इंदापूर - रेडा- बोराटवाडी एसटी बंद असल्याने विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक व रुग्णासह प्रवाशांची मोठी गैरसोय
इंदापूर - रेडा- बोराटवाडी एसटी बंद असल्याने विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक व रुग्णासह प्रवाशांची मोठी गैरसोय प्रवाशांना निमगाव केतकी, वडापुरी, वकील-वस्ती, बावडा दहा ते पंधरा किलोमीटर करावे लागते प्रवासासाठी पायपीट | इंदापूर तालुका प्रतिनिधी:दि.१८ इंदापूर - रेडा - बोराटवाडी ही एसटी बस सेवा आठ दिवसापासून बंद असल्याने पंधार-वस्ती, काटी , जाधववाडी, रेडा, रेडणी, बोराटवाडी तसेच खोरोची, शहाजीनगर अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंदापूर सारख्या ठिकाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज, आयटीआय व विविध शिक्षणासाठी, कोर्सेससाठी जाण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. विद्यार्थी आणि अनेक नागरिकांनी लेखी अर्ज देऊन सुद्धा इंदापूर बसस्थानक , डेपो मॅनेजर यांनी त्या अर्जाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा असून मनमानी कारभार चालला असल्याचे बोलला जात आहे.सदर इंदापूर बस स्थानकाचे डेपो मॅनेजर हे उन्हाळी विद्यार्थी सुट्टीचे कारण देत उडवाउडवीची उत्तर देऊन नागरिकांची दिशाभूल करत असल्याची चर्चा आहे. नुकतचे महाराष्ट्र शासन यांनी महिलांसाठी ...