Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

खासदार सुप्रीयाताई सुळे व माजी राज्यमंत्री मा.दत्तात्रय (मामा )भरणे यांना आज प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन

 खासदार सुप्रीयाताई सुळे व माजी राज्यमंत्री मा.दत्तात्रय (मामा )भरणे यांना आज प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) आज रुई (ता.इंदापूर) येथे आदरणीय सौ .खासदार मा.सुप्रीयाताई सुळे व माजी राज्यमंत्री मा.दत्तात्रय (मामा )भरणे यांना आज प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की प्रत्येक खासदार व आमदाराला वार्षिक 10 लाख रुपये दिंव्याग बांधवांसाठी खर्च करायचा असतो पण तो खर्च होत नाही केंद्र शासन दिंव्याग अधिनियम 2016 प्रमाणे खर्च करावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर प्रहार संघटनेचे जि.उपाध्यक्ष मा.बाबासाहेब पाडुळे ता.अध्यक्ष मा.अंनतराव गायकवाड ता.सचिव मा.रामदास चव्हाण ता.कार्याध्यक्ष नाना लावंड ता.महिला अध्यक्ष कु.दिपालीताई वाघमोडे कळस शाखाध्यक्ष सौरभ आगलावे श्रीरंग मारकड बबन पुणेकर मनिषा भगत दादा दगडे प्रविण लावंड आदींसह उपस्थित होते.

इंदापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब सरवदे यांची निवड

  इंदापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब सरवदे यांची निवड ( इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख)तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब सरवदे, इंदापूर शहर अध्यक्षपदी अमोल मिसाळ व इंदापूर तालुका युवक अध्यक्षपदी संदेश सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली,* *आज शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात पश्र्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व लोनावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रभारी संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड पंचायत समितीचे उपसभापती व इंदापूर तालुका निरिक्षक विकास कदम दौंड तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे नरेश डाळींबे सरचिटणीस गणेश गायकवाड व इंदापूर तालुका मार्गदर्शक संदीपान कडवळे यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. *या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवाजीराव मखरे, विकास कदम,गणेश गायकवाड, संदीपान कडवळे,अमोल मिसाळ, नितीन झेंडे,यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक राकेश कांबळे केले तर आभार महेश सरव...

इंदापूर नगरपरिषदेचा दिशा दर्शक फलक का दिशाहीन फलक ?

  इंदापूर नगरपरिषदेचा दिशा दर्शक फलक का दिशाहीन फलक ?  हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक व इंदापूरचे आराध्य दैवत चाॅदशाहवली  बाबा दर्गा व जैन मंदिर चा कोठेही उल्लेख नाही इंदापूर नगरपरिषदचे मराठी व्याकरण कच्चे इंदापूर पोस्ट ऑफिस चा उल्लेख इंदापूर पोस्ट आफिस दिशा चिन्ह ? (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) इंदापूर नगर परिषदेने हजारो रुपये खर्च करून इंदापूर नगरपरिषद हद्दीत चौका चौकात दिशादर्शक फलके लावलेली आहे. दिशादर्शक फलकामुळे परगावी हून  येणारे पाहुणे व नागरिकांना याचा फायदा होतो तेही खरेच व नक्कीच आहे परंतु इंदापूर नगर परिषदेच्या या दिशा दर्शक फलकाला नागरिकांमधून दिशाहीन फलक असेही म्हटले जाऊ लागले आहे. कारण इंदापूर नगर परिषदेने त्यांच्या दिशादर्शक फलकावरती जुने इंदापूर तहसील कार्यालय  असे माहिती  फलक  लावले  आहे. जुने जागेतील इदापूर  तहसील  कार्यालय नवीन  प्रशासकीय जागेत स्थलांतर होऊन सुद्धा त्या दिशादर्शक फलकावरती जुने तहसील कार्यालय असे उल्लेख केलेला आहे. नागरिकांमधून असा प्रश्न उपस्थित होत आहे की जुने तहसील कार्यालय आणि नवीन तहसील कार्यालय ...

अन् लहान मुलांंनी दत्तामामांना चॉकलेट देत केले अनोखो स्वागत!!

 अन् लहान मुलांंनी दत्तामामांना चॉकलेट देत केले अनोखो स्वागत!! (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अगदी ग्राऊंड लेव्हलला जात शेवटच्या घटकात मिसळून काम करणारे नेते म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहेत.त्यांच्याकडे काल परवा पर्यंत  राज्यमंत्री तसेच सोलापूर सारख्या महत्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असूनही सत्तेची हाव‌ डोक्यात जाऊ दिली नाही.की, त्यांनी कधीही अंगरक्षक अथवा सुरक्षा यंत्रणा  सोबत न ठेवता जनमाणसांत सहज वावरत असत ,त्यांचा हाच साधेपणा संबंध महाराष्ट्राने अनुभवला आहे,तालुक्यात सुध्दा फिरत श्री.भरणे हे कोणताही बडेजावपणा न करता सर्वसामान्य माणसात मिळून मिसळून वावरत असतात.त्यांच्या सुखा- दु:खात ते नेहमीच धावून जातात. त्याच बरोबर लहान मुलांच्यामध्ये तर दत्तामामा अगदी दिलखुलासपणे रमुण जातात हे अनेकदा दिसले आहे.त्याचाच प्रत्यय आज निमगाव केतकी  आला. त्याचे झाले असे की,श्री.दत्तात्रय भरणे हे या ठिकाणी भेटीनिमित्त गेले असता,त्यांचा ताफा थांबताच शुभरा अमोल दोशी व अथर्व अमोल दोशी ही मुले धावत  मामांकडे आली व त्यांनी हातातील चॉकलेट मामांना देत अ...

शिवराज्य शेतकरी विकास मंच उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी जाफर खान पठाण यांची निवड

 शिवराज्य शेतकरी विकास मंच उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी जाफर खान पठाण यांची निवड (इंदापूरचा आवाज) नाशिक जिल्ह्यातील ओझर या ठिकाणी रहिवासी असलेले जाफरखान पठाण यांची शिवराज्य शेतकरी विकास मंच उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र  संस्थापक प्रदेशाध्यक्ष  जावेद भाई शेख यांनी दिले. शिवराज शिवराज्य शेतकरी विकास मंच उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी निवड झाल्यानंतर जाफर भाई खान पठाण यांनी असे सांगितले की नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात होणाऱ्या ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका शिवराज्य शेतकरी विकास मंच पूर्ण ताकतीशी लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात शिवराज्य शेतकरी विकास मंच गावागावात  पोहोचवण्यासाठी   मी विशेष प्रयत्न करणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे त्यांनी निवड  झाल्यानंतर जाफरभाई पठाण यांनी तळागाळातील गरीब शेतकरी, कष्टकरी, महिला, मजूर सामान्य नागरिक यांच्यासाठी लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रातील बीजेपी सरकार असो इतर कोणतेही सरकार सामान्य जनतेच्या हिताशी कोणतेह...

कर्मयोगी कारखान्याने उसाचे संपूर्ण एफ आर पी द्यावी अन्यथा आंदोलन , रासपाचा इशारा.

 कर्मयोगी कारखान्याने उसाचे संपूर्ण एफ आर पी द्यावी अन्यथा आंदोलन , रासपाचा इशारा.             राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना येथे संपूर्ण एफ आर पी ची रक्कम एक ऑक्टोबर 2022 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी यासाठी कारखाना प्रशासनास पत्र देण्यात आले यावेळी बोलताना रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोपने म्हणाले की कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून ऊस बिलाच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक करत आलेला आहे गेले तीन वर्षे एकदाही वेळेत एफआरपीची रक्कम या कारखाने दिलेली नाही जर वर्षी दोन-तीन मस्टरचे बिल रेगुलर काढायचे यावर्षी कारखाना व्यवस्थित दर देतोय आस भासावयचे आणि कारखान्यास ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करायचं आणि त्यानंतर उरलेल्या चार महिन्याचे बिल मात्र सहा सहा महिने रखडून ठेवायचं हे धोरण या संचालक मंडळाने आतापर्यंत राबवलेला आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यातील भवानीनगर बारामती ऍग्रो या साखर कारखान्यांच्या तोडीचा दर सदर कारखान्यात दिला न...

*समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड या संस्थेकडून संजय सरवदे यांना समाजसेवक म्हणून गौरविण्यात आले

 *समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड या संस्थेकडून संजय सरवदे यांना समाजसेवक म्हणून गौरविण्यात आले * (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) वाघोली मध्ये समर्थन ट्रस्ट फोर द डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने अपंग वंचितांसाठी व युवकांसाठी समावेशक मोफत रोजगार मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रम भरविण्यात आला होता ही संस्था विविध समावेशक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमाद्वारे अपंगत्व वंचितांना सक्षम बनवणे यासाठी काम करते हा रोजगार मेळावा साकार करण्यासाठी संजय सरवदे यांनी श्री तुषार सरांना निस्वार्थपणे मदत सहकार्य केले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री ओसवाल सर आणि श्री संजय सरवदे व समर्थनम ट्रस्ट फोर द डिसेबल्ड या संस्थेचे श्री तुषार सर व डॉक्टर विशाल पाटील सर मोझे कॉलेज ऑफ फार्मसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमध्ये संजय सरवदे यांना श्री ओसवाल सर प्राचार्य मोझे कॉलेज ऑफ फार्मसी व ट्रस्टचे श्री तुषार सर व जयश्री मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन समाजसेवक म्हणून गौरवण्यात आले यावेळी अनेक उमेदवारांना समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड...

RSS संघराज्य असे अकाउंट असलेल्या अकाऊंट वरून छत्रपती शिवाजी महाराज , माँ साहेब जिजाऊ यांचे विषयी अत्यंत विकृत व बदनामीकारक कमेंट करणारेवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

 १ ) मा. तहसीलदार सो. इंदापूर , ता. इंदापूर , जि. पुणे २ ) मा. पोलीस निरीक्षक  इंदापूर पोलीस स्टेशन इंदापूर ,  ता. इंदापूर जि. पुणे. महोदय ,      दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11:06 चे सुमारास ABP live यू ट्यूब चॅनल वर  बातम्या सुरू असताना RSS संघराज्य असे अकाउंट असलेल्या अकाऊंट वरून छत्रपती शिवाजी महाराज , माँ साहेब जिजाऊ यांचे विषयी अत्यंत विकृत व बदनामीकारक कमेंट केले आहेत. याविषयी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी DGP Maharastra व MumbaiPolice यांना ट्विट करून माहिती दिली आहे परंतु या अकाउंट धारकवर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा त्याबद्दल शिवभक्तांना काहीही माहिती ना ही. कृपया RSS संघराज्य या अकाउंट धारकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.   त्यासाठी दिनांक   १९/ ०९ / २०२२ रोजी तहसीलदार कचेरीवर सकाळी ११:०० ते ०५:०० असे लाक्षणिक उपोषण करून सायंकाळी ०५:०० वाजता छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही शिवभक्त RSS संघराज्य या अकाउंट धारकाच्या विरोधात फिर्याद देत आहोत. सोबत विवादास्...

लंपी आजाराबाबत योग्य ती खबरदारी घ्या* *माजी पशुसंवर्धन राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रशासनाला सूचना

 *लंपी आजाराबाबत योग्य ती खबरदारी घ्या* *माजी पशुसंवर्धन राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रशासनाला सूचना * इंदापूर तालुक्यामध्ये गाय वर्ग व म्हैस वर्ग जनावरांची संख्या जवळपास 1लाख 70 हजार 465 इतकी आहे तालुक्यामध्ये लंपी व्हायरस हा आजार आल्याने आपल्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत लंपी आजाराच्या 99 केसेस आढळलेले आहेत त्यापैकी आतापर्यंत 51 केसेस ह्या पूर्णपणे बरे झालेले आहेत सद्यस्थितीमध्ये 43 केसेस ऍक्टिव्ह आहेत आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झालेला आहे या मध्ये मोठ्या मृत जनावरांना 35 हजार रुपये इतके तर लहान जनावरांना 16 हजार रुपये रक्कम शासनामार्फत नुकसान भरपाई म्हणून देणार आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. या आजाराबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरू नये तसेच आजाराबाबतची योग्य खबरदारी माहिती तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे म्ह्णून स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन भेट द्यावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. आतापर्यंत तालुक्यामध्ये 27 दवाखाने मार्फत काम चालू आहे 16 इ पी सेंटर आहेत तसेच आजपर्यंत 40 हजार लसींचे डोस प्राप्त झाले होते त्याचेही ...

शिवराज्य शेतकरी विकास मंचच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी शेख आयुब यांची निवड

 शिवराज्य शेतकरी विकास मंचच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी शेख आयुब यांची निवड (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शेख आयुब शेख खलील यांची शिवराज्य शेतकरी विकास मंचचे  प्रदेश सेक्रेटरी एकमताने निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जावेद भाई शेख यांनी दिले. यावेळी शिवराज्य शेतकरी विकासमंचचे प्रदेश कार्याध्यक्ष वैभव सोनवणे तसेच महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा राऊत तसेच महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्षा ज्योतीताई गाढवे तसेच इंदापूर तालुका अध्यक्ष गुणवंत दळवी तसेच सामाजिक कार्यकर्ते अलीअकबर  मनेरी उपस्थित होते. निवडीनंतर आयुब शेख  यांनी मनोगत व्यक्त करताना  असे सांगितले की येणाऱ्या लोकसभा  विधानसभा ,जिल्हा परिषद,नगरपरिषद      ,महानगरपालिका शिवराज्य शेतकरी विकास मंच सर्व ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जीवनात मिळालेल्या यशाचे श्रेय आत्मशक्तीला दिले पाहिजे; ईश्वर परमार

 जीवनात मिळालेल्या यशाचे श्रेय आत्मशक्तीला दिले पाहिजे; ईश्वर परमार  *शौकतभाई शेख श्रीरामपूर :*  जीवनात यशस्वी होण्यासाठी कर्माला महत्व असते,प्रत्येकाला अज्ञात आत्मशक्ती प्रेरणा देत असते आणि त्यामुळेच माणूस कार्याला प्रवृत्त होतो. यशाची इमारत उभी करायची तर त्यासाठी पाया मजबूत असावा लागतो, शिक्षण घेत असताना मानसिक स्वास्थ्य चांगले असावे लागते तसेच विचारात सकारात्मकता असणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन पुण्याचे परमार ग्रुपचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक ईश्वर परमार यांनी केले. तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने 'करिअर कट्टा' अंतर्गत आयोजित "विद्यार्थी जीवनातील यशाची गुरुकिल्ली" या विषयावर मार्गदर्शन करताना श्री.परमार बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास  मुरकुटे होते. कार्यक्रमास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, सचिव सोपानराव राऊत, कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, संचालक विरेश गलांडे, सहसचिव भास्कर ख...

राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे मोठे योगदान - सविताताई मुळे

 राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे  मोठे योगदान - सविताताई मुळे  हाजी युसुफखान पठाण उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित शेवगांव (प्रतिनिधी) : संकटात आपली खरी ओळख निर्माण होत असते कारण ते नवीन संधी निर्माण करुन देतात,सदय स्थितीत पालकांना मुलांना देण्यासाठी वेळ उपलब्ध नाही त्यामुळे शिक्षकांना त्याची एकाच वेळी कौटुंबिक, शैक्षणिक, भावनिक गरज पूर्ण करण्याचे काम करावे लागत आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोठे आहे असे प्रतिपादन औरंगाबाद येथील शारदा मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविताताई मुळे यांनी केले. शेवगांव येथे रोटरी क्लब ऑफ शेवगांव सिटीच्या वतीने देण्यात येणाऱ्या "राष्ट्र उभारणीचे शिल्पकार" या पुरस्काराच्या वितरणाप्रसंगी मुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्नेहलता लबडे होत्या. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष लाहोटी, सचिव डॉ. मयूर लांडे, डॉ. संजय लड्डा, बाळासाहेब चौधरी, भागनाथ काटे, किसन माने आदी प्रमुख उपस्थित होते.            हाजी युसुफखान पठाण यांनी सर्वसामान्य परिस्थितीतून यशस्वी भरारी घेत फॅब्रिकेशन व शेड उभारणी व्यावसायात आ...

राज्यस्तरीय हिंदी वकृत्व स्पर्धेत, न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेजला सुयश

 *राज्यस्तरीय हिंदी वकृत्व स्पर्धेत, न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेजला सुयश * *श्रीरामपुर शौकतभाई शेख :*  सोमय्या विद्या विहार प्रणित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगांव येथे दि.१४ सप्टेंबर या राष्ट्र भाषा हिंदी दिनानिमित्त राज्यस्तरीय हिंदी वकृत्व स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजने उत्तेजनार्थ तिसऱ्या  क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मागील दीड वर्षापासून अधिक काळ शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल प्रत्येक वर्षी तिन्ही भाषाची वकृत्व स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षी हिंदी वकृत्व स्पर्धेसाठी अहमदनगर,नासिक पुणे व औरंगाबाद जिल्ह्यातून २५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी हीरल नितीन जेठवा हिचा विषय होता "समय बडा बलवान " व कुमारी रश्मी मनोज गिडवाणी हिचा विषय होता "आझादी के ७५ साल " दोघींनीही उत्कृष्ट वकृत्व करून ५० स्पर्धकांमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज...

जिद्द व मेहनतीच्या जोरावर सामान्य विद्यार्थीही उच्च पदावर पोहोचू शकतो ; संदीप मिटके

 जिद्द व मेहनतीच्या जोरावर सामान्य विद्यार्थीही उच्च पदावर पोहोचू शकतो ; संदीप मिटके *शौकतभाई शेख श्रीरामपूर :*  जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जिवनात यश संपादन करता येते.यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करतानाच व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला पाहिजे. ध्येय उराशी बाळगून ते साध्य करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे प्रतिपादन उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी केले.  माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स प्रगतीनगर येथे नुकताच विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथ विधी समारंभ अशोक ग्रुप ऑफ स्कूलच्या व अशोक कारखान्याच्या संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीरामपूर विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी श्री.मिटके बोलत होते. प्रारंभी लेझिम पथकाच्या तालबद्ध, लयबद्ध सादरीकरणाने मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी नव्याने निवड झालेले चार हाऊसचे कॅप्टन, व्हाईस कॅप्टन,स्पोर्ट कॅप्टन, हेड बॉय, हेड गर्ल व क्ल...

*माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कर्मयोगींच्या स्मृतींना अभिवादन

 *माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कर्मयोगींच्या स्मृतींना अभिवादन .....*  काँग्रेस विचारसरणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्रद्धांजली अर्पित करून कर्मयोगींच्या स्मृतींना उजाळा दिला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसी विचारांचा वारसा अखेरच्या श्वासापर्यंत टिकवण्याचे प्रामाणिकपणे काम आदरणीय शंकरराव भाऊंनी केले,सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये समता,बंधुभाव व प्रेम रुजवत असताना या तालुक्यामध्ये धर्मांध शक्तींना तसेच जातीयवादी पक्षांना त्यांनी कधीही पाय रोवु दिले नाहीत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये सहकार चळवळ रुजवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबकता आणण्याचे मोलाचे काम कर्मयोगी भाऊंनी केले आहे. हे करत असताना सहकारी संस्थांमध्ये कोणतेही राजकारण न आणता सर्वांना सोबत घेऊन मोठ्या कष्टाने सहकारी संस्था यशस्वीपणे उभा करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हात होता. त्यांचे एकूणच राजकारण हे सहकार,शैक्षणिक,औ...

*रमेश जेठे यांची ओल्ड कम्युनिस्ट कौन्सिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

  *रमेश जेठे यांची ओल्ड कम्युनिस्ट कौन्सिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार * श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : अहमदनगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यातील मौजे देहरे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा  सा.शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेश जेठे (सर) यांची ओल्ड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया,नवी दिल्ली( OCCI ) या राष्ट्रीय संघटनेत "राष्ट्रीय सल्लागार " पदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात धडाडीचे दबंग ‌पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले दैनिक मेहकर टाईम्स आणि दैनिक शौर्य स्वाभिमान चे अहमदनगर प्रतिनिधी तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे प्रदेश संघटक आणि अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे प्रदेश महासचिव असे विविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यासह पत्रकारीता क्षेत्रातील महत्त्वाची कामगीरी बजावत त्यांनी नेहमी उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहोरात प्रयत्न केले आहे व करत आहे, श्री.रमेश जेठे यांचे सामाजिक कार्य अजोड असल्याने त्यांनी आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून संपूर्ण  महाराष्ट्र राज्यातील अ...

इंदापूर शहरात साथीच्या रोगाचे थैमान ,चिकनगुणीया, डेंगूचे इंदापुरात रुग्ण आढळले, इंदापूरक नगरपरिषदेचा कारभार डिसाळ, इंदापूर नगरपरिषद नियोजन शून्य

 इंदापूर शहरात साथीच्या रोगाचे थैमान ,चिकनगुणीया, डेंगूचे इंदापुरात रुग्ण आढळले,  इंदापूर नगरपरिषदेचा कारभार डिसाळ, इंदापूर नगरपरिषद नियोजन शून्य इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख इंदापूर शहरात साथीच्या आजाराने थैमान घातलेले असून इंदापूर शहरात अनेक ठिकाणी चिकनगुनिया डेंगू चे रुग्ण आढळून आलेले आहे परंतु इंदापूर नगरपरिषद इंदापूर शहरात कोणत्याही ठिकाणी फवारणी करताना त्याचप्रमाणे डेंगू व साथीच्या आजारांना प्रतिबंध होईल असे कोणतेही उपाययोजना करताना दिसत नाही. इंदापूर शहरात नागरिकांना थंडी ताप डोके दुखणे सांध्या दुखणे असे लक्षणे दिसून येत आहे. बारामती नगरपरिषद आसपासच्या नगरपरिषद च्या हद्दीत साथीच्या आजाराने थैमान घातलेले असून तरी इंदापूर  नगरपरिषदेने इंदापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य ची काळजी घेण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. इंदापूर नगर परिषदेची एक जुनी आणि घाण सवय म्हणजे नागरिकांनी तक्रारी अर्ज अथवा एखाद्या वृत्तपत्रात बातमी आल्याशिवाय इंदापूर नगरपरिषद झोपेतून जागे होत नाही हेही तेवढे खरे आणि वास्तविक परिस्थिती आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. नगरपरिषदेच्या या गलथान कारभ...

बारामती लोकसभा ताकतीने लढवणार महादेव जानकर.

 बारामती लोकसभा ताकतीने लढवणार महादेव जानकर.    (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख   )     इंदापूर येथे बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम इंदापूर येथील हॉटेल स्वामीराज येथे संपन्न झाला या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी 2024 लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वन बूथ टेन युथ या संकल्पनेनुसार पक्षाचे विस्तार वाढ प्रत्येक बूथपर्यंत करण्याचा निर्धार व्यक्त केला. ते पुढे म्हणाले आगामी निवडणुकांमध्ये गाफील न राहता सर्व निवडणुका स्वभावावर लढविण्याच्या हेतूने रासप कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथ वर दहा दहा माणसे तयार केले पाहिजेत त्या दृष्टीने महत्त्वाचे कानमंत्र जानकर यांनी कार्यकर्त्यांना दिले. सदर कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव माऊली सलगर पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपने पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष कोकरे ज्येष्ठ नेते विनोदराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे तानाजी मार्कड तालुका अध्यक्ष सतीश तरंग...

माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

 *माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही *   _निंबोडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ_  जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या योजना लवकरच पूर्णत्वास येणार असून,यासाठी सर्वतोपरी मेहनत घेत आहे त्यामुळे माझ्या माता- भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निंबोडी येथे बोलताना दिली. निंबोडी ता. इंदापूर येथे आज ५ कोटी ८३ लाख रूपायांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार मा दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते पार पाडला.यामध्ये पद्मविभूषण मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब सभागृह बांधण्यासाठी ५० लाख रुपये, जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ५० लाख रुपये तसेच ३ कोटी ८३ लक्ष अश्या विविध विकासकांचा यामध्ये समावेश आहे. याप्रसंगी बोलताना श्री भरणे यांनी सांगितले की, जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या कुठेही तळा जाऊ न द...

करमाळा तालुक्यातील घारगाव चे सुपुत्र श्री संजय सरवदे यांना भैरवनाथ युवक मंडळ वाघोली पुणे यांचेकडून कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

 करमाळा तालुक्यातील घारगाव चे सुपुत्र श्री संजय सरवदे यांना भैरवनाथ युवक मंडळ वाघोली पुणे यांचेकडून  कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित भैरवनाथ युवक मंडळ वाघोली पुणे (रजि.नं.महा/४३२/९९/पुणे) यांचेकडून संजय सरवदे यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोरोना काळात बिकट अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता covid-19 विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम केले  गोरगरिबांना धान्याचे वाटप, तसेच शालेय विद्यार्थ्यांना मास्क वाटप, व गोरगरिबांना जेवण वाटप, कोरोना विषयी जन जागृती , हॉस्पिटलमध्ये पेशंटला मदत कोरोना काळामध्ये अशा अनेक प्रकारच्या सेवा बजवल्यामुळे घारगाव येथील श्री संजय सरवदे यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला भैरवनाथ युवक मंडळ ही गेली 35 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे मंडळ दरवर्षी गणेश उत्सव शिवजयंती दहीहंडी होळी याचबरोबर 15 ऑगस्ट 26 जानेवारी रक्तदान शिबिर संपूर्ण मोफत शारीरिक तपासणी ॲम्बुलन्स सेवा सार्वजनिक पाणपोई, अंगणवाडी ,बस स्टॉप असे अनेक प्रकारचे कार्य हे मंडळ करत असते यावर्षी गणेश उत्सवानिमि...

अमेरिकेतील चैतन्य जोशी आणि इंग्लडला जाणाऱ्या संग्राम गायधने यांचा शैक्षणिक आदर्श भूषणावह = प्रा.डी.ए. माने

 अमेरिकेतील चैतन्य जोशी आणि इंग्लडला जाणाऱ्या संग्राम गायधने यांचा शैक्षणिक आदर्श भूषणावह = प्रा.डी.ए. माने  शौकतभाई शेख श्रीरामपूर :  उच्च विद्याविभूषित विद्यार्थी हे आपले भूषण असून श्रीरामपूरातील चैतन्य विलासराव जोशी यांनी अमेरिकेत २०१७ पासून जी शैक्षणिक प्रगती केली. ही बौद्धिकप्रगती आजच्या पिढीला चैतन्यदायी आहे,तसेच इंग्लडला उच्च शिक्षणासाठी जाणारे संग्राम भाऊसाहेब गायधने यांचे विशेष कौतुक आहे असे विचार सांगली जिल्ह्यातील तासगांव येथील रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्रा.डी.ए. माने यांनी व्यक्त केले.   येथील शिरसगांव स्थित इंदिरानगर मधील माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांच्या वाचनालयात अमेरिकेत शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून स्वावलंबी स्वरूपाने प्रगती केलेले चैतन्य विलासराव जोशी आणि  इंग्लड येथे शिक्षण घेण्यासाठी जात असलेले संग्राम भाऊसाहेब गायधने यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात प्रा. माने यांच्या हस्ते चैतन्य जोशी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच संग्राम गायधने यांना शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डी. ए...

श्री.काशिनाथ गोराणे यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार घोषित

 श्री.काशिनाथ गोराणे यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार घोषित  शौकतभाई शेख श्रीरामपूर :  येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा पहिला कै. नामदेवराव विश्वनाथ सुकळे सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार घोषित करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली.     विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ही मान्यताप्राप्त सेवाभावी संस्था असून ती ३० जानेवारी २०१८ रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी सुरु झाली. महात्मा गांधी यांचा आदर्श समोर ठेवून विविध सेवाभावी कार्य करीत आहे.कै. नामदेवराव सुकळे हे चंद्रपूर जिल्ह्यातून सन १९६० साली श्रीरामपूर येथे आले. त्यांनी अशोक सहकारी साखर कारखाना येथे प्रामाणिकपणे सेवा केली.ते विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष होते.प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य  टी. ई. शेळके, समनव्यक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये,सदस्य सुदामराव औताडे, खजिनदार पुष्पाताई सुकळे आदिंच्या सहकार्याने कै. नामदेवराव सुकळे यांनी सामाजिक सेवाकार्यात मोठे योगदान केले, अशा सेवाभा...

नफरत तेरी साँसो की सब,कट जायेंगी डोर ! प्यार मोहब्बत का ही मंजर होगा चारो ओर !! बस दिल की ऑखोंसे पढलो गीता और कुरआन ! आओ हिंदूस्तान बनाये, ऐसा हिंदुस्तान !!

 ‘नफरत तेरी साँसो की सब,कट जायेंगी डोर ! प्यार मोहब्बत का ही मंजर होगा चारो ओर !! बस दिल की ऑखोंसे पढलो गीता और कुरआन ! आओ हिंदूस्तान बनाये, ऐसा हिंदुस्तान !! ------------------------------------ देशभक्ती व सामाजिक प्रबोधनात्मक कवितांनी गणेश फेस्टिव्हलच्या मुशायराने वाहऽ वाहऽ मिळविली ------------------------------------ शौकतभाई शेख श्रीरामपूर : अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद व इकरास् पी.ए.इनामदार स्कूल नगर व्यासपीठच्यावतीने गणेशोत्सवातील अहमदनगर महोत्सवात ऑल इंडिया मुशायऱ्याचे मुस्लिम बँकेच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला नगर महोत्सवचे संस्थापक संयोजक स्व.सुधीर मेहता व प्रेस फोटोग्राफर जितेंद्र अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. निजामाबाद येथील मौलाना कादीर तमिम निजामाबादी यांच्या नाअत पठणाने मुशायर्‍यास प्रारंभ झाला. पुण्याच्या मुस्लिम बँक व राज वेलनेस सेंटर,फर्स्ट इंप्रेशन व ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगर अहमदनगर च्या सहकाऱ्यानेे आयोजित ऑल इंडिया मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी बुरहानपुर चे कवि नईम राशिद हे होते. यावेळी नाशिक विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषदेच...

आदर्श ग्राम समिती सदस्य भास्करराव पेरे यांचे,उद्या बेलापूरात व्याख्यान

 आदर्श ग्राम समिती सदस्य भास्करराव  पेरे यांचे,उद्या बेलापूरात व्याख्यान बेलापूर (प्रतिनिधी) - बेलापूर बुll  ग्रामपंचायतीच्या शताब्दीवर्षा निमित्त आदर्श ग्राम समितीचे सदस्य तसेच राज्यात ख्याती प्राप्त पाटोदा या गावाचे सरपंच भास्करराव पेरे यांचे "गाव सेवा हिच ईश्वर सेवा"या विषयावर उद्या गुरुवार(ता.८) रोजी सायं.६ वा.बेलापूरात व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.                                        बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या शताब्दीपूर्ती निमित्त ग्रामपंचायतीच्यावतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रम अंतर्गत गुरुवार ता.८ सप्टेंबर रोजी सायं ६ वा. पाटोदा (ता. जि. औरंगाबाद) येथील राज्यातील ख्यातनाम आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे यांच्या व्याख्यानाचे आजाद मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.                      ...

चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने जागर महापुरुषांच्या विचारांचा

 चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने  जागर महापुरुषांच्या विचारांचा थोर महापुरुषांचे विचार मनात रुजवून शिक्षणाकडे भर दिल्याने जिवनातील अंधकार दुर होतो ; तहसीलदार प्रशांत पाटील शौकतभाई शेख श्रीरामपूर : चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर आयोजित "जागर महापुरुषांच्या विचारांचा हा उपक्रम सलग दहा दिवस राबविण्यात येत आहे, यामध्ये थोर राष्ट्र संत,महापुरुष, महामानव, समाजसुधारक यांच्या जिवन चरित्र आणि विचारांची माहीती देण्याचे कार्य या उपक्रमातून करण्यात येत आहे. दिनांक ३१ /०८/ २०२२ ते ०९/०९/२०२२ असे दहा दिवस रोज सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्याने,ज्यांनी देश आणी सामाजासाठी मोठे योगदान दिले त्या रियल हिरोज राष्ट्र संत, महामानव,थोर समाजसुधारक यांच्या जिवन चारित्र्यावर अधारीत माहितीद्वारे प्रबोधनात्मक कार्यक्रम हा उपक्रम काळाची गरज ठरत आहे. समिती पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर तहसील कार्यालयाचे तहसिलदार श्री.प्रशांत पाटील यांची उपस्थिती लाभ...

बारामती ते सोलापूर जिल्ह्यात बावडा मार्गे अवैद्यरित्या कत्तलीसाठी आयशर सह 11 जर्सी गाई व ०१ देशी गाय ताब्यात

  आज रोजी  बारामती ते सोलापूर जिल्ह्यात बावडा मार्गे अवैद्यरित्या कत्तलीसाठी आयशर टेम्पो मध्ये निर्दयतेने कोंबून जनावरे नेत असल्याबाबत गुप्त माहिती मिळालेली असता, सदर ठिकाणी वालचंदनगर ते बावडा रोड वरती सापळा रुचून 11 जर्सी गाई व ०१ देशी गाय पकडण्यात आले. आईसर टेम्पो चालक नामे बंदेनवाज ख्वाजा शेख व त्याचा साथीदार रमजान ख्वाजाभाई शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे.एकूण बारा गाईंची किंमत ९६०००/- व आईसर ट्रक ची किंमत १०,००,०००/- रुपये असा एकूण १०,९६,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला. बारा गाईंना पांजरपोळ्यामध्ये योग्य तो बंदोबस्तात जमा करण्यात आले.सदरचा आयशर टेम्पो बावडा दूरक्षेत्र येथे आणून प्राणी संरक्षण अधिनियम व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. टी वाय मुजावर पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस ठाणे

विद्या प्रतिष्ठान इंदापूर येथे पालक संघटनेच्या वतीने पालक संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब खरात यांच्य हस्ते शाळेस अण्णाभाऊ साठे व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा भेट देऊन शिक्षक दिन साजरा

 विद्या प्रतिष्ठान इंदापूर येथे पालक  संघटनेच्या वतीने पालक संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब खरात यांच्य हस्ते शाळेस अण्णाभाऊ साठे व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा भेट देऊन शिक्षक दिन  साजरा  आज इंदापूर येथे विद्या प्रतिष्ठान शाळेत  पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब खरात शाळेच्या प्राध्यापक ज्योती जगताप मॅडम व इतर सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षक व शिपाई कर्मचारी यांना वृक्ष बाबासाहेबांची लेखणी असणारा पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळेस बोलताना पालक शिक्षक संघटने प्रमुख नानासाहेब खरात आपल्या  भाषणात म्हणाले की समाजाच्या देशाच्या जडणघडणेत 70 टक्के वाटा हा शिक्षकांचा आहे शिक्षक जसे मुलाला घडवतील तसेच त्याचे आयुष्य घडते गुरुच्या मार्गदर्शनावर माणसाचे आयुष्य अवलंबून असते आणि अशा गुरूंचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला आज लाभले हे आमचे भाग्य यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्या प्रतिष्ठानच्या प्राध्यापक ज्योती जगताप मॅडम यांनी भूषवले  तसेच डॉक्टर राणी ताटे जगताप मॅडम य...

बहुजन समाज पार्टी इंदापूर तालुका विधानसभा यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

 महागाईच्या विरोधामध्ये बहुजन     बहुजन समाज पार्टी इंदापूर तालुका विधानसभा यांच्या वतीने महागाईच्या विरोधामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन इंदापूर तहसील कार्यालय यांच्यासमोर करण्यात आले. यामधील  १) पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावे. २) जीवनावश्यक वस्तूवरील GST कर रद्द करावा.  ३) बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा ४) शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे. ५) शेतकऱ्यांच्या उसाला एफ आर पी प्रमाणे दर द्यावा. ६) दारू, मटका, जुगार, यांसारखे अवैध धंदे बंद करण्यात यावे. ७) मुस्लिमांना हायकोर्टाने दिलेल्या पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी      करावी. ८) ओबीसी चे राजकीय शैक्षणिक यातील आरक्षण कायम करण्यात यावे. ९)  मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी. १०) 25% आरटीई अंतर्गत एससी एसटी च्या मुलांना ऍडमिशन मिळावे व         शिष्यवृत्ती मिळावी व  जे  स्कुल जाणून बुजून ऍडमिशन देत नाहीत         त्यांच्यावर कारवाही व्हावी. ११) मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणानेनुसार गायरान...

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आमदार दत्तात्रय भरणे

 रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आमदार दत्तात्रय भरणे  नव उदय चव्हाण एज्युकेशन ट्रस्ट व ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमाने कुरवली ता. इंदापूर येथे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नितीन चव्हाण व विश्वस्त डॉ. नम्रता चव्हाण यांनी गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर,छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक दत्तात्रय सपकळ, तालुका राष्ट्रवादी माजी उपाध्यक्ष सत्यवान चव्हाण, रवींद्र कदम , ,बापूराव पांढरे,विठ्ठल फडतरे, विजय पांढरे ,दिलीप पांढरे,सुरेश चव्हाण,रावसाहेब चव्हाण, आयुब सय्यद,भानुदास चव्हाण,अरुण चव्हाण,राहुल चव्हाण,विजय चव्हाण,भीमराव दणाणे ,शंकर थोरात इ मान्यवर उपस्थित होते.

बारामती आरटीओ कार्यालयाचा भ्रष्ट कारभार ,महाराष्ट्र राज्य चे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मतदारसंघात हे काय चालले जी फॉम नावाखाली लाचखोरी व पैसे वसुली बारामती आरटीओ कार्यालयात खाजगी काम करणारा युवक गोळा करतो प्रत्येक कागदा मागे पैसे गोळा

 बारामती आरटीओ कार्यालयाचा भ्रष्ट कारभार ,महाराष्ट्र राज्य चे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मतदारसंघात हे काय  चालले ? जी फॉम नावाखाली  लाचखोरी व पैसे वसुली बारामती आरटीओ कार्यालयात खाजगी काम करणारा युवक गोळा करतो प्रत्येक कागदा मागे पैसे गोळा बारामती उप परिवहन कार्यालयात अनागोंदी भ्रष्ट कारभार चालू असल्याचे निर्दशनास येत आहे .याबाबत माहिती अशी की दिनांक 1/8/2022  रोजी एका युवकाने बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पक्क्या ट्रायल साठी अप्लाय केले होते. सदर त्या व्यक्तीने बारामती उप परिवहन कार्यालयातील एका प्रतिनिधीला गाडी व गाईड करण्यासाठी मदत मागितली होती त्या विनंतीला मान देऊन त्या  प्रतिनिधीने त्या युवकास मदत केली. काही दिवसापूर्वी त्या युवकाला मदत करणारे प्रतिनिधी  यांना   आरटीओ कार्यालयातील काम  करणारा खाजगी व्यक्तीे ने फोन  करून तुम्ही  एक तारखेला पक्के लायसन्स ट्रायल घेतली त्याचे जी फाम(पैसे) दिला नाही.  सदर  प्रतिनिधीने सांगितले की सदर त्या व्यक्तीला मी मदत केली होती पण तो माझ्याकडे लायसन काढलेले नाही इंदापुर...

बाभळेश्वर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

 बाभळेश्वर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा  बाभळेश्वर (प्रतिनिधी) : स्वतंत्र भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला रविवारी बाभळेश्वर येथे माहिती अधिकार संघर्ष समितीच्यावतीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.         यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे उपस्थित होते. यावेळी राहात्याचे शिक्षणविस्तार अधिकारी संजीवन दिवे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी बेंद्रे, पोलीस पाटील अण्णासाहेब बेंद्रे, शिवाजी बेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, उपस्थित शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.         याप्रसंगी पंचायत समितीचे मा.उपसभापती बबलू म्हस्के, सोसायटीचे चेअरमन दौलत बेंद्रे, उपसरपंच अजित बेंद्रे, अमृत मोकाशी, अनिल म्हस्के, शंकरराव बेंद्रे, प्रमोद बनसोडे, अॅड.प्रकाश बेंद्रे, शंकर रोकडे, प्रकाश हुंडेकरी, दादा पठा...

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच पंचायत समितीच्या ब्रँड अँम्बेसिडर - आमदार दत्तात्रय भरणे

 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच पंचायत समितीच्या ब्रँड अँम्बेसिडर - आमदार दत्तात्रय भरणे कोरोनाच्या काळात आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली.असं असलं तरी आपल्याला पाण्याचे आरोग्याचे महत्त्व हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे आहे.पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील त्या खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे अंगणवाडी सेविका करत आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या ब्रँड अँम्बेसिडर जर कोण असतील तर त्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत असे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढलेत. शुक्रवार दि.०२ सप्टेंबर रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प इंदापुर 1 व 2 पंचायत समिती इंदापुर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आमदार भरणे बोलत होते. दरम्यान एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प इंदापुर 1 व 2 पंचायत समिती इंदापुर यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर पंचायत समिती आवारात उभारण्यात आलेल्या "सही पोषण देश रोशन सेल्फी पॉईंट" चे उद्घाटन माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आलयं.  भरण...

इंदापूर साठे नगर येथे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदापूर साठे नगर येथे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरामध्ये 300 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून अल्प दरामध्ये चष्मे आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे अशी माहिती दादासाहेब सोनवणे यांनी दिली. साठे नगर येथील कै. अरुण नाना ढावरे सभागृहात पार पडलेल्या या नेत्र तपासणी शिबिरात साठे नगर मधील स्त्री पुरुष, तरुण मुले यांच्या डोळ्याची तपासणी चा कॅम्प आयडीएफसी फर्स्ट भारत ने गरजू नेत्र रुग्णांसाठी आयोजित केला होता.या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी केले होते. दादासाहेब सोनवणे हे साठे नगर मधील सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात, त्यांच्या या उपक्रमाचे चर्चा इंदापूर शहर व तालुक्यामध्ये नेहमीच होत असते. वयोवृद्ध व गरीब रुग्णांसाठी आपलाही मदतीचा हात असावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दादासाहेब सोनवणे हे नेहमीच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असतात. त्यांनी आज हा स्तुत्य उपक्रम राबवून साठे नगर व पंचक्रोशीतील गरीब रुग्णांना मदतीचा हात दिल्याचे समाधान नेत्र तपासणी...