Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

चाँदशावली बाबा दर्गाह उरूस चा प्रारंभ 11 तारखेपासून

 चाँदशावली बाबा दर्गाह उरूस चा प्रारंभ 11 तारखेपासून  (इंदापूर प्रतिनिधी ) इंदापूर शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या चाँदशावली बाबा यांचा उरूसचा प्रारंभ 11 तारखेपासून सुरू होत असल्याची माहिती चाँदशावली बाबा दर्गाहचे मुजावर शकीलभाई मुजावर यांनी दिली. 11 डिसेंबर रोजी संदल व उरूस 12 तारखेला व झेंडा 13 तारखेला असणार असल्याचेही मुजावर यांनी सांगितले. चाँदशावली बाबा यांच्या उरूसला पुणे जिल्हा तसेच सोलापूर ,धुळे उस्मानाबाद , सातारा , बीड ,अहमदनगर या जिह्यातील भक्त दरवर्षी येत असल्याचेही मुजावर यांनी सांगितले. सदर ऊरूस मध्ये चादरीचा मान इतिहास काळीन काळापासून इंदापूर पोलीस ठाण्याचे फौजदार यांचा तर झेंडा चा मान रामोशी  व कुरेशी समाजाचा आसतो.तल संदलचा मान आत्तार यांना आसतो. दरवर्षी वाजणारा यावर्षी नगारा या वर्षी काही वाजताना  आवाज ऐकू आले नसल्याचे नागरिकां मधून बोलले जात आहे. चाँदशावली बाबा दर्गाहच्या ऊरूस दिवशी मोठ्या प्रमाणावर प्रसाद बनवला जातो.

भारतीय बौद्ध महासभेच्या इंदापूर तालुका संघटकपदी प्रा.बाळासाहेब मखरे*

 *भारतीय बौद्ध महासभेच्या इंदापूर तालुका संघटकपदी प्रा.बाळासाहेब मखरे*  इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. बाळासाहेब मखरे यांची दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका संघटक पदी एकमताने निवड करण्यात आली.        इंदापूर येथील विश्रामगृहात इंदापूर तालुका पदाधिका-यांच्या निवडी विषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा अध्यक्षा आयु. सुजाताताई सोनकांबळे यांचे हस्ते प्रा. बाळासाहेब मखरे यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रा. मखरे यांनी धम्म कार्यासाठी स्वत:ला झोकून देण्याचे आश्वासन दिले.

रणगांव येथील असंख्य कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

( इंदापूर प्रतिनिधी )रणगाव ता. इंदापूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे विकासरत्न ना. दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी आदरणीय मामांची कामांची धडाडी व रणगाव च्या विविध विकासकामांसाठी त्यांची असलेली सकारात्मक भूमिका पाहून रणगाव गावच्या सरपंच सौ. सुषमा राहुल रानमोडे,श्री. राहुल रानमोडे व महाराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. बबलू दादा पवार,सौरभ बबलू पवार  अनिकेत रनमोडे , सचिन गोसावी, प्रकाश साळुंखे, संदीप गोसावी व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी आदरणीय मामांच्या कामांवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आदरणीय मामांनी सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करत रणगाव गावच्या विकासामध्ये कोणतीही कमतरता भासू देणार नाही असा विश्वास सर्वांना दिला.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरात बेमुदत धरणे आंदोलन 2 ऱ्या दिवशीही सुरू* - पृथ्वीराज जाचक, अप्पासाहेब जगदाळे व हजारो शेतकरी उपस्थित.

 *भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरात बेमुदत धरणे आंदोलन 2 ऱ्या दिवशीही सुरू* - पृथ्वीराज जाचक, अप्पासाहेब जगदाळे व हजारो शेतकरी उपस्थित. ____________________________   - शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्याची मागणी    - 11 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. _______________________________   इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेली 11 दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र 11 दिवस झाले तरी शेतीचा वीजपुरवठा सुरु केला जात नसल्याने भाजपा नेते व मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर शनिवारी (27) सकाळपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. महावितरण कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांनी काल रात्री मुक्काम केला. आज रविवारी (दि.28) दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.           शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत चालू होईपर्यंत माझे धरणे आंदोलन चालूच राहील, अ...

कोहिनूर ग्रुप आणि संवाद पुणे यांचा संविधान गौरव पुरस्कार रुग्ण हक्क परिषदेला प्रदान!*

 *कोहिनूर ग्रुप आणि संवाद पुणे यांचा संविधान गौरव पुरस्कार रुग्ण हक्क परिषदेला प्रदान!* पुणे दि. २६- डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय्य -  हक्कासाठी लढणारी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'आयएसओ' मानांकित जगातील पहिली संघटना असलेल्या रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश या संघटनेला यंदाचा दिला जाणारा प्रतिष्ठेचा संविधान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संविधान दिनानिमित्त 'संवाद पुणे आणि कोहिनूर ग्रुप' यांच्या वतीने पुण्यातील नामांकित संस्थांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.        यावेळी युवक क्रांती दलाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, संवाद पुणेचे सुनील महाजन, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक मंचावर उपस्थित होते. रुग्ण हक्क परिषदेचे प्रतिनिधी म्हणून संघटनेचे केंद्रीय सचिव संजय जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला.         परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण हक्क परिषदेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण केलेले छ...

इंदापूर मधील त्या तीन पोलिसांनी दाखवले माणुसकीचे दर्शन

 इंदापूर मधील त्या तीन पोलिसांनी दाखवले माणुसकीचे दर्शन इंदापूर/प्रतिनिधी:- इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पो ना मनोज प्रविण गायकवाड,पो कॉ रोशन नवनाथ मुटेकर,पो कॉ प्रवीण संजय शिंगाडे, यांनी अपघात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलांसहीत वयोवृद्ध व्यक्ती ला स्वतः घटनास्थळावरून उचलून अंबुलन्स ची वाट न बघता स्वतःच्या गाडीतून दवाखान्यापर्यंत पोहोचून माणुसकीचे दर्शन दिले आहे. सविस्तर माहिती अशी की मुंबई मधील भिवंडी येथून -तुळजापूरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भिवंडी स्थित असलेले कुटुंब इंदापूर जवळील शिंदेवस्ती कडे जाणाऱ्या मार्ग जवळ खाण्यासाठी पेरू घेण्यासाठी थांबले असता पुण्याहून -मुंबईकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रक ने जोरदार धडक दिल्याने दोन अल्पवयीन मुलांना सहित एक वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. त्यामधील जखमी मुलांचे नाव:- माही केशरनाथ पाटील वय १३ वर्षे, आधी रुपेश बाबरे वय १० वर्षे, असून वयोवृद्ध महिलेचे नाव माहिती नाही. जखमी झालेली तीनही व्यक्ती रस्त्यावर तसेच पडून जखमी अवस्थेत होती.परंतु त्यांना कोणीही रस्त्यावरून उचलून रुग्णालयापर्यंत नेण्यास पुढे आले नाही. सदर घटनेची...

पांडूरंग ( तात्या ) शिंदे व भारतीय जनता पार्टी . ओ.बी.सी . मोर्चा . इंदापूर तालुका अध्यक्ष यांच्या वतीने व पांडूरंग तात्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली S T . कामगारांना मदतीचा हाथ

 पांडूरंग ( तात्या ) शिंदे व भारतीय जनता पार्टी . ओ.बी.सी . मोर्चा . इंदापूर तालुका अध्यक्ष  यांच्या वतीने व पांडूरंग तात्या शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली S T . कामगारांना मदतीचा हाथ ... (इंदापूर प्रतिनिधी )काल आंदोलन स्थळी मा पांडूरंग ( तात्या ) शिंदे . हे कामगारांना भेटण्यास / विचारपूस करण्यात गेले होते त्या ठिकाणी कामगारांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या .. काही कामगाराने सांगितले की आम्ही आज फक्त थोडेफार पोहे खाल्ले आहे त्यानंतर आम्ही सर्व कामगार  उपाशी आहोत आमच्या कडे जेवणाकरीता काहीच सामान शिल्लक नाही ... आम्ही कामगारांकडून पैसे गोळा करून जेवण खर्च करतोय .. आम्हाला कुठल्याच नेत्यांना मदत केली नाही हे ऐकुण तात्यांना काही राहावासे वाटले नाही तात्या काही क्षणापूर्ते भावनिक झाले .. त्यांनी त्या कामगारांना सांगितले तुम्ही काही काळजी करु नका मी तुमच्या पाठिशी आहे कुठली ही अडचण असो आम्ही तुम्हाला मदत करू .. मी तुमची जेवणाची सोय करतो शब्द दिला आणि त्याने तो पाळला त्यानी व त्याच्या कार्यकर्त्यांनी जेवणाचे सामान पोहच केले ... तात्या म्हणले B J P पक्ष तुमच्या पाठ...

इंदापूरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा..*

 *इंदापूरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा..* इंदापूर (प्रतिनिधी) : येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जेतवन बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेदस प्रा.बाळासाहेब मखरे यांचे हस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात आला तर तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस प्रा.सुहास मखरे यांनी पुष्प अर्पण करुन दिप प्रज्वलन केले. सामुदायिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करुन प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.      ॲड. सुरज मखरे यांनी संविधानातील मजबूत अधिकार विषद करत संविधानाचे महत्व पटवून दिले.        यावळी पवन मखरे, अक्षय मखरे, दया मखरे, तुषार मखरे, सुहास मखरे, नागेश सोनवणे, सिद्धांत खरे, रोहित मखरे, सागर मखरे, उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विशेष परिश्रम घेतले.  अक्षय मखरे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा*.- *ॲड.समीर मखरे

 *संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा*.- *ॲड.समीर मखरे * ( *भिमाई आश्रमशाळेत ७२ वा संविधान दिन उत्साहात झाला साजरा* )  *इंदापूर* :- ( दि.२६ ) भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला आज रोजी ७२ वर्ष पूर्ण होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करु या, असे प्रतिपादन इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे सचिव ॲड. समीर रत्नाकर मखरे यांनी केले. संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात हा कार्यक्रम संपन्न झाला. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ज्युनिअर कॉलेज, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ॲड. मखरे पुढे म्हणाले की, २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी सुरू झाली आणि देशांमध्ये लोकशाही व्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर...

इंदापूर ते पंढरपूर सायकल वारी कार्तिक एकादशी निमित्त दिनांक २१/११/२०२१ रोजी इंदापूर सायकल क्लब कार्तिक एकादशी चे औचित्य साधून सायकल वारी साठी आणि सायकलींच्या प्रचारासाठी इंदापूर टेंभुर्णी करकम भोसे ते पंढरपूर सायकल वारीसाठी १३७ किलोमीटर सायकल प्रवास इंदापूर सायकल क्लब यांचे वतीने सायकल वारी संपन्न झाली

 ( इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर ते पंढरपूर सायकल वारी कार्तिक  एकादशी निमित्त दिनांक २१/११/२०२१ रोजी इंदापूर सायकल क्लब कार्तिक एकादशी चे औचित्य साधून सायकल वारी साठी आणि सायकलींच्या प्रचारासाठी इंदापूर टेंभुर्णी करकम भोसे ते पंढरपूर सायकल वारीसाठी  १३७ किलोमीटर  सायकल प्रवास इंदापूर सायकल क्लब यांचे वतीने सायकल वारी संपन्न झाली. सकाळी सहा वाजता प्रारंभ करण्यात आला. इंदापूर नगरपरिषद या ठिकाहूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल वारीस प्रारंभ करण्यात आला. या सायकल सहभागी सदस्य दशरथजी भोंग प्रशांत शिताप विकास खिलारे सचिन परबते योगेश काटे विष्णुपंत खरात उमेश राऊत रमेश शिंदे पांडुरंग माने संजय राऊत तुषार सरडे मोहिनी दळवी श्वेता राऊत आणि मुक्ता भोंग यांनी सहभाग घेतला या वेळी संकल्प केला सायकल चालवा निरोगी रहा पर्यावरणाचं  संतुलन ठेवा चंद्रभागेत स्नान व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन संध्याकाळी सात वाजेपर्यंत इंदापूर या ठिकाणी सायकल वारी समाप्त झाली.

नळांद्वारे येणाऱ्या घाण पाण्याची जर नगर पालिका प्रशासन दखल नाही घेणार ! तर हेच घाण पाणी बाटलीत बंद करुन नगर पालिका अधिकाऱ्यांना पिण्यास देणार !!

 नळांद्वारे येणाऱ्या घाण पाण्याची जर नगर पालिका प्रशासन दखल नाही घेणार ! तर हेच घाण पाणी बाटलीत बंद करुन नगर पालिका अधिकाऱ्यांना पिण्यास देणार !! नळांद्वारे येत असलेल्या दुषीत घाण पाण्यामुळे श्रीरामपूरकरांचे आरोग्य धोक्यात ; समाजवादी पार्टी आंदोलनाच्या पावित्र्यात श्रीरामपुर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर नगर पालिकेमार्फत पिण्याच्या पाण्याचा घराघरात पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्यांद्वारे (नळ कनेक्शन) दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत असल्याने शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असल्यानचे समाजवादी पार्टीच्यावतीने मुख्यधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे,येत्या आठ दिवसांत नळाद्वारे येत असलेले दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा योग्य बंदोबस्त न केला गेल्यास समाजवादी पार्टीतर्फे नगर पालिकेसमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन आणि आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे, निवेदनात पूढे असेही म्हटले आहे की,सदरील दुर्गंधीयुक्त घाण पाणी पिण्यात येऊन अनेक नागरीकांना जुलाब,वांत्या आणि थंडीतापाच्या साथीने ग्रासले आहे,यात लहान बालकांना मोठा फटका बसत असून रोजच दवाखाने गच्च भरल्याचे निदर्शनास येत...

पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारासाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विरोधी धोरण विरोधात इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी व महिला आघाडीच्या वतीने खालील विविध मागण्यासाठी इंदापूर तहसिल कार्यालयासमोर सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी शासकीय वेळेत एक दिवशिय धरणे आंदोलन करण्यात आले.

 पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारासाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विरोधी धोरण विरोधात इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी व महिला आघाडीच्या वतीने खालील विविध मागण्यासाठी इंदापूर तहसिल कार्यालयासमोर सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी शासकीय वेळेत एक दिवशिय धरणे आंदोलन करण्यात आले.            यामध्ये धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाडी शासनाला सुपूर्द केले आहे ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा,न्यायालयाने मान्यता दिलेले पाच टक्के शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करावे.महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम व मुअज्जीन आणि खुद्दाम हजरत यांना मासिक वेतन सुरू करावे.संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या ह-भ-प कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावी.             वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीस...

ओबीसीच्या राहुरी शहराध्यक्षपदी रियाज शेख तर उपाध्यक्षपदी अयाज बागवान !

 ओबीसीच्या राहुरी शहराध्यक्षपदी रियाज  शेख तर उपाध्यक्षपदी अयाज बागवान ! राहुरी (प्रतिनिधी) - येथील सामाजिक कार्यकर्ते रियाज अजिजोद्दीन शेख (सर) यांची ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहूरी शहराध्यक्षपदी तर शहर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अयाज शफी बागवान यांची नियुक्ती करण्यात आली. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांच्या आदेशान्वये तथा ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन अहमदनगर जिल्हाध्यक्ष हाजी फय्याजभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली ऑर्गनाईझेशनचे राहुरी तालुकाध्यक्ष उबेद अब्दुलसलाम बागवान यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनची राहुरी शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.  यावेळी तालुका उपाध्यक्ष नूर अत्तार, तालुका कार्याध्यक्ष नावेद बागवान,आयुब इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान, जिल्हा संघटक जाकीरभाई शाह, जिल्हा सरचिटणीस इब्राहिम बागवान, जिल्हा कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी, जिल्हा सहसचिव अजिजभाई अत्तार, शब्बीरभाई...

बारामती शहर पोलिसांची अवैद्य गुटखा विक्रेत्यांवर कारवाई ५० हजार ६७४ रुपये किंमतीचा गुटखा जप्त.

 बारामती शहर पोलिसांची अवैद्य गुटखा विक्रेत्यांवर कारवाई ५० हजार ६७४ रुपये किंमतीचा गुटखा जप्त. बारामती (दि:१९) बारामती शहरांमध्ये अवैद्य रित्या गुटका विक्री केल्याप्रकरणी केशव सोनबा जाधव (वय ५५ वर्षे)  व संजय केशव जाधव दोन्ही (रा: नेवसे रोड कैकाड गल्ली बारामती ता .बारामती जि पुणे) या दोघांविरोधात  बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून केशव सोनबा जाधव याला ताब्यात घेतले असून संजय केशव जाधव हा पोलीसांची चाहूल लागताच पळून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार (दि:१८) रोजी बारामती शहरातील नेवसे रोड येथील कैकाड गल्ली या ठिकाणी  केशव सोनबा जाधव व संजय केशव जाधव या दोघांनी संगणमत करुन महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदीचा आदेश असताना देखील पान मसाला गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने आपल्या घराच्या  पाठीमागे असलेल्या स्वताचे मालकीच्या पत्र्याचे शेडमध्ये बेकायदा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलीसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी एकूण ५० हजार ६७४ रुपये किंमतीचा पान मसाला गुटख्याचा साठा करुन ठेवल्याचे निदर्शनास आले. व त्या ठिकाणी सदर व्यक्ती केश...
 असाही महापुरुष प्रेम ,वैभव पलंगे  

भिगवण पोलिसांची गांजाची वाहतूक करणारेवरती गुन्हा दाखल

  भिगवण पोलिसांची गांजाची वाहतूक करणारेवरती गुन्हा दाखल  सहा लाखांचा मुद्देमाल जप्त इंदापूर : प्रतिनिधी मोटारसायकलवरून पोत्यातून गांजाची वाहतूक करणाऱ्या एकाला भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३५.८ किलो गांजा,एक होंडा शाईन मोटार सायकल असा एकूण ६ लाख १६ हजार दोनशे ऐंशी रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.   सविस्तर हकीकत अशी की,मौजे डिकसळ गावच्या हद्दीत राशीन ते भिगवण रोडवर नाकाबंदी करीत असताना गुरुवारी (दि.१८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक इसम हा मोटार सायकल वरून अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डिकसळ या ठिकाणी नाकाबंदी व सापळा रचून सुनील अनिल जाधव ( वय २४ वर्ष, रा.सासवड,उदाचीवाडी, ता.पुरंदर,जि. पुणे ) यास पकडून पोत्याची झडती घेतली असता गांजा आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क),२० (ब),(क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरील कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहि...

रायगड जिल्ह्यातील पात्र स्थानिकांना खलाशी भरतीमध्ये प्राधान्य द्यावे -मत्सविकास राज्यमंत्री मा.ना.दत्तात्रय(मामा)भरणे*

 *रायगड जिल्ह्यातील पात्र स्थानिकांना खलाशी भरतीमध्ये प्राधान्य द्यावे -मत्सविकास राज्यमंत्री मा.ना.दत्तात्रय(मामा)भरणे*  मुंबई दि 17 - रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील मच्छिमारांच्या समस्यांचे नियमांतर्गत निराकरण करण्यात यावे. स्थानिक मच्छिमारांना त्यांचा पारंपारिक व्यवसाय करताना मिनी पर्सोनिल बोटीला परवानगी मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, याचबरोबर खलाशी भरतीमध्ये पात्र स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश मत्स्यविकास राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा)भरणे सो यांनी दिली.             रायगड येथील स्थानिक मच्छिमारांना येणा-या विविध समस्या सोडविण्यासाठी शासनाने सहकार्य करावे. मत्स्य परवाना, जेट्टी बांधणे, खडींची अडथळे, नोकरीत स्थानिकांना प्राधान्य, घरकुल, किसान क्रेडीट कार्ड अशा विविध समस्या खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांनी आज मांडल्या. यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या मच्छिमारांच्या समस्यांचे नियमांतर्गत निराकरण करण्यात यावे असे निर्देश यावर राज्यमंत्री श्री.भरणे मामांनी संबंधित अधिका-यांना दिले. या ब...

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शौकत शेख यांचा सत्कार

 राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त  शौकत शेख यांचा सत्कार  श्रीरामपूर (प्रतिनिधी) - १६ नोव्हेंबर या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त येथील समता हॉलमध्ये ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान या़च्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी पत्रकार हा समाजाचा आरसा आहे,समाजात घडणाऱ्या विविध बाबींना पत्रकार हा आपल्या लेखणीद्वारे आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रतिबिंबित करत समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करत असल्याचे इब्राहिम बागवान म्हणाले,तसेच हाजी फयाजभाई बागवान आणि ओबीसी ऑर्गनायझेशन पदाधिकाऱ्यांच्यावतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू- भगिनींना यावेळी शुभेच्छाही देण्यात आल्या,याप्रसंगी समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक इंजि.मोहसिन शौकत शेख,समता आरटीओ ऑनलाईन सर्व्हिसेसचे सरताज शौकत शेख, ओबीसी ऑर्गनाईझेशनचे जिल्हा सचिव इब्राहीम बागवान,संघटक जाकीर शाह, कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी,सहसचिव अजीजभाई अत्तार, सहसचिव सरदारभाई (राजू) कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

इंदापुर शहरातील बोगस मते तातडीने काढण्यात यावी या साठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतिने मा. तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले

 (इंदापूर प्रतिनिधी ) दि. १६ /११ / २०२१ रोजी इंदापुर शहरातील बोगस मते तातडीने  काढण्यात यावी या साठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतिने मा. तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले निवेदनात विविध मागण्या आहेत त्यात २०१६ मध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे पुुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय ( डोनाल्ड ) शिंदे यांनी उच्च न्यायालयात बोगस मतदार संदर्भात याचिका दाखल केली होती मा.उच्च न्यायालयाने २०१६ मध्येच मा.जिल्हाधिकारी सो यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते मा.जिल्हाधिकारी सो यांनी सदरच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास मा. प्रांताधिकारी सो.यांना लेखी पञाव्दारे सांगितले त्यानंतर मा.प्रांताधिकारी सो.यांनी जिल्हाधिकारी सो.यांच्या आदेशानुसार कार्यवाहिचे आदेश मा.तहसिलदार सो. यांना दिले होते तरी आदेशाची अंमलबजावणी गेल्या ५ वर्षा पासुन काहीच झाली नसल्याचे दिसुन येत आहे जर पुढिल मागण्या पुर्ण नाही झाल्या तर दि.२४ नोव्हेंबर २०२१ पासुन दि. ०५ डिसेंबर पर्यंत बोगसमतदारांन संदर्भात  कार्यवाही झाली नाही तर दि.६ डिसेंबर २०२१ पासुन बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुलजी मखरे साहेब मा.संजयजी शिंदे मा....

देशभक्ती सेवा मंच कोपरगाव कार्यकरणी जाहिर*

 *देशभक्ती सेवा मंच कोपरगाव कार्यकरणी जाहिर* कोपरगाव प्रतिनिधी :- तरुणामध्ये देशभक्तीची विचारधारा पेरण्याचे काम देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमातुन केले जाते.तरूणांना संस्कार त्याच बरोबर आपली संस्कृती आणि देश हिताचे रक्षण करुन या सर्व विषयावर चर्चा संमेलन जनजागृती करण्याचे कामकाज देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमातुन केले जात असते.देशभक्ती सेवा मंचच्या कार्याची दखल यापुर्वी राष्ट्रपती त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा घेतली आहे.स.न.२१-२२ ची कार्यकरणी बैठक लुम्बीनी वन या ठिकाणी संपन्न झाली.या बैठकीत पत्रकार रवींद्र जगताप यांची अध्यक्ष पदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली.अल्ताफ शहा उपाध्यक्ष, संतोष जगताप सचिव,गणेश रणशूर कार्याध्यक्ष,कृणाल किर्तीकर संघटक,अरबाज शेख सेक्रटरी,वासिम शेख सहसंघटक,सुनिल वाहुळकर खजिनदार, बाबासाहेब सातुरे सह खजिनदार,संजय भारती प्रसिध्दी प्रमुख,विशाल आव्हाड संरक्षण प्रमुख,अँड अमोल मगर कायदेशीर सल्लागार, राजेंद्र घोडेराव सल्लागार, नानासाहेब मोरे मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.उपस्थित सदस्यांनी नविन कार्यकरणीस शुभेच्छा देवुन पुढील वाटचालीस मंगलकामना व्...

भिमाई आश्रमशाळेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचा कार्यक्रम संपन्न*.

 *भिमाई आश्रमशाळेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचा कार्यक्रम संपन्न*.  ( *तालुका विधी सेवा समिती व वकील संघ इंदापूर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन*) *मुलांनी शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे*. *मा. पी. एल.पाटील साहेब (मुख्य न्यायाधीश,  दिवाणी न्यायालय इंदापूर ) यांचे प्रतिपादन*. *इंदापूर* ( *दि.१४* ) :- मुलांनी शिक्षण घेत असतानाच आपल्याला भविष्यात काय व्हायचे आहे, याचे ध्येय निश्चित करूनच शिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री.पी. एल.पाटील साहेब यांनी बालदिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिरात केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ इंदापूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रात ते बोलत होते. श्री.पाटील पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असतानाच मुलांनी बाह्य गोष्टीकडे  आकर्षित न होता, ध्येयपूर्तीकडे वाटचाल केली पाहिजे.असे आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले. श्रीमती वडगावकर (सह.दिवाणी न...

इंदापूर तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ची बैठक ग्रामपंचायत कार्यालय कळंब मध्ये पार पडली

( इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ची बैठक ग्रामपंचायत कार्यालय कळंब मध्ये पार पडली तालुका संघटक जनार्धन पांढरमिसे , जेष्ठ  सामाजिक कार्यकर्ते भजनदास पवार  खजिनदार अनिल चितळकर, इंदापूर शहर संघटक  प्रशांत भानुदास शिताप, सहसँघटक लक्ष्मण गडदेसर,तालूका सहसंघटक शामराव केशव जाधव.  इंदापूर तालूका सचिव महेश  मोहिते.व नौशाद पठाण मॕडम ऊपस्थित होते ...  यामध्ये 24 तारखेला राळेगण सिद्धी ठिकाणी शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिरासाठी लेखातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची संख्या कशी वाढेल यावर ती चर्चा झाली व इंदापूर तालुक्यातून जास्तीतजास्त कार्यकर्ते यावेत या उद्देशाने सर्वांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शिबिरासाठी जास्त संख्या कसे वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे गुरुवारपर्यंत नावाची यादी तयार करणे अपेक्षित आहे त्यानंतर आपणा सर्वांना कशा पद्धतीने जायचं आहे यासाठी व्यवस्था करण्यासाठी सगळ्यांनी नावांची यादी तालुका सहसंघटक जनार्धन पांढरमिसे  व शहर संघटक प्रशांत शिताप  यांच्याकडे पाठव...

इंदापूर नगरपरिषद चे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये श्री लीलाचंद पोळ यांच्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

 शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम नवीन पाणी पुरवठा केंद्र येथे संपन्न झाला होता त्याला एक वर्ष पूर्ण झाल्याने तसेच नगर परिषदेचे सहा.आरोग्य निरीक्षक श्री लीलाचंद पोळ यांचाही वाढदिवस13 नोव्हेंबरला  असल्याने  त्यांच्या वाढदिवसानिमित्त व माझी वसुंधरा अभियानांतर्गत  नवीन पाण्याची टाकी येथील लावलेल्या वृक्षांचा  वाढदिवस असल्याने  आरोग्य विभागातील कर्मचारी,वीज विभागातील कर्मचारी यांनी दैनंदिन काम करून सायंकाळी पाच वाजता तेथील उगवलेले गवत काढून साफ सफाई व परिसरातील राडारोडा उचलून परिसर सुंदर केला होता. गेल्या वर्षी या ठिकाणी लावलेल्या विविध प्रकारच्या झाडांना रंगीबेरंगी फुगे बांधून रंगीत झुरमुळ्या यांनी सजवून वातावरण आनंदमय केले होते. झाडांना हार बांधून कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये माननीय नगराध्यक्ष सौ अंकिता ताई शहा यांच्या हस्ते केक कापून एकमेकांना भरून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याबरोबरच सकाळी ठीक नऊ वाजता नगरपरिषदेने नव्याने निर्माण केलेल्या बायोडायव्हर्सिटी येथील गवत काढणे साफसफाई करणे चा संकल्प ...

महामार्गावर झालेला अपघात पाहताच भरणे यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली..

( इंदापूर प्रतिनिधी ) अपघात दिसताच ताफा थांबवला; राज्यमंत्री भरणे यांनी अपघातग्रस्ताला दिला धीर.. महामार्गावर झालेला अपघात पाहताच भरणे यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली.. इंदापूर :- नेता दुरदृष्टीचा असावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते.त्याच बरोबर त्याच्यामध्ये मानवतेची दृष्टी असेल अन् कोणत्या ही प्रसंगात झटपट निर्णय घेण्याची क्षमता असेल तर ती सामान्य माणसाच्या हृदयात नक्कीच कायमचे घर करुन रहाते... असाच एक अनुभव आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे सर्वांनाच आला.... राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा  रविवार हा दिवस धावपळीचा आणि व्यस्ततेचा दिनक्रम असतो. इंदापूर तालुक्यात दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे ते आज रविवारी दुपारी तालुक्यातील भिगवन येथील  कार्यक्रमातून इंदापूर कडे परतत असताना पुणे- सोलापूर महामार्गावरती लोणी देवकर या ठिकाणी त्यांच्यासमोर अचानक एका कार चा अपघात झाला, ती कार रस्ता सोडून समोरच्या दुभाजकावर गेली, यावेळी भरणे यांनी त्यांचा ताफा ताबडतोब थांबवून तातडीने जखमींकडे धाव घेतली, यावेळी त्या कार मध्ये दोन प्रवासी होते, त्यांना गंभ...

काय म्हणाले अशोक पोळ इंदापूर शहरातील डाॅ. आंबेडकरनगर, साठेनगर, होलारगल्ली आणि अन्य शहराच्या परिसरामध्ये मलेरिया, गोचिडताप, निमोनिया, चिकन गुनिया अशा अन्य रोगाच्या साथीने थैमान घातले असून आपल्या स्तरावरुन साथीच्या रोगास प्रतिबंधक ठोस उपाययोजना म्हणून तत्काळ कारवाईचे आदेश देऊन त्या आदेशाची अंमल बजावणी होणे बाबत._

 *_प्रति,_*                                   *_दि.१५/११/२०२१_*      *_मा.मुख्याधिकारी सो._*       *_इंदापूर नगरपालिका इंदापूर_*                  *_यांना सविनय सादर,_* _विषय :- इंदापूर शहरातील डाॅ. आंबेडकरनगर, साठेनगर, होलारगल्ली आणि अन्य शहराच्या परिसरामध्ये मलेरिया, गोचिडताप, निमोनिया, चिकन गुनिया अशा अन्य रोगाच्या साथीने थैमान घातले असून आपल्या स्तरावरुन साथीच्या रोगास प्रतिबंधक ठोस उपाययोजना म्हणून तत्काळ कारवाईचे आदेश देऊन त्या आदेशाची अंमल बजावणी होणे बाबत._ *_महोदय,_*     _उपरोक्त वरिल विषयांस अनुसरुन आपणांस या तक्रार अर्जाद्वारे गांभिर्यपूर्वक कळवु इच्छितो कि, ज्या इंदापूर शहराने स्वच्छ भारत अभियानासारख्या महत्वपूर्ण योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात इंदापूर शहराचं नांव लाैकिकास आणलं आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या पुरस्काराचा मान मिळवला त्याचं इंदापूर शहरामध्ये कोरोनासारख्या महामारीलासुद्धा रो...

अपोलो हॉस्पिटल मुंबई यांचे तर्फे श्रीरामपुरात मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन

 अपोलो हॉस्पिटल मुंबई यांचे तर्फे श्रीरामपुरात मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटी उपक्रम श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2.30 पर्यंत जैन स्थानक हॉल, शिवाजी रोड, श्रीरामपूर येथे अपोलो हॉस्पिटल मुंबई यांचे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सचिव सुनील साळवे यांनी दिली. ज्या रुग्णांना दम लागणे,सतत खोकला येणे,छातीत दुखणे, श्वसन त्रास होणे, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला असणे, कोरोना झाल्यानंतर त्रास होणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन अपोलो हॉस्पिटलचे भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजीव जाधव यांनी केले आहे.  डॉ.संजीव जाधव व त्यांची टीम रुग्णांची तपासणी करणार आहेत.त्यामध्ये शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, पी.एफ.पी, ई.सी.जी, बी.एम.आय आदी तपासण्या होणार आहेत.  रुग्णांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असून,जुने रिपोर्ट व सध्या घेत असलेली औषध माहिती सोबत आणणे. तपासणीला येताना मास्क लावूनच यावे तशी...

इंदापूर नगरपरिषदेच्या या अधिकारी विरोधात दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

 इंदापूर नगरपरिषदेच्या या अधिकारी विरोधात दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी  (इंदापूर प्रतिनिधी )  इंदापूर नगरपरिषद ने आम्ही दलित समाजाचे असल्याने जाणूनबुजून आम्हाला आमच्या पालकाच्या  मृत्यू नंतर अनुकंपा  तत्वानुसार वारस हक्काने नोकरीस घेण्यास विलंब केला जात असून विलंब करणारे  इंदापूर नगरपरिषदेच्या सतिश तारगांवकर यांच्या वरती दलित अत्याचार प्रतिबंध नुसार गुन्हा दाखल करावा असे महेश दशरथ सरवदे , माधुरी बाळू पवार , शिवाजी तानाजी मखरे व सारीका  चंद्रकांत सोनवणे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आम्ही सनदशीर मार्गाने गेले (15  वर्षे)पंधरा वर्षे पासून लेखी पत्रव्यवहार करीत असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे.आम्ही अनुसूचित जाती जमातीचे  मागासवर्गीय असल्यानेच  आमच्यावर जाणूनबुजून अन्याय केला जात आहे असे ही निवेदनात म्हटले आहे. सदर आमच्या घरात कोणीही शासकीय व निमशासकीय नोकरीला नसल्याने आमच्या वर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या आस्थापना विभागातील कर्मचारी सतीश ता...

शिर्डी शहरात मोफत ॲक्युपंक्चर उपचार शिबिराचे आयोजन,,,,, डॉ, महेश प्रभू शिर्डी, राजेंद्र दूनबळे

 शिर्डी शहरात मोफत ॲक्युपंक्चर उपचार शिबिराचे आयोजन,,,,, डॉ, महेश प्रभू शिर्डी, राजेंद्र दूनबळे   शहरात साईबाबांच्या पवित्र भूमीत सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जागतिक कीर्तीचे डॉक्टर एम बी  प्रभू  व चायना येथून वैद्यकीय शिक्षण घेऊन आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा देशातील जनतेला उपलब्ध करून देणारे डॉक्टर साईश प्रभू तसेच डॉ ज्योत्स्ना व वैद्यकीय पथक  यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक २१ नोव्हेंबर ते२८ नोव्हेंबर या कालावधीत मानेचा त्रास कंबर दुखी सांधे दुखी गुडघे दुखी टाच दुखणे संधिवात आदीसह विविध आजारावर मोफत तपासणी व उपचार केले जाणार असल्याचे डॉक्टर एम बी प्रभू यांनी सांगितले      डॉक्टर एम बी  प्रभू यांनी या गोदरी शिर्डी येथे मोफत तपासणी व उपचार शिबीर आयोजित केले होते आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा शिर्डीचा परिसरातील रुग्णांना झाला पाहिजे या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे डॉक्टर एम बी  प्रभू यांनी गेल्या पस्तीस वर्षात ६०हजारापेक्षा अधिक असाध्य रोगावर उपचार केले असून त्याचा फायदा वेगवेगळ्या लाखो रुग्णांना झालेला आहे वेगवेग...

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ राहाता तहसीलदारांना निवेदन,,!

 त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ   राहाता तहसीलदारांना निवेदन,,! राहाता (प्रतिनिधी) - त्रिपुरा राज्यात सतत घडणाऱ्या जातिय हिंसे विरोधात तसेच संपूर्ण देशात या प्रकारच्या घटनांवर कायमस्वरूपी प्रतीबंध लागण्यासाठी कडक शासन लागु करणेबाबत तसेच त्रिपुरा हिंसेचा जाहिर निषेध करत देशाचे महामहिम राष्ट्रपतींच्या नावे असेलेले निवेदन येथील मुस्लिम समाजातर्फे आज राहाता तहसीलदारांना देण्यात आले. या हिंसेचा संपूर्ण राज्यभर  ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने देऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे,सोबत या हिंसेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने आपापले व्यावसाय आज बंद देखील ठेवले आहेत, त्रिपुरा राज्यात काही दिवसांपासून मुस्लिम समुदायास टारगेट करत धुडगूस घातला जात आहे,काही जातियवादी पक्ष, संघटनेच्या माध्यमातून मुस्लिमांचे धार्मिक स्थळे मस्जिद,मदरसे आणि घरावर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात असल्याच्या निषेधार्थ येथील राहाता तहसीलदार यांच्या मार्फत राहाता मुस्लिम समाजाने महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांच्या नावे असलेले निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. त्रिपुरा राज्यातील काही जातियवादी संघटनेच्या पदाध...

*देशद्रोही कंगना राणावत वर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी - उमेश चव्हाण*

 *देशद्रोही कंगना राणावत वर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी - उमेश चव्हाण* *पुणे -* १५ ऑगस्ट १९४७ साली मिळाले ते 'स्वातंत्र्य' नसून 'भीक' होती. खरे स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळाले आहे. असे लबाडीचे वक्तव्य करून समस्त स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱ्या, स्वातंत्र्यचळवळीत स्वतःचे रक्त सांडवून बलिदान देणाऱ्या, मायभूमीसाठी फासावर चढणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्यसैनिकांना आणि स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करणाऱ्या सुमार अभिनेत्री देशद्रोही कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.          निर्लज्जपणे मूर्खपणाची मुक्ताफळे उधळण्याचे बक्षीस म्हणून अर्धनग्न अंग प्रदर्शन करणाऱ्या सुमार अभिनेत्री कंगना राणावतला 'पद्मश्री'चे बक्षीस बहाल केले खरे मात्र त्याच कंगनाने स्वातंत्र्यचळवळीत कोणतेही योगदान नसणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  पूर्वजांना आता आम्ही 'स्वातंत्र्यवीर' होतो, अशा प्रकारची शेखी मिरवता येणार नाही, असेच अप्रत्यक्षरीत्या कबूल केले. असल्याचे परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हण...

इंदापूर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट काम - हर्षवर्धन पाटील - उपसभापतीपदी ॲड.हेमंत नरुटे यांची निवड

 इंदापूर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट काम - हर्षवर्धन पाटील  - उपसभापतीपदी ॲड.हेमंत नरुटे यांची निवड  - भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे  इंदापूर: प्रतिनिधी दि.11/11/21        इंदापूर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गेली साडेचार वर्षात नावलौकिक वाढेल असे उत्कृष्ट काम केले आहे. आता नूतन उपसभापती ॲड. हेमंत नरुटे हेही पंचायत समितीचा नावलौकिक वाढविण्याचे काम प्रभावीपणे करतील. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.11) केले.           इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी ॲड. हेमंत नरूटे यांची गुरुवारी (दि.11) बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसभापती संजय देहाडे यांनी ठरलेप्रमाणे राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या उपस्थितीत ही बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नूतन...

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे निवेदन

 त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे निवेदन श्रीरामपूर (प्रतिनिधी) - स्थानिक निवडणुकीत आपले राजकिय हित साध्य करु पाहत असलेल्या काही जातियवादी शक्तींनी त्रिपुरा राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लिम समुदायास टारगेट करत त्रिपूरा राज्यात धुडगूस घातला आहे, काही जातियवादी पक्ष,संघटनेच्या माध्यमातून मुस्लिमांचे धार्मिक स्थळे मस्जिद,मदरसे आणि घरावर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात असल्याच्या निषेधार्थ येथील ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान तथा ऍड.हारुन बागवान यांच्या उपस्थितीत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांच्या नावे असलेले निवेदन श्रीरामपूर तहसिलदारांना देण्यात आले. त्रिपुरा राज्यातील काही जातियवादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना इस्लाम धर्मियांच्या विरोधात भडकविण्याचे काम केले तथा त्रिपुरा राज्यात सर्वत्र भारतीय दंड संहिता कलम १४४  लागु असताना देखील वरील काही जातियवादी संघटनेच्या  पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह मोर्चा काढून इस्लाम धर्माचे संस्थापक आणि मुस्लिमांविरो...

टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंबाळकर साहेब यांनी विनंती केली असता. दि.12/11/2021 रोजी करण्यात येणारे आंदोलन दि 18/11/2021 रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला

 (इंदापूर प्रतिनिधी ) दि.10/11/2021 वार बुधवार  रोजी आंदोलनाचा 51 वा.दिवस ##मौजे रांझणी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील बौद्ध बांधवांच्या मुळ जमीनी ज्या उजनी धरणासाठी संपादित केलेल्या आहेत त्या त्यांच्या उदरनिर्वाह साठी वहिवाटीस देण्यात याव्यात यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा.संजय (भैय्या) सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांच्या गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे . आज दि. 10/11/2021 रोजी टेंभुर्णी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निंबाळकर साहेब ,मा.श्री.संजय भैय्या सोनवणे व आंदोलक यांच्यामध्ये चर्चा होऊन  या आंदोलनाच्या दिवशी दि.12/11/2021 रोजी कार्तिकी एकादशी असल्यामुळे पोलिस बंदोबस्त त्यादिवशी पंढरपूर येथे असल्यामुळे आपण पोलीस प्रशासनास सहकार्य करावे  व आपले आंदोलन पुढील तारखेस घोषित करावे अशी विनंती टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंबाळकर साहेब यांनी विनंती केली असता.  दि.12/11/2021 रोजी करण्यात येणारे आंदोलन दि 18/11/2021 रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला . आंदोलनस्थळी मौजे रांजणी येथील सर...

शिक्षण,कला,सहित्य व संस्कृतीत अग्रेसर असलेले नेतृत्व :मौलाना अबुल कलाम आझाद

 शिक्षण,कला,सहित्य व संस्कृतीत अग्रेसर असलेले नेतृत्व :मौलाना अबुल कलाम आझाद भारतीय स्वातंत्र्य संग्रामात खरी देशसेवा करणा-यांमध्ये अव्वलस्थानी असलेले मौलाना अबुल कलाम आझाद हे तमाम भारतीयांना सुपरिचित आहे.त्याकाळी स्वातंत्र्यपूर्व काळात जगातील प्रसिध्द विदवान म्हणून ओळख निर्माण केलेल्या प्रसिध्द सूफी वडील पंडित मौलाना खैरुद्दिन व आई आलिया बेगम यांच्या घरी मोईनुद्दीन अहेमद खैरुद्दिन बख्त अर्थात मौलाना अबुल कलाम आझाद या महान शिक्षणतज्ञाने दि.11नोव्हेंबर 1888 रोजी जन्म घेतला.त्यावेळी मौलाना खैरुद्दिन यांच्या कुटुंबाचे वास्तव्य पवित्र तिर्थक्षेत्र `मकका या ठिकाणी होते. जन्मानंतर तिस-याच वर्षी 1890 मध्ये त्यांचे कुटुंब कलकत्ता येथे स्थलांतरित  झाले. तेथेच त्यांचे वडील खैरुद्दिन यांनी अबुल कलाम यांना त्यांच्या लहान वयातच घरच्या घरी फारशी, उर्दू या धर्मिक शिक्षणाबरोबरच इंग्रजीचेही शिक्षण दिले.यामुळे लहानग्या वयातच कलामांना वाचनाची आवड निर्माण झाली होती.कलाम 1903 मध्ये ` दर्स-ए-निजामिया ' ही फारसी भाषेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन `अलीम ' प्रमाणपत्र मिळवले.तर 1906 मध्ये मक्केतील मौलवींनी ...

आमदार संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची ग्राम सेवक संघटनेची मागणी

 आमदार संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची ग्राम सेवक संघटनेची मागणी श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - औरंगाबाद येथील सरपंच  परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहिर निषेध करत संबधितांवर भा.दं.सं.नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन करत गट विकास अधिकारी, तहसिलदार आणि तालुका पोलिस स्टेशन श्रीरामपूर यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे तुकाराम जाधव, रामदास जाधव, रुबाब पटेल, दादासाहेब काळे, रमेश निषेध, निलेश लहारे, हितेश ढुमणे,राजु भालदंड आदींनी तिव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी औरंगाबाद याठिकाणी आयोजित सरपंच परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबद्दल बिभत्स व अपमाजनक तथा अवमानकारक शब्द वापरुन संवर्गाचा अवमान केलेला आहे, वास्तविक पाहता राज्यातील ग्रामसेवक संवर्ग हा शासन व्यवस्थेमध्ये गावपातळीवर काम करणारा शेवटचा घटक असून सदर कामे करताना जनमानसांशी संपर्क ...

अभियांत्रिकी पदविकेत दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते, इंजि.विशाल शिरसाठ यांचा सत्कार..!

 अभियांत्रिकी पदविकेत दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते,  इंजि.विशाल शिरसाठ यांचा सत्कार..!  श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार रमेश शिरसाठ यांचे चिरंजीव इंजि.विशाल शिरसाठ यांचा श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंजि.विशालने सिव्हिल इंजिनिअरिंग या पदविका अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण संपादन करुन उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला. इंजि.विशाल हे सुप्रसिद्ध आर्किटेक मा. सुभाषराव फेगडे यांच्या मे.सुभाष फेगडे अँड असोसियटस् या नामांकित फर्ममध्ये गत अनेक वर्षांपासून सेवेत कार्यरत आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी प्रथमतः बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेले एम. सी. व्ही. सी.कन्स्ट्रक्शन सुपरवायझर नामक आपले शिक्षण पुर्ण केले तद्नंतर डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअर या पदविकेचे पुढील शिक्षण पूर्ण केले. इंजि.विशाल त्यांना याकामी इंजि.सुभाषराव फेगडे, अजितदादा पवार पॉलिटिक महाविद्यालयाचे अनिल गीते सर,खिल्लारी सर, ज्येष्ठ बंधू पत्रकार अ...

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाईझेशन के जिला प्रसिद्धी प्रमुखपदपर शौकतभाई शेख श्रीरामपूर (संवाददाता) : मुस्लिम समाज मे गत अनेक वर्षों से उपेक्षित और पिछडा रहा ओबीसी समुदाय के साथ सभी उपेक्षित सामाज घटकांको मुख्य धारा मे लाने के लिये देशभर मे कार्यरत ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनाईझेशन के अहमदनगर जिला प्रसिद्धी प्रमुखपदपर वरिष्ठ पत्रकार शौकतभाई शेख इनको संघटन के प्रमुख हाजी शब्बीरभाई अन्सारी और सभी के सहमती से नियुक्त किया गया. इसीके साथ उत्तर जिला सचिवपदपर शाहिद खान और सहसचिवपदपर शकील अहमद शेख इनको भी नियुक्त किया गया है,ऑर्गनाईझेशन के राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी इनके आदेशपर जिलाध्यक्ष हाजी फय्याज बागबान के हाथों सभी नवनिर्वाचित पदाधिकारीयों को नियुक्ती पत्र दिया गया.यहां के संत मदर तेरेसा सर्कल स्थित समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूट के मिटिंग हॉल मे आयोजित इस छोटेखानी प्रोग्राम मे ऑर्गनाईझेशन के जिला संघटक जाकीर शाह,सामाजिक कार्यकर्ता मुश्ताकभाई तांबोळी,अॅड, मोहसीन शेख इन्होने आपना मनोगत व्यक्त किया, इस समय आपने प्रस्ताविक मे ऑर्गनाईझेशनचे जिला संघटक जाकिर शाह ने कहा की, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यह राष्ट्रीय स्तरपर एक बडा संघटन है, जो राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी इनके मार्गदर्शनतले चलता है, इस संघटन के माध्यम से देश के अनेक राज्य और जिला तथा तालुकास्तरापर उपेक्षित घटकों को मुख्य धाराओं मे लाने का काम गत अनेक वर्षोंसे चल रहा है, इसिलिऐ ओबीसी समुदाय के साथ सभी उपेक्षित समाज घटकों ने तथा विविध सामाजिक संस्थाओं ने जीयादा से जीयादा तादाद मे इस संघटन मे शामील होकर आपने हक्क और अधिकार प्राप्त करने हेतू आगे आकर इस राष्ट्रीय संघटन मे जुडने की जरुरत है ऐसाही उन्होने कहा. जब की सामाजिक कार्यकर्ता मुश्ताकभाई तांबोळी ने इस वक्त आपनी बात रखते हुवे कहां की, महामानव भिमराव डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी ने आपने देश को जो राज्य घटना दी है,उसीमे सभी उपेक्षित घटकों को सही और उचित न्याय,अधिकार बहाल किया हुवा है,दुनियां के नक्शेपर एक आपना एकमेव देश ऐसा है जहां अनेको जाती-धर्मों के लोकं बडी शांती और प्रेम भाव के साथ रहते है, यह जो कुच भी है, सभी डॉ.बाबा भिमराव आंबेडकर जी की देन है, जीनकी राज्य घटना की बदौलत देश मे सभी को हक्क और समानाधिकार प्राप्त है, इसिलिऐ राष्ट्रीय स्तर के इस संघटन के माध्यम से सभी वंचित और उपेक्षित समुदाय ने एक जगह आते हुवे आपने हक और अधिकार को जानने तथा प्राप्त करने हेतू मुख्य धाराओं मे सम्मलित होने का प्रयास जरुर करना चाहिऐ ऐसाभी उन्होंने कहा है, इस समय ऐडवोकेट मोहसिन शेख ने कहा की, अनेक वर्षों से मै देख रहा हु की,ओबीसी ऑर्गनायझेशन का कार्य बहूतही बढीया और शानदार तरीके से चल रहा है,संघटन को आगे बढाने और उपेक्षित घटकों को न्याय,हक्क, अधिकार दिलाने मे मुझसे जो कुच बनेगा मै आवश्य करुगा,संघटन के सदस्य, पदाधिकारीयों को सरकारी दफ्तर मे आ रही मुश्किले और उपेक्षित घटकों के कामों मे सरकारी बाबुओद्वारा गर कोई परेशानी हो रही हो तो बेझीझक मुझसे बताऐं, उपेक्षित घटकों को न्याय दिलाने हेतू मै सरकार से भी लड जाऊंगा ऐसाभी उन्होंने कहा, इस समय शौकतभाई शेख ने कहां की,ऑर्गनाईझेशनने सही मे बहूत बडी जिम्मेदारी मुझपर सौंफी है, इस जिम्मेदारी को मै विश्वासपूर्ण बाखुबी अच्छी तरह से निभाऊगा,ऐसा यकीन दिलाता हु, साथही ऑर्गनाईझेशन के राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान शब्बीर अन्सारी, जिल्हाध्यक्ष फयाज बागवान, उपाध्यक्ष इक्बाल काकर आणि पदाधिकारियोंका उन्होने इस समय अभार व्यक्त किया, इस प्रोग्राम का प्रास्ताविक जिला संघटक झाकीर शाह औय सूत्र संचालन उपाध्यक्ष इकबाल इस्माईल काकर (सर) ने किया.इस समय संघटन के जिला कार्याध्यक्ष आरिफ कुरेशी, जिला सहसचिव अजीज आत्तार, साबीर शाह (सर) सरताज शेख, अब्दुल हमीद शाह, रियाज अन्सारी,राजू कुरेशी आदी मान्यवर इस प्रोग्राम मे सम्मलित थे, प्रोग्राम मे सहयोग देनेपर जिलाध्यक्ष फय्याज बागवान ने सभी का आभार व्यक्त किया.

  ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाईझेशन के जिला प्रसिद्धी प्रमुखपदपर शौकतभाई शेख श्रीरामपूर (संवाददाता) : मुस्लिम समाज मे गत अनेक वर्षों से उपेक्षित और पिछडा रहा ओबीसी समुदाय के साथ सभी उपेक्षित सामाज घटकांको मुख्य धारा मे लाने के लिये देशभर मे कार्यरत ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनाईझेशन के अहमदनगर जिला प्रसिद्धी प्रमुखपदपर वरिष्ठ पत्रकार शौकतभाई शेख इनको संघटन के प्रमुख हाजी शब्बीरभाई अन्सारी और सभी के सहमती से नियुक्त किया गया. इसीके साथ उत्तर जिला सचिवपदपर शाहिद खान और सहसचिवपदपर शकील अहमद शेख इनको भी नियुक्त किया गया है,ऑर्गनाईझेशन के राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी इनके आदेशपर जिलाध्यक्ष हाजी फय्याज बागबान के हाथों सभी नवनिर्वाचित पदाधिकारीयों को  नियुक्ती पत्र दिया गया.यहां के संत मदर तेरेसा सर्कल स्थित समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूट के मिटिंग हॉल मे आयोजित इस छोटेखानी प्रोग्राम मे ऑर्गनाईझेशन के जिला संघटक जाकीर शाह,सामाजिक कार्यकर्ता मुश्ताकभाई तांबोळी,अॅड, मोहसीन शेख इन्होने आपना मनोगत व्यक्त किया, इस समय आपने प्रस्ताविक मे  ऑर्गनाईझेशनचे जिला संघटक जाकिर शाह ने ...

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची बैठक संपन्न*

 *ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची बैठक संपन्न*  *राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र बहाल*. विटा (जि.सांगली) प्रतिनिधी :  ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेचे पदाधिकारी निवडीत संबंधी व मुस्लीम आरक्षण विषयी ठोस भूमिका घेण्यासाठी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक आदर्श महाविद्यालय मायनी रोड विटा याठिकाणी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर भाई अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुस्लिम ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून मुस्लिम आरक्षणासंबंधी राज्यातील कोणताही पक्ष ठाम भूमिका घेत नाही,न्यायालयाने मुस्लिम आरक्षण देण्यासंबंधी सकारात्मक भूमिका घेऊन सुद्धा राजकीय इच्छाशक्ती अभावी मुस्लिम आरक्षण प्रलंबित आहे, यावर राज्यभर मुस्लिम समाजाचे प्रबोधन करून मुस्लिम समाजाला आरक्षण संबंधी जागृत करणे या हेतूने सदरील बैठक आयोजित केलेली होती.        यावेळी बोलताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी म्हणाले की,आज मुस्लिम समाजामध्ये या ओबीसी आरक्षणामुळे कित्येक मुस्लिम समाजातील मुले आयएएस अधिकारी...

गरिबांचे मरण स्वस्त, पैशाने भरपाई होईल का? रुग्ण हक्क परिषदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

 गरिबांचे मरण स्वस्त, पैशाने भरपाई होईल का? रुग्ण हक्क परिषदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल! अहमदनगर - यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा आगीने होरपळून मृत्यू झाला. एप्रिलमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयात सुमारे २५ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आज भाऊबीजेच्या दिवशी दिवाळीच्या सणात अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आगीत होरपळून पंधरापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू तर सुमारे २० जखमी रुग्णांना इतरत्र उपचारांसाठी हलविण्यात येत आहे. इतक्या गंभीर घटना घडल्यानंतर ही राज्याच्या आरोग्य यंत्रणेला जाग येणार आहे का? मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या रुग्णांना दोन - पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करून गरिबांचे मरण स्वस्त झाले आहे, असेच 'सत्य' आणि 'वास्तव' अधोरेखित केले जात आहे. महा विकास आघाडी सरकारच्या काळात गरिबांच्या जीवाशी खेळायचे कधी थांबणार आहे? असा सवाल रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना आज विचारला आहे.     अशा दुर्दैवी घटनांमुळे सरकारी रुग्णालयांवरचा विश्वास उडाला असल्याची लोकांची भावना निर्मा...