गॅस एजन्सीतील कामगारांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिक ‘गॅसवर’; इंदापूरकर त्रस्त! गॅस एजन्सीतील कामगारांची ‘चहापेक्षा किटली गरम’; !
गॅस एजन्सीतील कामगारांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिक ‘गॅसवर’; इंदापूरकर त्रस्त! गॅस एजन्सीतील कामगारांची ‘चहापेक्षा किटली गरम’; ! इंदापूर प्रतिनिधी – जावेद शेख) इंदापूर शहरातील नागरिकांना घरगुती गॅस मिळवणे म्हणजे आता एक मोठे आव्हान ठरत आहे. गॅस एजन्सीतील काही कामगारांच्या मनमानी व बेफिकीर कार्यपद्धतीमुळे नागरिकांना गॅससाठी अक्षरशः “गॅसवर बसण्याची” वेळ आली आहे.तर नागरिकांचा ‘धैर्याचा गॅस’ संपणार हे निश्चित! गॅस एजन्सीतील कामगारांची मनमानी; सामान्य ग्राहक त्रस्त – ‘तुम घर कब आओगे’ स्थिती! इंदापूर शहरात गॅस एजन्सींच्या कामकाजात “चहापेक्षा किटली गरम” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गॅस एजन्सीतील कामगारच मालकांपेक्षा जास्त प्रभावशाली बनले असून, त्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना गॅससाठी अक्षरशः वाट बघत बसावे लागत आहे. शहरातील अस्मिता गॅस एजन्सी आणि विनय गॅस एजन्सी या दोन प्रमुख एजन्सींमधील काही कामगार ग्राहकांना दुर्लक्षित करून व्यावसायिक हॉटेलधारक व व्यापाऱ्यांना चढ्या भावाने गॅस पुरवत असल्याचे समोर आले आहे. या मनमानीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले असून, “आम्ही ऑनलाईन गॅस ...