*भोई समाज बांधवांच्या विकासासाठी कटीबध्द - आमदार दत्तात्रय भरणे* *नारळी पोर्णिमेनिमित्त आजोती येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन.* बौद्ध विहार परिसरात संरक्षक भिंत बांधणे या कामाचा भूमिपूजन करण्यात आले... इंदापूर तालुक्यातील माझा भोई समाज बांधव अत्यंत प्रामणिक असुन मत्स्यमारी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे.त्यामुळे मत्स्यमारी व्यवसायाला भेडसवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कायम कटीबद्ध असल्याची ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आजोती ता.इंदापूर येथे नारळी पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भोई समाज बांधवांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते.यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते उजनी जलाशयामध्ये नारळ वाढवून जलपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला,या प्रसंगी आ.भरणे बोलत होते.ते म्हणाले की,उजनी जलाशयाचा विस्तीर्ण भुभाग आपल्या इंदापूर तालुक्याला लाभला असल्यामुळे समृद्ध शेतीबरोबरच मत्स्यमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असल्या कारणाने हजारो कुटूंबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध असून या भागातील असंख्य भोई समाज बांधवांचा प्रपंच म...