नेहमीच अनेकांना प्रसिद्धी देत जातो !* *अन् प्रसिद्धी देणाराच उपेक्षित राहतो !!* *प्रसिद्धी पावणारे या उपेक्षित* *घटकांचा विचार करणार का ?* *यथाशक्ती जाहिरात स्वरुप कधी* *मदतीचा हात पुढे धरणार का ?*
*नेहमीच अनेकांना प्रसिद्धी देत जातो !* *अन् प्रसिद्धी देणाराच उपेक्षित राहतो !!* *प्रसिद्धी पावणारे या उपेक्षित* *घटकांचा विचार करणार का ?* *यथाशक्ती जाहिरात स्वरुप कधी* *मदतीचा हात पुढे धरणार का ?* हल्ली विविध डिजिटल प्रसार माध्यमे मोठ्या प्रमाणात आगेकुच करत आहे,त्यात दैनिके, सांयदैनिके,साप्ताहिक पाक्षिक, मासिके वर्तमानपत्रांसोबत ईपेपर्स/ न्यूज पोर्टल्स/स्थानिक वृत्त वाहिन्या / वेब पोर्टल्स अशी अनेक प्रसार माध्यमे ही मार्केट मध्ये प्रचंड प्रमाणात आगेकुच करत असताना आजच्या युगात क्षणात जगाची खबर- बातमी मानसाला आपल्या मोबाईलवर प्राप्त होत आहे. मात्र विविध प्रसार माध्यमातून मोबाईलवर आलेल्या बातम्यांमध्ये जी सत्यता असते ती इतर व्यक्तीगत कोणी व्यक्तीश: टाकलेल्या बातम्यांत नसते,त्यावर विश्वास करुन खरे मानण्यात अर्थही नसतो, कारण शासनमान्य नोंदणीकृत प्रसार माध्यमांना जबाबदारी असते म्हणून ते जबाबदारीनेच वृत संकलित आणि प्रकाशित करतात,याकरीता कधीही प्रिंट मिडियातील (प्रिंट केलेले वर्तमानपत्र) सत्यता ही परिपूर्ण मानली जाते, शिवाय अधिकृत न्यूज पोर्टल्स आणि अधिकृत वृत्तवाहिन्या / वेब पोर्...