Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

हिंदी भाषेचे राष्ट्रीय साहित्य संमेलन भरवून अर्जुन राऊत यांनी टाळीभानचे नाव उज्ज्वल केले =सभापती डॉ.वंदना मुरकुटे श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - हिंदी भाषेचे राष्ट्रीय साहित्य संमेलन भरवून अर्जुन राऊत यांनी टाकळीभानचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे, असे गौरवोद्गार श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी व्यक्त केले. टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उदघाटन सोहळ्यात डॉ.वंदना मुरकुटे बोलत होत्या. उदघाटक प्रो.डॉ.सदानंद भोसले यांनी सांगितले की, हिंदी भाषा ही देशाचे प्रतिनिधित्व करणारी भाषा असून , या साध्या सुमधुर भाषेने पूर्ण देशाला जोडून ठेवले आहे, आपल्या देशाच्या विविधतेतून एकतेचे दर्शन या भाषेने दिले आहे. टाकळीभान येथील रुक्मिणी माधव मंगल कार्यालयात ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे पहिले राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आणि उत्कृष्ट हिंदी अध्यापन सेवाकार्य पुरस्कार 2022 हा सोहळा पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे, उदघाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी भाषा चे अध्यक्ष प्रो. डॉ. सदानंद भोसले होते. . हे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन अनेक मान्यवंरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आयोजक श्री अर्जुन राऊत यांनी दिली. श्रीसरस्वतीप्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून हे उदघाट्न करण्यात आले.यावेळी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रो. डॉ. सदानंद भोसले, उत्तरप्रदेश प्रयागराजचे, विश्व हिंदी साहित्यसेवा संस्थान अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.शहाबुद्दीन शेख, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे हिंदी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.यादवराव धुमाळ, अध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन अध्यक्ष प्रा.डॉ.मिलिंद कांबळे, प्रा.कार्लस साठे, कविवर्य प्रा.पोपटराव पटारे, ह.भ.प.दत्तात्रय बहिरट महाराज, पुणे येथील बालभारतीचे सदस्य, प्रा.सुधाकर शिंदे, पेन रायगड येथील भा.नेने महाविद्यालयाचे हिंदी विभाग अध्यक्ष डॉ.देविदास बामणे , शिंदे सर,इत्यादींसह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी हिंदी अध्यापकांना उत्कृष्ट हिंदी अध्यापन सेवाकार्य पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, साईशिर्डी डायरी,लाडू प्रसाद पॉकेट, साई कॅलेंडर,पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.श्री साई संस्थानच्या विश्वस्त, श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी अध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी साईडायरी, कॅलेंडर, प्रसादपॉकेट सर्वांना भेट म्हणून दिले.त्याबद्दल आयोजक अर्जुन राऊत यांनी विशेष कौतुक करून आभार मानले. उदघाटनपर भाषणात प्रो.डॉ.सदानंद भोसले म्हणाले,अर्जुन राऊत यांनी टाकळीभानसारख्या छोट्या खेड्यात राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आयोजित केले ही ऐतिहासीक आणि गावाच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे.हिंदी भाषा ही जन -जन के हृदय की भाषा असून या भाषेत भारतीय सभ्यता, संस्कार, शिक्षा, न्याय, नीती मूल्यांचे भरणपोषण करणारी ही भाषा आहे.भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात या भाषेचे अमूल्य योगदान आहे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत असताना हे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आयोजित करून ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थने इतिहास घडविला आहे.शासकीय पातळीवर यासाठी मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग संस्थेला करता येईल असे डॉ.भोसले यांनी सांगून साहित्यनिर्मितीचा सविस्तर आढावा घेतला. सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी भाषा आणि समाज यांचे महत्व सांगून मराठी ही आपली आई असून हिंदी भाषा ही मावशी आहे, तिचे प्रेम जपले पाहिजे असे सांगून अर्जुन राऊत यांच्या धाडशी उपक्रमांचे कौतुक केले.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी 'ज्ञानज्योतीचा प्रकाश 'ही कविता सादर करून अर्जुन राऊत हे 'ज्ञानज्योती 'शब्द शोधण्यासाठी दोन, तीन महिने शब्दकोश, शब्दरत्नाकर चाळत होते, त्यांना हाच शब्द योग्य वाटला, ज्ञानदीप जगी लावणारे शिक्षक ह्या खऱ्या ज्ञानज्योती आहेत, हा त्यांच्या उद्दात्त हेतू महत्वाचा असून ज्ञानज्योतीचे हे उदघाट्न व पहिले संमेलन सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाले. कार्यक्रम प्रसंगी गायक दिपक वाघ यांनी देशभक्तीपर सुंदर गीत सादर केले तदनंतर स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देश सेवा देणारे मेजर संभाजी आघाडे,मेजर भिमराज कांबळे, मेजर पोपटराव दाभाडे,मेजर प्रतापराव मगर, यांचा देश सेवेबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, भैया पठाण,मुकुंद हापसे, अक्षय कोकणे, सागर पवार, रामेश्वर शिंदे ,संजय वाघमारे, प्रा.विजय बोर्डे इत्यादींचे मान्यवरांनी कौतुक केले.प्राचार्य डॉ.शहाबुद्दीन शेख यांनी हिंदी भाषा आणि साहित्यनिर्मितीचा अनुबंध सांगितला.ह.भ.प.दत्तात्रय बहिरट महाराज यांनी संत तुकाराम, संत कबीर,संत मीराबाई, संत ज्ञानेश्वर इत्यादींचे महत्व व भाषावैभव सांगून ज्ञानज्योत सदैव तेवत राहो ह्या सदिच्छा व्यक्त केल्या.अर्जुन राऊत यांनी स्वागत करून मान्यवरांचा सत्कार केला.प्रा.विजय बोर्डे यांनी प्रास्ताविक केले.तर या यशस्वी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रियंका चाबुकस्वार व प्रा. संजय पवार यांनी केले.यावेळी अकोले येथील अगस्ती महाविद्यालयातील डॉ. साहेबराव सुकदेव गायकवाड यांच्या 'हिंदी नाटक :एक समीक्षा 'या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्तें प्रकाशन करण्यात आले.अर्जुन राऊत यांनी लेखकाचा सत्कार केला. डॉ. साहेबराव गायकवाड, सुधाकर शिंदे, डॉ.देविदास बामणे आदिंनी आपले मनोगतं व्यक्त केले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी अर्जुन राऊत यांनी ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था,सुरू केल्याबद्दल आपली पुस्तके भेट देऊन त्यांच्या सत्कार केला.तसेच प्रो.डॉ.सदानंद भोसले यांचा सत्कार सभापती डॉ.वंदना मुरकुटे आणि प्राचार्य डॉ.शहाबुद्दीन शेख यांचा सत्कार ह.भ.प.दत्तात्रय बहिरट महाराज यांच्या हस्ते डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित 'भारतीय कुंभार समाजातील संत'आणि 'लॉकडाऊनच्या कविता 'ही पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र कोकणे, प्रल्हाद कापसे, शिवाजी वखरे, पत्रकार बापूसाहेब कोकणे, पत्रकार दिलीपराव लोखंडे,विकास मगर , पत्रकार अशोक रणनवरे आदींसह हिंदी साहित्यिक प्रेमी ग्रामस्थ उपस्थित मुकुंद हापसे यांनी आभार मानले.या संमेलन प्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, अनिल भनगडे यांनी भेट दिली त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला...

 हिंदी भाषेचे राष्ट्रीय साहित्य संमेलन भरवून अर्जुन राऊत यांनी टाळीभानचे नाव उज्ज्वल केले =सभापती डॉ.वंदना मुरकुटे  श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - हिंदी भाषेचे राष्ट्रीय साहित्य संमेलन भरवून अर्जुन राऊत यांनी टाकळीभानचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे, असे गौरवोद्गार श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी व्यक्त केले.                   टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उदघाटन सोहळ्यात डॉ.वंदना मुरकुटे बोलत होत्या.         उदघाटक प्रो.डॉ.सदानंद भोसले यांनी सांगितले की,   हिंदी भाषा ही देशाचे प्रतिनिधित्व करणारी भाषा असून , या साध्या सुमधुर भाषेने पूर्ण देशाला जोडून ठेवले आहे, आपल्या देशाच्या विविधतेतून एकतेचे दर्शन या भाषेने दिले आहे. टाकळीभान येथील रुक्मिणी माधव मंगल कार्यालयात ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे पहिले राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आण...

तब्बल बावीस वर्षांनी भरला वर्ग

( इंदापूर प्रतिनिधी )  सन १९९९ -२००० च्या वर्षी इयत्ता १० वी च्या विद्यार्थी यांनी एकत्र येऊन गेट-टुगेदर च्या माध्यमातून इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयास सन 1999 ते 2000 या मधील विद्यार्थीथी व विद्यार्थिन स्वखर्चाने अंदाजे 40,000/- चाळीस हजार रुपयाचेे सीसीटीव्ही भेेट दिली.                   रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल बावीस वर्षांनी एकत्र येऊन रविवार दि.२९मे रोजी जुन्या आठवणी जागविल्या.  हा स्नेहमेळावा प्राचार्य बी. एम. वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.  सन १९९९ -२००० च्या वर्षी इयत्ता १० वी च्या विद्यार्थिदशेत असणारा तोच जोश ,तोच उल्हास व गुरुजनांचे प्रति असणारा आदर पहावयास मिळाला त्यावेळी उपस्थित असणारे बहुतांश माजी विद्यार्थी व  विद्यार्थिनी या आठवणी सांगत असताना भावनाविवश झाल्याचे पाहावयास मिळाले.             विद्यार्थिदशेत असताना अनेकांच्या अंगी खोडकरपणा बरोबरच खेळकरपणा सुद्धा असतो, त्याचबर...

सुशिक्षित वर्गाने सविधान वाचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे ; दिशा पिंकी शेख

 सुशिक्षित वर्गाने सविधान वाचवण्यासाठी  नेहमी प्रयत्नशील असावे ; दिशा पिंकी शेख   श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -  स्वतंत्र समता शिक्षक संघ व परिवर्तन शिक्षक मित्र श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ येथील संगमनेररोडवरील शासकीय व्ही.आय.पी. रेस्ट हाऊस याठिकाणी संपन्न झाला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या दिशा शेख यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी बोलताना दिशा शेख म्हणाले की,सुशिक्षित वर्गांना ज्यांना ज्यांना फुले शाहू आंबेडकर यांची चळवळ समजलेली आहे,आकलन झालेले आहे त्यांनी त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे तसेच महिलांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केला पाहिजे,दैनंदिन जीवनामध्ये विज्ञाननिष्ठ बनले पाहिजे तरच लोकशाही टिकेल व संविधान बळकट होईल असेही त्या म्हणाल्या,तसेच स्वतंत्र समता शिक्षक संघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र विधाते यांनी आ...

*राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा)भरणे यांची बावड्यात रेकॉर्ड ब्रेक सभा संपन्न* _नेत्यांच्या आक्रमक भाषणांनी बाजारतळ प्रांगण दणाणून सोडले._

 *राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा)भरणे यांची बावड्यात रेकॉर्ड ब्रेक सभा संपन्न*   _नेत्यांच्या आक्रमक भाषणांनी बाजारतळ प्रांगण दणाणून सोडले._ माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मुळ गाव बावडा, त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकीय पटलावर बावडा गावच्या सभेला अनन्य साधारण महत्व आहे.कारण याच मैदानावरून तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवली जाते.परवा पर्यंत हर्षवर्धन पाटलांनी अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितमध्ये या मैदानावर हजारोंच्या सभा गाजवून आपली ताकद दाखवून दिली.  शुक्रवारी दि.२७ मे रोजी सुद्धा अशीच प्रचंड मोठी सभा या मैदानावर गाजली,परंतु ती सभा होती,हर्षवर्धन पाटलांना सलग दोन वेळा ज्यांनी पाणी पाजले ते राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय(मामा) भरणे यांची...!! होय,हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावामध्ये राज्यमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय( मामा) भरणे यांची बावडेकरांनी प्रचंड मोठी सभा आयोजित करून हर्षवर्धन पाटलांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीला गावातच ब्रेक देण्याच्या दृष्टीने ताकदीने पाऊल टाकले आहे.या ठिकाणी हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये राज्यमंत्री दत...

अमृत जवान सन्मान योजने अंतर्गत ७२ वर्षांपूर्वीच्या रस्त्याचा वाद संपुष्टात ---------------------------------- तहसीलदार प्रशांत पाटील आणि त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून माजी सैनिकास मिळाला न्याय

 अमृत जवान सन्मान योजने अंतर्गत ७२ वर्षांपूर्वीच्या रस्त्याचा वाद संपुष्टात ---------------------------------- तहसीलदार प्रशांत पाटील आणि त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून माजी सैनिकास मिळाला न्याय  श्रीरामपूर ( शौकतभाई शेख) -  तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील माजी सैनिक विलास खर्डे यांच्या जमिनीकडे जाण्यासाठी ७० वर्षा पासून शिवार रस्ता होता परंतु संबंधित काही शेतकरी जाण्या-येण्यासाठी मनाई करत असत व शेजारील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात  अतिक्रमण केलेले असल्याकारणाने  रस्ता नामशेष होता त्यामुळे माजी सैनिकासह सर्वच शेतकऱ्यांना शेतीत अवजारे घेऊन जाणे व शेतमालाची वाहतूक करताना मोठी कसरत व त्रास होत असे म्हणून मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या संकल्पनेतील व राज्य शासनाने दखल घेतलेल्या अमृत जवान सन्मान योजनेअंतर्गत श्रीरामपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील यांचेकडे अर्ज दाखल केला असता मा. तहसीलदार यांनी बेलापूर खुर्द चे मंडलाधिकारी सी. बी.बोरुडे व तलाठी यांना आदेश पारित करून स्पॉट पंचनामा करत माजी सैनिकास तात्काळ न्याय देऊन अर्ज निकाली काढावा असा आदेश ...

ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्साररी ३१ मे रोजी श्रीरामपूरात ओबीसी जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक,यासोबत ओबीसींच्या विविध समस्यांबाबत जिल्हा मेळावा

 ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्साररी ३१ मे रोजी श्रीरामपूरात  ओबीसी जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक,यासोबत ओबीसींच्या विविध समस्यांबाबत जिल्हा मेळावा श्रीरामपूर (प्रतिनिधी) - ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या जिल्हा कार्यकरणीची आढावा बैठक आणि जिल्हा मेळावा श्रीरामपूर येथे ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हाजी फैयाजभाई बागवान यांनी दिली आहे, ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी हे सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात ओबीसींच्या प्रश्नासंदर्भात व समस्यांवर, विविध चर्चा संदर्भात सध्या दौरे करून मेळावे घेत आहेत, येत्या आठवड्यात ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून मंगळवार दि. ३१ मे २०२२ रोजी श्रीरामपूर याठिकाणी येत असून याकरीता जिल्हा कार्यकारणीतील सर्व सदस्यांची आढावा बैठक होणार आहे त्यात ओबीसी संदर्भात विविध समस्यांवर चर्चा व निवारण आणि पुढील रणनीती, नवीन सदस्य निवड तथा अशा विविध अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे,श्रीरामपूर येथील संगमनेर रोडवरील व्ही.आय.प...

अहमदनगर शहरातील हस्तमुख व्यक्तीमत्व किरण रमेश सब्बन काळाच्या पडद्याआड

 अहमदनगर शहरातील हस्तमुख व्यक्तीमत्व  किरण रमेश सब्बन काळाच्या पडद्याआड अहमदनगर (शौकतभाई शेख)- सावेडी टीव्ही सेंटर येथील अहमदनगर महापालिकेचे निवृत्त गुणवंत कर्मचारी किरण रमेश सब्बन  यांचे गुरुवार दि.१९ मे रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते सदैव हस्तमुख अत्यंत मनमिळावू व आपल्या शांत स्वभावावामुळे सर्वत्र सुपरिचित होते. महानगरपालिकेत आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाने त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. त्यांचे कार्यालयीन काम अद्यायावत असे आणि रेकॉर्ड ठेवण्याची अत्यंत सुरेख पध्दत सर्वांना सुपरिचित होती. ते क्रिकेटचे शौकीन होते. क्रिकेटच्या इतिहासातील सर्व बारकावे त्यांना माहित होते. त्यांनी संग्रह केलेल्या क्रिकेटच्या माहितीचे रेकॉर्ड पाहण्यासारखे आहे. उत्कृष्ट अक्षर लेखन व चित्रकलेतही ते पारंगत होते. प्रसिद्ध गायक मोहंमद रफी यांचे ते चाहते होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त ते  उपक्रम घेत असत. तर मोहंमदी रफी यांच्या आवाजात ते हुबेहुब गात असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माजी नगराध्यक्ष विद्याधर भुुुमाजी चन्ना यांचे ते जावई होते. त्यांच्या पश्‍चात वडील निवृत्त...

फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्ण हक्क परिषद तर्फे एक लाख नागरिक पत्र पाठवणार! रुग्ण हक्क कायदा अभियानाची सुरुवात.

  फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्ण हक्क परिषद तर्फे एक लाख नागरिक पत्र पाठवणार! रुग्ण हक्क कायदा अभियानाची सुरुवात. पुणे - आपल्या देशात गेली गेली दोन वर्षे आरोग्याच्या प्रश्नावर आपण भयंकर प्रश्नाला तोंड देत असताना व्यवस्था म्हणून अत्यंत अपुरे पडलो. देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक केवळ स्वतः जवळ पैसे नाहीत म्हणून ऑक्सिजन इंजेक्शन ॲम्बुलन्स हॉस्पिटल मधील बेड व्हेंटिलेटर आणि चांगले उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू होत आहे हे वास्तव देशातील जनतेने उघड्या डोळ्याने बघितले आहे. दर्जेदार उपचार मिळविणे येथील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. मात्र तरीही यासाठी कोणताही कायदा नाही म्हणून अनेक नागरिकांना, असंख्य रुग्णांना पैशाअभावी मरण पत्करावे लागत आहे म्हणूनच पैसे नाहीत म्हणून कोणीही मरू नये यासाठी फौजदारी संहितेचा रूग्ण हक्क संरक्षण कायदा केंद्राने करावा यासाठी रुग्ण हक्क कायदा अभियान आजपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण या...

बावडा गावात ६९ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ बावडा गावात कोटीचे उद्घाटन

विकासाचे काम करतो तो मामा बावडा गावात राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विकासाचा कामाचा डोंगर पाहता अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत इंदापूर तालुक्यातील राजकारण बदलणार ?  (इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर  सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ता.२७ मे रोजी इंदापूर तालुक्यातील बावडा गावात ६९ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ होणार आहे.सायंकाळी ६ वाजता बावडा गावातील बाजार तळावर राज्यमंत्री भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभा होणार इंदापूर  सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ता.२७ मे रोजी इंदापूर तालुक्यातील बावडा गावात ६९ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ होणार आहे.सायंकाळी ६ वाजता बावडा गावातील बाजार तळावर राज्यमंत्री भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभा होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध...

बावडा गावातील बाजार तळावर राज्यमंत्री भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभा होणार

 इंदापूर  सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ता.२७ मे रोजी इंदापूर तालुक्यातील बावडा गावात ६९ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ होणार आहे.सायंकाळी ६ वाजता बावडा गावातील बाजार तळावर राज्यमंत्री भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभा होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर असणार आहेत. या नियोजित कार्यक्रमासाठी माजी.जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, मा.बांधकाम सभापती प्रवीण माने,मा.जि.प.सदस्य श्रीमंत ढोले, मा.पं.स.सभापती प्रशांत पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जि.प. सदस्य अभिजित तांबिले,जि.नि.समिती सदस्य सचिन सपकळ, युवानेते दिपक जाधव,कार्याध्यक्ष अतुल झगडे,दत्तात्तय घोगरे, बाळासाहेब करगळ,पंचायत समिती सभापती स्वाती शेंडे,महिलाध्यक्षा छाया पडसळकर,महारुद्र पाटील यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. याकामांचे होणारे उद्घाटन आणि भूमिपूजन बावडा- निरा नरसिंहपूर रस्त्याचे लोकांपण ५७ कोटी बीकेबीएन रस्त्याव...

फुले शाहू आंबेडकरांच्या आदर्श चळवळीची बुज राखा ; सर्व पक्षीय आमदारांना मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन...!

 फुले शाहू आंबेडकरांच्या आदर्श चळवळीची बुज राखा ; सर्व पक्षीय आमदारांना मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन...! नेवासा (कमलेश शेवाळे) - छञपती शिवरायांचे १३ वे वंशज “युवराज छत्रपती संभाजीराजे” यांना राज्यसभा निवडणुकीत बिनशर्त मतदान करावे असे आवाहन सकल महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने व जीवन ज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र या संघटनेने विधानसभेच्या सर्व पक्षीय आमदारांना केले आहे. मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर तसेच जीवन ज्योत फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले यांनी आमदारांना आवाहन करतांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यसभा निवडणुकीमध्ये छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे हे अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. आपणांस मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर व जीवन ज्योत फाऊंडेशन या संघटनेच्या वतीने विनंती करत आहोत की आपण छञपती संभाजीराजेंना बिनशर्त पाठिंबा देऊन आपले बहुमूल्य मत युवराज छत्रपती संभाजीराजे यांना करावे. छञपती संभाजीराजे हे मराठा समाजा सोबतच बहुजन समाजाच्या अनेक विषयांविषयी सवेंदनशील असून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. आजवर संभाजीराजेंनी ग...

खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करा ; अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेशी संपर्क करावा ; ढोरे- पाटील

 खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करा ; अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेशी संपर्क करावा ;  ढोरे- पाटील चिखली (प्रतिनिधी) -  किंमतीपेक्षा जास्त दराने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे - पाटील यांनी केली आहे. जिल्ह्याभरात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असून,थोड्याच दिवसांत खरीप हंगाम सुरू होत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना रासायनिक खत उपलब्द होत नसल्याचे दिसत आहे,त्यात मोठ्या प्रमाणात काही कृषीसेवा केंद्र चालकांकडून मोठ्या प्रमाणात साठेबाजी करून रासायनिक खतांची अधिक दराने विक्री सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे,तसेच गरज नसलेले खत देखील बळजबरीने लीकिंगद्वारे शेतकऱ्यांवर माथी माररे जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येत असून त्यांची पिळवणूक होतांना दिसत आहे, त्यामुळे रासायनिक खतांची साठेबाजी करणाऱ्या,गरज नसलेले खत देणाऱ्या आणि जास्त दराने खतांची विक्री करणाऱ्या दोषी कृषी केंद्...

पुणतांबा ग्रामसभेत शेतकऱ्यांची आंदोलनाची घोषणा, सात दिवसात मागण्या मान्य नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार,

 पुणतांबा ग्रामसभेत शेतकऱ्यांची आंदोलनाची घोषणा, सात दिवसात मागण्या मान्य नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार, शिर्डी,राजेंद्र दूनबळे अहमदनगर जिल्यातील  राहाता तालुक्यातील ऐतिहासिक असलेले गावपुणतांबा येथे मागे शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्यानंतरच २०१७ साली राज्यभरात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला होता. याच पुणतांबा गावातून आता ५ वर्षानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक कार्यवाही न केल्यास एक जूनपासून धरणे आंदोलन आणि त्यानंतर अधिक आक्रमकपणे आंदोलनाचा ठराव पुणतांबा इथं विशेष ग्रामसभेत करण्यात आला.  या ग्रामसभेत १६ ठराव मंजूर करण्यात आले पुणतांबा इथं विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे १६ ठराव मंजूर करण्यात आले. ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची प्रत सरकारला पाठवून दिली आहे. पुढील सात दिवसांत दखल न घेतल्यास १ ते ५ जून या कालावधीत धरणे आंदोलन केले जाणार आहे. तसंच ५ जूननंतर आंदोलन आणखी आक्रमक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राहाता तहसीलदारांना उद्या ठरावाचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच इ...

इंदापूर नगरपरिषद च्या पाण्याचा घाण दुर्गंधीयुक्त वास इंदापूरकर नागरिक त्रस्त, आंबेडकर नगर मध्ये पाण्यामध्ये आळ्या

  इंदापूर नगरपरिषद च्या पाण्याचा घाण दुर्गंधीयुक्त वास इंदापूरकर नागरिक त्रस्त, आंबेडकर नगर मध्ये पाण्यामध्ये आळ्या (इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर नगरपरिषद स्वच्छता बाबतीत राष्ट्रीय पातळीवर पदके मिळवून एक प्रकारे देशात नावलौकिक केलेल्या असतानाच याची इंदापूर नगरपरिषदेच्या पिण्याचा पाण्याचा दुर्गंधीयुक्त आणि घाण वास येत असून नागरिकांना ते पाणी पिण्यायोग्य नसल्याचे ही नागरिकांमधून बोलले जात आहे. इंदापूर नगरपरिषद  स्वच्छता पुरस्कार मिळवतानाच कोटीचे बक्षिसे मिळवली मग कोटीचे बक्षिसे रूपी मिळणारे पैसे कुठे वापरली याचाही नागरिक जाब विचारत असल्याचेही बोलले जात आहे. इंदापूर नगर परिषदेने पिण्याच्या पाण्यासाठी करोडो रुपये खर्च केले असतानाच इंदापूर शहरातील कसबा भागात पिण्याचे पाणी दुर्गंधीयुक्त त्याचप्रमाणे रासानिक  ज्याप्रमाणे ऑईलचे वास येत आहे असे वास पाणी मध्ये येत आहे. इंदापूर नगरपरिषद च्या या घाण पाण्यामुळे नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे.     तसेच येणारे पाणी हे चविष्ट नसल्यामुळे नागरिकांना जुलाब तसेच पोटाचे आजार उद्भवत आहे परंतु  इंदापूर नगरपरिषद याकडे लक्ष ...

. रेड क्रॉस व ज्युपिटर हॉस्पिटलची आरोग्यसेवा कौतुकास्पद - मीनाताई जगधने

 रेड क्रॉस व ज्युपिटर हॉस्पिटलची आरोग्यसेवा कौतुकास्पद - मीनाताई जगधने शिबिरास जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - हृदयविकार औषधाने अथवा बरा करणं सामान्यांना खर्चीक बाब आहे,कुटुंबातील सदस्यास हा आजार झाला तर आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या दवाखान्यात उपचार घेऊ शकत नाही, त्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागतात,अशा परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे यांचा मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम संजीवनी देणारा आहे. गोरगरिबांसाठी मोठमोठी दवाखाने मोफत उपलब्ध करून देण्यासाठी रेड क्रॉस नेहमीच प्रयत्नशील असते.जगात रेड क्रॉस सोसायटी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.रेड क्रॉस सोसायटी व जुपिटर लाईफ  लाईन हॉस्पिटल पुणे यांची आरोग्यसेवा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांनी केले जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर व ज्युपिटर हॉस्पिटल पुणे यांचे संयुक्त विद्यमाने ०ते १८ वयोगटातील लहान बालकांचे मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच संपन...

इंदापूर शहरात दुचाकी गाड्या चोरीचे प्रमाण वाढले

 इंदापूर शहरात दुचाकी गाड्या चोरीचे प्रमाण वाढले   ( इंदापूर प्रतिनिधी) इंदापूर शहरात अनेक दुचाकी गाड्या चोरीला जात असून इंदापूर पोलिस स्टेशन फक्त गावात हॉर्न वाजून लोकांचं समाधान करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे .   अनेकांची हातावर पोट असणारे युवकांनी फायनान्स करून काढलेल्या गाड्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हद्दीतून चोरीला जात आहे .  पाच ते दहा मिनिटात गाडी मालक लावून गेल्यानंतर गाडी लंपास होत आहे याचा अर्थ मोबाईलच्या जिओ नोट फोर जी पेक्षा जास्त गाडी चोर फास्ट झाल्याचे दिसून येत आहे . तरी इंदापूर पोलिस स्टेशन यांनी याकडे तत्काळ लक्ष देऊन झाडाची फांदी न तोडता चोरांची मुळासकट उपटून काढून इंदापूर शहरातून गेलेल्या सर्व गाड्यांची चौकशी करून हातावरचे पोट असलेली युवकांनी रोजीरोटीसाठी घेतलेल्या गाड्या इंदापूर  पोलीस स्टेशने मिळवून देण्याची मागणी पुढे येत आहे. कसबा गल्लीतील गोविंद बाळू बांबळे वय सत्तावीस राहणारा इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांची गाडी MH42  AC9283 राहत्या घरापासून दिनांक वीस चार दोन गोविंदा बाळू बांबळे यांची गाडी ठाकर गल्लीत...

ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांचा कोकण डायरी परिवार कडून विशेष सत्कार

 ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांचा कोकण डायरी परिवार कडून विशेष सत्कार पनवेल /प्रतिनिधी        ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल या पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित केंद्रीय अध्यक्ष पदावर नियुक्त पनवेलचे जेष्ठ पत्रकार गणेश कोळी यांचा कोकण डायरी परिवार कडून विशेष सत्कार करण्यात आला.    ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल संघटनेने पनवेलच्या सभेत गणेश कोळी यांना केंद्रीय अध्यक्ष पद दिले. गणेश कोळी गेली दोन तपाहून अधीक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.वाचकाला केंद्र मानून त्यांनी आजतागायत उत्तम पत्रकारिता केली आहे त्यांना केंद्रीय अध्यक्ष म्हणून मिळालेला मान हा पनवेलच्या सर्व पत्रकारांचा सन्मान वाढवणारा मान आहे असे कौतुकोदगार कोकण डायरीचे संपादक जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांनी मांडले.  गणेश कोळी यांना पुणेरी पगडी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे अल्लाउद्दीन शेख,उरणचे अजीत पाटील, खारघरचे जसपाल सिंग नेओल, खोपोलीचे साबीर शेख,किरण बाथम, गणपत वारगडा,शंकर वायदंडे आदी पत्रकार मान्यवरांनी कोळीन...

भिमाई आश्रमशाळेत बुद्ध जयंती साजरी*.

 *भिमाई आश्रमशाळेत बुद्ध जयंती साजरी*. *इंदापूर* (दि.१६) :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात जगाला शांतीचा संदेश देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त भारतीय सैनिक मधुकर लक्ष्मण जगताप (पुणे) यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिवंगत रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरेंनी उपस्थितांना बुद्ध जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी), सचिव ॲड.समीर मखरे, आयु.मंगलताई साळवे ,सुहास पवार (पुणे) तसेच नानासाहेब सानप, अधिक्षक अनिल ओहोळ,अनिसा मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न  श्रीरामपूर: (शौकतभाई शेख) - येथील भारतीय बौद्ध महासभा आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एकता समितीतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, चित्ररांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ लुंबिनी बुद्ध विहार येथे बुध्द जयंती दिनी मान्यवरांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाल्याची माहिती स्पर्धा प्रमुख अशोकराव दिवे यांनी दिली. सुगंधराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बाबासाहेब दिघे, साहित्यिक डॉ.प्रा. बाबुराव उपाध्ये,डॉ.मच्छिन्द्र त्रिभुवन, उपाध्यक्ष प्रकाश सावंत, आनंद मेढे, किरण खंडागळे, कुंडलिक दळवी, आदींसह मान्यवर उपस्थित होते.  एकता समितीचे अध्यक्ष रितेश एडके यांनी स्वागत केले. स्पर्धा प्रमुख अशोकराव दिवे यांनी प्रास्तविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.स्पर्धा प्रमुख राजेंद्रकुमार हिवाळे, संतोष त्रिभुवन,अमोल सोनवणे यांनी नियोजन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, आभ्यास कसा करावा पुस्तक, रोख र...

आमदार लहुजी कानडे यांच्याकडून,हजरत काझीबाबा दर्गाहला फुलांची चादर अर्पण

 आमदार लहुजी कानडे यांच्याकडून,हजरत काझीबाबा दर्गाहला फुलांची चादर अर्पण श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -  शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत काझीबाबा दर्गाहमध्ये फुलांची चादर आर्पण करताना आमदार लहुजी कानडे,अशोक नाना कानडे,अरुण पाटील नाईक, जहागिरदार,हाजी मुजफ्फरभाई शेख, ऍड.समिनभाई बागवान, माऊली मुरकुटे,आबा पवार, सतीष बोरडे,राजू औताडे, दानिश शेख,साजीद शाह,रफिक शौकत शेख आदी मान्यवर उपस्थित होते. हजरत काझीबाबा दर्गाह यांचा ऊर्स असल्याने आज सोमवार दिनांक १६ मे २०२२ रोजी सायंकाळी संदलचा कार्यक्रम होणार आहे,तसेच उद्या मंगळवार दिनांक १७ मे रोजी वॉर्ड क्र.२ येथील शहिद अय्यूबभाई चौक, काझीबाबा ऊर्स मैदानावर सायंकाळी ६ वाजता,मुंबई येथील सुप्रसिद्ध कव्वाल अजिम नाजा यांचा शानदार कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे तसेच परवा बुधवार दिनांक १८ मे रोजी सुप्रसिद्ध कव्वाल वसीम साबरी आणि करिष्मा ताज यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे,तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहनही संयोजक मा.नगरसेवक हाजी मुजफ्फरभाई शेख,फतेह ऍंड पार्टीचे अध्यक्ष दानिश शेख,ऊर्स कमेटीचे अध्यक्ष मा.नगरसेवक दिलीप नाग...

*दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रथम स्मृतिदिनी आजी-माजी मंत्र्यांनी दिला गत स्मृतींना उजाळा*.

 *दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रथम स्मृतिदिनी आजी-माजी मंत्र्यांनी दिला गत स्मृतींना उजाळा*. *इंदापूर* ( *दि.१४* ) :- येथील  माजी नगराध्यक्ष व  मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष स्मृतीशेष पँथर रत्नाकर मखरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचा कार्यक्रम भिमाई आश्रमशाळेत पार पडला. दिवंगत रत्नाकर मखरेंच्या अस्थींचे पुजन. प्रतिमापूजन तदनंतर बुद्ध पुजा व प्रवचनाचा कार्यक्रम भंते धम्मसार , बौद्धाचार्य बाळासाहेब धावारे,बाळासाहेब सरवदे यांच्या हस्ते संपन्न झाला. पूजेस आयु. शकुंतला रत्नाकर मखरे,पुत्र ॲड. राहुल मखरे,संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री श्री. हर्षवर्धनजी पाटील म्हणाले की, दिवंगत रत्नाकर मखरेंच्या जाण्याने इंदापूर तालुका हा पुरोगामी विचाराला मुकला असून आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित व कष्टकरी वर्गासाठी काम केलं. तात्या व माझे जवळचे संबंध होते.कै. शंकरराव भाऊ व माझे वडील कै. शहाजी बापू  यांच्याशी त्यांची मैत्री होती. पाटील पुढे म्हणाले की, तात्या नगराध्यक्ष झाले.पुढे त्यांन...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शिफारशी मुळे बारामती शहर तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 20 विद्यार्थ्यांना मिळाला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जवळपास 50 लाख रुपयांचा निधी*

 *उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शिफारशी मुळे बारामती शहर तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 20 विद्यार्थ्यांना मिळाला मौलाना आझाद  आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने  जवळपास 50 लाख रुपयांचा निधी* बारामती -: आज दिनांक 14 /5/ 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते बारामती शहर व तालुक्यातील 20 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जवळपास 50 लाख रुपयांचे मजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांन ची ही सर्व रक्कम आर टी जी एस द्वारे त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेलीआहे.मंजुरी पत्र वाटप वेळी उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार यांनी या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महामंडळाचे पैसे वेळेवर परतफेड करण्याची सूचना केली. आदरणीय दादांनी मागील दोन बजेटमध्ये मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास मोठ्या प्रमाणात निधी दिलेला असल्यामुळे ही योजना उत्तम रित्या महाराष्ट्रात राबविली जात आहे.  याप्रसंगी सर्व समाज बांधवांच्या वतीने सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्...

राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी

( इंदापूर प्रतिनिधी )पुणे येथील पत्रकार भवन  येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या सदर निवडी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष - काशिनाथ शेवते पक्षाचे मुख्य महासचिव- ज्ञानेश्वर जी सलगर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष - ॲड संजय माने पाटील,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष -अजितकुमार पाटील   यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आल्या यावेळी १) प म उपाध्यक्ष प्रकाश खरात २) प म संघटक कालीदास गाढवे ३) पुणे        जिल्हा सरचिटणीस संतोष कोकरे४) पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार ५) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर ६) पुणे महिला अध्यक्ष किरवे ताई ७) पिंपरी महिला अध्यक्ष गंगावणे ताई८) पुणे शहर युवक उमेश कोकरे तसेच महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडी १)अध्यक्ष शरद दडस , २)प महाराष्ट्र अध्यक्ष पंकज देवकते व  १)पुणे जिल्हा शहर वकिल आघाडी     जिल्हाध्यक्ष ॲड विजय लेंगरे २)पुणे शहर अध्यक्ष ॲड लक्ष्मण केसकर , ३)सासवड (पुरंदर) ता वकील आघाडी ॲड पंकज बोरावके यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी      पुणे ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष ...

राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा सरचिटणीस पदी भिगवण येथील संतोष कोकरे यांची निवड.

( इदापूर इंदापूर प्रतिनिधी) राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा सरचिटणीस पदी भिगवण येथील संतोष कोकरे यांची निवड. पुणे येथील पत्रकार भवन येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या िविध पदाधिकार्‍यांच्या निवडी प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी भिगवण येथील उद्योजक संतोष कोकरे यांची निवड करण्यात आली सदर निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर जी सलगर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष  एडवोकेट संजय माने पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोपने पक्षाचे युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील आदी उपस्थित होते श्री संतोष कोकरे पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांचा भिगवण येथे कृषी निविष्ठा विक्री केंद्र असून गेल्या वीस वर्षापासून चांगल्या प्रकारची सेवा ते शेतकऱ्यांना देतात तसेच शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करतात श्री कोकरे यांचा भिगवण परिसरात तसेच करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात चांगला जनसंपर्क आहे पक्षाला भिगवण परिसरातून चांगले नेतृत्व मिळाल्यामुळे आगामी काळात पक्ष पुण...

इंदापूर येथे राष्ट्रीय लोक अदालतीत 6,243 प्रकरणे निघाली निकाली

 इंदापूर येथे राष्ट्रीय लोक अदालतीत  6,243 प्रकरणे निघाली निकाली  ६६ दिवाणी व फौजदारी प्रकरणे व ६१७७ प्री लिटीगेशन प्रकरणे निकाली : कौटूंबिक वादाची अनेक प्रकरणे निकाली  तालुका प्रतिनिधी / इंदापूर   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व दिवाणी व फौजदारी न्यायालय इंदापूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये शेकडो नागरिकांना आपली न्यायालयीन प्रकरणे निकाली काढून घेतले. तसेच अनेक वर्षे विभक्त राहणारी विवाहित जोडपी, बँकांची अनेक वर्षे थकीत असणारी कर्ज व गहाण खत प्रकरणे, वीज बिलासंदर्भातील वादविवाद, वाहतूक पोलीस यांच्याकडून करण्यात आलेल्या कार्यवाही, कौटुंबिक व भावभावकी मधील शेती संदर्भातील असणारी वाटप संदर्भात असणारी हजारो न्यायालयीन प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली.  इंदापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार ( दि. ७ मे २०२२ )  रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत तब्बल ६६  दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच, दाखल पूर्व प्रकरणे ( प्री लिटीगेशन ) ची  ६१७७ प्रकरणे मिटवण्यात आले असल्याची माहिती न्यायाधीश तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.ल.पाटील यां...

इंदापूर तालुक्यासाठी दत्ता मामांनी आणले 8 कोटी 57 लाख रुपये मंजूर ; या गावांना मिळाला इतका निधी

 इंदापूर तालुक्यासाठी दत्ता मामांनी आणले 8 कोटी 57 लाख रुपये मंजूर ; या गावांना मिळाला इतका निधी  इंदापूर || राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणत विकास निधी खेचून आनत असून कोट्यावधींच्या विकास कामांचा त्यांनी तालुक्यात धडाकाच लावला आहे.भरणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 8 कोटी 57 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागरी सुविधाममधून 1कोटी 57 लाख, लेखाशीर्ष 3054 गट ब व क मधून दोन रस्त्यांकरिता 2 कोटी तर 2515 योजनेतून 5 कोटी रुपये असा एकूण निधी 8 कोटी 57 लाख रूपयांचा निधी इंदापूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. नागरी सुविधा अंतर्गत मंजूर कामे खालीलप्रमाणे :-  सणसर येथील समर्थ नगर थोरात घर रस्ता करणे ६  लक्ष, अंथुर्ण शिंदे मळा अंतर्गत रस्ता करणे १५ लक्ष,अंथुर्णे येथील ४८ फाटा ते दळवी वस्ती रस्ता करणे २० लक्ष,काटी येथील प्राथमिक शाळा ते महादेव मंदिर रस्ता करणे १० लक्ष,लासुर्णे येथील ग्रा.पं.लासुर्ण ते माळी मळा रस्ता करणे १० लक्ष,बिजवडी ये...

बारामती आरटीओ कार्यालयात अनागोंदी कारभार, अंदाजे आठ ते पंधरा दिवस झाले तरी गाडीवर लोन वाढवण्याचे कामे लिपीकाडून अद्यापही नाही

 बारामती आरटीओ कार्यालयात अनागोंदी कारभार, अंदाजे आठ ते पंधरा दिवस झाले तरी गाडीवर लोन  वाढवण्याचे कामे लिपीकाडून अद्यापही नाही (इंदापूर प्रतिनिधी ) बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात काही दिवसापूर्वीपासून कामे संथ गतीने होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.    याबाबत अशी माहिती की पूर्वी अशी  कामे  गाडीवर लोन चढवणे अथवा गाडी इतरांच्या नावे करणे अशी कामे एक ते दोन दिवसात मार्गी लागत  होते परंतु या ठिकाणी आलेले अधिकारी हे वेळेवर काम करत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे .  काही कागदपत्रे ही अत्यावश्यक असतात ती वेळेवर न झाल्यास याबाबत नागरिकांना खूप मानसिक त्रास करावा सहन करावा लागतो. गाडीवर लोन वाढवून नागरिक हे आपले देणेघेणे मिटवण्यासाठी गाडीवर लोन करत असतो आणि ते वेळेवर न मिळाल्यास नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. बारामती आरटीओ कार्यालयात सध्या गाडीचे कागदपत्रे टी ओ करणे त्याचप्रमाणे एचपी वाढवणे बाबतचे कामे खूप संथ गतीने चालली असल्याचे ही नागरिकांमधून बोलले जात आहे त्यामुळे नागरिक आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये खटके उडत आहे.  त...

जून २०२२ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभे राहील ; मा.खासदार शरदराव पवार

 जून २०२२ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभे राहील ; मा.खासदार शरदराव पवार सातारा - ‘कर्मवीर अण्णांनी जे काम हातामध्ये घेतले त्यासाठी आपले आयुष्य सर्व खर्ची घातले.सर्व सामान्यांच्या मुलांमुलीना प्रोत्साहित करण्यासाठी ,ज्ञानाचा आधार देणे ही आपली जबाबदारी आहे हे मनात ठेवून उभे आयुष्य ज्ञानधारणेसाठी त्यांनी खर्ची घातले. त्याचा परिणाम म्हणून आज ही संस्था देशातली सर्वात महत्वाची संस्था झाली आहे. ७८९ शाळा, ४ लाख ४६ हजार विद्यार्थी,पंधरा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  असा रयतेचा मोठा संसार उभा राहिला,अण्णांनी जे रोपटे लावले त्याचे खऱ्या अर्थाने वटवृक्षात रुपांतर झाले आहे.त्याला सेंद्रिय खतपाणी घालण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली त्यामुळे वृक्षाची वाढ झाली आणि त्याची फळे आज आपण चाखत आहोत. सर्वसामान्य वर्गातील शिक्षित वर्ग उभा करण्याचे काम अण्णांनी केले. आज रयतच्या वटवृक्षाची निरोगी वाढ होत असून यातून घडणारी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची पिढी देशाची प्रगतीमध्ये बहुमूल्य योगदान देत आहे. रयतच्या प्रगतीसाठी दानशूर व्यक्ती पुढे येऊ लागल्याने कर्मवीर अण्णांनी पाहिलेली स्वप...

शिर्डी श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.अशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राहाता शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ईदमिलन निमित्त शिरखुरमा पार्टीचे आयोजन

 शिर्डी श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष  ना.अशुतोष काळे यांच्या उपस्थितीत  राहाता शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ईदमिलन निमित्त शिरखुरमा पार्टीचे आयोजन राहाता ( ) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहाता शहर यांच्या वतीने शहरात ईद मिलननिमित्त शिरखूर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या प्रमुखस्थानी श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष व कोपरगाव मतदारसंघाचे आमदार ना.आशुतोष काळे,उपविभागीय अधिकारी संजय सातव,राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.  या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळी, गेली चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान जागेची प्रमुख मागणी तातडीने मार्गी लावण्याची विनंती करून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा आशी विनंती केली.सदर प्रसंगी ना.आशुतोष काळे यांनी ईद मिलन निमीत्त रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. रमजान ईद व अक्षय तृतीया एकाच दिवशी आल्याने हिंदु बांधवांनाही अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देण्यात आल...