मराठा आरक्षणासाठी मुस्लिम तरुणाचे अन्नत्याग उपोषण शेवट पर्यंत मराठा समाजासोबत राहू- जैद शेख अहमदनगर (प्रतिनिधी) - खासदार संभाजीराजे भोसले मराठा आरक्षणावर आणि इतर मागण्यांसंदर्भात मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देत स्मायलिंग अस्मिता, कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी अहमदनगरमध्ये छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे उपोषणाला बसून पाठिंबा दिला आहे मुंबईत खा.संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर उपोषण पुकारले आहे. यामध्ये आम्ही देखील अहमदनगर शहरातून सहभागी होत आहोत. सकाळी १० वाजल्यापासून साखळी पध्दतीने अन्नत्याग करणार आहे. मराठा आरक्षणावर प्रत्येकवेळी आम्ही सहभागी असतो मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागणीसाठी तथा अनेक वर्षापासून लढा उभारून सुद्धा अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. ते त्यांना लवकरात लवकर मिळावे तसेच सोबतच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. २०१७ मध्ये देखील आम्ही मराठा समाजासोबत होतो आणि शेवटपर्यंत राहु असे मुस्लिम समाजातर्फे आलेले जैद शेख म्हणाले.यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि इतर सर्व क्षेत्रातील विद्यार्थी उपस्थित...