Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

महाराष्ट्र हे लोकशाहीचे सक्षम राज्य- हर्षवर्धन पाटील*

 *महाराष्ट्र हे लोकशाहीचे सक्षम राज्य- हर्षवर्धन पाटील*   महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त इंदापूर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की कल्याणकारी राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राने सहकारी, शैक्षणिक, औद्योगिक धोरणे राबवली. सामाजिक समतोल राखत सत्तेचे  विकेंद्रीकरण करीत लोकशाहीचे सक्षम राज्य म्हणून गौरवशाली महाराष्ट्राने गेल्या 62 वर्षांत देशात सर्व क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.      हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांच्या विचारांचा महाराष्ट्र असून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. औद्योगिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती महाराष्ट्राने साधली असून देशात महत्त्वाच्या सर्व ...

भिमाई आश्रमशाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा* ( *आयु.शकुंतला मखरेंच्या हस्ते ध्वजारोहण*. )

 *भिमाई आश्रमशाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा* ( *आयु.शकुंतला मखरेंच्या हस्ते ध्वजारोहण*. ) *इंदापूर*: (दि.१) - येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ज्युनिअर कॉलेज, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेचे अध्यक्षा. आयु.शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे , मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, उपप्राचार्या सविता गोफणे,सर्व शिक्षक,प्राध्यापक,अधीक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे  यांनी केले.

सर्व सामान्य व्यक्तीचा नवस पूर्ण केला राज्यमंत्र्यांनी*

सर्व सामान्य व्यक्तीचा नवस पूर्ण केला राज्यमंत्र्यांनी* निंबोडी तालुका इंदापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त *श्री दत्तात्रय(मामा) भरणे,(राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर)* हे आले असताना त्यांना, *श्री दिपक पंढरीनाथ खाडे व श्री रुपेश शिवाजी घंबरे* यांच्याकडून माहिती मिळाली की निंबोडी गावातील सर्वसामान्य व्यक्ती *श्री राजेंद्र सुभेदार चव्हाण* यांचा श्री मारुतीरायाच्या चरणी असा नवस होता  की, जो पर्यंत मामा निवडून येत नाहीत तो पर्यंत व मामा निवडून आल्यानंतर मामांच्या हातून मारुतीरायाच्या चरणी नारळाचे तोरण बांधत नाही,तो पर्यंत मंदिरांमध्ये पाय ठेवणार नाही,असा त्यांचा नवस होता ही माहिती मिळताच  मामांनी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या गाड्यांचा ताफा मारुतीरायाच्या मंदिराकडे वळवला व *श्री राजेंद्र सुभेदार चव्हाण* यांचा नवस सन्माननीय मामांनी मारुतीरायाच्या चरणी नारळाचे तोरण वाहून पूर्ण केला

रोजी राज्यमंत्री भरणे यांनी शिक्षक पतसंस्थेवर निवडून आलेल्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या संचालकांचा सत्कार

( इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर निवडून गेलेल्या संचालक मंडळाने संस्थेच्या माध्यमातून विकासात्मक कामांवर भर द्यावा,त्यासाठी लागेल ती मदत करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भरणेवाडी ता.इंदापूर येथे शुक्रवार दि.२९ रोजी राज्यमंत्री भरणे यांनी शिक्षक पतसंस्थेवर निवडून आलेल्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या संचालकांचा सत्कार केला.यावेळी बोलताना मंत्री भरणे म्हणाले,तालुक्यातील शिक्षकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून कोट्यावधींची उलाढाल असलेली संस्था तुमच्याहाती सोपवली आहे.संस्थेच्या माध्यमातून शहराच्या ठिकाणी असलेले व्यापारी संकुल,मंगल कार्यालय पारदर्शीपने सांभाळा.यापुढे जाऊन त्याठिकाणी आणखी नवीन उपक्रम राबवता येणे शक्य असून त्यासाठी सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घ्या.शिक्षकांना केला जाणारा पतपुरवठा सूक्ष्मपणे चालवून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करा.यावेळी स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या निवडून आलेल्या २१ संचालकांचा मंत्री भरणे यांनी सत्कार केला.यावेळी नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकाळ,कार्याध्यक्ष अतुल झगडे,शिक्षक ...

राहात्यात शांतता समितीची बैठक संपन्न ; बैठकीस मुस्लिम धर्मगुरुंसह हिंदू- मुस्लिम बांधवांसह मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

 राहात्यात शांतता समितीची बैठक संपन्न ; बैठकीस मुस्लिम धर्मगुरुंसह हिंदू- मुस्लिम  बांधवांसह मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहाता (प्रतिनिधी) - पुढील आठवड्यात हिंदू धर्मियांचा अक्षय तृतीया आणि मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद या महत्त्वाच्या सणानिमित्त राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली, कोणत्याही धर्मियांचे सण-उत्सव साजरे करताना कोणतेही जातिय तेढ निर्माण होऊ नये, प्रत्येक जाती - धर्मात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केले.  मागे काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत मस्जिदीवरील भोंग्याबाबत बोलतांना सांगीतले होते की जर ३ मे पर्यंत मस्जिदीवरचे भोंगे उतरवले गेरे नाही तर मनसैनिक अशा मस्जिदींसमोर त्यापेक्षाही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवतील त्यांच्या या वक्तव्यावरुन या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करुन  राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर दिनांक ३-५-२०२२ रोजी मस्जीदींसमोर हनुमान चालीसा लावण्याबाबत चर्चा करण्यात आली,तस...

*इंदापूर शहरातील विकास कामांकरिता ५ कोटींचा निधी मंजूर* *सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

 *इंदापूर शहरातील विकास कामांकरिता ५ कोटींचा निधी मंजूर* *सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती* इंदापूर : प्रतिनिधी 'वैशिष्ट्यपूर्ण' योजनेअंतर्गत तसेच विशेष रस्ता अनुदान निधीतून इंदापूर शहरातील विविध विकास कामांकरिता ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी (दि.२५) दिली. इंदापूर शहाराकरिता सन २०२१-२२ करीत लेखाशीर्ष (३०५४ ००२२) खाली इंदापूर शहरातील गणेश कोथमीरे घर ते बागवान गल्ली भिसे घर ड्रेनेज व कॉंक्रिटीकरणासाठी ७० लाख रुपये. शाहू नगर येथे अंतर्गत ड्रेनेज व कॉंक्रिटीकरण ५० लाख, राजेवली नगर  येथे ड्रेनेज करणे ३० लाख, श्रीनाथ हौसिंग सोसायटी व वडरगल्ली अंडरग्राउंड ड्रेनेज व लादीकरण करणे ३० लाख, अशोक क्लॉथ स्टोअर्स ते आगलावे घर पंधारानाला पर्यंत व सिद्धेश्वर बोळ ड्रेनेज व कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख, रामवेस नाका सुशोभीकरण करणे व श्रीराम मंदिर परिसरात कॉंक्रिटीकरण करणे ३० लाख, कासारपट्टा परिसर अंतर्गत ड्रेनेज व कॉंक्रिटीकरण २५ लाख, कोठारे घर ते श्रीकृष्ण मं...

'समल मराठा सोयरीक ग्रुप'च्या माध्यमातून प्रा.रामचंद्र राऊत यांनी हाती घेतलेले कार्य ही काळाची गरज - प्राचार्य शेळके

 'समल मराठा सोयरीक ग्रुप'च्या माध्यमातून प्रा.रामचंद्र राऊत यांनी हाती घेतलेले कार्य ही काळाची गरज - प्राचार्य शेळके श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -  विवाह हा एक पवित्र संस्कार आहे. त्यातून कुटुंब आकाराला येते परंतु आजच्या युगात विवाह जुळविणे आणि परस्पर संवाद होणे कठीण झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रा. रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत आणि सौ. रामेश्वरी संजय लाटे यांनी 'सकल मराठा सोयरीक ग्रुप'च्या माध्यमातून हाती घेतलेले कार्य ही काळाची गरज असून त्यासाठी समाजाने त्यांच्या कार्याला पाठबळ द्यावे असे आवाहन ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.     श्रीरामपूर येथील रहिवाशी असलेले आणि रयत शिक्षण संस्थेच्या नगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्रा. रामचंद्र राऊत यांची 'श्रीरामपूर सकल मराठा सोयरीक ग्रुप 'च्या अध्यक्षपदी तर सौ. रामेश्वरी संजय लाटे यांची खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी प्राचार्य शेळके बोलत होते.        ...

जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कराटे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

 जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कराटे प्रशिक्षण शिबीर संपन्न.         (इंदापूर प्रतिनिधी )राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेवजी जानकर साहेब यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने आज इंदापूर येथे एक दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले तसेच उपस्थित  प्रशिक्षणार्थींना अल्पोपहार देण्यात आला. सदरच्या आयोजन पक्षाचे क्रीडा व कला आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री किरण राऊत सर रासपचे इंदापूर विधानसभा अध्यक्ष बजरंग वाघमोडे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी प्रमुख पाहुणे रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोपने जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे तालुका अध्यक्ष सतीश तरंगे तानाजी शेठ शिंगाडे युवक आघाडीचे कार्याध्यक्ष अतुल शिंगाडे युवा नेते सोन्या भाऊ जानकर विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू जानकर तसेच सरडेवाडी येथील प्रगतशील बागायतदार शंकर चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गोपने बोलताना म्हणाले की कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा माणसाच्या दैनंदि...

रूग्ण हक्क परिषद केंद्रीय कार्यालयांमध्ये सर्वधर्मीय एकतेची इफ्तार पार्टी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली

 रूग्ण हक्क परिषद केंद्रीय कार्यालयांमध्ये सर्वधर्मीय एकतेची इफ्तार पार्टी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली . यावेळी रूग्ण हक्क परिषदेचे मौलाना अब्बास शेख, सलीम मुल्ला, केंद्रिय कार्यालय सचिव श्री संजय जोशी, सहसचिव मारुती बानेवार, पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक खेंडकर, प्रसिद्धीप्रमुख निता तूपारे, पुणे शहर उपाध्यक्ष विजय लांडे, पुणे शहर कार्याध्यक्ष नितीन चाफळकर, पुणे शहर संघटक किरण चौगुले, पुणे जिल्हा सचिव भाग्यश्री काशीद, चित्रा साळवे, मुंबई जिल्हा अध्यक्ष शशिकांत लिंबारे, पुणे जिल्हा सचिव दत्तात्रय कारंडे, प्रभा ऑलेलू उपस्थित होते. रुग्ण हक्क परिषद पुणे शहर अध्यक्ष अपर्णाताई साठ्ये यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.  #रुग्णहक्कपरिषदकार्यालय #रुग्णहक्कपरिषद #रुग्ण_हक्क_परिषद #रुग्ण_हक्क_परीषद 

शिवराज्य शेतकरी विकास मंचाकडून रोजा इफ्तार पार्टी

 शिवराज्य शेतकरी विकास मंचाकडून रोजा इफ्तार पार्टी (इंदापूर प्रतिनिधी )शिवराज्य शेतकरी विकास मंच कडून इंदापूर शहरात कसबा या ठिकाणी शुक्रवारी इंदापूर शहरातील सर्व हिंदू मुस्लीम बांधवांना इफतार पार्टी आयोजित करण्यात आली होती या पार्टीमध्ये जेवण देण्यात आले शिवराज्य शेतकरी विकास मंच ने घेतलेल्या इफ्तार पार्टीमध्ये इंदापूर शहरातील अनेक नागरिकांनी  जेवणाचा आस्वाद घेतला. शिवराज्य शेतकरी विकास मंच हा सर्व गोरगरीब व सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष असल्याचेही प्रदेश अध्यक्ष जावेद शेख यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला इंदापूर शहरातील दरगाह मस्जिद चे मौलाना व्यंकटेश नगर  मौलाना तसेच इंदापूर शहरातील नामवंत नागरिक त्याचप्रमाणे  इंदापूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज्य शेतकरी विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष पत्रकार जावेद शेख शिवराज्य शेतकरी विकास मंच प्रदेश कार्याध्यक्ष वैभव सोनवणे शिवराज्य शेतकरी विकास मंचचे  इंदापूर तालुका अध्यक्ष गुणवंत दळवी तसेच पुणे जिल्हा सदस्य किशोर मिसाळ त्याचप्रमाणे सोहेल तांबो...

पुण्यात पहिल्यांदाच इव्हॉल्व एचआर सोहळा*

 *पुण्यात पहिल्यांदाच इव्हॉल्व एचआर सोहळा* आपल्या पुण्यामध्ये पहिल्यांदाच 'इव्हॉल्व्ह एचआर सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११-३० ते सायंकाळी ८-०० या वेळेत विमाननगर येथे नोवोटेल (हॉटेल्स आणि रिसॉर्ट) मध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजेच गणेश नटराजन (५ एफ वर्ल्ड कळझुम अडव्हायझर्स आणि सोशल व्हेंचर पार्टनर्स इंडियाचे अध्यक्ष) सकाळी ११-३० ते १२-०० या वेळेत उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२-३० ते १-३० या वेळेत अमित भोसले (ग्लोबल टॅलेंट ट्रॅक चे ऑपरेशन डायरेक्टर) यांच्यासह सप्तर्षी भट्टाचार्य (हेडटॅलेंट अॅक्विझिशन बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स ) उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर क्षितिज अगरवाल ( सीईओ टेकिला ग्लोबल सर्व्हिसेस ) या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. दुपारी २-०० ते ३-०० या वेळेच्या सत्रात हितेश रामचंदानी (लेखक,मोटिव्हेशनल स्पीकर,पॅरालिम्पिक पदक विजेते) मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ ते ४ या सत्रात सय्यद अझफर हुसेन (वरिष्ठ उपाध्यक्ष बजाज फिनसर्व्ह),मंजिरी गोखले-जोशी (संस्थापक संचालिका,माया केअर,यांच्यास...

*कर्जाची वसुलीही कायदेशीर मार्गानेच झाली पाहिजे, बळाचा वापर करून नाही" : मा. सर्वोच्च न्यायालय*

 *कर्जाची वसुलीही कायदेशीर मार्गानेच झाली पाहिजे, बळाचा वापर करून नाही" : मा. सर्वोच्च न्यायालय* *ऍड. रोहित एरंडे.Ⓒ* *प्रसंग एक* : कर्जाच्या वसुलीसाठी एका वित्तीय कंपनीने कर्जदाराचे कथित अश्लील व्हिडीओ करून ते व्हायरल  धमकी दिल्यामुळे कर्जदाराने आत्महत्या केली.  *प्रसंग दोन* : कर्जाचे हप्ते फेडू न शकल्यामुळे ट्रक फायनान्स कंपनीच्या वसुली पथकाने ट्र्क जप्त करून नेल्यामुळे ट्रक चालकाची आत्महत्या.  *प्रसंग तीन* : गृहकर्जाचे हप्ते थकले  त्यामुळे घरातील टी .व्ही., फ्रिज अश्या  वस्तूच उचलून नेल्या.  अश्या स्वरूपाच्या बातम्या हल्ली ऐकण्यात येऊ लागल्या आहेत. मात्र असे अनेक प्रसंग घडले असतील ज्याच्या बातम्या झालेल्या नाहीत.  घर, गाडी इतकच काय फोन पासून वॉशिंग मशीन पर्यंत सर्वच गोष्टी विकत घेण्याची हौस, इच्छा प्रत्येकाला असते परंतु ह्यासाठी लागणारे पैसे  तयार असतातच असे नाही. त्यासाठी सुलभ कर्ज योजना उपलब्ध असल्याच्या जाहिराती आपण बघत असतो. परंतु कुठल्याही कारणास्तव असे  कर्ज आणि त्यावरील व्याजाची  परतफेड वेळेत   करता आली नाही तर...

अंगावर आल्यावर शिंगावर घेणार! चितावणीखोर खोर भाषण करणाऱ्यावर राज ठाकरे कोणतीच कारवाई का नाही?

 अंगावर आल्यावर शिंगावर घेणार! चितावणीखोर खोर भाषण करणाऱ्यावर राज ठाकरे कोणतीच कारवाई का नाही?   पुणे (१८ एप्रिल २०२२): सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत, एसडीपीआयच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस अझहर तांबोळी यांनी, राज ठाकरे यांनी जारी केलेल्या विधानांवर “धर्मनिरपेक्ष पक्ष” निष्क्रिय असल्याचा आरोप केला आणि अशा पक्षांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. ३ मेपर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी करून वाद निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत एसडीपीआयच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस अझहर तांबोळी म्हणाले की, ठाकरे भारतीय जनता पक्षाने (भाजप) दिलेली “स्क्रिप्ट” वाचून हिंदुत्वाच्या राजकारणात गुंतत आहेत. “ठाकरे आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्याद्वारे मुस्लिमांना भडकवत आहेत. सत्ताधारी पक्ष या प्रश्नावर मौन धारण करून त्यांच्या जातीयवादी राजकारणाला पाठिंबा देत आहेत. सरकार आणि पोलिस यंत्रणेने कायदेशीर कारवा...

मस्जिद जवळ भोंगे लावलं तर ०४ महिने तुरंगवास किंवा थेट हद्दपार एप्रिल १८, २०२२ मस्जिद जवळ भोंगे लावलं तर ०४ महिने तुरंगवास किंवा थेट हद्दपार

 मस्जिद जवळ भोंगे लावलं तर ०४ महिने तुरंगवास किंवा थेट हद्दपार एप्रिल १८, २०२२ मस्जिद जवळ भोंगे लावलं तर ०४ महिने तुरंगवास किंवा थेट हद्दपार नाशिक : मशिदीवरील भोंगे काढावेत यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ०३ मे हा अल्टीमेटम दिला असता त्याआधीच या संदर्भात नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आदेश काढला आहे. भोंगे लावण्याच्या नावाखाली कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास ०४ महिने तुरुंगवास किंवा थेट हद्दपारी करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे. मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यात धार्मिक वातावरण तापले आहे. धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी रविवारी रात्री उशिरा याविषयी धार्मिक प्रथा, परंपरा, रीतिरिवाज आणि कायदा सुव्यवस्था यांचा विचार करीत सुस्पष्ट, असे आदेश काढले आहेत. भोंगे लावण्याच्या नावाखाली कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याची तरतूद असलेला हा आदेश आहे. हनुमान चालिसा म्हणू इच्छिणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी प्रतिबंध न करता मंगळवार पर्...

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा पुढील हंगाम 16 लाख टन गाळप करण्याचा संकल्प -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

 *कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा पुढील हंगाम 16 लाख टन गाळप करण्याचा संकल्प -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*   कर्मयोगी सहकारी साखर  कारखान्याच्या 32व्या ऊस गळीत हंगामामध्ये यशस्वीरित्या 11, 12,500 मे. टन गाळप केल्याबद्दल सर्व कामगार बंधू, ऊस वाहतूकदार यांना स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की  सर्व सभासद शेतकरी, ऊस वाहतूकदार, कामगारांच्या वतीने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने पुढील हंगामात 16 लाख टन गाळप करण्याचा संकल्प केला आहे.    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' सर्वांनी सहकार्य केल्याने विश्वासाने, पारदर्शकपणे आपण 11 लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप केले असून पुढील हंगामामध्ये 16 लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी ही कारखानदारी उभा केली असून इंदापूर तालुक्याला वैभव मिळवून दिले आहे. आज नीरा भीमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 18 लाख लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कर्मयोगी कारखान्याच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांची उल...

भोडणी येथील वृद्ध शेतकरी कुटुंबाची इंदापूर तहसील कार्यालयावर प्रांणाकीत उपोषण

 भोडणी येथील वृद्ध शेतकरी कुटुंबाची इंदापूर तहसील कार्यालयावर प्रांणाकीत  उपोषण इंदापूर तहसील कार्यालयावर  भोडणी  येथील वृद्ध शेतकरी आपल्या पत्नीसह प्रांणाकीक उपोषणाला बसलेले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की भोडणी   येथील दिनकर शंकर भांगे तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी इंदापूर तहसीलदार कार्यालयाकडे मौजे  भोडणी येथील मीन गट नंबर 391 क्षेत्र एक हेक्‍टर 13 आर्या जमिनीमधून जाण्या-येण्यासाठी व बैलगाडी व ट्रॅक्टर साठी रस्ता तयार करण्यासाठी फाट्यापासून गट नंबर 391 च्या जमिनीमधून पूर्वापार असलेला रस्ता तेथील शेतकरी अविनाश सुदाम गोसावी साधू वाघा पुरी गोसावी यांनी मोडल्यामुळे मी  मे तहसीलदार  साहेब   यांच्याकडे मामलेदार कोर्ट ऍक्ट अधिनियम 1906चे पोटकलम 5 प्रमाणे न्याय मागितला होता त्याची दखल घेत तहसीलदार इंदापूर सो यांनी दिनांक 24 /3/ 2015 रोजी निकाल देऊन सदर च्या लोकांनी निर्माण केलेला अडथळा दूर करावा म्हणून आदेश दिला आहे. परंतु या घटनेस 7 वर्ष उलटली तरीही अद्याप पर्यंत या निकालाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आमच्या शेतातील अनेक नगदी प...

या देशातील हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या शेवटी दोघांचे रक्त एकच

 मंत्री पदाची खुर्ची ही काय रुबाब करण्यासाठी नसते, तर जनतेची सेवा करण्यासाठी असते आणि राम पण आमचाच, रहीम पण आमचाच- राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे   डाळजच्या सभेत श्री.भरणे काय म्हणाले…. • या देशातील हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या शेवटी दोघांचे रक्त एकच •इंदापूर तालुक्यातील हिंदू – मुस्लिम गुण्या – गोविंदाने एकत्र राहतात,हे या तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. कुठल्याही धार्मिक द्वेषाला बळी पडून नका असे आवाहन केले. • या मामाने जातीयवाद केला असता तर एवढा निधी दिला नसता. • कोल्हापूर निवडणुकी संदर्भात त्यांनी श्री.पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. आणि म्हणाले की,जे लोक निवडून येवू शकतील अश्या लोकांनी मार्गदर्शन केले तर  ठीक आहे पण पडलेल्या लोकांच्या बाबतीत नागरिक म्हणतील की तुम्हीच पडलाय आणि आम्हाला काय सांगताय असे म्हणत पुन्हा एकदा मा. सहकार मंत्र्यांवर टीका केली. भिगवण प्रतिनिधी                              दि.१७ : काल १६ एप्रिल रोजी  २९ कोटी ०८ लाख कामांच्या उद्घाटन व शुभारंभ करण्यात आला. यावेळी आपल्...

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा करण्यात आले आहे.

  राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अथक प्रयत्नातून शहरातील १० कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमीपुजनाचा कार्यक्रम खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार! इंदापूर |प्रतिनिधी दि.१६: बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा करण्यात आले आहे. राज्यमंत्री दत्तात्रय यांनी आपल्या विकास कामाचा मोर्चा आता इंदापूर शहराकडे वळीवला असून उद्या दिनांक १७ एप्रिल रोजी इंदापूर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील काही कामांचे भूमिपूजन होणार असून या कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे असून प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीप गारटकर असणार आहेत. इंदापूर तहसील कार्यालय नवीन अभिलेख कक्ष, सेतू सुविधा केंद्र व उपहारगृह इमारत सध्या राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आपले संपूर्ण लक्ष इंदापूर तालुक्यात केंद्रित केलं असून चौफेर विकास कामे चालू आहेत. त्यामुळे त्यांनी एका सभेत म्हटले आहे की येणाऱ्...

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2021 अंकिता पाटील ठाकरे यांना प्रदान

  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2021 अंकिता पाटील ठाकरे यांना प्रदान पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा कायदेशीर समितीचे सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2021 (सामाजिक कार्य) आज महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री भगत सिंह कोश्यारी जी यांच्या शुभहस्ते राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आज मला प्राप्त झाला असून या पुरस्काराने अजुन उत्स्फुर्तपणे काम करण्यासाठी प्रेरणा व एक जबाबदारी प्राप्त झाली आहे. असे अंकित पाटील ठाकरे यावेळी म्हणाल्या. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले व विविध क्षेत्रातील मान्यवर या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.

जोतीबाच्या नावाने* *चांगभलेच्या गजरात* *श्री* *जोतिबाची यात्रा* *हजारो भाविकांच्या* *उपस्थित उत्साहात* *संपन्न* . '

 *जोतीबाच्या नावाने* *चांगभलेच्या गजरात* *श्री* *जोतिबाची यात्रा* *हजारो भाविकांच्या* *उपस्थित उत्साहात* *संपन्न* . ' इंदापूरचे कूलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानची यात्रा आज दिनांक १६ -४- २०२२ रोजी संपन्न झाली  त्यावेळी यात्रेसाठी हजारो भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती . त्यावेळी उपस्थित देवस्थानचे पुजारी संदिप जाधव रोहित जाधव नारायण साळुंके बाळासाहेब उंबरे श्री .जोतिबां देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री . अरविंद वाघ . जि.प. सदस्य अभिजीत तांबिले गटनेते कैलास कदम माजी नगरसेवक गोरख शिंदे आर .पी.आय. चे शिवाजी मखरे संदिपान कडवळे महादेव चव्हाण सर हमीदभाई आत्तार बाबासाहेब घाडगे सर . अॅड . किरण लोंढे इ . उपस्थित होते .

तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार!

  (इंदापूर प्रतिनिधी )तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार! इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा जागृत आहे, इंदापूरकरांसाठी आनंदाची बाब श्री.शरद पवारांच्या वाक्याला राज्यमंत्री भरणे खरे उतरले! अशी जनमानसात प्रतिक्रिया   तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार! प्रतिनिधी  दि.१५:उद्या दिनांक १६ एप्रिल रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रदीप गारटकर हे असणार आहेत. लाखेवडीच्या सभेत श्री.शरद पवार यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची इंदापूर तालुक्याचे जागृत लोक प्रतिनिधी म्हणून गुणगौरव केला होता. इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा जागृत आहे, इंदापूरकरांसाठी आनंदाची ...

चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने श्रीरामपूरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने श्रीरामपूरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - येथील चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षण महर्षी राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रेरित... चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्मकार संघर्ष समिती श्रीरामपूर,परिवर्तन फाउंडेशन श्रीरामपूर आणि माजी सैनिक त्रिदल सेवा संघ महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला,  सकाळी ७:०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समता रथाची मिरवणूक काढण्यात आली,ही मिरवणूक संभाजीनगर (कांदा मार्केट परिसर मार्गे) नेवासा-श्रीरामपूर रोडवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्म...

आधार युथ फाऊंडेशन, वंचित बहुजन आघाडी व समस्त ग्रामस्थ कालठण नं 1 यांच्या वतीने परमपूज्य, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

 आजआधार युथ फाऊंडेशन, वंचित बहुजन आघाडी व समस्त ग्रामस्थ कालठण नं 1 यांच्या वतीने परमपूज्य, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.           प्रत्येक महापुरुषांच्या जयंती ही  त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा घेऊन करण्याची गरज खऱ्या अर्थाने आज आहे. महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेण्याची गरज आहे. कारण पुस्तकाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कुणापुढे ही नतमस्तक होत नाही. आपले गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गाव सुद्धा सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होत असते. आपल्या प्रत्येक कार्यात गाव सहभागी असते. आपले गाव ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या आशीर्वादाने सर्व बाबतीत सुजलाम सुफलाम झाले आहे. गावातील अनेक जण मोठ्या मोठया पदावर काम करत आहेत. गावातील अनेक विद्यार्थी हे UPSC, MPSC, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु तयारी करत असताना अभ्यासासाठी त्यांना बाहेरगावी जावे लागत आहे.कारण गावात सुसज्ज ग्रंथालय नाही म्हणून आपल्या गावातील बौध्द बांधवांनी गावातील या गोरगरीब विद्यार्थ्य...

भोंग्याचं राजकारण* *(सुनील गायकवाड*)

 *भोंग्याचं राजकारण* *(सुनील गायकवाड*)  आज वयाची ५२ वर्षे झाली. माझं गाव तसं हिंदू मुस्लिम सगळे एकोप्याने राहणारं. आजपर्यंत आम्ही सगळे सण वार साजरे करत आलो, पण ना आम्हाला कधी मुस्लिमांच्या अजानचा त्रास झाला, ना आमच्या गणपती, शिवजयंती, नवरात्रीच्या वेळचा, लक्ष्मी आईच्या यात्रेचा त्यांना त्रास झाला... गणपतीचा हार, दिवाळीची दुकाने मुस्लिमांचीही आहेत..  पण एकदाही कधी हिंदू - मुस्लिम असा भेद करण्याचा विचारच आला नाही. माझ्या गावातल्या कोणताही मोबदला न घेता मुक्तार पटेलने बनवलेली व्हेज, नॉन व्हेज बिर्याणी, मतीन पटेलने बनवलेला रुचकर स्वयंपाक, युसूफ इर्शादने बनवलेलं कारणाचं मटण, आशिफचा चहा, सेवन करून सर्व जाती धर्माचे लोक आवडीने तृप्तीचा ढेकर देतात. तर अशोक गायकवाडच्या हॉटेलचा भत्ता, भजी, वडे अन लक्ष्मी आईच्या यात्रेवेळी बनवलेली जिलेबी म्हणजे जगात भारी. यात्रेवेळी या जिलेबीची चव चाखत नाही, असा एकही महाभाग सापडणार नाही. अगदी डायबेटीस पेशंट सुद्धा या जिलेबीची चव चाखणारच!! यावेळी सगळी मंडळी तुटून पडतात जिलेबी अन भत्त्यावर! रमजानच्या सणाला अनेक मित्रांकडे घेतलेल्या सिरखुरमाची चव वर्षभ...

आधार युथ फाउंडेशन, वंचित बहुजन आघाडी, समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले व बोधिसत्व, परमपूज्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कालठण नं 1 येथे संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य मा. महादेव लोंढे साहेब यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना यांची मोफत प्रकरणे करण्यासाठी फ्रॉमचे वाटप करण्यात आले

 आज आधार युथ फाउंडेशन, वंचित बहुजन आघाडी, समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले व बोधिसत्व, परमपूज्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कालठण नं 1 येथे संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य मा. महादेव लोंढे साहेब यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना यांची मोफत प्रकरणे करण्यासाठी फ्रॉमचे वाटप करण्यात आले . यावेळी संजय गांधी निराधार प्रकरणासाठी लागणाऱ्या वयाचा दाखला या कागदपत्रांची पूर्तता करताना प्रवासाने हाल होऊ नये व त्यांना आर्थिक झळ पोहचू नये म्हणून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. विनोद राजपुरे व डॉ. नामदेव गार्डे यांच्या उपस्थितीत गावातील वयोवृद्ध माता-पिता यांना वयाचे देण्यासाठी सहकार्य केले.        यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सचिव मा.हनुमंत तात्या कांबळे, तालुका संपर्क प्रमुख मा. सिद्धार्थ साळवे, संजय गांधी निराधार समिती सदस्य मा.महादेव लोंढे, आबासाहेब वाघमोडे, अलका ताई जेडगे याच बरोबर गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.      या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद भाऊ चव्हाण यांन...

शिवराज्य शेतकरी विकास मंच महाराष्ट्र राज्य वतीने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131जयंती इंदापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात मध्ये साजरी करण्यात आली शिवराज्य शेतकरी विकास मंच महाराष्ट्र राज्य  अप्रैल 14, 2022 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरयांच्या 131जयंती  इंदापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात मध्ये साजरी करण्यात आली शिवराज्य शेतकरी विकास मंच महाराष्ट्र राज्य वतीने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवराज्य शेतकरी विकास  प्रदेश अध्यक्ष जावेद शेख ,प्रदेश उपाध्यक्ष वैभव सोनवणे तसेच सहकारी मित्र सोहेल तांबोळी सहकारी मित्र सलीम मनेरी ,कैलास कोथमिरे फरीद पठाण ,बादशाह मनेरी ,तय्यब मोमीन ,सादीक मोमीन तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते

तब्बल 63 कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर केले असून त्यांचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा 15 एप्रिल रोजी संध्याकाळी होणार आहे

 . सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार घेतल्यापासून दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील रस्त्यांचे भविष्य बदलण्याचा निर्धार केला आहे. त्यातूनच शेकडो कोटींची कामे सध्या इंदापूर तालुक्यात सुरू आहेत. आता देखील शेटफळगडे ते म्हसोबाची वाडी हा 13 कोटी 44 लाख रुपयांचा रस्ता मंजूर केला असून, म्हसोबाची वाडी ते लाकडी काझड हा 17 कोटींचा रस्ता मंजूर केला आहे. इंदापूर तालुक्‍यात 1इंच देखील रस्ता करावयाचा ठेवणार नाही अशी केलेली भीष्मप्रतिज्ञा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी कसूर ठेवणार नाही असेच ठरवलेले दिसते. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेटफळगडे म्हसोबावाडी व निरगुडे परिसरात तब्बल 63 कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर केले असून त्यांचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा 15 एप्रिल रोजी संध्याकाळी होणार आहे याव्यतिरिक्त शेटफळगडे येथील कोठारी फार्म ते पोंधवडी इथपर्यंतचा नऊ कोटी रुपयांचा रस्ता व मदनवाडी पिंपळे ते निरगुडे इथपर्यंतचा दहा कोटी 62 लाख रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. निरगुडे येथे दोन कोटी 11 लाख रुपयांच्या खर्चाचा पूल बांधण्यात येणार असून, मदनवाडी ते बा...

*महाराष्ट्र केसरी किताब इंदापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी मिळवावा- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

 *महाराष्ट्र केसरी किताब इंदापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी मिळवावा- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील* -सातारा येथील कुस्ती स्पर्धेतील यशस्वी इंदापूर तालुक्यातील कुस्ती मल्लांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गौरव   सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत इंदापूर तालुक्याचे सुपुत्र माऊली कोकाटे यांनी पुणे जिल्हा कडून मॅट विभागात फायनल पर्यंत धडक मारली तर माती विभागातून महारुद्र काळेल यांनी चांगली कामगिरी केली तसेच संतोष गावडे व नामदेव कोकाटे यांनी सुवर्णपदक मिळवले. सातारा येथील कुस्ती स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या गुणवंत खेळाडूंचा दूधगंगा येथे गुरुवार दि. 14 एप्रिल रोजी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.   महाराष्ट्र केसरी किताब इंदापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी मिळवावा अशी अपेक्षा यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली   कुस्ती मल्ल विद्या महासंघ सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पै. युवराज केचे यांनी या ...

भिमाई आश्रमशाळेत महामानवाला जयंती दिनी अभिवादन

 *भिमाई आश्रमशाळेत महामानवाला जयंती दिनी अभिवादन * !! ( *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात  साजरी*) *इंदापूर* (दि.१४):- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेला इंदापूरचे माजी नगरसेवक हरिदास हराळे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल देशमाने व स्नेहल शिंदे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमस्थळी सामूहिक पंचशील, त्रिशरण घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांना पेढे वाटून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणं झाली व गीतंही गायली. यावेळी  कार्यक्रमास इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी), कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरे, सचिव ॲड.समीर मखरे,संचालक गोर...

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत इंदापूर शहरवासीयांना घरकुल मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे भाजप शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी मानले आभार*

 *प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत इंदापूर शहरवासीयांना घरकुल मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे भाजप शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी मानले आभार*    प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून इंदापूर शहरातील 897 लाभार्थ्यांना घरकुले मंजुर करण्यात आल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे  इंदापूर शहरवासीयांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. इंदापूर शहरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 897 घरांचा भव्य प्रकल्प उभारला जात असून राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असणाऱ्या इंदापूर नगरपालिकेने मोठे यश संपादन केले असल्याची प्रतिक्रिया इंदापूर शहर भाजपाध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी दिली.    नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील आणि नगरसेवक, प्रशासन यांनी वेळोवेळी प्रस्ताव पाठवून,पाठपुरावा केला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विशेष प्रयत्न करून ही योजना मंजूर करून घेतली. 30 मार्च  2022 रोजी केंद्रीय गृह निर्माण मंत्रालय दिल्ली येथे झालेल्य...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन

 *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन * इंदापूर: प्रतिनिधी दि.14/4/22       बावडा येथील विश्वरत्न डॉ.आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास 131 व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी ( दि.14) पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उद्यान परिसर डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला आहे.           यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. _____________________________ फोटो :- बावडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हर्षवर्धन पाटील यांनी अभिवादन केले.

*देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

 *देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील *    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त येथील जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सर्व जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देत देशाची राज्यघटना, भारतीय रिझर्व बँकेची स्थापना, तसेच सर्व क्षेत्रातील डॉ. बाबासाहेबांचे योगदान मोठे असून देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.    तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यावेळी अभिवादन करून सामूहिक त्रिशरण, पंचशील घेण्यात आले.   इंदापूर नगरपरिषदे समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिह...

डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार................... विश्वरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील जयंती कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची उपस्थितांना दिली जाहिर ग्वाही.

  *डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार................... विश्वरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील जयंती कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची उपस्थितांना दिली जाहिर ग्वाही. ........*                *नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे  यांच्या प्रयत्नांतून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याने वालचंदनगर परिसरातील नागरिकांनी मानले नामदार श्री भरणे मामा यांचे जाहीर आभार*                   विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांनी पुष्पहार घालून विनम्...

*इंदापूर शहरातील ८९७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर* *सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

 *इंदापूर शहरातील ८९७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर *सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती* इंदापूर नगरपरिषद इंदापूर प्रधानमंत्री आवास योजना BLC ( Beneficiary Led Construction - स्वतःच्या जागेवर बांधकाम) घटकाअंतर्गत   309 लाभार्थी हे यादी क्रमांक 2 - (Detailed Project Report - सविस्तर प्रकल्प अहवाल) DPR-2 मध्ये , मंजूर झाले आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (AHP - Affordable Housing in Partnership - भागीदारी तत्त्वावर घरे) घटकाअंतर्गत एकूण 588 लाभार्थी यांना घरकुल मंजूर झालेले आहे. ह्यात इंदापूर शहरात 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असणारे भाडेकरू तसेच बांधकाम परवानगी मिळण्यात वादग्रस्त जागा असल्यामुळे अडचण असणारे किंवा लाभार्थ्यांची स्वतःची पसंती असणारे असे सर्व लाभार्थी सामावले आहेत.असे यावेळी भरणे यांनी माहिती दिली. यामध्ये 588 घरांचा हा भव्य प्रकल्प नगर परिषद हद्दीत नियोजित असून त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम होऊन त्यात सर्व उच्च सुख सुविधा उपलब्ध असणार आहेत. ह्या प्रकल्पात विविध क्षेत्रफळांचे एकूण 48 दुकाने अ...