Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

*सामान्य माणूस केंद्रबिंदु माणून प्रशासकीय सेवा करावी-दत्तात्रय भरणे* इंदापूर तालुक्यातील अनेक होतकरू तरूण-तरूणी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत असून त्यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदु माणून गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी आपल्या पदाचा वापर करावा,असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.सपकळवाडी ता.इंदापूर येथील श्री.किरण शंकर सपकळ यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल आज त्यांचा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी आमदार भरणे बोलत होते.ते म्हणाले की,आपल्या इंदापूर तालुक्यातील असंख्य तरूण-तरूणी विविध स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अतिशय खडतर प्रवासातून मोठ-मोठ्या पदावर विराजमान होऊन उत्तम पद्धतीने प्रशासकीय सेवा बजावत आहेत.त्यामुळे आपल्या इंदापूरचा नावलौकीक वाढत असून अलीकडच्या काळामध्ये तर इंदापूर तालुक्यातील शेकडो परीक्षार्थी गुणवत्ता यादीत चमकत आहेत.यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी कुटूंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.त्यामुळे आता शहरातील युवकांबरोबरच आमच्या ग्रामीण भागातला युवकही स्पर्धा परीक्षांमध्ये बरोबरीने यश संपादन करत असल्याने याचा निश्चितपणे आनंद असून किरण तु ही प्रशासकीय सेवा बजावताना नेहमी सामान्य माणसाचे हित जोपासून गोरगरिबांची सेवा कर,अशा प्रकारच्या शुभेच्छा आमदार भरणे यांनी श्री.सपकळ यांना दिल्या.या प्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे,छत्रपतीचे माजी व्हा.चेअरमन बाळासाहेब पाटील,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ,सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर,तुषार सपकळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 * सामान्य माणूस केंद्रबिंदु माणून प्रशासकीय सेवा करावी-दत्तात्रय भरणे* इंदापूर तालुक्यातील अनेक होतकरू तरूण-तरूणी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत असून त्यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदु माणून गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी आपल्या पदाचा वापर  करावा,असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.सपकळवाडी ता.इंदापूर येथील श्री.किरण शंकर सपकळ यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल आज त्यांचा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी आमदार भरणे बोलत होते.ते म्हणाले की,आपल्या इंदापूर तालुक्यातील असंख्य तरूण-तरूणी विविध स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अतिशय खडतर प्रवासातून मोठ-मोठ्या पदावर विराजमान होऊन उत्तम पद्धतीने प्रशासकीय सेवा बजावत आहेत.त्यामुळे आपल्या इंदापूरचा नावलौकीक वाढत असून अलीकडच्या काळामध्ये तर इंदापूर तालुक्यातील शेकडो परीक्षार्थी गुणवत्ता यादीत चमकत आहेत.यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी कुटूंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण  अधिक आहे.त्यामुळे आता शहरातील युवकांबरोबरच आमच्या ग्रामीण भागातला युवकही स्पर्धा पर...

इंदापूरला रस्ते व इमारतींच्या बांधकामाकरिता १४४ कोटींचा निधी...*..

 *इंदापूरला रस्ते  व इमारतींच्या बांधकामाकरिता १४४ कोटींचा निधी...*.. *आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती*           इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १७ रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या विशेष रस्ते दुरुस्ती व अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल १४४ कोटी ४ लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती माजीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून यापैकी काही कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत.तर काही कामे निविदा स्तरावर असल्याचे सांगण्यात आले आहे.                     इंदापूर तालुक्यातील जवळपास प्रमुख जिल्हा मार्गांची कामे गेल्या काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहेत.दरम्यान या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असते.प्रामुख्याने उसाची मोठी वाहतूक होत असल्याने या रस्त्यांना प्राधान्याने निधी देण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून रस्ते व पुल परीक्षण व दुरुस्ती कार्यक्रम २०२१ - २२ व २०२२ - २३ या दोन आर्थिक वर्षात मिळून जवळपास ९८ कोटींचा निधी मंजूर करून आणला...

अन् क्षणार्धात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच बनले उद्घाटक...* *आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कृतीचे सर्वत्र होतेय कौतुक....*

 *अन् क्षणार्धात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच बनले उद्घाटक...*  *आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कृतीचे सर्वत्र होतेय कौतुक....* आमदार दत्तात्रय भरणे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेच्या केंद्रस्थानी कायम असतात.सार्वजनिक जिवनात काम करत असताना त्यांनी सातत्याने आपल्या साधेपणाचा आणि अनोख्या कार्यशैलीचा आदर्शवाद समाजाला घालून दिला आहे.आजमितीच्या गावगाड्यातील शेवटच्या माणसाबरोबर २४ तास थेट संपर्कात असणा-या आमदार भरणे यांच्यासारखा दांडगा जनसंपर्क उभ्या महाराष्ट्रात अपवादात्मकच पहायला मिळेल. आज आमदार भरणे यांचा असाच एक अनोखा अंदाज तालुकावासियांना पहायला मिळाला.त्याचे झाले असे की,आ.भरणे यांनी नुकतीच जलसंधारणाच्या विभागाच्या सुमारे ५० कोटीच्या विकासकामांवरील स्थगिती उठविण्यामध्ये यश मिळवले आहे.या कामांचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी १०:०० वाजता करण्याचे योजिले होते.या विषयी गावोगावच्या कार्यकर्त्यांना सदरील कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना आमदार भरणे यांच्याकडून दोन-चार दिवसांपूर्वी मिळाल्या होत्या.त्यामुळे कार्यकर्त्यांनीही उद्घाटन फलक तसेच ठिकठिकाणी आमदार भरणे यांचे स्वागताचे फ्लेक्स ल...

*संत- महंतांनी अखंड मानवजातीला जगण्याचा मार्ग दाखवला- माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे*

 *संत- महंतांनी अखंड मानवजातीला जगण्याचा मार्ग दाखवला- माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे*  *निमगाव केतकी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन,आ.भरणे यांच्या कडून २५ लाख निधीची घोषणा.*  आपला महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी असून त्यांनी दिलेली शिकवण आपण आत्मसात केल्यास प्रत्येकाचे जगणं समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही,हा विश्वास माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमगाव केतकी येथे बोलताना व्यक्त केला. आज निमगाव केतकी ता.इंदापूर येथे संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी आमदार भरणे बोलत होते.या प्रसंगी त्यांनी संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले.तसेच उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की,आपल्या महाराष्ट्राला साधू-संतांचा खूप मोठा अध्यात्मिक वारसा लाभला असून संत-महंतांनी अखंड मानवजातीला जगण्याचा मार्ग दाखवला असल्याचे सांगत या ठिकाणी गेल्या ३३ वर्षांपासून निमगावकरांनी अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू ठेवल्या बद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.त्याच बरो...

अजितदादा सत्तेत सहभागी होताचं,दत्तामामांचा धमाका सुरू.. पहिल्या झटक्यात जलसंधारणाच्या ५० कोटींच्या विकासकामांची स्थगिती उठवली

 अजितदादा सत्तेत सहभागी होताचं,दत्तामामांचा धमाका सुरू..  पहिल्या झटक्यात जलसंधारणाच्या ५० कोटींच्या विकासकामांची स्थगिती उठवली (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असताना इंदापूर तालुक्यामध्ये निधीचा अक्षरशः महापुर आणला होता.निधी कुठून कसा आणायचा! यामध्ये तरबेज असणाऱ्या आमदार भरणे यांनी विविध विभागाच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी खेचून आणत विकास कसा करावा हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले होते. महाविकास आघाडी सरकार असताना निधीच्या बाबतीमध्ये इंदापूर तालुका उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व  तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून दर आठवड्याला कोटींच्या कोटी उड्डाणे घेत होता परंतु अचानक एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत भाजपशी घरोबा करत महायुतीचे सरकार स्थापन केले आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाला ब्रेक लागला.खरे तर दत्तात्रय भरणे राज्यमंत्री असताना विकास कामांमध्ये कधीही भेदभाव न करता सरसकट निधी मंजूर करत होते परंतु शिंदे फडणवीस सरकारने महाव...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रदीपदादा गारटकर यांचा शाल नारळ व हार देऊन सत्कार

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल   प्रदीपदादा गारटकर यांचा शाल नारळ व हार देऊन सत्कार (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब,इंदापुर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  प्रदीपदादा गारटकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या बरोबर जाण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत प्रदीपदादा गारटकर यांना पुष्पगुच्छ देऊन पाठींबा दर्शवला. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल   माजी नगराध्यक्ष विठ्ठल (आप्पा ) ननवरे,माजी नगराध्यक्ष सुरेश (नाना ) गवळी, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे,यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांना शाल नारळ व हार देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालय कंत्राटी कामगार भरतीत पूर्वीच्या करोना काळात काम केलेले व होतकरू / गरजू या कामगारांना संधी द्यावी .. मा. प्रकाश ( पप्पूशेठ ) पवार . इंदापूर शहराध्यक्ष मौर्य क्रांती संघटना .

 इंदापूर उपजिल्हा रुग्णालय कंत्राटी कामगार भरतीत पूर्वीच्या करोना काळात काम केलेले व होतकरू / गरजू या कामगारांना संधी द्यावी .. मा. प्रकाश ( पप्पूशेठ ) पवार . इंदापूर शहराध्यक्ष मौर्य क्रांती संघटना . इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे कंत्राटी कामगार भरती निघाली असून काही दिवसात ते भरली ही जातील . ज्या कंपनीने हे कॉन्ट्रक्ट घेतले आहे  हे कंत्राटी कामगार भरण्याचे त्यांने सर्व प्रथम जे पूर्वी करोनाच्या काळात व काही वर्ष उपजिल्हा रुग्णालयात काम केले होते . त्यांच्या कामाने गोरगरीबाना सहकार्य / मदत ही झाली काही कामगारांना शहराच्या वतीने करोना योदधा म्हणून पुरुस्कार ही देण्यात आला होता . त्यांचे काम विचारात घेऊन त्यांना या भरतीत प्राधान्य देण्यात यावे . या अगोदर अशीच कंत्राटी भरती पूर्वी झाली होती . त्या भरतीत बरीच अपार टपरी झाली होती . नेते मंडळी / पैशावर भरती करू नये . जर अशी भरती झाली तर बऱ्याच कामगारांन वर अन्याय होईल . वशीला / पैसा याने भरती केल्याने ते लोक उपजिल्हा रुग्णालयात काम करू शकत नाही व गोरगरीबाना सेवा देऊ शकत नाही . म्हणून गरजू / होतकरू लोकांना प्राधान्य द्यावे .. पूर्व...