*वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला यश* दि.27/12/2021पासून मौजे आनंदनगर ता.इंदापूर जि. पुणे येथील दलित वस्तीत जाणारा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असलेल्या सार्वजनिक रस्ता प्रकरणातील प्रतिवादी गावगुंड, जातीयवादी मानसिकतेच्या गावपुढारी श्रीकांत मोहोळकर यांना मदत करणाऱ्या भ्रस्ट विस्तार अधिकारी के.एन.मोरे व ग्रामसेवक आर.पी.काळे यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंध कायदा नुसार कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करावे या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. 4 दिवसाच्या धरणे आंदोलन, हलगी आंदोलन, बोंबाबोंब आंदोलन अशा अनेक प्रकारच्या आंदोलनानंतर अखेर प्रशासनाला जाग आली व पंचायत समिती इंदापूर चे मा.गटविकास अधिकारी मा. विजयकुमार परीट सो. यांच्या बरोबर चर्चा करून त्यांचे अधीकारी हे त्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवतात हे कागदोपत्री पुराव्यानिशी सिद्ध केले. संबंधित प्रकरणात के.एन.मोरे व ग्रामसेवक आर.पी. काळे यांनी हलगर्जीपणा केला आहे हे मान्य करत मा.गटविकास अधिकारी सो.यांनी त्यांच्यावर दोन दिवसात कारवाई करण्याच्...