कुटुंब संस्कृती ही पतिपत्नीच्या विश्वासातून आकाराला येते = प्राचार्य शेळके श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : भारतीय कुटुंब संस्कृती ही विश्वास,प्रेमभावना, समर्पितता, त्याग, सेवाभाव आणि नीतीशीलतेतून जगात सर्वक्षेष्ठ आहे,पतीपत्नीचा असा आदर्श स्व.सौ. पुष्पाताई आणि सुखदेव सुकळे यांच्या जगण्यातून दिसतो, असे विचार ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई.शेळके यांनी व्यक्त केले. येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या खजिनदार स्व. सौ. पुष्पाताई सुकळे यांच्या निधन प्रसंगी शोकसभेचे आयोजन सुकळे, बुरकुले परिवाराने केले होते, त्याप्रसंगी प्राचार्य शेळके बोलत होते.यावेळी प्राचार्य शंकरराव अनारसे, डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रसन्न धुमाळ, सुखदेव सुकळे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,बुरकुले बंधू यांनी प्रतिमापूजन केले. प्राचार्य शेळके यांनी आपल्या जगण्याची,जीवनाची खरी कमाई अशा दुःखप्रसंगी व्यक्त होत असते,भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या भाषणातील संदर्भ सांगत प्राचार्य शेळके यांनी स्व. सौ.पुष्पाताई यांनी ५१ वर्षाच्या वैव...