Skip to main content

Posts

Showing posts from January, 2023

भीमशक्तीच्यावतीने उदया पुणे सोलापूर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

 भीमशक्तीच्यावतीने उदया पुणे सोलापूर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख भीमशक्ती च्या वतीने इंदापूर तहसीलदार तथा तालुका कार्यकारीदंडाधिकारी इंदापूर जिल्हा पुणे यांना दिलेल्या निवेदनातअसे म्हटले आहे की इंदापूर तहसील कार्यासमोर दिनांक 23-1-2023 व 26 -1 -2023 म्हणजे प्रजासत्ताकच्या दिनांका पासून आमरण उपोषण चालू आहेत त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास उदया दिनांक दोन फेब्रुवारी 2023 म्हणजे गुरुवारी तारखेला पुणे सोलापूर रोड रस्ता रोको  आंदोलन करणार असल्याचेही भिम शक्तीच्या वतीने भिम शक्तीचे इंदापूर तालुका अध्यक्ष युवराज मामा पोळ यांनी इंदापूर तहसील कार्यालय यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की इंदापूर तहसील कार्यासमोर गेले 23-1-2023 व 26 -1 -2023 प्रजासत्ताक दिनाच्या पासून अमरण उपोषण चालू आहे हे उपोषण आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आहे. उपोषण करते दत्तात्रय आप्पाजी सूळ मुक्काम पोस्ट पोधेंवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांना बिल्ड ग्राफिक पेपर भिगवन तालुका इंदापूर जिल्...

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच वसंतराव पवार विधी महाविद्यालय बारामती आणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रम संस्कार शिबीर संपन्न*

 *विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच वसंतराव पवार विधी महाविद्यालय बारामती आणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रम संस्कार शिबीर संपन्न* बारामती - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना आणि  विद्या प्रतिष्ठान संस्थेचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय व वसंतराव पवार विधी महाविद्यालय, बारामती  यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, "युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास' या उपक्रमांतर्गत 'विशेष श्रमसंस्कार शिबिर मंगळवार दि. १७ जानेवारी ते सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ या कालावधीत मु.पो. देऊळगाव रसाळ ता. बारामती, जि. पुणे येथे मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाले. सदर शिबिराचा शुभारंभ प्राचार्य डॉ. अतुल रमाकांत शहाणे यांचे हस्ते तसेच मा. सरपंच सौ. वैशाली वसंतराव वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सात दिवसीय शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी पर्यावरण जागृती, मतदार जनजागृती, अन्न सुरक्षा जनजागृती, जल-संधारण, ग्राम-मंदिर स्वच्छता,  वृक्षारोपण, ग्...

नेहरू चौकातील गतिरोधक अपघात रोखण्यासाठी का अपघात करण्यासाठी ? नागरिकांचा प्रश्न

 नेहरू चौकातील गतिरोधक अपघात रोखण्यासाठी का अपघात करण्यासाठी ? नागरिकांचा प्रश्न (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) नेहरू चौक या ठिकाणी   चारीबाजूंनी रस्ता येत असल्यामुळे छोटे मोठे अपघात होत होते. त्यामुळे नागरिकांच्या मागणीला अनुसरून इंदापूर नगरपरिषदेने नेहरू चौक या ठिकाणी पाधांरा रोड व कासारपट्टा रोड या  ठिकाणांच्या रोडवर गतिरोधक बसवलेले आहे . इंदापूर नगरपरिषदेने हे गतिरोधक अपघात होऊ नये यासाठी बसवलेला आहे. परंतु वास्तविक परिस्थिती असे आहे की इंदापूर नगरपरिषदेने जपानच्या 4g पेक्षाही मोठा शोध लावून गतिरोधक असे बनवले आहे की ज्यामुळे अपघात कमी होण्याची नाही अपघात जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंदापूर नगर परिषदने बनवलेल्या या  गतिरोधकाला कसल्याही प्रकारचे दिशादर्शक पांढरे पट्टे दिलेले नाही . त्यामुळे रात्री अपरात्री हे गतिरोधक गतीरोधकापेक्षाही मोठे असे आडवे पाणी अडवल्यागत गतिरोधक टाकले आहे. त्यामुळे या ठिकाणावरून दोन चाकी यांना जाताना जीव  मुठीत धरून पुढे जावे लागत आहे.  रात्री अपरात्री  हा गतिरोधक block कलरचे असल्यामुळे तो लक्षात येत नाही त्या...

बारामती इंदापूर शटल बस फेऱ्या जादा वाढवण्याची मागणी

 बारामती इंदापूर शटल बस फेऱ्या जादा वाढवण्याची मागणी इंदापूर (प्रतिनिधी जावेद शेख)  इंदापूर बारामती शटल बस जादा वाढवण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष  अहमदरजा सय्यद यांनी केली आहे. अनेक विद्यार्थी बारामती या ठिकाणी शिक्षणासाठी ये जा करत असतात इदापूर डेपोच्या  अपुऱ्या बस वाहतुकीमुळे नागरिक सह विद्यार्थी यांना बारामती बस स्थानकावर वर दोन ते तीन तास अंदाजे ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इंदापूर बस डेपो ने इंदापूर बारामती शटलबस च्या  फेऱ्या वाढवाव्यात अशीही मागणी अहेमदरजा सय्यद यांनी केली आहे. बारामती एसटी डेपोच्या धर्तीवर इंदापूर बस डेपोने ही बारामती इंदापूर या शटल मार्गावर विद्यार्थी आणि नागरिकांची मागणी पाहता शटलबसच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी आणि अहेमदरजा सय्यद यांनी केली आहे. याप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडेही निवेदन देणार असल्याचेही अहमद रजा सय्यद यांनी सांगितले. बारामती लोकसभा च्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे व इंदापू...

निरवांगी येथे 10 MVA क्षमतेचे नविन विज उपकेंद्र मंजूर..* *दत्तात्रय भरणे यांची माहिती

  *निरवांगी येथे 10 MVA क्षमतेचे नविन विज उपकेंद्र मंजूर..* *दत्तात्रय भरणे यांची माहिती * निरवांगी येथील शेतकरी तसेच घरगुती,व्यवसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व विज ग्राहकांची नविन विज उपकेंद्र मंजूर करण्यासाठी सातत्याने मागणी होत होती.या मागणीचा पाठपुरावा केल्याने निरवांगी येथे 10 MVA क्षमतेचे नविन उपकेंद्र मंजूर झाले असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. या उपकेंद्रामुळे खोरोची,निरवांगी,निमसाखर, दगडवाडी,सराफवाडी व घोरपडवाडी या गावांना फायदा होणार असून योग्य दाबाने विज पुरवठा होण्यास मदत होणार आहे.यामुळे सततचे विद्युत रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी होणार असून विज ग्राहकांचा अनावश्यक खर्च वाचणार आहे.तसेच नविन विज जोडणी तात्काळ मिळणेकामी फायदा होणार आहे.यासाठी कृषी धोरण अंतर्गत जिल्हास्तरीय निधीतून मंजुरी देण्यात आली आहे. या निरवांगी उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकरी वर्ग, व्यवसायिक व औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. येथे 5MVA क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

*निरोगी शरीरासाठी नियमित योग करण्याची गरज असल्याचे मत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.*

 *निरोगी शरीरासाठी नियमित योग करण्याची गरज असल्याचे मत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.*  इंदापूर मध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव स्वामी विवेकानंद जयंती राजमाता जिजाऊ जयंती निमित्त पतंजली योग समितीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या योग शिबिराच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन भारत स्वाभिमानी न्यास समितीचे अध्यक्ष जयकुमार शिंदे पतंजली योग समितीचे इंदापूरचे अध्यक्ष मल्हारी घाडगे रवींद्र परबत बिबीशन खबाले प्रशांत गिड्डे सचिन पवार रामेश्वर साठे शरद झोळ उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की सांगितले की, पतंजली योग समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इंदापूर तालुक्यातील नागरिकांना मोफत योग प्रशिक्षणाचे धडे देण्याचे काम पतंजली योग समिती करत आहेत. नियमित योगामुळे मनुष्याचे शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असल्याने नागरिकांनी नियमित योग करण्याचे आवाहन यांनी केले.

क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने उत्साहात साजरी!

 क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने उत्साहात साजरी! पुणे - क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांचा विजय असो! महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे! अशा पद्धतीच्या घोषणा देत महात्मा फुले वाडा येथे जयंती साजरी करण्यात आली. साध्वी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.         यावेळी, महात्मा फुले दांपत्याला  भारतरत्न किताब मिळालाच पाहिजे, या साठी केंद्र सरकारकडे सामूहिक पत्र लेखन करण्यात आले. याप्रसंगी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, केंद्रीय सचिव संजय जोशी, शहराध्यक्ष अपर्णा साठे मारणे, शहर कार्याध्यक्ष नितीन चाफळकर, पुणे शहर सचिव चित्रा साळवे, संघटक प्रभा अवलेलू, पुणे शहर उपाध्यक्ष राकेश बनसोडे, विशाल मारणे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

शिक्षणानेच स्त्री सक्षम होईल -सुनिता कुसनाके

 शिक्षणानेच स्त्री सक्षम होईल -सुनिता कुसनाके  मुलचेरा येथील वीर बाबुराव शेडमाके  सभागृहात आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या   जयंती निमित्त आयोजित समारंभात बोलताना, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्त्री शिक्षणाचा  प्रारंभ केला त्यामुळे स्त्रिया शिकून पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.त्यामुळे उच्चशिक्षण घेऊन स्त्रियांनी स्वतःची प्रगती साधली पाहिजे असे मुलचेरा नगरपंचायत च्या  नगरसेविका तथा गटनेत्या सुनिता कुसनाके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे  उद्घाटन कृषी मंडळ अधिकारी सुतार  मॅडम यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून  प्रा. स्मिता चापले प्रा . चंद्रकला गजभिये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनिल आत्राम, ग्रामपंचायत सदस्य आम्रपाली प्रफुल् दुर्गे . ग्रामपंचायत सदस्या प्रतिमा डोर्लीकर, माजी ग्रामपंचायत सदस्या  ज्योतीताई सोनुले, बोडावार मॅडम ,पोलीस पाटील उषाताई पेंदाम ,नगरसेविका मनीषा गेडाम , गृहपाल प्रणाली मेश्राम , नगरसेवक बंडू आलाम. देवनाथ बोबाटे , तिरुपती मुंड...