Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

इंदापूर तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये ४८४ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते यापैकी ४७४ प्रकरण मंजूर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली.

  इंदापूर तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये ४८४ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते यापैकी ४७४ प्रकरण मंजूर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली. 10 प्रकरणे नामंजूर करण्यात आली कागदपत्र पूर्तता  साठी ते पुन्हा खाली पाठवण्यात आले आहे अशी माहिती सागर मिसाळ यांनी दिली (इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये ४८४ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते यापैकी ४७४ प्रकरण मंजूर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली. 10 प्रकरणे नामंजूर करण्यात आली कागदपत्र पूर्तता  साठी ते पुन्हा खाली पाठवण्यात आले आहे अशी माहिती सागर मिसाळ यांनी दिली इंदापूर येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न;४७४ प्रकरणांना मंजुरी अध्यक्ष सागर मिसाळ यांची माहिती. यावेळी बोलताना सागर मिसाळ म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेची बैठक इंदापूर तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना’ श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, संजय ग...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी कडून बारामतीच्या धर्तीवर इंदापूर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाने क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी कडून बारामतीच्या धर्तीवर इंदापूर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाने क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन (इंदापूर : प्रतिनिधी )बारामतीच्या धर्तीवर इंदापूर मध्ये देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी कडून करण्यात आली आहे. सदरील मागणीचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याकडे मंगळवारी (दि.२९) देण्यात आले. इंदापूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट हा खेळ खेळण्यात येतो. परंतु उदयोन्मुख खेळाडूंना आद्यवत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने तसेच पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे. वास्तविक पाहता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणारे इंदापूर शहर गेल्या दहा वर्षांपासून झापाट्याने वाढत आहे. पूर्वेला काही किलोमीटरवर उजनी धरण आहे. तर पश्चिमेला औद्योगिक वसाहत आहे.त्याच बरोबर शिक्षण व आरोग्य विषयक सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कामानिमित्त किंवा अन्...

मुख्याधिकारी कधी घेणार नागरी ज्वलंत प्रश्न ध्यानी ? सय्यदबाबा पुलाखाली रोज साचतय गटारीचे पाणी !!

 मुख्याधिकारी कधी घेणार  नागरी ज्वलंत प्रश्न ध्यानी ? सय्यदबाबा पुलाखाली रोज  साचतय गटारीचे पाणी !! श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - येथील सय्यदबाबा दर्गाहसमोरील रेल्वे भुयारी मार्गाच्या छताची नुकतेच एक्टेंशन व नुतनीकरणाची कामे झाली असलीतरी पुलाखाली मात्र प्रचंड प्रमाणात खड्डे निर्माण झालेली आहेत,त्यात याठिकाणी दर्गाह बाजुने असलेल्या भुयारी मार्गालगत अंडरग्राऊंड जनरल गावगटार आहे,या भुयारी मार्गातील पावसाचे पाणी जाण्याकरीता सदरील गटारीवर चेंबर देखील बनविण्यात आलेले आहे,मात्र परिस्थिती या ठिकाणी त्याविरुद्ध आहे,त्या चेंबरमध्ये पावसाचे पाणी जाणे तर सोडाच याउलट त्या चेंबरमधून गटारीचे घाण पाणी भुयारी मार्गात येत आहे,यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, याठिकाणी पादचाऱ्यांना मार्गक्रमण करणे मोठे दुरापास्त होत असुन संभव्य अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही शिवाय जवळच असलेल्या हजरत सय्यदशाह कादरी बाबा दर्गाह आणि जामा मस्जिद असल्याने भाविक भक्त आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे,पुढे ३ एप्रिलपासून मुस्लिम धर्...

दर्गाह परिसरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांना समज द्यावा - गौसे आझम सेवा संस्थेची मागणी

 दर्गाह परिसरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांना समज द्यावा - गौसे आझम सेवा संस्थेची मागणी बेलापूर ) - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील बुरुड गल्ली नंबर १ मध्ये जिल्हा प्राथमिक उर्दु शाळेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या प्राचीन देवस्थान दरगाह "हजरत चांदशाहवली बाबा" यांचे जागृत देवस्थान आहे,ही जागा पूर्वीपासूनच पवित्र आणि जागृत देवस्थानची आहे तथा मानली  जाते,या ठिकाणी बाहेरुन येणारे अनेक भाविक, श्रद्धाळू येथे दर्शनासाठी नेहमी येत असतात, परंतु काही दिवसांपासून या परिसरात राहणारे काही (गाढववाले) व्यक्ती दर्गा परिसरात आपली गाढवे बांधीत असुन त्यावर त्या ठिकाणी राहणारे लोकांनी आपल्या घरातील कचरा देखील त्या ठिकाणी टाकण्यास सुरवात केली असल्याने यामुळे दर्गाह परिसरात पवित्र दरगाहचे पावित्र्य धोक्यात येऊन याठिकाणी मोठी अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे भाविकांच्या मनात मोठी नाराजगी निर्माण होत आहे. याकरीता सदरील पवित्र परीसरात अशी अस्वच्छता निर्माण होऊ नये याकरीता येथील गौसे आझम सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन सदरील ठिकाणच्या गाढववाले आणि व परिसरातील नागरिकांना य...

_*राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय,प्रदीपदादा गारटकर यांचा 59 वा वाढदिवस इंदापुर येथील साठे नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा..*

 _*राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय,प्रदीपदादा गारटकर यांचा 59 वा वाढदिवस इंदापुर येथील साठे नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा..* _  ------------------------------------   (इंदापूर प्रतिनिधी) प्रदीपदादा गारटकर यांचा 59 वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे (पाणपोई )चे उद्धाटन मा.प्रदीपदादा गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयास (UPSE,MPSE,पोलीस भरती,सवांतर)अशा विवीध पुस्तकांचा संच भेट देण्यात आला._   _यावेळी मा.नगराध्दक्ष विठ्ठल आप्पा ननवरे,मा.उपनगराध्यक्ष. धनंजय बाब्रस,शहर अध्यक्ष. बाळासाहेब ढवळे,मा.शहर अध्यक्ष अनिल राऊत,मा.उपनगराध्यक्ष. राजेश शिंदे,दिलिप शिंदे,निखिल बाब्रस,मा.नगरसेवक.राजेंन्र्द चौगुले,वसिम बागवान,ललेंन्र्द शिंदे, सामाजिक कार्यकर्ते उमेश ढावरे,सा.न्याय अध्यक्ष शुभम मखरे,कार्याध्यक्ष मयुर ढावरे,पप्पु शेख,रनजित ढावरे,देविदास शिंदे,सतिष भाऊ सागर,बापु ढावरे,शिवाजी मखरे,बापु आडसुळ,पप्पु आडसुळ,चंदू आडसुळ,ज्ञानेश्वर सोनवणे,सोमनाथ खंडाळे,संजय खंडाळे,बाळासाहेब ढावरे,अनिल ढावरे,बापुसाहे...

जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांनी मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरू नये- शकील भाई सय्यद*

 *जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांनी मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरू नये- शकील भाई सय्यद*  - मुस्लिम समाजाविषयी निष्क्रिय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी केला जाहीर निषेध    राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल एका सभेमध्ये भाजपा मुस्लिम विरोधी असल्याचे मत व्यक्त केले होते. भाजपा शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी आज त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून जातीपातीचे राजकारण करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरू नये असे मत व्यक्त केले.   शकीलभाई सय्यद म्हणाले की,' तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी 2014 मध्ये न मागता भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता तर तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करता त्यांनी पहाटेच्या शपथविधी वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शपथ घेतली होती. हे तुम्ही का विसरता.    सबका साथ सबका विकास या तत्त्वाप्रमाणे भाजपा आपले कार्य करीत असून सर्व योजना सर्वांपर्यंत पोचविण्याचे कार्य भाजपाच्यावतीने होत आहे म्हणूनच देशात भारतीय जनता ...

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव म्हणाले की संविधानाला अनुसरून काम करणाऱ्यासाठी सजग तरुणांनी पुढे यावे नेतृत्व करावे आणि जागे राहून समाजकारण, अर्थकारण, समजून घ्यावे जाती-धर्माच्या चौकटी तोडून माणूस जोडण्याची व्यापक चळवळ निर्माण केली पाहिजे.

( पुणे प्रतिनिधी )मानवतेचे काम करत माणुसकीच्या मार्गाने जाण्याचा संकल्प आज तरुणांनी करणे खूप गरजेचा आहे. कोरोनाची लस सापडली असली तरी  हिंदू-मुसलमाना धार्मिक तेढ या प्रश्नांवरची लस शोधण्याचे काम सध्या स्थितीत करावे लागेल. व्यवस्थेला जो ताप आला आहे त्या तापावर उपचार करण्याची गरज आहे. कोरोना जातोय पण माणसाच्या मनाला मेंदूला जो कोरोना झाला आहे त्याचे काय?  असा थेट सवाल ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी आजच्या स्थितीवर करताना विचारला. कोरोना मृत्यूनंतर... नाते मानवतेचे या अंजुम इनामदार लिखित पुस्तकाचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक हाजी नजीर तांबोळी, तसेच डॉ. पी.ए. इनामदार शिक्षण महर्षी, माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, गणराज्य संघाचे अध्यक्ष सुषमाताई अंधारे, ज्येष्ठ विचारवंत रफीक सय्यद, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. आझम कॅम्पस या ठिकाणी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे प्रतिनिधी )सदर प्रसंगी आझम कॅम्प...

विद्या भडके लिखित 'उठे तुफान काळजात' स्त्री मनाचा उत्कट आविष्कार

 विद्या भडके लिखित 'उठे तुफान काळजात' स्त्री मनाचा उत्कट आविष्कार    श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  अहमदनगर येथील साहित्य चळवळीचे सेवाभावी केंद्र असलेल्या शब्दगंध प्रकाशनतर्फे २६ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित झालेला विज्ञान शिक्षिका कवयित्री विद्या रामभाऊ भडके लिखित 'उठे तुफान काळजात 'हा ८४ पृष्ठांचा ४९ कवितांचा संग्रह म्हणजे "स्त्री मनाचा उत्कट आविष्कार आहे".  कवयित्री विद्या रामभाऊ भडके या नागरदेवळे ता. जि. अहमदनगर येथील असून त्या १५ वर्षांपासून उपशिक्षिका म्हणून अध्यापन करीत आहेत.शेवगांव तालुक्यातील बोधेगांव येथील श्री शिवाजी हायस्कुल येथे कार्यरत आहेत.अनेक साहित्यिक, सामाजिक,शैक्षणिक,सेवाभावी कार्यात सहभागी असणाऱ्या विद्या भडके यांची कविता ही अनुभवातून आविष्कृत झाली आहे, या कवितांना प्रबोधनाचा सुगंध आणि राजहंस मनाची निर्मळता लाभलेली आहे.या कवितासंग्रहाचे प्रकाशन अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार आणि साहित्यचर्चेत संपन्न झाले. शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी,सौ.शर्मिला गोसावी,कु.दिशा गोसावी, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदाग...

इंदापूर तालुक्याकरिता अर्थसंकल्पातून 160 कोटींचा निधी मंजूर :-सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

 *इंदापूर तालुक्याकरिता अर्थसंकल्पातून 160 कोटींचा निधी मंजूर :-सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती* ( इदापूर चा आवाज इंदापूर प्रतिनिधी) अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2022 नुकतेच पार पडले या अर्थसंकल्पामध्ये इंदापूर तालुक्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत 160 कोटी 15 लक्ष इतका निधी मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली इंदापूर तालुक्यातील रस्त्यांची बरेच वर्षांपासून मागणी प्रलंबित होती प्रत्येक गावागावातून रस्त्याची मागणी होत होती याचाच विचार करून दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सामान्य नागरिक व शेतकरी व औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे अशा रस्त्याची मंजुरी यावेळी देण्यात आली आहे मंजूर कामाची यादी खालीलप्रमाणे 1)पिठेवाडी बावडा भगतवाडी ते कचरेवाडी  एकूण लांबी 8 किमी रक्कम 9 कोटी 50 लक्ष 2) नॅशनल हायवे 9 ते राऊतवाडी गायकवाड वस्ती पाटील वस्ती बेंद वस्ती माळवाडी ते इंदापूर रस्ता एकूण लांबी 14 किमी रक्कम 16 कोटी 15 लक्ष 3) गोंदी ते ओझरे गिरवी ते शिरसागरवस्ती पाटील वस्ती ठोकळे वस्ती रस्ता एकूण लांबी 11 किमी रक्...

मात्र हिंदु असो मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो सर्वांचे रक्त हे लालच आहे.

  यांनी वीस वर्षे विकास केला असता तर मी आज आमदार झालो नसतो -  दत्तात्रय मामा भरणे (इंदापूर ) विरोधकांना आज काही काम राहिलेले नाही. तीन तारखेला लाखेवाडी या गटात देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब येणार असून इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी यावे असेही भरणे यांनी काटी या सभेत सांगितले. फांदी तुटायला आणि कावळा बसायला याप्रमाणे जशी वेळ होती तशीच वेळ विरोधक आपल्या बाबतीत निर्माण करत असतात. तू लय मामाच्या जवळ असतो पण मामा ना तुझं कामच केलं नाही अशी गत राजकारणात होत असते. विरोधक जाती-पातीचे विष पेरून आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल यासाठी प्रयत्न करत असतात तरी आपल्या इंदापूर तालुक्यातील जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपण सर्व एक आहोत या भावनेतून काम करावे असेही भरणे म्हणाले. ज्या झाडाला फळे लागतात त्याच झाडाला लोक दगड मारतात याचप्रमाणे विरोधक आपण काम करत आहोत त्यामुळे आपल्यावर टीका टिपणी आणि निष्क्रिय आमदार असे सतत म्हणत असतात. भारतीय जनता पार्टी ही मुस्लिम विरोधी असून कुठेही काही झालं की मुस्लिम समाजातील ...

इंदापुर तालु्क्याचे नाव उंचावण्याचे काम करावे: हर्षवर्धन पाटील

 इंदापुर तालु्क्याचे नाव उंचावण्याचे काम करावे: हर्षवर्धन पाटील इंदापुर तालु्क्याचे नाव उंचावण्याचे काम करावे: हर्षवर्धन पाटील  - लाकडी येथे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण युवक-युवतींचा व सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार  इंदापूर : प्रतिनिधी दि.27/3/22         इंदापुर तालुक्यातील युवक-युवती ह्या जिद्द व बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करीत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. आगामी काळात राज्यभर विविध पदांवर काम करताना या युवक-युवतींनी इंदापुर तालु्क्याचे नाव उंचावण्याचे काम करावे, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.          लाकडी (ता.इंदापुर) येथे शनिवारी (दि.26) स्पर्धा परिक्षांमधून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या प्रतिक्षा ग्यानदेव वणवे, निलेश ओंबासे, सौं.अर्चना ज्ञानदेव दराडे-घुगे यांचे पालक तसेच लाकडी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब ढोले, उपाध्यक्ष पांडुरंग वणवे व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आयोजित क...

महाड येथे पत्रकारांशी असभ्य वर्तन करत पत्रकारांना बाहेर हाकलुन देणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा इंदापूर विभागीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये काळ्या फीती लावुन जाहिर निषेध

  (इंदापूर प्रतिनिधी )महाड येथे पत्रकारांशी असभ्य वर्तन करत पत्रकारांना बाहेर हाकलुन देणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा इंदापूर विभागीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये काळ्या फीती लावुन जाहिर निषेध नोंदविला.व कीरिट सोमय्या यांचा निषेध करणारे निवेदन इंदापूर पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर धनवे यांना दीले.त्या प्रसंगी इंदापूर विभागीय मराठी पत्रकार परिषदेचे शिलेदार सधाकर बोराटे, प्रकाश आरडे, शिवाजी (अप्पा)पवार,निलेश भोंग,शिवकुमार गुणवरे, दत्तात्रय गवळी,श्रीयश नलवडे,अशोक घोडके,भगवान मोरे,पोपट बुनगे,दत्तात्रय मिसाळ, विशाल तावरे, नवनाथ कचरे,नवनाथ मारकड इत्यादी पत्रकार उपस्थित होते.तर काँग्रेसचे महादेव लोंढे, मनसेचे रामभाऊ ,मौर्यक्रांती सघटना शहराध्यक्ष प्रकाश पवार उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील यांनी रियाज मुलाणीच्या धाडसाचे केले कौतुक*

 *हर्षवर्धन पाटील यांनी रियाज मुलाणीच्या धाडसाचे केले कौतुक*   ( इंदापूर प्रतिनिधी )रियाज मुलाणी या युवकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ज्येष्ठ दाम्पत्याचे प्राण वाचले. गाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे दुचाकी अत्यंत वेगाने धावत होती परंतु रियाजच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचले. आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रियाज मुलाणी या युवकाचा सत्कार करत त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.      लासुर्णे ता. इंदापूर येथे काल ब्रेक फेल झाल्यामुळे ज्येष्ठ दाम्पत्यांची दुचाकी गाडी बंद करता येत नव्हती परंतु रियाज याने धाडसाने ही गाडी पकडून ठेवली आणि थांबवली त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचू शकले. रियाच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रियाजने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक करत त्याचा सन्मान केला.

काटी व गिरवी येथील २० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व शुभारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्या होणार सायंकाळी ७.०० वाजता काटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भरणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

   काटी व गिरवी येथील २० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व शुभारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्या होणार  सायंकाळी ७.०० वाजता काटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भरणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष (इंदापूर  संपादक जावेद शेख )रविवारी (२७ मार्च) रोजी इंदापूर तालुक्यात विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन सभारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी गिरवी येथील ५ कोटी ६२ लाखांच्या विविध विकास कामांच्या भुमीपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून राज्यमंत्री भरणे यांची सभा दुपारी १.०० वाजता होणार आहे. त्यानंतर काटी येथील काटी- रेडा- रेडणी रस्ता (३ कोटींचा निधी), वरकुटे- काटी- नीरा भीमा कारखाना(६.११ कोटी रुपयांचा निधी) तसेच काटी येथील ओढ्यावरील पुल (१ कोटींचा निधी) व इतर विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ भरणे यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता काटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कार्यक्रमाच्या अध्य...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकासाचा झंझावत सुरूच ; विकास कामाचे उद्घाटन करता करतात राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग जोरात सुरू ; भविष्यात राष्ट्रवादी भक्कम पणे निवडणुकीला सामोरे जाणार ; दर रविवारी विकास कामाचे भूमिपूजन

  दर रविवारी विकास कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकासाचा झंझावत सुरूच ; विकास कामाचे उद्घाटन करता करतात राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग जोरात सुरू ; भविष्यात राष्ट्रवादी भक्कम पणे निवडणुकीला सामोरे जाणार ; दर रविवारी विकास कामाचे भूमिपूजन गिरवी आणि काटी भागात होणार २० कोटींच्या विकासकामांची भूमिपूजन आणि उद्घाटने   (इंदापूर प्रतिनिधी )राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकासाचा झंझावत सुरूच ; विकास कामाचे उद्घाटन करता करतात राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग जोरात सुरू ; भविष्यात राष्ट्रवादी भक्कम पणे निवडणुकीला सामोरे जाणार ; दर रविवारी विकास कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकास कामे व भूमिपूजन करताना राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे . रविवारी दि.२७ मार्च रोजी इंदापूर तालुक्यात विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन सभारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून होणार आहे. या वेळी गिरवी येथील ५ कोटी ६२ लाखांच्या विविध विकास कामांच्या भुमीपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम आयोज...

श्रीरामपूरात रेड क्रॉस रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न ऑक्सीजन मशीन व ऑक्सीमीटरचे वाटप

 श्रीरामपूरात रेड क्रॉस रुग्णवाहिका  लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न ऑक्सीजन मशीन व ऑक्सीमीटरचे वाटप श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - इंडियन रेड क्रॉस सोसायटी सब डिस्ट्रिक्ट शाखा श्रीरामपूर शाखेला राज्य शाखेने दिलेल्या जीवन रक्षक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  तालुका गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांचे शुभहस्ते रुग्णवाहिकेचे उदघाटन झाले, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अविनाश आपटे,डॉ. दिलीप शिरसाठ,डॉ.रवींद्र जगधने, के.के.आव्हाड, रमेश लोढा, हनुमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष मनोज पोरवाल,तालुका आरोग्याधिकारी  डॉ. राजश्री देशमुख,मर्चंट  असोसिएशनचे संचालक सुनील गुप्ता,बाळासाहेब खाबिया,बाजार कमिटी संचालक जितेंद्र गदिया, माजी नगरसेवक कल्याण कुंकुलोळ,लोकेश लोढा,विलास लोढा,वैभव लोढ,शहर पोलिस   निरीक्षक जीवन बोरसे, तालुका पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश गोरे,सतीश कुंकुलोळ , पो. हे.कॉ. चांद पठाण,पो.हे.कॉ. अनिल शेंगाळे,पो.हे.कॉ.बिरप्पा करमल आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर यांना ऑक्...

बेलापुर पोलीस स्टेशनला आली एस.आर.के. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या लहानग्यांची सहल

 बेलापुर पोलीस स्टेशनला आली एस.आर.के. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या लहानग्यांची सहल बेलापुर  (प्रतिनिधी) - पोलीस दादा विषयी असलेले कुतुहल, गैरसमज,कामाची पध्दत हे बालवयातच मुलांना सांगून त्यांच्या मनात असलेली भिती, शंका दुर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सहलीमुळे  अनेकांच्या शंका तर दुर झाल्याच पण काही लहानग्यांच्या प्रश्नामुळे पोलीसदादाही अचंबित झाले, बेलापूरातील एस.आर.के. इंग्लिश मिडीयम स्कूलच्यावतीने "चला पोलीसदादाशी करु या मैत्री, गुन्हेगारी करु या हद्दपार "या उपक्रमांतर्गत बेलापुर पोलीस स्टेशन येथे विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विद्यार्थ्यांनी साहेब आम्हांला पण तुमच्यासारखे पोलीस अधिकारी व्हायचंय....असे सांगताच चांगला आभ्यास करा,भरपुर व्यायाम करा ज्ञान व शरीरयष्ठी हे दोन्हीही कमवा पोलीस गुन्हेगारांचे शत्रू आणि चांगल्या नागरिकांचे मित्र असतात,पोलीसांकडे नागरिकांची पाहण्याची दृष्टी वेगळी असली तरीपण जनतेचे रक्षण व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे  पुण्याचे काम करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याचे पोलीस दादांनी सांगितले, बालपणापासून जर विद्य...

अशोकनगर येथे अशोक पॉलिटेक्निकमध्ये आंतरविभागीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन

 अशोकनगर येथे अशोक पॉलिटेक्निकमध्ये  आंतरविभागीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -  तालुक्यातील अशोकनगर येथे लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयात विविध आंतरविभागीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत खो-खो मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत अटीतटीचा विजय मिळवित विजेतेपद पटकाविले.  या स्पर्धेत प्रथम वर्ष, मेकनिकल, कॉम्पुटर, सिव्हील, केमिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन या विभागातील संघानी सहभाग नोंदवला होता. अंतिम फेरीत प्रथम वर्ष व मेकेनिकल विरुद्ध मध्यंतराला १० विरुद्ध ५ अशी ५ गुणांची विजयी आघाडी होती. त्यांच्या अमीर शेख व कृष्णा नाणेकर याने सहा मिनिटे २५ सेकंदाचे संरक्षण करीत आक्रमणात तीन गडी बाद केले. त्यांना महेश जाधव, रितेश येसेकर, निखील तांबे, संतोष कुमावत, साहिल अमोलिक, सर्फराज शेख यांनी चांगली साथ दिली. तर पराभूत संघातर्फे आकाश क्षत्रिय व कार्तिक वमने यांची खेळी आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाही. हा ...

भिमाई आश्रमशाळेत शाहीर जंगम स्वामींना स्मृतीदिनी अभिवादन*!

 *भिमाई आश्रमशाळेत शाहीर जंगम स्वामींना स्मृतीदिनी अभिवादन*! *इंदापूर (प्रतिनिधी)* ( *दि.२२*) :-  संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक धगधगतं पर्व असलेल्या स्वातंत्र्यसैनिक  नागसेन तथा लोकशाहीर जंगम स्वामी यांचा १५ वा स्मृतिदिन भिमाई आश्रमशाळेत साजरा करण्यात आला. यावेळी लोकशाहीर जंगम स्वामींच्या कार्याला उजाळा दिला. महाराष्ट्र ही शूरवीर, पराक्रमी योद्ध्यांची जननी तर संत -  महात्म्यांच्या, महापुरुषांच्या व स्वातंत्र्य सेनानींच्या आचार विचारांची कर्मभूमी. याच कर्मभुमीत जन्मलेल्या स्वातंत्र्यसेनानी पैकी एक धगधगते पर्व म्हणजेच नागसेन तथा लोकशाहीर जंगम स्वामी होय. स्वामी हे स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी योद्धा  म्हणून लोकशाहीर जंगम स्वामी यांची ओळख राहिलेली आहे, असे गौरवोद्गार भिमाई आश्रमशाळेत नानासाहेब सानप यांनी आयोजित कार्यक्रमात काढले. सानप पुढे म्हणाले की, लोकशाहीर जंगम स्वामी यांची ओळख आम्हाला आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक , संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या)  यांनीच करून दिली. ज...

श्रीरामपूर - अवैध धद्यांची जिल्हा पोलिस प्रमुख दखल घेणार का ? राजरोसपणे चालु असलेले सर्वच अवैध व्यवसाय बंद होणार का ? अवैध धंद्यांविरोधात समाजवादी पार्टीचे उपोषण सुरु

 श्रीरामपूर - अवैध धद्यांची जिल्हा  पोलिस प्रमुख दखल घेणार का ? राजरोसपणे चालु असलेले सर्वच  अवैध व्यवसाय बंद होणार का ? अवैध धंद्यांविरोधात समाजवादी पार्टीचे उपोषण सुरु  श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसाय चालु असुन यामुळे गुन्हेगारांची दहशत निर्माण झालेली असल्याने सर्वसामान्य नागरीक दहशत आणि भीतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत असल्याने जिल्हा पोलिस प्रमुख श्री मनोज पाटील यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालुन सदरील अवैध व्यावसाय बंद करुन या प्रश्नी जनसामान्यांना न्याय द्यावा असे समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिनांक ३ मार्च २०२२ रोजी पाठविलेल्या निवेदनात म्हटले होते,मात्र त्यावर आज तब्बल १९ दिवस उलटले तरी कोणतीही उचित कार्यवाही होत नसल्याने त्यांनी आज दिनांक २२ मार्च २०२२ पासून आपले उपोषण सुरु केले आहे. जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्यासोबत पोलिस महासंचालक, पोलिस उप महानिरीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा इतर संबधितांना पाठवलेल्या ...

कनोसा वसतिगृहात महिला मेळावा उत्साहात साजरा

 कनोसा वसतिगृहात महिला  मेळावा उत्साहात साजरा श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -  महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शिरसगांव येथील कनोसा वसतिगृहाच्या सुपिरियर सि. पाकुली यांनी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. असंख्य महिलांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.दिपाली करण ससाणे, लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह.फा.ज्यो.गायकवाड, सेंट लूकच्या सि. फिलोमिना सि.जॅकलिन, ब्र. राहुल रणशूर, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ. शीतल गवारे, सि. ऍनि, रवींद्र त्रिभुवन,सौ.सविता वाघमारे, खंडागळे गुरुजी, कनोसाच्या सुपीरियर सि. पाकुली व इतर धर्म भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात लोयोला धर्मग्रामातील महिला, तालुक्यातील विविध बचत गट, व शिरसगांव पंचक्रोशीतील महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व जनजागृती पर गीते सादर केली.  सि.पाकुली यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि व्यसनमुक्तीवर सादर केलेल्या गीतांनी विशेष दाद मिळविली.या मेळाव्यात सौ. सविता वाघमारे व रवींद्र त्रिभुवन यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना सविता वाघमारे म्हणाल्या क...

पल्लवी सोनोने यांना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार

पल्लवी सोनोने यांना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार ( इंदापूर प्रतिनिधी )भिगवण ता इंदापूर येथील पल्लवी सोनोने दूरचित्रावाणीच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आहे .पल्लवी सोनोने यांना महिला दिनानिमित्त भारत इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल च्या वतीने वूमन सिनेमा अँड आर्टस् इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने तावशी ता इंदापूर येथील जाहीर कार्यक्रमात पल्लवी सोनोने यांना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला यावेळी त्यांचेसमवेत लागीर झाल जी फेम कल्याणी सोनोने -चौधरी यांचा ही सन्मान केला.यावेळी भिगवण चे सचिन बोगावात, आण्णा धवडे,अजिंक्य माडगे,प्रमोद बंडगर, मनोज राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते .सर्व सामान्य कुटुंबातील पल्लवी सोनाने व कल्याणी सोनोने या सख्या बहिणींनी कला क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावत इंदापूर तालुक्याचे नाव देशात झळकवण्याचे काम केले आहे असे यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले...

इंदापुरातील विरोधकांच्या सांगण्यावरून सोलापूर जिल्ह्यात जिवंतपणी माझी प्रेत यात्रा काढून माझा पुतळा धरणात बुडवण्यात आला - दत्तात्रय मामा भरणे

इंदापुरातील विरोधकांच्या सांगण्यावरून सोलापूर जिल्ह्यात जिवंतपणी माझी प्रेत यात्रा  काढून माझा पुतळा  धरणात बुडवण्यात आला - दत्तात्रय मामा भरणे (इंदापूर प्रतिनिधी )      दि. १९ मार्च रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते तावशी येथे १२ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन व भूमिपूजन संपन्न झाले त्यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.  22 गावाचा प्रश्न मार्गी लागला असता तर इंदापुरातील विरोधकांना आपले राजकारण संपले असते या भूमिकेतून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात माझ्याविरोधात हवे तेवढे आंदोलन करण्यासाठी ताकद पुरवली. त्यांना इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाची काही देणे घेणे नाही. आता यापुढे कोणताही गाजावाजा न करता गुपचूपपणे इंदापूर तालुक्यातील 22 गावाचा प्रश्न सोडणारच असेही भरणे म्हणाले. विरोधकांना काही काम राहिलेले नाही त्यामुळे ते विहिरीच्या पायाभरणीसाठी सुद्धा कार्यक्रमाला येतील असेही भरणे म्हणाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी साथ सोडली होती परंतु इंदापूर तालुक्याच्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेच्या आशीर्वादरूपी मी पुन्हा इंदाप...

तावशी येथे १२ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज

  तावशी येथे १२ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज  राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून तालुक्यात करोडो राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज तावशी येथे १२ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून तालुक्यात करोडो रुपयांचा निधी ( इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर तालुक्यातील मौजे तावशी येथे शनिवारी (दि.१९) सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १२ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, पीडीसी बँकेचे संचालक संभाजी होळकर,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील,जिल...

तरंगवाडी, गोखळी येथील 8 कोटी 75 लाख रुपयांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार

   तरंगवाडी, गोखळी येथील 8 कोटी 75 लाख रुपयांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते  होणार (इंदापूर प्रतिनिधी )  राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा वाहत असून तालुक्यातील वाडीवस्ती देखील विकासकामातून वंचित राहत नाही. राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तरंगवाडी व गोखळी गावाला देखील कोट्यावधी रुपयाचा विकास निधी मिळाला आहे. शुक्रवार दिनांक 18 मार्च रोजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी व गोखळी येथील 8 कोटी 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून गोखळी येथे संध्याकाळी 6.00 वाजता जाहीर सभा ही होणार आहे. तरंगवाडी - गोखळी रस्ता - 2 कोटी, तरंगवाडी ओढ्यावरील पूल - 75 लाख, गोखळी प्राथमिक आरोग्य केंद्र - 73 लाख तसेच तरंगवाडी व गोखळी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे...

समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर...*

 *समीक्षा बहुउद्देशीय  विकास संस्थेच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर...*   *( इंदापूर प्रतिनिधी )    जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समीक्षा बहुउद्देशीय  विकास संस्थेच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर  आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन  नगराध्यक्षा मा. सौ अंकिताताई शहा इंदापूर न.पा. यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे सुरुवात  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  अंकिता ताई शहा  म्हणाल्या की महिला दिन हा वर्षाचे 365 दिवस साजरा झाला पाहिजे. तसेच संस्थेच्या कामाला शुभेच्छा दिल्या  आरोग्य शिबिरामध्ये केंद्रप्रमुख मा.सौ .कदम मॅडम , संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. रोहिणी राऊत  मॅडम व जिल्हाध्यक्षा स्पीड बॉल कोच मा. सौ  व्यवहारे मॅडम उपस्थित होत्या.   तसेच डॉक्टर  व सर्व स्टाफला पुष्प गुच्छ देऊन सन्मानीत केले.अंकिताताई शहा, कदम मॅडम यांना देखील गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले...

ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार - तहसीलदार प्रशांत पाटील

 ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष  प्रयत्न करणार - तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपुर  (शौकतभाई शेख) - सध्या युक्रेन रुस युध्दाच्या नावाखाली अनेक ठिकाणी जिवनावश्यक वस्तू चढ्या भावाने विकत असल्याच्या तक्रारी असुन या बाबत व्यापारी,पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल तसेच गँस वितरक व महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेवुन समस्या सोडविण्यात येतील असे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले. ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात ग्राहक दिन संपन्न झाला .यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक मंचचे विभागीय अध्यक्ष रणजीत श्रीगोड हे होते प्रास्ताविक भाषणात ग्राहक मंचचे अध्यक्ष प्रा.गोरख बारहाते म्हणाले की, अनेक व्यापारी चढ्या भावाने जिवनावश्यक वस्तूंची विक्री करत आहे, खाद्य तेलाच्या किमती वाढलेल्या आहे ही बाब गांभिऱ्याने घेणे आवश्यक आहे, युध्दाच्या नावाखाली ग्राहकांची लुट केली जात आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे, याकरीता महावितरण अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात यावी असेही ते म्हणाले. अध्यक्षपदावरुन बोलताना रणजीत श्रीगोड म्हणाले की, आज आहार कोणता घ्...

इंदापूर निवडणुक शाखेचा कारभार रामभरोसे सर , इंदापूर तहसील निवडणूक शाखेचा कारभार चालतोय खाजगी कंत्राटी युवकाच्या खांद्यावरून,

 इंदापूर निवडणुक शाखेचा कारभार रामभरोसे  , इंदापूर तहसील निवडणूक शाखेचा कारभार चालतोय खाजगी कंत्राटी युवकाच्या खांद्यावरून, (इंदापूर प्रतिनिधी) इंदापूर निवडणुक शाखेचा कारभार हा रामभरोसे चाललेला असून याबाबत सावळागोंधळ निर्माण झालेला आहे या प्रकरणी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय पक्षांनी देखील इंदापूर निवडणूक शाखेत असलेल्या सावळागोंधळ बाबत आंदोलन केले होते परंतु या ठिकाणी हवा तसा बदल करण्यात आलेला नाही यापूर्वी बहुजन मुक्ती पार्टी ने इंदापूर निवडणुक शाखेत खाजगी तत्वावर खाजगी काम करणाऱ्या सोमनाथ माने याला तात्काळ या कामावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती परंतु इंदापूर तहसील कार्यालयाने कागदपत्री  घोडे नाचवून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून इतर बाबींचा विचार करता सोमनाथ माने यांच्या वर कारवाईचा बडगा  उगारला नाही. इतर मागण्या मान्य केल्या परंतु सोमनाथ माने याला या ठिकाणाहून हाकलपट्टी करण्यात यावी ही मागणी अद्याप मंजूर करण्यात आलेले नाही सोमनाथ माने हा शासनाचा जावई झाला का अशीही नागरिकांमधून बोलले जात आहे? निवडणूक कामासंदर्भात संदर्भात या ठिकाणी गेले असता को...

इंदापूर नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत मिळालेल्या बक्षीस रकमेतून खरेदी केलेल्या जेटिंग मशीनचे आज इंदापूर शहरातील लोकमान्य नगर येथे प्रात्यक्षिक करण्यात आले.

( इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत मिळालेल्या बक्षीस रकमेतून खरेदी केलेल्या जेटिंग मशीनचे आज इंदापूर शहरातील लोकमान्य नगर येथे प्रात्यक्षिक करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष माननीय सो अंकिता ताई शहा मुख्य अधिकारी माननीय श्री रामराजे कापरे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री मुकुंद शेठ शहा व नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या जेटिंग मशीन द्वारे शहरातील गल्लीबोळातील तुंबलेल्या गटारी व चेंबरची साफ सफाई  करण्यात येणार आहेत. तसेच या मशीनद्वारे रोगराईच्या काळामध्ये औषध फवारणी करण्याची सुद्धा सोय आहे त्यामुळे भविष्यात शहरातील साफसफाई व औषध फवारणी करण्याकरिता या मशीनचा अत्यंत उपयोग होणार आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी सक्शन मशीन वाहन खरेदी करण्यात आले आहे त्याद्वारे शहरातील सार्वजनिक तसेच खाजगी शौचालयाच्या टाकीतील मैला उपसण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मागील चार पाच वर्षापासून इंदापूर नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत सलग मिळालेल्या मानांकना मूळे बक्षीस रुपी मिळालेल्या रकमेतून ही वाहने खरेदी करण्य...

सुनील दाभाडे यांना पीएचडी प्रदान

 सुनील दाभाडे यांना पीएचडी प्रदान  श्रीरामपूर ( प्रतिनिधी) -येथील  सुनील बाबुराव दाभाडे यांना प्रौढ शिक्षा आंतरविद्याशाखीय या विषयांमध्ये नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संशोधक विद्यार्थी सुनील बाबुराव दाभाडे यांनी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील पुढाकार एक अभ्यास या विषयावर शोध प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता त्यात त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. प्रा डॉ.धनंजय लोखंडे (संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले या बाबत बाबुराव दाभाडे, छबुराव दाभाडे, निवृत्त नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे, राजू दाभाडे, राहुल शिरसाठ, मेजर कृष्णा सरदार,रामभाऊ        सुगुर, प्रा. डॉ.विलास आढाव, प्रा डॉ. प्रकाश यादव, डॉ. नवनाथ तुपे, डॉ. पी व्ही. गुप्ता, दैनिक सार्वमतचे वरिष्ठ संपादक बद्रीनारायण वडणे,अशोकराव गाडेकर,उपसंपादक राजेंद्र बोरसे,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख,अॅड.मोहसिन शेख आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

स्वयंसिद्ध संस्थेकडून महिला दीनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना केले सन्मानित

 स्वयंसिद्ध संस्थेकडून महिला दीनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना केले सन्मानित श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - स्त्री- ही आदिशक्तीचे रूप आहे त्यांची ताकद ही अद्वितीय असून त्यांच्यासमोर कोणतेही दुसरी ताकत असू शकत नाही अशा शब्दात योगगुरु अनिल कुलकर्णी यांनी महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांचे कौतुक केले ८ मार्च महिला दिन सर्वत्र साजरा झाला या दिनाचे औचित्य साधत स्वयंसिद्ध युवा स्वंयम रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था श्रीरामपूर यांच्यावतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा महिलांना स्वयंसिद्ध हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालपाठक मॅडम होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये अनिल कुलकर्णी सर ,ज्येष्ठ उद्योजक पद्मनाथ जोशी, नगरपालिकेच्या पाठक, मॅडम स्वयंसिद्धाच्या संचालिका अनिता आहेर, किरण घोलप आदी मान्यवर उपस्थित होते कुलकर्णी सरांनी जीवनातील आईस्क्रीम चा अर्थ समजावून सांगितला आ- आकलनशक्ती, ई-इच्छाशक्ती, स-सहनशक्ती,क्री- क्रियाशीलता,म- मनाचा मोठेपणा या सर्वच बाब...

सत्यमेव जयतेकडून सौंदळ्यात महावितरणाविरुद्ध निदर्शने ! वाढीव बिले दिल्यास छेडणार आंदोलन : जैद शेख

 सत्यमेव जयतेकडून सौंदळ्यात  महावितरणाविरुद्ध निदर्शने ! वाढीव बिले दिल्यास छेडणार आंदोलन : जैद शेख  नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील सौंदळा येथे आज रोजी सामाजिक कार्यकर्ते जैद शेख यांच्या नेतृत्वाखाली सत्यमेव जयते प्रतिष्ठानतर्फे सौंदळा सब स्टेशन समोर निदर्शने करून "शेतकरी विरोधी महावितरण" अश्या पाट्या हातात घेऊन निदर्शने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भेंडा पंचक्रोशीतील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने झालेले होते. शेतीपंपासाठी दहा ते बारा तास वीज पुरवठा आवश्यक क्षमतेने सुरळीतपणे करावा,चुकीचे वाढीव बिले दुरुस्त करून द्यावी व शेतकऱ्यांची समिती गठन करून शेतकऱ्यांच्या वेळेनुसार शेत पंपासाठी विजेचा वेळ ठरवावा इत्यादी मागण्या संघटनेने आपल्या निवेदनातून मांडल्या. यावेळी सत्यमेव जयते सामाजिक संघटनेचे अद्यक्ष जैद शेख म्हणाले की महावितरण आणि त्यांचा सुरु असलेला गलथान कारभार बदलून जेवढे वाढीव बिल तुम्ही घेता त्या मोबदल्यात उत्तम सेवा ही तितकीच द्यायला हवी. शेतात पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतकऱ्यांसोबत घडलेल्या अनेक घटना समोर आलेले आहेत त्या बघता शेत पंपासाठी विजेचा वे...

ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन तालुकाध्यक्षपदी अफजल कुरेशी यांची निवड

 ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन तालुकाध्यक्षपदी अफजल कुरेशी यांची निवड  (इंदापूर प्रतिनिधी ) ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन तालुकाध्यक्षपदी अफजल कुरेशी यांची निवड करण्यात आली .मुस्लिम समाजाने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी असे राष्ट्रीय अध्यक्ष  इकबाल अन्सारी यांनी इंदापूर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात सांगितले.    इंदापूर या ठिकाणी ऑल मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील भाई सय्यद ,माजी उपनगराध्यक्ष सादिक भाई बागवान ,सलीम भाई बागवान ,इमरान शेख यावेळी उपस्थित होते.सुत्रसंचलन एडवोकेट आसिफ बागवान यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  पञकार जावेद शेख, अली अकबर मनेरी , इम्रान बेपारी इनूस मनेरी ,इमानुद्दीन अन्सारी

भिमाई आश्रमशाळेत सावित्रीबाई फुलेंना स्मृतीदिनी अभिवादन.* *सावित्रीबाईंनी स्री शिक्षणाचा पाया रचला*. :- *उप-प्राचार्या सविता गोफणे यांचे प्रतिपादन*

 *भिमाई आश्रमशाळेत सावित्रीबाई  फुलेंना स्मृतीदिनी अभिवादन.* *सावित्रीबाईंनी स्री शिक्षणाचा पाया रचला*. :-  *उप-प्राचार्या सविता गोफणे यांचे प्रतिपादन* *इंदापूर (प्रतिनिधी)* ( *दि.१०*) :- सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या स्री शिक्षिका.त्यांनी सर्व जाती धर्मातील मुलींना मोफत शिकविले.त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढल्या. त्यांनी अनिष्ट रुढी परंपरेला कडाडून विरोध केला. सावित्रीबाई अत्यंत संवेदशील व कारुण्यमय मनाच्या होत्या. सावित्रीबाईंचे महिलांसाठी शैक्षणिक कार्य महान असल्याचे गौरोद्गार माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळेच्या उप- प्राचार्या सविता गोफणे यांनी काढले. त्या भिमाई आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.  मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी ट्रस्टच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या फातिमा शेख मुलींचे अनुदानित वसतिगृहाच्या अधिक्षिका निता भिंगारदिवे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार, दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या)यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन ...

अल्लाबक्ष बागवन ते आयुब कुरेशी यांच्या घरापर्यंत ड्रेनेज पाईप बसवण्याची नागरिकांची मागणी

 अल्लाबक्ष बागवन ते आयुब कुरेशी यांच्या घरापर्यंत ड्रेनेज पाईप बसवण्याची  नागरिकांची मागणी (इंदापूर प्रतिनिधी)  अल्लाबक्ष बागवन ते आयुब कुरेशी यांच्या घरापर्यंत ड्रेनेज पाईप बसवण्याची  नागरिकांची मागणी या मागणीसाठी नगरपरिषद धरणे आंदोलन करणार असल्याची नागरिकांनी  नगरपालिकेला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.  15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र होऊन नागरिकांना आज ही ड्रेनेज  सारख्या  मूलभूत गरजांसाठी धरणे आंदोलन करावे लागत आहे . तर ही मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने इंदापूर नगर परिषदेने किरकोळ प्रश्न लावणे बंधनकारक असतानाच इंदापूर नगरपरिषद याकडेे दुर्लक्ष करीत आहे इंदापूर नगरपरिषद या नागरीका कडून  कररुपी टॅक्स घेत असताना माञ इंदापूर नगरपरिषद या नागरिकांच्या मूलभूत सुविधा कडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे  सुविधा म्हणून ड्रेनेज पाईप देणे बंधनकारक असताना इंदापूर नगरपालिका उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.  याप्रकरणी इंदापूर नगरपरिषद चे बांधका...

*'उम्मती व श्रीरामपूर मेमन जमात तर्फे १७० रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया होणार*

 *'उम्मती व श्रीरामपूर मेमन जमात तर्फे १७० रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया होणार*        उम्मती सोशल वेलफ़ेयर सोसायटी, मेमन जमात श्रीरामपुर व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.६ मार्च २०२२ रोजी 'मोफत मोतीबिंदु, काचबिंदु, तिरळेपणा व इतर नेत्रविकार निदान व उपचार शिबिराचे' आयोजन खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूल श्रीरामपूर येथे करण्यात आले होते. सदर शिबिराचा जवळपास ४८० रुग्णांनी लाभ घेतला.     सदर शिबिरासाठी अध्यक्ष म्हणुन वैद्यकीय अधिकारी  डॉ.वसंतराव जमदाडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन अविनाश जी आदिक माजी नगराध्यक्षा अनुराधा ताई आदिक माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष हाजी मुझफफर भाई शेख,माजी नगसेवक मुक्तार भाई शहा, डॉ. अक्षय शिरसाठ, जयंत चोधरी,राजेश जी अलग, रवींद्र गुलाटी, मुफ्ती रिझवान,इरफान जीवनी, फिरोज मुसानी,फारुख मुसानी, डॉ. इरफान लखाणी , तोफिक भाई एकता,जोयेब जमादार, गफ्फार पोपटिया, तुलसी हॉस्पिटलचे डॉ.पाटील आदि उपस्थित होते.     शिबिराचे उदघाटन मुफ्ती रिजवान यांच्या पवित्र कुरआन शरी...