Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

समीक्षा बहुउददेशीय विकास संस्थेकडून महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 समीक्षा बहुउददेशीय विकास संस्थेकडून महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन  ( इंदापूर प्रतिनिधी ) समीक्षा बहुउददेशीय विकास संस्थेकडून महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन  यावेळी  मा. श्री . ढवळे साहेब- Assistant Sub Inspector मा. श्री . यादव साहेब - police constable मा. श्री . गोरवे साहेब-  , मा. श्री . लोंढे साहेब , मा. श्री . सानप साहेब - home guard सामाजिक कार्यकर्ते मा. श्री अनिल राऊत , मा सौ रुपाली झगडे मॅडम  संस्थेच्या अध्यक्षा मा सौ रोहिणी राऊत व संस्थेचे सचिव मा.श्री दादा राऊत गुरुजी . व प्रशिक्षनार्थी

इंदापूर शहरात दादा राऊत सर व रोहिणी राऊत मॅडम या दाम्पत्यांच्या कन्येचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा*

 *इंदापूर शहरात दादा राऊत सर व रोहिणी राऊत मॅडम या दाम्पत्यांच्या कन्येचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा*   *(इंदापूर प्रतिनिधी ) इंदापूर शहरातील राऊत दाम्प त्याने आपल्या मुलीचा वाढदिवस इंदापूर बस स्टँड वरील साई मंदिर येथे अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे.  राऊत* *दाम्पत्याने त्यांची कन्या समीक्षा हीचा दुसरा वाढदिवस पालावरील लहान मुली मुलं यांना कपडे देवून साजरा केला त्याच प्रमाणे इंदापूर बस स्टाँडवरील मुक्कामी बेघर लोकांना  ही थंडीपासून बचाव साठी रग वाटप केल्या तसेच एसटी ड्रायव्हर, कंडक्टर व सफाई कर्मचारी यांना* *टोपी - टॉवेल देऊन धोतरे साहेब, शिक्षक वृंद व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित  केले. व सर्व उपस्थित लोकांना जेवण दिले. इंदापूर शहरातील अनेक मान्यवरांनी, शिक्षक वृंदांनी, समीक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मौर्य क्रांती संघाच्या इंदापूर शहर अध्यक्ष पदी प्रकाश पवार

 मौर्य क्रांती संघाच्या इंदापूर शहर अध्यक्ष पदी प्रकाश पवार  (इंदापूर प्रतिनिधी )  मौर्य क्रांती संघाच्या इंदापूर शहर अध्यक्ष पदी प्रकाश पवार यांची निवड करण्यात आली. इंदापूर गेस्ट हाऊस या ठिकाणी झालेल्या मिटिंगमध्ये प्रकाश पवार यांची निवड करण्यात आली. प्रदेश संघटक शिंगाडे राहूल यांनी प्रकाश पवार यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी बहुजन मुक्ती पक्षाचे राष्ट्रीय संघटक राहूल मखरे.   अमोल मारकड . नानासाहेब चव्हाण उपस्थित  यांच्या उपस्थित पद देण्यात आले.

इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा.प्रदीपदादा गारटकर मित्र परिवार यांच्या माध्यमातुन शहरातील प्रभाग क्र.६ मधील संत रोहीदास महाराज मंदिरामध्ये नागरीकांना पहीला ,दुसरा व बूस्टर डोस देण्यात आला

(इंदापूर प्रतिनिधी ) इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा.प्रदीपदादा गारटकर मित्र परिवार यांच्या माध्यमातुन शहरातील प्रभाग क्र.६ मधील संत रोहीदास महाराज मंदिरामध्ये नागरीकांना पहीला ,दुसरा व बूस्टर डोस देण्यात आला . करोना लसीकरण मोहिमेचा एकूण  २१५ नागरीकांनी लाभ घेतला. अशी माहिती माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे यांनी दिली. इंदापुर शहर करोना मुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना गवळी,माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, प्रा.अशोक मखरे सर ,माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, युवक शहर अध्यक्ष इम्रानभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्या इंदापूर शहर अध्यक्ष अहेमदरजा सय्यद,वसिमभाई बागवान, प्रविण ननवरे, शुभाष ननवरे ,इत्यादी मान्यवर उपस्थिति  होते

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर यांच्या माध्यमातून प्रभाग क्र. ८ मधील डाॅ. आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर, लोकमान्यनगर, आठभाई मळा, बजरंगनगर, उमाजी नाईक नगर या परिसरातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम दि. २१/१/२०२२ रोजी माजी नगराध्यक्ष कै. अरुणरावजी ढावरे सभागृहात राबविण्यात आली.

 इंदापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर यांच्या माध्यमातून प्रभाग क्र. ८ मधील डाॅ. आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर, लोकमान्यनगर, आठभाई मळा, बजरंगनगर, उमाजी नाईक नगर या परिसरातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम दि. २१/१/२०२२ रोजी माजी नगराध्यक्ष कै. अरुणरावजी ढावरे सभागृहात राबविण्यात आली. या ठिकाणी पहिला, दुसरा व बुस्टर डोस देण्यात आले. एकूण ४१० नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेतला. अशी माहिती माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी दिली.          यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, प्रा.अशोक मखरे, नगरसेविका राजश्री अशोक मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, बाळासाहेब आडसुळ, सामाजिक कार्यकर्ते उमेश ढावरे, दिलीपराव शिंदे, वसिमभाई बागवान,रणजित आबा ढावरे,आप्पासाहेब खंडाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, मुकूंद आप्पा शिंदे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन मा.प्रदीपदादा गारटकर मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

खतांचे भाव वाढल्याने अन्नदाता मोठ्या चिंतेत ? खतांच्या किमती कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

 खतांचे भाव वाढल्याने अन्नदाता मोठ्या चिंतेत ?  खतांच्या किमती कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी खतांचे भाव वाढल्याने अन्नदाता मोठ्या चिंतेत ?  खतांच्या किमती कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी बेलापुर  (प्रतिनिधी )- निसार्गाच्या ऋतुमानात अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच शासनाने खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ करुन शेतकऱ्यांना जोरदार धक्का दिला असुन वाढलेल्या खतांच्या किमती कमी करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे, वातावरणात वेळोवेळी बदल होत असतानाही आपला जिव मुठीत धरुन शेतकऱ्यांनी कांदा,गहु हरबरा,ज्वारी पिके घेतली. अनेकांनी फळबागा धरलेल्या आहेत, वातावरणात झालेल्या बदलामुळे फवारणी करुन वैतागलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक जोरदार झटका दिला असुन रासायनिक खतांच्या किमतीत ५० रुपयापासुन १९५ रुपयापर्यत वाढ केलेली आहे, आगोदरच वाढता उत्पादन खर्च व कमी उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झालेली असतानाच खताच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेती करावी तर कशी करावी ? असा प्रश्न शेताकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे,रब्बी हंगामातील खतांची मागणी वाढलेली असतानाच शासनाने खतांच्या क...

येणाऱ्या काळातही अजिंक्य जावीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार- हर्षवर्धन पाटील* -युवा नेतृत्व अजिंक्य जावीर यांच्या अभिष्टचिंतन निमित्त हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

 *येणाऱ्या काळातही अजिंक्य जावीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार- हर्षवर्धन पाटील* -युवा नेतृत्व अजिंक्य जावीर यांच्या अभिष्टचिंतन निमित्त हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा  इंदापूर प्रतिनिधी    सामाजिक कार्यामध्ये सतत सहभागी असणारे युवा नेतृत्व अजिंक्य जावीर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वाढदिवसानिमित्त छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील सहभागी होऊन युवा नेतृत्व अजिंक्य जावीर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' अजिंक्य जावीर हे युवकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक जाणिवेतून त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. कोरोना काळात त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. युवक संघटनेत ते सक्रिय सहभागी असतात. त्यांच्या सामाजिक कार्याशी भारतीय जनता पक्ष सदैव पाठीशी राहील. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.   यावेळी नगरसेवक भरत शहा, ॲड. राहुल मखरे, पै. रमेश शिंदे, नगरसेवक कैलास कदम, शकीलभाई...

व्यंकटेशनगर येथील एकच निर्धार कोरोना हद्दपार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर शहर यांच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहीम

(इंदापूर प्रतिनिधी ) प्रभाग क्रमांक ५ व्यंकटेशनगर येथील एकच निर्धार कोरोना हद्दपार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर शहर यांच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहीम इंदापूर शहरातील नागरिकांसाठी खबरदारी लसीकरण करून घेणे हीच आत्ता सर्वांची जबाबदारी व्यंकटेश नगर या ठिकाणी  दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी पहिला दुसरा व बूस्टर डोस देण्याचा प्रारंभ संपन्न झाला .या लसीकरण मोहीम मध्ये ४२३ नागरिकांनी लसीकरण केले  या वेळी  इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे  इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष महादेव लोखंडे सामाजिक कार्यकर्ते वसिमभाई बागवान साजन ढावरे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे श्रीधर बाबस इंदापूर शहर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय अध्यक्ष विकास खिलारे अरबाज बागवान सोहम मोहिते अभिजीत सूर्यवंशी सद्दाम बागवान स्वप्नील उतेकर दिपक उतेकर  हायुल बागवान विजय मोरे  स्वप्नील उत्तेकर राजू ढावरे नदीम बागवान जावेद शेख कूष्णा सुर्यवंशी त्रुषिकेश उत्तेकर रोहित ढावरे उपस्थित ..या लसीकरण मोहीमचे आयोजन राष्ट्रवादी काँग्र...

सिद्धी भिटे या मुलीस न्याय मिळवून देणार- राजवर्धन पाटील*

 *सिद्धी भिटे या मुलीस न्याय मिळवून देणार- राजवर्धन पाटील* इंदापूर प्रतिनिधी   इंदापूर तालुक्यातील बोरी येथील नववीत शिकत असलेल्या सिद्धी भिटे या अल्पवयीन मुलीने काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी बोरी येथील भिटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी या कुटुंबाचे सांत्वन केले तसेच या भेटीच्या वेळी सिद्धीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.    सिद्धी गजानन भिटे या मुलीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. सिद्धीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.      भिटे कुटुंबावर या घटनेमुळे मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून अशा घटना घडू नये यासाठी सर्वांचा सामाजिक प्रयत्न असला पाहिजे असे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रमाता माॅ.साहेब जिजाऊ यांची प्रविण मोबाईल शॉपी यांच्या वतीने निमगाव केतकी या ठिकाणी जयंती उत्साहात साजरी*

 *राष्ट्रमाता माॅ.साहेब जिजाऊ यांची प्रविण मोबाईल शॉपी यांच्या वतीने निमगाव केतकी या ठिकाणी जयंती उत्साहात साजरी*  (निमगाव केतकी प्रतिनिधी ) :- दि.12 रोजी निमगांव केतकी या ठिकाणी *राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ यांच्या 424 व्या जयंतीनिमित्त* प्रविण  मोबाईल शॉपी ( श्री संत सावता माळी चौक) निमगाव केतकी या ठिकाणी *राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ* यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन  निमगाव केतकी येथील ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले यावेळी उपस्थित मा.अंकुश (दादा) जाधव माजी सभापती पंचायत समिती इंदापूर मा. श्री किशोर (आबा )पवार चेअरमन श्री गणेश पतसंस्थेचे निमगांव केतकी ,मा. श्री तात्यासाहेब वडापुरे चेअरमन श्री बालाजी पतसंस्था निमगांव केतकी, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल (आप्पा) मिसाळ एडवोकेट श्रीकांत करे अडवोकेट सचिन राऊत सामाजिक कार्यकर्ते संदीप (नाना) भोंग, बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव श्री अजित ठोकळे साहेब, राऊत सर, माझी ग्रामपंचायत सदस्य सचिन मुलांनी माणिक भोंग सामाजिक कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर अमोल राऊत सामाजिक कार्यकर्ते वस्ताद सचिन बनकर, सचिन देशमाने, गणेश शेळके, महेश मोरे,...

अन्यायग्रस्त कांचनच्या आमरण उपोषणाला आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेने दिला जाहीर पाठिंबा !

 अन्यायग्रस्त कांचनच्या आमरण उपोषणाला आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेने दिला जाहीर पाठिंबा ! प्रतिनिधी- श्री.आनंद काळे बारामती -  मौजे सोंनगाव ता.बारामती येथील अन्यायग्रस्त महिला सौ.कांचन भोसले ही दि.१०/०१/०२२ पासून प्रांत अधिकारी बारामती यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसलेली आहे.सदर आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे.मा. अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते परंतु राजकीय दडपणाखाली अधिकारी कच खात होते.आरोपींना आजतागायत अटक केलेली नाही, त्यामुळे आरोपी हे सोंनगावतील प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती असल्याने,सौ.कांचन भोसलेवर केस मिटवन्यासाठी सारखे दबाब टाकत आहेत.त्या कारणाने आरोपींना त्वरित अटक व्हावी व न्याय मिळवण्यासाठी सौ.कांचन भोसले आमरण उपोषणाला बसले आहेत.    आदिवासी पारधी परिवर्तन परिषेदेचे राज्य समन्वयक श्री.आनंद काळे,श्री.बापूराव काळे यांनी आंदोलन कर्त्या सौ.कांचन भोसले यांना त्वरित न्याय मिळावा व समाज्याला भेडसावणाऱ्या विविध मागण्यांसाठी मा. प्रांताधिकारी बारामती यांना जाहीर पाठिंब्याचे निवेदन द...

दफनभूमी प्रश्नासाठी खासदार श्रीरंग बारणे घालणार लक्ष !* 🔹🔹🔹 *पालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार - कब्रस्तान संघर्ष समितीला आश्वासन*

 *दफनभूमी प्रश्नासाठी खासदार श्रीरंग बारणे घालणार लक्ष !* 🔹🔹🔹  *पालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार  -  कब्रस्तान संघर्ष समितीला आश्वासन* 👆 (पुणे प्रतिनिधी )थेरगाव ,काळेवाडी परिसरामध्ये  मुस्लिम कुटुंबात एखाद्या व्यक्तीची मयत झाल्यास दफनविधी जागाच उपलब्ध नसल्याने *प्रशासनाकडून समाजावर अन्याय होत असून मुस्लिम बांधवांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्येन मागील महिनाभरापासून कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने परिसरात अनेक बैठका घेण्यात आल्या. लोकांमध्ये जनजागृती करून मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला. या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा समाजाच्या भावना निवेदनाच्या माध्यमातून पोहचवल्या आहेत.* मागील २ दिवसांमध्ये शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या भेटी गाठी सुरु आहेत.  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव काळेवाडी दफनभूमी प्रश्नी कब्रस्तान संघर्ष समिती ने सर्व पक्षीय आमदारांची भेट घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ...

पुणे जिल्हा सह निबंधक श्री.दिपक पाटील व इंदापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक श्री अरूण आव्हाड, तसेच श्री सोडणवर यांचेवर कायदेशीर कारवाई करून निलंबित करणेची इंदापूर मनसेची मागणी

  (इंदापूर प्रतिनिधी ) पुणे जिल्हा सह निबंधक श्री.दिपक पाटील व इंदापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक श्री अरूण आव्हाड, तसेच श्री सोडणवर यांचेवर कायदेशीर कारवाई करून निलंबित करणेबाबत इंदापूर तालुक्यातील इंदापूर चे दुय्यम निबंधक श्री.अरूण आव्हाड श्री सोडणवर यांनी मौजे.हिंगणगाव येथील गट नं.१५ तथाकथित दस्त क्र.४८८४/२०२१ हा बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केला आहे.ह्यामध्ये आदिवासी समाजातील वारसदारांना न्याय हक्कापासून जाणिव पूर्वक डावलले गेले आहे . तसेच मे. कोर्टाचा आदेश डावलून दस्त केला आहे. बनावट साक्षीदार उभे करून दस्त केला आहे सदर ७/१२ वर सुवर्णयुग ग्रामीण पतसंस्थेचा बोजा आहेअ.पा.क. चे नावे फिक्स डिपॉजिट(पावती) न करता केली असल्याचे भासवले आहे मे. कोर्टात सदर जमीनीबाबत दावा प्रलंबित असताना स्वतःच्या स्वार्थासाठी बनावटगिरी  करून खरेदी दस्त केला आहे. ह्या दुय्यम निबंधक ह्यांनी मंडल अधिकारी इंदापूर यांना दस्त क्र.४८८४/२०२१ची नोंद ७/१२ उतार्यावर करू नये असे प्रथम पत्र दिले आणि नंतर काही दिवसांनी त्याच मंडल अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करून तो दस्त नोंदणी करण्यासाठी दुसरे पत्र दि...

इंदापूर नगरपरिषदेच्या नवीन गाळ्यांच्या लिलाव पध्दतीला राजकीय व सामाजिक संघटनेचा कडकडून विरोध इंदापूर नगरपरिषद जनतेची मत विचारात घेणार का अन् शेवटी लोकशाही जिंकणार का ? श्री धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शॉपिंग सेंटर मधील गाळे लिलावात फेरबदल करण्याची काँग्रेस पक्षासह प्रहार व शिवराज्य शेतकरी विकास मंचची ची मागणी दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन इंदापूर नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला चाप बसणार का ?

इंदापूर नगरपरिषदेच्या नवीन गाळ्यांच्या लिलाव पध्दतीला राजकीय व सामाजिक संघटनेचा कडकडून विरोध इंदापूर नगरपरिषद जनतेची मत विचारात घेणार का  अन् शेवटी  लोकशाही जिंकणार का ?    श्री धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शॉपिंग सेंटर मधील गाळे लिलावात फेरबदल करण्याची  काँग्रेस पक्षासह प्रहार व शिवराज्य शेतकरी विकास मंचची  ची मागणी  काही राजकीय व सामाजिक संघटनांंनी  दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन इंदापूर नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला चाप बसणार का ? जनतेचा प्रश्न  ...  स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासह गाळे भाडे कमी करण्याची मागणी.... इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर नगरपरिषदेच्या श्री धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शॉपिंग सेंटर मधील गाळे क्र १ ते ७० असे एकूण ७० गाळ्या संदर्भातील निलाव निवेदा नुकतीच इंदापूर नगरपालिकेने प्रदर्शित केली यामध्ये नागरिकांच्या भावना लक्षात घेता फेरबदल करावा असे निवेदन इंदापूर तालुका काँग्रेस पक्षासह प्रहार च्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना देण्यात आले आहे. खालील मागणी संदर्भात तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, ज...

सावित्रीबाई फुले जयंतीदिनी 'समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्थेचा' शुभारंभ

 सावित्रीबाई फुले जयंतीदिनी 'समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्थेचा' शुभारंभ (इंदापूर प्रतिनिधी ) दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंचायत समितीचे सभागृह येथे समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्थेचा शुभारंभ करण्यात आला.प्रथम पंचायत समितीच्या सभापती स्वातीताई शेंडे व उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर संस्थेच्या प्रमुख रोहिणी राऊत यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविक मध्ये त्यांनी संस्थेमार्फत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ब्युटी पार्लर चे सर्व कोर्स ,शिलाई मशिन क्लास असे क्लास चालू आहेत याची माहिती दिली.उपस्थित मान्यवरांचा सत्कार रोहिणी राऊत व राऊत कुटुंबियांच्या हस्ते पार पडला.शुभारंभ प्रसंगी सभापती स्वाती शेंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना साडी वाटप, गरजू मुलींना कपडे वाटप,काटी केंद्रातील 600 मुलांना पेनचे वाटप करण्यात आले.यावेळी माधुरी लडकत मॅडम,मारुती मारकड सर,कैलास गवळी सरांनी मनोगते व्यक्त केली.सभापती स्वाती शेंडे यांनी संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी शु...

व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा इंदापूर यांच्या वतीने युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री विधायक ३१ डिसेंबर दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम

 व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा इंदापूर यांच्या वतीने युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री विधायक ३१ डिसेंबर दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम इंदापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राबवण्यात आला यामध्ये सहभागी युवक व नागरिकांना रचना देशी गोसंवर्धन यांच्या वतीने मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता भाभी शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर म्हणाले 'संपूर्ण महाराष्ट्रात जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त संस्कारक्षम युवा पिढी घडवण्याचं कार्य कौतुकास्पद आहे कोणत्याही राष्ट्राची युवा पिढी संस्कारक्षम असल्याशिवाय राष्ट्र उभारणी होऊ शकत नाही समाजामध्ये व्यसनमुक्तीची क्रांती घडवायची असेल तर व्यसनमुक्त युवक संघाचा आदर्श सर्वांनी घ्यावा.      यावेळी प्रास्ताविकामध्ये प्रा. धनंजय देशमुख यांनी व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून व्...