पुण्यातून लोकसभेसाठी एम आय एम पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर. गेल्या पंचवीस वर्ष पुण्यातील राजकारणात सक्रिय असलेले. अनिस सुंडके एमआयएम पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्या होत्या. गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे येथील राजकारणात सक्रीय असलेले अनिस सुंडके यांची आज 16/04/2024 रोजी औरंगाबाद येथे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुदुल मुस्लिमिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची निवडणूक प्रचारासाठी आले होते. याच दरम्यान झालेल्या जाहीर सभेत पुणे लोकसभा मतदारसंघ येथून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी औरंगाबाद व पुणे येथील अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. खासदार ओवेसी यांनी सांगितले की आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकत...