१० वी,१२ वी परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अलमिजानच्यावतीने सत्कार श्रीरामपुर (शौकतभाई शेख) : येथील अलमिजान एजुकेशन ऍंड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह पालक मेळाव्यात पुष्प गुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष हाजी याक़ूब भाई कुरेशी होते. संस्थेचे अध्यक्ष शेख मोहम्मद रफीक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला. या प्रसंगी त्यांनी हजरत मौलाना मख्दुम हुसैन साहब उर्दू हायस्कूल चा निकाल ९८ टक्के व मखदुमियॉं कॉलेज ऑफ सायन्स चा निकाल १०० टक्के लागल्याने समाधान व्यक्त करत सर्व शिक्षकांचे कौतूक केले. यावेळी १० वी च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या कु.बुशरा फिरोज मन्सूरी (प्रथम ८९%), कु.अक्सा वसीम शेख (द्वितीय ८७%), अर्जुमंद अकील सय्यद (तृतीय ८६%), तसेच १२ वी च्या परीक्षेत उत्कृष्ट उत्तीर्ण झालेल्या फैज़ान अ.करीम सय्यद (प्रथम ७६%), उम्मेहानी असलम जहागीरदार (द्वितीय ७४%) व सानिया कादीर मेमन (तृतीय ७३%), या यश संपादन...