"सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने....! श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई शेख यांचा आज ५६ वा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांच्या कार्यांविषय हा थोडासा आलेख....! आज शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते "शौकतभाई शेख" यांचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्म बुधवार दि.३० ऑगस्ट १९६७ रोजी झालेला असून आज ते आपल्या वयाची ५६ वर्ष पुर्ण करुन ५७ व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्यांनी १९८४ साली आपल्या वयाच्या १६ व्या वर्षीच पत्रकारीतेत पाऊल टाकले, १९८५ / ८६ साली एका साप्ताहिकाचे सहसंपादक पद भुषविले,१९८९ साली राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांच्या साप्ताहिक भडकत्या ज्वाला चे अस्तगांव परिसर प्रतिनिधीत्व केले, १९९२ साली प्रथमच ते दक्ष पोलिस समाचार या साप्ताहिकाचे संपादक झाले, पुढे दैनिक विजयसत्ता,साप्ताहिक प्रशासक, साप्ताहिक पद्मश्री,असे विविध वर्तमानपत्राचे त्यांनी संपादन केले आहे,आणी सन २०१० साली प्रथमच शिर्डी शहरातून त्यांनी दैनिक साईसंध्या नामक सायं दैनिकाची सुरुवात केली. सध्या दै.साईल...