Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी बंटीभाऊ सोनवणे*

 *डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी बंटीभाऊ सोनवणे*      (प्रतिनिधी इंदापूर) : इंदापूर येथील डॉ.आंबेडकर नगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे २०२४-२५ या वार्षिक कालावधी साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कार्यकारिणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते बुद्धांच्या मुर्तीला पुष्प तर डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.       डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती इंदापूर शहर अध्यक्ष पदी सामाजिक युवक कार्यकर्ते बंटीभाऊ सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा आरपीआयचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, प्रा.अशोक मखरे, जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मखरे, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते हनुमंत कांबळे, प्रा.बाळासाहेब मखरे, पुणे जिल्हा आरपीआयचे चिटणीस संदिपान कडवळे, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुहास मोरे, अनिल साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी जयंती महोत्सव सोहळा स...

*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ एप्रिल १९३७ रोजी उद्घाटन केलेल्या विहिरीच्या सुशोभिकरणाच्या कामाचा आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ…*

 *भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ एप्रिल १९३७ रोजी उद्घाटन केलेल्या विहिरीच्या सुशोभिकरणाच्या कामाचा आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ…* सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व प्राप्त असलेल्या वळसंग गावातील विहिर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.   दलित बांधवांनी स्वातंत्र्यपूर्व काळात वळसंग गावातील या विहिरीचे स्वतः खोदकाम केले होते. वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतरच या विहिरीचे पाणी प्यायचे असा निर्धार देखील त्यांनी केला होता. या नंतर  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २४ एप्रिल १९३७ रोजी या विहिरीचे उद्घाटन केले होते. अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपल्या सगळ्यांचेच कर्तव्य आहे असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी केले. यावेळी माजी पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी गट नेते संयोजक श्री. आनंद चंदनशिवे, जीएम ग्रुपचे संस्थापक श्री. बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी ...

मामा तुम्ही आमचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला म्हणत नगरपालिका कर्मचारी यांनी आमदार भरणे यांना भरविला पेढा*

 *मामा तुम्ही आमचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला म्हणत नगरपालिका कर्मचारी यांनी आमदार भरणे यांना भरविला पेढा*  (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) इंदापूर  नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावर कायम करण्याचा प्रश्न, मागील २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता. यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्यानंतर या ६४ कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याचे उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी अद्यादेश काढला आहे. यानंतर या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी आमदार भरणे यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बोलताना नगरपरिषद कर्मचारी सुरेश सोनवणे म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षापासून आमचा कामगारांचा प्रश्न प्रलंबित होता, आदरणीय आमदार दत्तात्रय भरणे यांनी तो प्रश्न सुलभतेने आणि चांगल्या पद्धतीने सोडवला आहे. त्याबद्दल नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. या सोबतच आम्ही कर्मचारी तुम्हाला कायमस्वरूपी कधीही विसरणार नाही म्हणत या कर्मचाऱ्य...

इंदापूर नगरपालिकेचा स्वच्छतेचा ठेका अस्वच्छच

 लाखो करोडो रुपये टॅक्स देणाऱ्या इंदापूर नगर परिषदेच्या गाळ्याकडे इंदापूर नगर परिषदेचे दुर्लक्ष स्वच्छता अभावी इंदापूर नगर परिषदेचे गाळे  बनले मुतण्याचे व शौचालय करण्याचे स्थान इंदापूर  नगरपालिकेचा स्वच्छतेचा ठेका अस्वच्छच देशात स्वच्छता बाबतीत पारितोषिक  पटकावणारी इंदापूर नगरपरिषदेच्या गाळ्यात अस्वच्छतेच्या बाबतीत विश्वात प्रथम क्रमांक (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) इंदापूर नगर परिषदेचे इंदापूर तहसील कार्यालय शेजारी  गाळे असून या ठिकाणाहून इंदापूर नगरपरिषदेला वर्षाकाठी लाखो करोड रुपये टॅक्स मिळत असून परंतु इंदापूर नगरपरिषद फक्त टॅक्स गोळा करण्यापूर्वीच मर्यादित राहिले का असे समस्त गाळेधारक बोलू लागले आहे.  कारण इंदापूर नगरपरिषद याकडे इतर वेळेस ढुंकूनही   पाहत नसल्याचे एक भयानक चित्र  समोर आलेले आहे. कारण इंदापूर नगर परिषदेच्या या गाळ्याची एखाद्या शौचालय अथवा मुतारी पेक्षा वाईट परिस्थिती झालेली आहे. परंतु येथील गाळेधारक मोकाटपणे इंदापूर नगरपरिषदेचा अन्याय सहन करताना दिसत आहे. इंदापूर नगर परिषदेचे गाळधारकाने भाडे न भरल्यास इंदापूर नगरपरिषद भले ...

*"सहकुटुंब आत्मदहन : पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे फक्त दोनच दिवसात मी माझी पत्नी आणि एकुलता एक मुलगा आम्ही आत्मदहन करणार आहोत "* अशा आशयाचे कदम कुटुंबाचे लेखी व्हायरल

 *"सहकुटुंब आत्मदहन : पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे फक्त दोनच दिवसात मी माझी पत्नी आणि एकुलता एक मुलगा आम्ही  आत्मदहन करणार आहोत "* अशा आशयाचे कदम कुटुंबाचे लेखी व्हायरल (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) इंदापूर पोलीस स्टेशन समोर हनुमंत कदम हे आपल्या मागण्यासाठी  आमरण उपोषणाला बसलेले असून 8 दिवस झाले त्यांच्या अमरण उपोषण ला काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांच्या पत्नी सौ मनीषा हनुमंत कदम वय 40 वर्षे राहणारा गलांडवाडी नंबर 1 तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सो कोल्हापूर यांना दिलेल्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की आमच्या कुटुंबावर इंदापूर पोलीस स्टेशन व संबंधित आरोपीकडून वारंवार अन्याय होत असल्याने दिनांक 19/ 2 /2024 पासून माझे पती हनुमंत कदम हे इंदापूर पोलीस स्टेशन येथे( 8 )आठ दिवस झाले आमरण उपोषणाला बसले असून आरोपीचा बचाव करण्यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून आपल्या अधिकाराचा व फौजदारी बाळाचा गैरवापर करून  माझे  पतीस छळ करीत असल्याचे त्याबाबत माझे पतीचे आपणास  दिनांक 22 /2/ 2024 रोजी ...