*गोंधळी समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला..* दिनांक 15/ 8 /2023 रोजी वंचित बहुजन आघाडी, पुणे जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष मा. राज यशवंत कुमार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व तालुकाध्यक्ष मा.मनोज साबळे साहेब, तालुका प्रसिद्धिप्रमुख मा.राहल काबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर शहर वंचित बहुजन आघाडी ची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी इंदापुर शहर मधील "गोंधळी" समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये श्री. प्रकाश माने, रोहित माने, संदीप माने, निखिल माने, समर्थ वाघमारे, सुजित माने व इतर सहकारी यांनी जाहीर प्रवेश केला. सदर बैठकीस शहर अध्यक्ष सुभाष खरे, उपाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे, महासचिव अजय साळुंखे, सहसचिव राहुल गुंजवटे, सल्लागार ज्ञानदेव(भाऊ) ढगे, संघटक राजेंद्र (आण्णा) साबळे व पदाधिकारी तसेच उमेश मखरे, केवल मखरे, बाळासाहेब गायकवाड,अमित चंदनशिवे, सागर शिंदे, अमन गायकवाड, जॉन सोनवणे, रोहित माने, अमित शेटे पाटील, राजेंद्र कडवळे, मंगेश राऊत, संजय भोंग, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.