राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (सेक्युलर ) व मित्र पक्षाच्या वतीने कांद्याला हमी भाव मिळावा, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी वीज बील माफ करावे, विज तोड थांबवावे शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासह शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन
राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (सेक्युलर ) व मित्र पक्षाच्या वतीने कांद्याला हमी भाव मिळावा, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी वीज बील माफ करावे, विज तोड थांबवावे शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासह शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन शिरूर : कांद्याला हमी भाव मिळावा, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी वीज बील माफ करावे, विज तोड थांबवावे शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासह शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (सेक्युलर ) व मित्र पक्षाच्या वतीने पुणे नगर महामार्गावर शिरूर जवळ न्हावरेफाटा येथे केंद्रर शासन व महाराष्ट्र शासन यांचा निषेध करत महामार्गावर कांदे टाकून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिरूर नायब तहसीलदार महेश काळेगावकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे ,तालुका अध्यक्ष शिवाजी कु-हाडे, जिल्हा संघटक तान्हाजी शिंगाडे,जनता दल जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, शिवाजी खेडकर, रासपा नेते रामकृष्ण बिडगर, शिरूर -आबेगाव विधानसभा अध्यक्ष किरण श...