील आतापर्यंत2700 माळी महासंघाच्या शाखा उघडल्या गेल्या सर्वांचे भाषणे झाल्यानंतर. नंतर नियुक्ती पत्र देण्यात आलेली पुढील प्रमाणे पदाधिकारी अमोल शिंदे गणेश राऊत शिंदे गुरुजी निखिल शिंदे संतोष शिंदे बाबरे युवराज शिंदे शिवराज शिंदे सुमित शिंदे रामचंद्र शिंदे अक्षय शिंदे बाळू शिंदे सुरेश व्यवहारे शंकर शिंदे अनिल सीनलकर. तसेच निवडीनंतर त्यांचा सत्कार जिल्हा परिषद शाळा नंबर सहा आणि शाळा नंबर चार शिंदे सर घुगे सर घुगे मॅडम लोंढे सर पालवे सर यांच्यावतीने करण्यात आला.

Comments
Post a Comment