पुणे शहरात 'आयसीयूचा' बेड शिल्लक नाही, पालकमंत्री अजित पवार भानावर या - उमेश चव्हाण पुणे 08 ऑक्टो.- संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या पाच दिवसात हजारो अत्यवस्थ रुग्ण निर्माण झालेले आहेत. पुणे शहरातील कुठल्याच हॉस्पिटलमध्ये सध्या 'आयसीयू'चा बेड शिल्लक नाही, अशा पद्धतीची भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना पालकमंत्री अजित पवार देवदर्शनामध्ये आणि जेसीबीतून होणारी फुलांची उधळण अंगावर घेण्यात, स्वागत सत्कार आणि हार-तुरे स्वीकारण्यामध्ये गुंतलेले दिसतात. राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोणीही जायला तयार नाही. पुणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 'आयसीयू'ची व्यवस्था नाही. अशावेळी खाजगी हॉस्पिटल मधले आयसीयू विभागातील बेड शिल्लक राहिलेले नसताना अजित पवार यांचे 'रोगराई' पसरलेल्या पुण्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते, त्यामुळे 'पालकमंत्री अजित पवार तुम्ही भानावर या!' अशी टीका रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली. परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मु...