Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

उद्या इंदापूर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थिती मध्ये होणार भव्य कार्यकर्ता व शेतकरी मेळावा संपन्न. लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याच्या आव्हान

  इंदापूर प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी,कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभेचे आयोजन रविवारी (दि. २५) करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, युवक अध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, दत्तात्रय बाबर या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. गारटकर म्हणाले की, सकाळी दहा वाजता पोलीस ठाण्यासमोरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा कार्यक्रम होणार आहे. आ.दत्तात्रय भरणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी ते कायम ठाम व ठोस भूमिका घेतात याचा इंदापूरकरांना जुना अनुभव आहे. दीर्घ कालावधीनंतर व बऱ्याच घडामोडी घडून गेल्यानंतर पवार इंदापूरात येत आहेत. संपूर्ण घडामोडींबाबतची आपली व पक्षाची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. त्याचबरोबर इंदापूर तालुक्याच्या भावी काळात विकासाच्यासंदर्भातही ते भाष्य करणार आहेत. ...

*निरा डाव्या कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी यापुढील काळात उन्हाळी हंगामातील दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. तर नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून येत्या चार मार्चपासून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.*

 *निरा डाव्या कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी यापुढील काळात उन्हाळी हंगामातील दोन आवर्तने सोडली  जाणार आहेत. तर नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून येत्या  चार मार्चपासून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.* आज पुणे येथे पालकमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रेय भरणे  आमदार राहुल  कुल,कार्यकारी संचालक अतुल कपोले पुणे पाटबंधारे विभागाचे  अभियंता श्री गुलाने सर अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप  कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे  पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार सर जिल्हाधिकारी  सुहास दिवसे व इतर पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते. आम्दार भरणे  यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तन सोडण्यात यावे अशी आग्रही  मागणी बैठकीत केली यावेळी बैठकीत केली  यावेळी उन्हाळी हंगामातील पहिले  आवर्तन संपल्यानंतर खडकवासला प्रकल्पातील पाण्याचा अंदाज घेऊन श्री भरणे यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तन उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल  अ...

चव्हाणवाडी - बंबाडवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे स्थानिक नागरिकांचा आरोप शिवराज्य शेतकरी विकास मंच या विरोधात रास्ता रोको करणार

 चव्हाणवाडी - बंबाडवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे  स्थानिक नागरिकांचा आरोप शिवराज्य शेतकरी विकास मंच या विरोधात रास्ता रोको करणार (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) चव्हाणवाडी - बंबारवाडी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम भिगवन यांच्या अधिपत्याखाली असलेला 50 लक्ष रुपये किमतीचा रस्ता हा माती मिश्रित असून तो निकृष्ट दर्जाचा असून या रस्त्याची क्वालिटी ऑफ कंट्रोल मार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदार वाबळे सह भिगवन सार्वजनिक अभियंताा  यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी ही मागणी राज्यपाल यांच्याकडे शिवराज्य शेतकरी विकास मंचचे पुणे जिल्हा अध्यक्ष व स्थानिक रहिवासी गुणवंत हनुमंत दळवी यांनी लेखी निवेदनात मार्फत केलेले असून सदर हा रस्ता नियमाप्रमाणे इस्टिमेट प्रमाणे 33 फुटाचा असून संबंधित ठेकेदाराने हा लोकांची तोंडी पाहून काही ठिकाणी 15 फूट तर काही ठिकाणी 18 फूट काही ठिकाणी 20 फूट तर काही ठिकाणी 14 फूट असा तयार केलेला आहे .एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय आता ठेकेदारही राजकीय पक्ष चालू लागले असेही या ठिकाणी स्थानिक नागरिक बोलत आहे.  सदर हा रस्ता राज्यभ...

पुणे-बेंगलुरु महामार्गालगतच्या दुष्काळी गावातील जमिनी सरकारने भूसंपादित करून तलावे/ डॅम तयार करण्याचीॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांची मागणी

  पुणे-बेंगलुरु महामार्गालगतच्या दुष्काळी गावातील जमिनी सरकारने भूसंपादित करून तलावे/ डॅम तयार करण्याची ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांची मागणी  पुणे-बेंगलुरु ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे (राष्ट्रीय महामार्ग) ला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यातून दुष्काळी ६ तालुक्यातून जातो. हे ६ तालुके पर्जन्यछायेतील भाग असल्याने येथे सतत दुष्काळ असतो. म्हणून मा. नितीन गडकरी साहेब, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी देशाच्या संसदेत व बाहेर पण असे आवाहन केले आहे की, ज्या भागातून राष्ट्रीय महामार्ग जाईल त्यांच्या शेजारील गावांनी जमीन उपलब्ध करून दिली तर त्या ठिकाणी डॅम/तलाव फुकट तयार करून दिला जाईल. म्हणून केंद्र व राज्य सरकारला विनंती आहे की, ठराविक रक्कम केंद्राने व ठराविक रक्कम राज्य सरकारने देऊन या दुष्काळ भागातील जमिनी खरेदी कराव्यात. किंवा राज्य सरकारने सरकारी गायरान, वनविभागाच्या किंवा स्वतः जमिनी भूसंपादित कराव्यात, किंवा मा. जिल्हाधिकारी साहेबांना विनंती की, ज्या भागातून महामार्ग जात आहे त्यांच्या १० ते २० किल...