कृषी कंपन्यांकडून पिचडगांव येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे मार्गदर्शन नेवासा (निरज जेठे) : तालुक्यातील पिचडगांव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविदयालय सोनई येथील ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत पिचडगांव येथे आलेल्या कृषी कन्या भोसले स्नेहल,कोरडे मृणाल,जगताप आरती,कष्टी पायल, बांबळे संजना,आहेर आश्विनी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी मोरे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. पलघडमल मॅडम आणि विषय विशेषज्ञ प्रा.सचिन खाटिक सर तसेच प्रा .चौगुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन केले. पिकांवर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून, बियाण्यांपासून होतात अशा रोगांपासून तसेच किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्वाची असते. तसेच बीजप्रक्रियेमुळे जास्तीत जास्त होणारा फवारणीचा खर्च कमी होतो. उगवण क्षमता वाढते व पिकांची निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. त्यामुळे बीजप्रक्रिया ही पिकाच्या पेरणीसाठी खुप महत्वाची आहे असे मार्गदर्शन करू...