इंदापूर तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय यंत्रणा कामाला लावून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तात्काळ करावेत
इंदापूर तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय यंत्रणा कामाला लावून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तात्काळ करावेत . , सन २०२२ मध्ये परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाला आलेली पिके वाया गेलेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच लंपी सारख्या आजारामुळे जनावरांनाही नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. म्हणून विनंती की सन २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी च्या नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी. तसेच जून 2022 पासून आज पर्यंत इंदापूर तालुक्यातील मंडल निहाय किती मिलिमीटर पाऊस झाला याची माहिती संबंधित विभागाकडून तात्काळ उपलब्ध करून घेऊन पर्जन्यमापक विभाग कृषी विभाग महसूल विभाग तसेच संबंधित सर्व विभागांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे प्रमाण पाहून सहा तारखेपर्यंत तालुक्यातील सर्व पंचनामे पूर्ण झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आमरण उपोषण त...