अनिल पवार म्हणजे गोरगरिबाला मदत करणारा प्रामाणिक माणूस- तहसीलदार श्रीकांत पाटील आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते संपन्न. आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४८२ बॅग रक्त संकलन तर ७०० च्या वरती नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ इंदापूर तालुका प्रतिनिधी: आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४८२ बॅग रक्त संकलन झाले असून ७०० च्या वरती नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे. आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते अनिल (आण्णा) पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त इंदापूर शहरांमध्ये भव्य आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप पवार , सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार ,वैद्यकीय सेवेतील नामवंत डॉक्टर मिलिंद खाडे, रोहिदास थोरवे, यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्...