*उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने हेल्मेट रॅली व रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ*
*उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने हेल्मेट रॅली व रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ* *हेल्मेट व स्वयंशिस्त हाच एकमेव* *पर्याय - न्यायाधिश श्री.एन.के खराडे* श्रीरामपूर प्रतिनिधी: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला यावेळी न्यायाधीश श्रीरामपूर श्री.एन.के.खराडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करत उपस्थित अधिकारी यांना शुभेच्छा व्यक्त करून शासनाच्या विविध नियमाचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले तसेच वाहन चालक यांनी नेत्र तपासणी करावी तसेच प्रवासापूर्वी आपल्या वाहनाची तांत्रिक स्थिती म्हणजे वाहनांचे टायर प्रेशर, टायर कंडिशन, कुलंट, इंजिन ऑईल, पुरेसे इंधन असल्याची खात्री करावी तसेच वाहनाचे इंडिकेटर व हॉर्न सुस्थितीत असल्याचे खातरजमा करावी. वाहनाची समोरची व मागची काच स्वच्छ ठेवावी, वाहनात अग्निरोधक यंत्र, प्रथमोपचार पेटी असल्याची खात्री करावी तसेच संकट काळात बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन दरवाजा कार्यरत असल्याची खात्री करावी व मद्य प्राशन करून वाहन चालवु नये, लेनची शिस्त पा...