फलटण तालुक्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या व तालुका कोर्टाची अद्यावत स्वरूपाची सर्व समावेशक इमारत उभारणेबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.*
*फलटण तालुक्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या व तालुका कोर्टाची अद्यावत स्वरूपाची सर्व समावेशक इमारत उभारणेबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.* (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) फलटण, जिल्हा सातारा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली त्यासाठी प्रथम आपल्या सर्वांचे आभार. सध्याचे तालुका कोर्ट हे फलटण येथे विमानतळा नजीक आहे. तिथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी लागणारी जागा मुबलक प्रमाणात नाही. कारण - या ठिकाणी विमानतळ नजीक असले कारणाने या इमारतीवर मजले वर चढविता येत नाहीत व ही जागा ही तशी अपुरी /कमी आहे. सध्या फलटणमध्ये एकूण ७ बेंच आहेत (मा.न्यायाधीश साहेब आहेत). त्यांना बसण्यासाठी एका ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे ४ बेंच फलटण कोर्टाच्या इमारतीत तर बाकी ३ बेंच हे तहसील कार्यालयाच्या वरती आहेत. या दोन्ही कोर्टांच्या ठिकाणांमधील अंतर हे साधारण 300 मीटर पेक्षा जास्तच आहे. त्यामुळे सर्वच नागरिक/ पक्षकारांची व वकिलांची तारांबळ उडते. जामीनाचा अर्ज एका ठिकाणी तर त्याची पूर्तता ही दुसऱ्या ठिकाणी ही कोणती न्यायदानाची पद्धत? ज...