Skip to main content

"सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने....!

 "सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई 

शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने....!


श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा


सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई शेख यांचा आज ५६ वा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांच्या कार्यांविषय हा थोडासा आलेख....!

आज शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते "शौकतभाई शेख" यांचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्म बुधवार दि.३० ऑगस्ट १९६७ रोजी झालेला असून आज ते आपल्या वयाची ५६ वर्ष पुर्ण करुन ५७ व्या वर्षात पदार्पण करत आहे,

त्यांनी १९८४ साली आपल्या वयाच्या १६ व्या वर्षीच पत्रकारीतेत पाऊल टाकले,

१९८५ / ८६ साली एका  साप्ताहिकाचे सहसंपादक पद भुषविले,१९८९ साली राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांच्या साप्ताहिक भडकत्या ज्वाला चे अस्तगांव परिसर प्रतिनिधीत्व केले, १९९२ साली प्रथमच ते दक्ष पोलिस समाचार या साप्ताहिकाचे संपादक झाले, पुढे दैनिक विजयसत्ता,साप्ताहिक प्रशासक, साप्ताहिक पद्मश्री,असे विविध वर्तमानपत्राचे त्यांनी संपादन केले आहे,आणी सन २०१० साली प्रथमच शिर्डी शहरातून त्यांनी दैनिक साईसंध्या नामक सायं दैनिकाची सुरुवात केली.

सध्या दै.साईलिला टाईम्स, दैनिक विदर्भ सत्यजित, दैनिक जलभूमी, दैनिक नगरशाही, साप्ताहिक भवानीमाता, साप्ताहिक समतादूत, मोहसिन ऐ मिल्लत, वृक्ष संवर्धन, वृत्त नगरी, साप्ताहिक शिर्डी एक्सप्रेस, खरे सव्वाशेर,साई गंगा,आदी अनेक वर्तमानपत्रात मार्गदर्शक संपादक म्हणून त्यांना मानाचं स्थान दिले जात आहे ही त्यांच्या ४० वर्षाच्या पत्रकारीतेतील कार्याची पावतीच होय,

असे आजवर त्यांनी विविध प्रसार माध्यमातून सामाजाभिमुख पत्रकारिता केली आहे,तसेच त्यांच्या समता फाऊंडेशन आणि इतरही विविध सामाजिक सेवाभावी संस्था, संघटनेच्या माध्यमातून ते अनेक समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबवत असतात, स्वाभिमानी संपादक सेवा संघ या त्यांच्या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून अनेक नवोदित पत्रकार,संपादकांना त्यांचे  मोलाचे मार्गदर्शन लाभले व लाभत आहेत,

त्यांचा नेहमीचा शांत आणी हस्तमुख स्वभाव,यासोबतच सातत्याने बोलण्यातून आपलेपण जाणवत असल्याने जो कोणी त्यांच्या संपर्कात आला तो कायमचा त्यांचाच झाला, असे त्यांचे निर्पेक्ष आणी परोपकारी व्यक्तीमत्व असल्याने राज्यभरात त्यांनी शैक्षणिक , साहित्यिक,सांस्कृतिक, पत्रकारीता क्षेत्रासह शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय क्षेत्रात देखील मोठा मित्र परीवार जोडला आहे. अशा या दिलदार मित्राच्या वाढदिवसा निमित्ताने आमच्या त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

*-डॉ.सलिम शेख*

बैतूश्शिफा हॉस्पिटल

आणि मित्र परीवार,श्रीरामपूर



Comments

Popular posts from this blog

इंदापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून प्रभाग सात मधून नगरसेवक उमेदवारी साठी मोहम्मद रफी सय्यद प्रबळ दावेदार उमेदवार

 इंदापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून प्रभाग सात मधून नगरसेवक उमेदवारी साठी मोहम्मद रफी सय्यद प्रबळ दावेदार उमेदवार  इंदापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून प्रभाग सात मधून नगरसेवक उमेदवारी साठी मोहम्मद रफी सय्यद प्रबळ दावेदार उमेदवार  इंदापूर – इंदापूर नगरपरिषद निवडणुकीचे वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर व्यंकटेश नगर येथील रहिवासी तसेच काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोहम्मद रफी सय्यद यांनी प्रभाग क्रमांक ७ (ब) मधून सर्वसाधारण पुरुष या गटातून निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास सय्यद हे उमेदवार जनतेच्या विश्वासाचे सोने करून दाखवतील, असा ठाम विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. शहरातील विविध भागात त्यांचा वाढता जनसंपर्क, सर्व समाजघटकांशी सुसंवाद आणि अल्पावधीत उभे केलेले सामाजिक कार्य यामुळे त्यांची प्रतिमा जनतेच्या मनात दृढ झाली आहे. शहरात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, तसेच युवकांच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा...

दफ्तर दिरंगाई कायदा, 2006

 दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दं...

फलटण तालुक्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या व तालुका कोर्टाची अद्यावत स्वरूपाची सर्व समावेशक इमारत उभारणेबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.*

 *फलटण तालुक्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या व तालुका कोर्टाची अद्यावत स्वरूपाची सर्व समावेशक इमारत उभारणेबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.* (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) फलटण, जिल्हा सातारा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली त्यासाठी प्रथम आपल्या सर्वांचे आभार. सध्याचे तालुका कोर्ट हे फलटण येथे विमानतळा नजीक आहे. तिथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी लागणारी जागा मुबलक प्रमाणात नाही. कारण - या ठिकाणी विमानतळ नजीक असले कारणाने या इमारतीवर मजले वर चढविता येत नाहीत व ही जागा ही तशी अपुरी /कमी आहे. सध्या फलटणमध्ये एकूण ७ बेंच आहेत (मा.न्यायाधीश साहेब आहेत). त्यांना बसण्यासाठी एका ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे ४ बेंच फलटण कोर्टाच्या इमारतीत तर बाकी ३ बेंच हे तहसील कार्यालयाच्या वरती आहेत. या दोन्ही कोर्टांच्या ठिकाणांमधील अंतर हे साधारण 300 मीटर पेक्षा जास्तच आहे. त्यामुळे सर्वच नागरिक/ पक्षकारांची व वकिलांची तारांबळ उडते. जामीनाचा अर्ज एका ठिकाणी तर त्याची पूर्तता ही दुसऱ्या ठिकाणी ही कोणती न्यायदानाची पद्धत? ज...