गॅस एजन्सीतील कामगारांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिक ‘गॅसवर’; इंदापूरकर त्रस्त! गॅस एजन्सीतील कामगारांची ‘चहापेक्षा किटली गरम’; !
गॅस एजन्सीतील कामगारांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिक ‘गॅसवर’; इंदापूरकर त्रस्त!
गॅस एजन्सीतील कामगारांची ‘चहापेक्षा किटली गरम’; !
इंदापूर प्रतिनिधी – जावेद शेख)
इंदापूर शहरातील नागरिकांना घरगुती गॅस मिळवणे म्हणजे आता एक मोठे आव्हान ठरत आहे. गॅस एजन्सीतील काही कामगारांच्या मनमानी व बेफिकीर कार्यपद्धतीमुळे नागरिकांना गॅससाठी अक्षरशः “गॅसवर बसण्याची” वेळ आली आहे.तर नागरिकांचा ‘धैर्याचा गॅस’ संपणार हे निश्चित!
गॅस एजन्सीतील कामगारांची मनमानी; सामान्य ग्राहक त्रस्त – ‘तुम घर कब आओगे’ स्थिती!
इंदापूर शहरात गॅस एजन्सींच्या कामकाजात “चहापेक्षा किटली गरम” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गॅस एजन्सीतील कामगारच मालकांपेक्षा जास्त प्रभावशाली बनले असून, त्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना गॅससाठी अक्षरशः वाट बघत बसावे लागत आहे.
शहरातील अस्मिता गॅस एजन्सी आणि विनय गॅस एजन्सी या दोन प्रमुख एजन्सींमधील काही कामगार ग्राहकांना दुर्लक्षित करून व्यावसायिक हॉटेलधारक व व्यापाऱ्यांना चढ्या भावाने गॅस पुरवत असल्याचे समोर आले आहे. या मनमानीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले असून, “आम्ही ऑनलाईन गॅस बुक करून नियम पाळतो, तरी गॅस मिळत नाही,” अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहे
इंदापूर शहरात सहज फेरफटका मारला तर इंदापूर शहरातील अनेक दुकानदार ,हॉटेल चालक, रिक्षा चालक हातगाडी चालक यांच्याकडे घरगुती गॅसचाच भरणा असल्याचे दिसून येत आहे
इंदापूर शहरात सर्रास वडापाव , हातगाडी वरील चहा दुकानदार, हॉटेल चालक व काही व्यापारी व्यावसायिक कमर्शियल गॅस न वापरता घरगुती गॅसचा वापर करताना दिसत आहे.
इंदापूर शहरातील नागरिक आता ‘तुम घर कब आओगे’ या गाण्याप्रमाणे गॅस सिलिंडरची वाट बघत आहेत. शहरातील गॅस एजन्सीकडून प्रामाणिक व ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना गॅस वितरणात प्रचंड विलंब होत असून, दुसरीकडे व्यावसायिक, हॉटेलधारक व व्यापाऱ्यांना चढ्या भावाने गॅस सहजपणे उपलब्ध करून दिला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. नियमानुसार गॅस ग्राहकांकडून एम आर पी पेक्षा जास्त राजरोसपणे सर्रास पैसे घेतले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गॅस एजन्सीतील काही कामगार हे एजन्सी मालकांना न कळवता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विक्री करत आहेत. या प्रकारात हॉटेलधारकांना आणि व्यावसायिकांना ‘घरपोच सेवा’ मिळते, तर घरगुती ग्राहक मात्र दिवसभर वाट बघत राहतात.
आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या व घरात डबल गॅस टाकी ठेवण्यास जागा नसणाऱ्या सिंगल गॅस टाकी कनेक्शन असलेल्या ग्राहकाला चुलीवर स्वयंपाक थाटल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
इंदापूर शहरात तील गॅस एजन्सीच्या परिसरात आणि बाजारात कामगार खुलेआम गॅस विकताना दिसत असून, तालुका पुरवठा शाखेचा देखरेख अभाव नागरिकांच्या नाराजीस कारणीभूत ठरत आहे. नागरिकांनी सांगितले की, “आम्ही नियमितपणे ऑनलाईन बुकिंग करूनही आठ-आठ दिवस वाट पाहावी लागते. पण काही हॉटेलधारकांना एका फोनवर गॅस मिळतो. हे स्पष्टपणे अन्यायकारक आहे.”
काही ग्राहकांनी तर आश्चर्य व्यक्त केले की, आपण बुकिंगच न करता आपल्या नावाने गॅस बुक झाल्याचे संदेश मोबाईलवर येत आहेत. त्यामुळे हा प्रकार फसवणूक आणि ‘गॅस चोरी’चाच एक भाग असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
अस्मिता अस्मिता गॅस व विनय गॅस एजन्सी अनुक्रमे दोन्ही गॅस एजन्सी मालक नम्र असल्याने या संदर्भात नागरिकांनी गॅस एजन्सी मालकांकडे तक्रारी केल्या असता, काही वेळा मालक तत्काळ सेवा देतात, त्यामुळे बहुतेक वेळा नागरिक एजन्सी मालकाशीच संवाद साधताना दिसत आहे मात्र बहुतांश प्रकरणांत कामगारांच्या मनमानीवर कारवाई होत नाही.
> “गॅस ही प्रत्येक घराची मूलभूत गरज आहे. पण एजन्सीतील काही कामगार स्वतःच्या फायद्यासाठी जनतेची फसवणूक करत आहेत. पुरवठा शाखेने यावर तात्काळ लक्ष देऊन चौकशी करावी.”
स्थानिक नागरिक आणि ग्राहक संघटनांनी इंदापूर तालुका पुरवठा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून गॅस वितरण प्रणाली पारदर्शक करण्याची मागणी केली आहे.
> “बँक खात्यातून पैसे चोरी झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या, पण आता गॅसचीही चोरी सुरू झाली आहे,” असा संतप्त स्वर नागरिकांमधून उमटतो आहे.

Comments
Post a Comment