हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या चाॅदशाहवलीबाबा दर्गाचा ऊरूस प्रारंभ 1डिसेंबर पासून (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या इंदापूर शहराचे आराध्य दैवत असलेल्या चाॅदशाहवलीबाबा दर्गा चा ऊरूस एक तारखे पासून सुरू होत असल्याची माहिती दर्गाचे मुजावर मुनीर मुजावर यांनी दिली. याबाबत त्यांनी माहिती देताना असे सांगितले की एक तारखेला संदल व दोन तारखेला ऊरूस व तीन तारखेला झेंडा आहे. इतिहासकालीन पासून इंदापूर शहरात चाॅदशाहवली बाबा दर्गा याचा उरूस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. इतिहासकालीन पासूनच चाॅदशाहवलीबाबा दर्गा उरूस मध्ये चादरीचा मान इंदापूर पोलीस स्टेशनचे फौजदार यांना असतो तर झेंड्याचा मान रामोशी समाजाला व कुरेशी समाजाला असतो तसेच संदल चा मान आतार यांना असतो दरवर्षीप्रमाणे उरूस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . उरूसामध्ये परराज्यातून तसेच उस्मानाबाद ,पुणे ,सोलापूर सातारा ,सांगली ,कोल्हापूर या ठिकाणीहून लोक चाॅदशाहवली बाबा दर्गाच्या उरूसला येत असतात. उरूसामध्ये लहान मुलांचे पाळणे आकर्षण ठ...