भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजयभाऊ सुभाषशेठ कांबळे यांची निवड
(इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख)
भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजयभाऊ सुभाषशेठ कांबळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
इंदापूर ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या कार्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये विजय भाऊ सुभाष शेठ कांबळे यांची निवड संस्थापक प्रदेशाध्यक्ष पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आली.
शासन प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराची लागलेली कीड संपूर्णपणे समूळ पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करेल व माझ्या हातून जे काही नागरिकांचे व जनतेची निस्वार्थ सेवा करता येईल ती मी करण्याचा प्रयत्न करीन व विना लाच विना भ्रष्टाचार या मार्गाचा अवलंब करून शासन प्रशासन दरबारी असलेली नागरिकांची कामे मी मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर कांबळे यांनी सांगितले.
जे अधिकारी खरेच भ्रष्ट कारभार करतात त्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी पुढे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून भ्रष्ट कारभाराचा समूळ नष्ट करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे असेही निवडीनंतर कांबळे यांनी सांगितले.
पुढे ते असेही म्हणाले महाराष्ट्रात कोठेही एखाद्या शासकीय कार्यातलयात अधिकारी पैशाची मागणी करीत असेल तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही संबंधित त्या जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी अथवा त्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी व सामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी एक दुवा म्हणून नागरिकांना मदत करू असेही कांबळे यांनी सांगितले.
विजयभाऊ कांबळे इंदापूर शहरातील कांबळे कावड सोहळा चे प्रमुख विश्वस्त असून इंदापूर शहरात कांबळे कावड सोहळा महाराष्ट्रात एक नावलौकिक असलेली व उत्साहाने पार पाडणारी कावड सोहळा म्हणून महाराष्ट्राला परिचित असून काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी भुत्या तेल्याची कावडीने या कांबळे कावड सोहळ्याला भेट दिलेली होती .
या भेटीसाठी कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले होते . कांबळे हे शिवराज्य शेतकरी विकास मंचचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष असून त्याचप्रमाणे ते हिंदू खटीक समाज संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम करीत आहे. कांबळे यांच्या घराला स्वतंत्र सैनिक यांचा वारसा लाभलेला आहे.
भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंच मध्ये महाराष्ट्र राज्यात काम करण्यासाठी या 9881412930 ,9561222930 मोबाईल भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असेही विजय भाऊ कांबळे यांनी सांगितले.
भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंच मंच चे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जावेदभाई शेख यांनी यावेळी विजय भाऊ कांबळे यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष गुणवंत हनुमंत दळवी,अलीअकबर मणेरी, महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा रंणजीत राऊत तसेच सामाजिक कार्यकर्ते तय्यब तांबोळी हे यावेळी उपस्थित होते.

Comments
Post a Comment