Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

इंदापूर पोलिसांकडून 500 पोती गहू व एक 10 चाकी ट्रक जप्त.

 इंदापूर पोलिसांकडून 500 पोती गहू व एक 10 चाकी ट्रक जप्त. (इंदापूर प्रतिनिधी )आज रोजी इंदापूर पोलीस ठाणे अंतर्गत सरडेवाडी टोल नाक्या जवळ सोलापुर पुणे रोडच्या जवळ सर्व्हिस रोडवर पुण्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रक क्रमांक MH 13 AX 4709 या गाडीची दोन पंचांसमक्ष तपासणी केली असता सदर ट्रकच्या चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली व त्याच्या ताब्यातील ट्रक मधील मालाची तपासणी करता त्यामध्ये एकूण (500)पाचशे गव्हाची पोती मिळून आले त्याबाबत चालकाकडे विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही,  सदरचा गहू कोणत्यातरी शासकीय गोडाऊन मधून चोरून अवैधरित्या जीवनावश्यक वस्तू चा साठा करून काळया बाजारामध्ये सदरचा गहू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची खात्री झाल्याने त्याबाबत सविस्तर पंचनामा करून सदरचा दहा चाकी ट्रक त्यामधील पाचशे पोती गहू एकूण 25 टन असा एकूण पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलेला असून यातील ट्रक चालका विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3, 7 तसेच भारतीय दंड संहिता अधिनियम कलम 379, 420 अन्वये गुन्हा दाखल करत आहोत.         ...

श्रीरामपूरात मुस्लिम ओबीसी जिल्हा मेळावा उत्‍साहात संपन्‍न

 श्रीरामपूरात मुस्लिम ओबीसी   जिल्हा मेळावा उत्‍साहात संपन्‍न  श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील बाजारतळावरील प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालयात ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी होते तर मौलाना मिर्झा अब्दुल कयूम नदवी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमात नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी व जिल्हाध्यक्ष हाजी फय्याज  बागवान यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले, या पदग्रहण समारंभात जिल्हा सल्लागार म्हणून ॲड. हारूण बागवान, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष सादिक साबुद्दिन शेख - मुलानी (कर्जत), राहुरी तालुकाध्यक्ष उबेदूर रहमान बागवान, राहुरी तालुका उपाध्यक्ष नूर मोहम्मद आतार, तालुका कार्याध्यक्ष नवेद इक्बाल बागवान, श्रीरामपूर सहसचिव शब्बीर नंहे सहाब कुरेशी, तालुका सहसंघटक इसा आतार, तालुका सहसचिव  सलिम आतार, श्रीरामपूर तालुका सहसचिव अफजल सुलेमान  मंसुरी,तालुका खजिनदार अमीन नादर  पिंजारी,तालुका सहसंघटक समीर इस्...

सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांवर वेगवेगळ्या क्षेत्रातून दबावतंत्र वापरून कार्यरत असणाऱ्या पत्रकारांवर अन्याय होत आहे असाच अन्याय शिर्डी येथील पत्रकारावर साई संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून झाला आहे. येथिल पत्रकार जितेश लोकचंदानी यांच्यावर पोलीस स्टेशनला दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा

 शिर्डी (प्रतिनिधी) सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांवर वेगवेगळ्या क्षेत्रातून दबावतंत्र वापरून  कार्यरत असणाऱ्या पत्रकारांवर अन्याय होत आहे असाच अन्याय शिर्डी येथील पत्रकारावर साई संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून झाला आहे. येथिल पत्रकार जितेश  लोकचंदानी यांच्यावर पोलीस स्टेशनला दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा. म्हणून शिर्डीतील विविध संस्थेचे पदाधिकारी, संघटना व पक्ष कार्यकर्त्यांनी वेगवेगळे शिष्टमंडळ जाऊन शिर्डी चे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव तसेच पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना निवेदने देऊन यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून मागणी केली आहे. तसेच या संदर्भात शिर्डीतील पत्रकारांनीही पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. शिर्डी येथील पत्रकार जितेश  लोकंचंदानी यांनी आपल्या वृत्तपत्रात अन्यायाला वाचा फोडणारे वृत्त नेहमीच प्रसिद्ध केले. साईभक्तांच्या समस्या अडचणी मांडल्या. भक्तांच्या तक्रारही पुरावे असल्याने छापल्या. त्याचप्रमाणे संस्थांनच्या जनसंपर्क अधिकारी यांनी मुंबई व आसाम येथील साईभक्त महिले...

बारामती - ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण (2018-2019)राज्यशासन राबवत असताना मौजे झारगडवाडी ता.बारामती जि. पुणे येथील पारधी वस्तीवरील पक्के व कच्चे घर जमिनदोस्त करणाऱ्या कर्मचारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,अन्यथा आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेमार्फत 4 नोव्हेंबर 2021 रोजी मा. खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या निवासस्थानी (गोविंदबाग,माळेगाव)आंदोलन करण्यात येणार असल्याचे माहिती राज्यसमन्वयक श्री.आनंद काळे व बापूराव काळे यांनी राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनात दिली आहे

  बारामती - ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण (2018-2019)राज्यशासन राबवत असताना मौजे झारगडवाडी ता.बारामती जि. पुणे येथील पारधी वस्तीवरील पक्के व कच्चे घर जमिनदोस्त करणाऱ्या कर्मचारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,अन्यथा आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेमार्फत 4 नोव्हेंबर 2021 रोजी मा. खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या निवासस्थानी (गोविंदबाग,माळेगाव)आंदोलन करण्यात येणार असल्याचे माहिती राज्यसमन्वयक श्री.आनंद काळे व बापूराव काळे यांनी राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनात दिली आहे .द केंद्रशासन व राज्यशासन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना सन 2022 पर्यंत सर्वाना घरकूल तसेच सर्वाना निवारा देण्याचे जाहीर करते.व एकीकडे आदिवासी जमाती,दुर्बल घटकातील लोकांची घरे जमीनदोस्त करतात.अशा हुकूमशाही शासनाचा जाहीर निषेध केला पाहिजे. बारामती तालुक्यामध्ये घराविना अनेक पारधी कुटूंब फूटपाथवर वास्तव्य करून उदरनिर्वाह करीत आहे.त्यांना शासनाच्या कोणत्याही सुखसुविधा आजपर्यंत भेटलेल्या नाहीत.कधीही आमदार,खासदार निधींयोजनेतून पारधी समाज्यासाठी एकही रुपया मंजूर अथवा खर्च केलेल...

इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार*

 * इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार* इंदापूर (प्रतिनिधी) : येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदापूर तालुका अध्यक्ष डाॅ.प्रा.जीवन सरवदे यांनी भूषविले.    सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तर नगरसेविका राजश्री मखरे यांनी दिप प्रज्वलन केले.      विचारपिठावर डाॅ.प्रा.जीवन सरवदे, भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष विलासदादा मखरे, माजी प्राचार्य शहाजी मिसाळ, माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, आरपीआय बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब सरवदे, नगरसेविका राजश्री मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.           दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका व शहर शाखेच्या वतीने गुण...

अबब इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षमय 200 शाखांचे उदघाटन

  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्याचा आमदार रासपचा असेल                       (इंदापूर प्रतिनिधी ) राष्ट्रीय समाज पक्षाच्या इंदापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये शाखा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी माऊली सलगर व युवक आघाडीचे प्रभारी अजित पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपने तालुका अध्यक्ष सतीश तरंगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते माऊली सलगर बोलताना म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष राज्यातील प्रमुख पक्षांपैकी एक आहे कष्टकरी शेतकरी युवक बेरोजगार कामगार हा पक्षाचा मूळ गाभा आहे सर्वसामान्य माणसांना राजकीय सत्तेमध्ये भागीदारी देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जन्म झालेला आहे या तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे वेळेवर न देता शांत झोप कशी काय लागते हा एकच सवाल आहे 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी इंदापूर तालुक्याने जानकर साहेबांवर मतदान रुपी भरपूर प्रेम केला आहे त्यामुळे ये...

!!! " समता -विश्व बंधुत्व - महीलांचे हक्क प्रदान करणारा क्रांतीदुत "" ;----- प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व. ""!!!

 !!!    "  समता -विश्व बंधुत्व - महीलांचे हक्क प्रदान करणारा   क्रांतीदुत "" ;-----  प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व. ""!!!       ( १)    " तेरावे सद्दीची पैगंबरी खुप ! दावीतो प्रमाण कुराणातं !!                जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !    आनंद वतनी ज्योती म्हणे !! ".  समतेचा पुरस्कार करणारे   "राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले ...         (२)"  एक ही सफमें खडे हो गयै , मेहमूद और अयाज ...!! ना कोई बंदा रहा ,ना बंदा नवाज. ..!!! " जगप्रसिद्ध साहित्यिक व ऊर्दू कवी डॉ.मुहम्मद इक्बाल सहाब..       इतिहासाच्या कित्येक महान व्यक्तींनी ज्या महामानवाच्या कार्याविषयी , जीवनाविषयी , त्यांच्या  सामाजिक एकता विषयावर , क्रांतिकारक निर्णय विषयी कित्येकदा स्तुती केली ,ज्ञात -अज्ञात पणे आदर्श घेतला व आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा अंगिकार केला ,  !!!    "  समता -विश्व बंधुत्व - महीलांचे हक्क प्रदान करणारा ...

अखिल भारतीय लोकहित संघटना व कला क्रीडा दूत फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंजि. हफीजउल्ला दुर्राणी यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ ’यादें हफ़िज’ त्रैभाषीक मुशायराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते.

 ’यादें हफ़िज’ त्रैभाषीक मुशायरा उत्साहात संपन्न जालना/प्रतिनिधी : अखिल भारतीय लोकहित संघटना व कला क्रीडा दूत फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंजि. हफीजउल्ला दुर्राणी यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ ’यादें हफ़िज’ त्रैभाषीक मुशायराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जालन्याचे जेष्ठ शायर स. कासीम कालिब हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये जेष्ठ नेते इकबाल पाशा, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, प्राचार्य मो. इफतेखार सर व दुर्रानी सर यांच्या सुपुत्री डॉ. आर. सिद्दीकी तर प्रमुख पाहुणे म्हणून मो. अब्दुला सर, ईकबाल कुरेशी, समाज सेवक गणेश सुपारकर, माजी नगरसेवक मिर्झा अनवर बेग, सगीर पहेलवान, शिवसेना अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जफर खान, मुस्लिम वंचित आघाडी चे अफसर चौधरी, माजी नगरसेवक बाळा परदेसी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात स्व. इंजि. हफीजउल्ला खान दुर्रानी तसेच गत वर्षात स्वर्गवासी झालेले शम्स जालनावी, दीपक परिहार, शमीम जोहर, डॉ. फहीम अहमद सिद्दीकी, हिंदी कवी खुशालचंद शोला यांना दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण क...

भिमाई आश्रमशाळेत टॅबचे वाटप*. ( *इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते वितरण

 *भिमाई आश्रमशाळेत टॅबचे वाटप*.  ( *इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते वितरण *). *इंदापूर*(दि.२०)  :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील इ. ९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमा अंतर्गत मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांनी दिलेल्या  टॅबचे वितरण आश्रमशाळेवर छोटेखानी घेतलेल्या कार्यक्रमात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्री. पाटील यांनी अभिवादन केले. तहसिलदार श्रीकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, म्हणून शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या टॅबचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.त्यातून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययना बरोबरच तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होईल असे यावेळी पाटील म्हणाले. पाटील पुढे म्हणाले की, ऑनलाईन शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द...

सध्या फेसबुक अकाऊंट हेकिंग टोळी जास्त सक्रिय झालेली दिसून येत आहे. ही टोळी फेसबुक अकाऊंट हेक करून त्याचा गैरवापर करत आहेत.या टोळीकडून जवळील मित्र नातेवाईक यांना मेसेज फोन कोल यांच्या माध्यमातून पैशांची मागणी होताना दिसत आहे.तसेच फेसबुक फ्रेंड यांना तुमच्या मित्राचा एक्सिडेंट झाला असून लगेच तातडीने पैशाची गरज आहे असे भासवून पैशाची मागणी होत आहे.

 (इंदापूर प्रतिनिधी ) फेसबुक व इतर सोशल मिडिया मुळे जग जवळ आले असतानाच याचा फायदा तसेच गैरवापर सुध्दा होताना दिसत आहे. सध्या फेसबुक अकाऊंट हेकिंग टोळी जास्त सक्रिय झालेली दिसून येत आहे. ही टोळी फेसबुक अकाऊंट हेक करून त्याचा गैरवापर करत आहेत.        फेसबुक   अकाऊंट हँक करून हँक केलेल्या चे टोळीकडून जवळील मित्र नातेवाईक यांना मेसेज फोन काँँल यांच्या माध्यमातून पैशांची मागणी होताना दिसत आहे.तसेच फेसबुक फ्रेंड यांना तुमच्या मित्राचा एक्सिडेंट झाला असून लगेच तातडीने पैशाची गरज आहे असे भासवून पैशाची मागणी होत आहे.काही पोलीस शिपाई यांनी असे सांगितले की, काही ठिकाणी पोलीस अधिकारी यांची सुध्दा फेसबुक खाते झालेले आहे.       इंदापूर येथिल किशोर मिसाळ यांचेही फेसबुक अकाऊंट हेक करून अशा प्रकारे मागणी केल्यामुळे त्यांनी सदर गांभीर्य ओळखून मराठी पत्रकार न्याय संघाचे प्रदेशाध्यक्ष जावेद शेख व जिल्हाध्यक्ष वैभव सोनवणे यांच्या मदतीने इंदापूर पोलिस स्टेशन ला तक्रारी अर्ज दाखल केला व सदर हेकरला सायबर क्राईम नुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.   ...

इंदापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून इंदापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि इंदापूर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित लसीकरण मोहिमेत185 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला!

 इंदापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून इंदापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि इंदापूर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित लसीकरण मोहिमेत185 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला! ( इंदापूर प्रतिनिधी )आज जशने ईद ए मिलाद उन नबी निमित्त आयोजित लसीकरणाचे उद्घाटनप्रसंगी आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रदिपदादा गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष आदरणीय विठ्ठल आप्पा ननवरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, माजी नगरसेवक श्रीधर भाऊ बाबरस, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, इंदापूर शहर युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख, विद्यमान नगरसेवक पोपट शिंदे, नगरसेवक स्वप्नील राऊत, विद्यमान नगरसेवक अशोक मखरे सर,  माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, वसीमभाई बागवान, विद्यमान नगरसेविका सौ हेमलाता मालुंजकर, महिला तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षा छाया ताई पडळसकर, इंदापूर शहर महिला अध्यक्षा सौ उमाताई इंगोले, सौ ढोले ताई,सौ शहा ताई, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी, तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित...

यादें हफ़िज' त्रैभाषिक मुशायराचे आयोजन

 'यादें हफ़िज' त्रैभाषिक मुशायराचे आयोजन जालना/प्रतिनिधी : अखिल भारतीय लोकहीत संघटना व कला क्रीडा दूत फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.इंजि. हफीजउल्ला खान दुर्रानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'यादें हफ़िज' त्रैभाषिक मुशायराचे आयोजन दिनांक 20 ऑक्टोबर 2021, बुधवार रोजी रात्री 8 वाजल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुना जालना येथे करण्यात आले आहे.        सदर मुशायरा जेष्ठ शायर कासीम कालिब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून यात बशारत अली खान (हैदराबाद), रजा जालनवी,  जकी अहमद जकी (औरंगाबाद), शफी अहमद शफी, हबीब हशर (परभणी), मौलाना बशीर अहमद राही, अब्दुल रज्जाक रहबर, लियाकत अली खान यासेर (जालना), सलीम नवाज़ हशर (जाफराबादी), प्रा. अशोक खेड़कर, मौलाना कौसर जालनवी, डॉ. ज़फर इक़बाल, खिज़र राही, नईम खान नईम, मो. अज़हर फ़ाज़िल, सुनील लोनकर दर्द, फैज सुभानी आदि प्रख्यात शायर आपल्या रचना सादर करणार आहेत, सूत्र संचालन ऍड. मो. अशफाक कागजी हे करणार आहेत.      कार्यक्रमास जालना शहरातील नामांकित राजकीय तथा सामाजिक व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. ...

आंदोलनाचा 25 वा.दिवस

  (इंदापूर प्रतिनिधी )आजचा आंदोलनाचा 25 वा.दिवस ##मौजे रांजणी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील बौद्ध बांधवांच्या मुळ जमीनी ज्या उजनी धरणासाठी संपादित केलेल्या आहेत त्या त्यांच्या उदरनिर्वाह साठी वहिवाटीस देण्यात याव्यात यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा.संजय (भैय्या) सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांच्या गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे .आंदोलन स्थळि 65 वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच माढा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी आंदोलकांना भेट दिली नाही आंदोलन 25 दिवस झाले सुरू आहे सर्व आंदोलकांनी माढा तालुक्याचे आमदार मा.बबनदादा शिंदे यांचा जाहीर निषेध केला . त्यावेळी मौजे रांझणी येथील सर्व बौद्ध बांधव व उजनी धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत .*

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गेल्या 18 दिवसांपासून मौजे रांजणी येथील बौद्ध बांधवांच्या मूळ जमिनी कसण्यासाठी परत मिळाव्यात यासाठी देशाचे माजी कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब

 भीमानगर.दि.8/10/2021. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गेल्या 18 दिवसांपासून मौजे रांजणी येथील बौद्ध बांधवांच्या मूळ जमिनी कसण्यासाठी परत मिळाव्यात तसेच उजनी धरण ग्रस्त मुळ शेतकर्‍यांच्या सातबारावरती जलसंपदा किंवा उजनी धरण हि नावे कमी करून शेतकऱ्यांची नावे लावा या मागण्यासाठी कार्यकारी अभियंता भिमानगर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची प्रशासनाने लवकर दखल न घेतल्यामुळे आज देशाचे माजी कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने जाताना मा.संजय भैय्या सोनवणे यांनी सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांना फोनवरून संपर्क साधला आणि भिमानगर या ठिकाणी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना देणार आहे तरी आपण साहेबांना माहिती द्यावी व निवेदन स्वीकारावे ही विनंती केल्यानंतर भिमानगर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसोबत सर्वजण त्या ठिकाणी थांबलो असताना साहेबांची गाडी आली त्या ठिकाणी आम्ही हात दाखवला साहे...

इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ शेळके यांच्या समर्थनार्थ इंदापूर ए आय एम आय एम पक्ष व शिवराज्य शेतकरी विकास मंच देणार मुख्यमंत्री यांना निवेदन कोरोना रूग्णांना सेवा देणारे डॉक्टर यांचे मनधैर्य खच्चीकरण करून चिखलफेक भाजपने करु नये. इंदापूर नगरपरिषदला लसीकरण चा कँम्प घेण्यासाठी आधी सांगितले होते - डॉक्टर शेळके इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात अधिक्षक

 इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ शेळके यांच्या समर्थनार्थ  इंदापूर ए आय एम आय एम  पक्ष व  शिवराज्य शेतकरी विकास मंच  देणार मुख्यमंत्री यांना निवेदन  कोरोना रूग्णांना सेवा देणारे डॉक्टर यांचे मनधैर्य खच्चीकरण करून चिखलफेक भाजपने करु नये.  इंदापूर नगरपरिषदला लसीकरण चा कँम्प घेण्यासाठी  आधी सांगितले होते - डॉक्टर शेळके इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात अधिक्षक  (इंदापूर प्रतिनिधी )  इंदापूर शहरातील घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोफत लसीकरण ला आमचा पाठिंबा नसून परंतु इंदापूर शहरातील गल्ली गल्लीत लसीकरण  घेतल्या ने नागरिकांना याचा फायदा झाला. इंदापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत ने मोफत लसीकरण घेतले. परंतु भाजपची सत्ता असलेल्या इंदापूर नगरपरिषद ने इंदापूर शहरात  इतके दिवस लसीकरण का घेतले नाही. शिवराज्य शेतकरी विकास मंच महाराष्ट्र राज्य व इंदापूर शहर ए आय एम आय एम डॉ शेळके यांनी केलेल्या गल्लीत लसीकरणाला आमचा पाठिंबा असून वेळप्रसंगी  शिवराज्य शेतकरी विकास मंच व ए आय एम आय एम पक्ष सुध्दा शहरात लसीकरण घेणार असल्याचे शिवराज्...

रक्तदान देवदूतांचा श्रीरामपुरात सन्मान

 रक्तदान देवदूतांचा श्रीरामपुरात सन्मान   श्रीरामपूर - दहा वर्षापासून रुग्णसेवेसाठी समर्पित वृत्तीने तन मन धनाने जिल्ह्यात कोठेही रुग्ण वाचविण्यासाठी धडपड करत रक्तदान करण्यासाठी चोवीस तास तयार असलेले श्रीरामपूर रक्तदान ग्रुपचे सर्व सदस्यांचा इंडियन रेड क्रॉस सोसायटीने आमदार लहुजी कानडे यांचे शुभहस्ते प्रशस्तीपत्रक व आरोग्य किट देऊन गौरव करण्यात आला                प्रमुख अतिथी म्हणून आमदार लहुजी कानडे,माजी आमदार भानुदास मुरकुटे साई संस्थान विश्वस्त सचिन गुजर,नगराध्यक्षा अनुराधा ताई आदिक, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, सचिव सुनील साळवे,के के आव्हाड,अविनाश आपटे भरत कुंकलोळ सतीश कुंकुलोळ, प्रमोद पत्की,बाळासाहेब सोनटक्के,प्रवीण साळवे,पोपटराव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते                  प्रास्तविक मध्ये रक्तदान ग्रुपचे कौतुक करताना सुनील साळवे म्हणाले हे सर्व दाते रक्त देण्यासाठी स्वतःचा वेळ, व खर्च करून दवाखान्यात जातात आज या गृपमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचून त्यांना नवजीवन मिळाले त्यांच...

११ हजार साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला.

 ११ हजार साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला.  शिर्डी -राजेंद्र दूनबळे  राज्‍य शासनाच्‍या आदेशाने आज दिनांक ०७ ऑक्‍टोबर पासून पहाटेच्‍या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले असून दिवसभरात सुमारे ११ हजार साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.               श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. दिनांक २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून घट स्‍थापनाच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे काही अटी शर्तीवर खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. तसेच अजुन कोरोना व्‍...

इंदापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव , इंदापूर नगरपरिषद ने बंदोबस्त करण्याची गरज

 इंदापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव , इंदापूर नगरपरिषद ने बंदोबस्त करण्याची गरज  (इंदापूर प्रतिनिधी ) इंदापूर शहरातील अनेक ठिकाणी मोकाट कुत्रे शहरातील नागरिकांना नाहक त्रास देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मोकाट कुत्रे इंदापूर शहरातील घराजवळ अथवा पार्किंग मध्ये लावलेल्या  गाड्यांच्या सीट कव्हर चा चावा तसेच पंजाने मारा केल्याने नागरिकांना नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. इंदापूर शहरातील काही ठिकाणी लहान मुलांच्या अंगावर मोकाट कुत्रे जात असल्याचेही नागरिकांनी यावेळी सांगितले. इंदापूर नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व  कर्मचारी वर्ग यांनी इंदापूर शहरातील मोकाट व नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे असे नागरिकां मधून बोलले जात आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते जुबेन पठाणचा सत्कार*

 *हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते जुबेन पठाणचा सत्कार*   इंदापूर प्रतिनिधी-  महात्मा फुले विद्यालय, वरकुटे खुर्द येथील विद्यार्थी चि.जुबेन इम्रान पठाण याने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला तसेच त्याचे अभिनंदन करीत त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.       हर्षवर्धन पाटील म्हणाले की जुबेन पठाण याने आपल्या प्रशालेचे, कुटुंबाचे नाव उज्वल केले असून प्रामाणिक प्रयत्न केले असता यश संपादन करता येते असे यावेळी त्यांनी सत्कार प्रसंगी आपले मत व्यक्त केले.     महात्मा फुले विद्यालय, वरकुटे खुर्दचे अध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शहरातील अस्वच्छतेप्रश्नी विविध अटी आणि शर्तीवर जोएफ जमादार यांनी ५ व्या दिवशी आपले उपोषण सोडले

 शहरातील अस्वच्छतेप्रश्नी विविध अटी आणि शर्तीवर जोएफ जमादार यांनी ५ व्या दिवशी आपले उपोषण सोडले श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर नगर पालिकेकडून पुणे येथील डोंबाळे यांच्या दिशा एजन्सीला शहरातील घाण-कचऱ्याचा ठेका देण्यात आलेला आहे,त्यास नगर पालिकेकडून दर महिन्याला ३० लाख रुपये देऊनही शहरातील घाण-कचरा रोजच्या रोज व्यवस्थित साफ होत नसल्याने या घाण-कचऱ्यामुळे डासांचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून शहरात संभाव्य डेंग्यू, मलेरिया, टायफाईड,फ्ल्यू,चिकनगुनिया अशा स्वरुपाच्या साथीच्या आजाराची साथ फैलाऊ पहात आहे,याविषयी नगर पालिकेला वेळोवेळी निवेदने,विनंती अर्ज देऊनही नगर पालिकेकडून संबंधित ठेकेदारास समज देत त्यावर उचित कारवाई करण्याऐवजी उलट त्याची पाठराखण केली जात आहे, शहरातील नागरीकांना संभाव्य रोगराईच्या खाईत ढकलु पाहणाऱ्या संबंधित घाण-कचरा ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्यात येऊन दुसऱ्या कोणास देण्यात यावा,यामुळे शहरवासियांचे आरोग्य अबाधित राहील या आशयाच्या विविध ज्वलंत नागरी समस्यांच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोयफ जमादार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यां...

स.पा.चे जोयफ जमादार यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस

 स.पा.चे जोयफ जमादार यांचा  उपोषणाचा आज चौथा दिवस झोपी गेलेल्या नगरपालिका प्रशासनाची झोप कधी उघडणार ? श्रीरामपूर नगर पालिका प्रशासन उपोषणकर्त्यांची दखल घेणार का ? शहरवासियांची मागणी  श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील घाण - कचरा रोजच्या रोज उचलला जात नसल्याने शहरात दुर्गंधी पसरुन डासांची उत्पत्ती यासोबतच साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली असताना, संबंधित घाण-कचरा ठेकेदारास दर महिना ३० लाख रुपये देऊनही जर तो शहरातील घाण-कचरा रोजच्या रोज व्यवस्थित उचलत नसेलतर त्याचा ठेका रद्द करुन इतर दुसऱ्यास देण्यात यावा तथा श्रीरामपूर शहरात रोगराईचा फैलाव वाढला जाऊ नये यासाठी संबंधित नगर पालिका प्रशासनाने दखल घ्यावी अशा विविध मागण्यासाठी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोयफ जमादार यांनी वेळोवेळी नगर पालिका प्रशासनाच निवेदने देऊन कळविले आहे,मात्र तरी देखील संबंधित ठेकेदारावर कोणतीच कारवाई न करता त्यास पाठिशी घालण्याची कामे नगर पालिका प्रशासनाकडून होत असल्याच्या निषेधार्थ दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पासून नगर पालिकेसमोर आपल्या कार्यकर्त्यांसह आमरण उपोषणाचा मार...

शिर्डी संस्थान ने अद्यावत हॉस्पिटल उभारावे - आमदार कानडे नूतन विश्वस्त सत्कार सोहळा संपन्न

 शिर्डी संस्थान ने अद्यावत हॉस्पिटल उभारावे - आमदार कानडे नूतन विश्वस्त सत्कार सोहळा संपन्न श्रीरामपूर  - आपल्या जिल्ह्यामधे अद्यावत सर्व सोयींनीसुसज्ज हॉस्पिटल ची कमतरता आहे गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी पुणे,मुंबई,नाशिक अशा शहरात जावे लागते येथे उपचारासाठी येणारा खर्चही अतिशय महागडा असून तो सर्वसामान्यांना न परवडणारा आहे त्यामुळे अनेकांना प्राणांना मुकावे लागते कुटुंबाची वाताहत होते बाहेर सर्वच गैरसोयीचे असते अशा पार्श्वभूमीवर नूतन विश्वस्त मंडळांनी शिर्डीमध्ये सुसज्ज असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले तर गरीब व सामान्यांना वैद्यकीय उपचार घेता येतील तेव्हा जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीचा सर्व नूतन विश्र्वस्तानी योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन तालुक्याचे आमदार लहुजी कानडे यांनी केले              इंडियन रेड क्रॉस सोसायटी,युवक बिरादरी, पोलीस मित्र संघटना,अंधश्रध्दा निर्मुलन समिती,महाराष्ट्र एन जी ओ फेडरेशन आदींच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा संस्थान शिर्डी नूतन विश्वस्त अनुराधा आदिक,सचिन गुजर,सुरेश वाबळे,महेंद्र शेळके,अविनाश दंडवते आदींचा...

लोणी देवकर येथे हर्षवर्धन पाटील यांनी अल्पोपहार घेत साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद*

 *लोणी देवकर येथे हर्षवर्धन पाटील यांनी अल्पोपहार घेत साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद* इंदापूर प्रतिनिधी-   राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज लोणी देवकर येथील बाबर बंधू यांच्या त्रिमूर्ती स्नॅक्स सेंटर येथे गावातील जेष्ठ नागरिक व सहकाऱ्यांसमवेत त्रिमूर्ती स्नॅक्स सेंटरचा प्रसिद्ध शेव चिवडा व कांदा भजी यांचा आस्वाद घेत ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. सकाळच्या मनमुराद आशा गप्पांच्या मैफिलीत उत्साही वातावरणात ज्येष्ठ नागरिक आनंदाने सहभागी झालेले दिसले.    हर्षवर्धन पाटील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नेहमी त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होत असतात. तसेच नागरिकांमध्ये चहाच्या निमित्ताने किंवा इतर कारणाने त्यांच्याशी गप्पांच्या मैफलीत सहभागी होत असतात. आज लोणी देवकर येथे बाबर बंधू यांच्या त्रिमूर्ती स्नॅक सेंटर येथील प्रसिद्ध शेवचिवडा व कांदा भजी याचा त्यांनी आस्वाद घेतला आणि उपस्थित नागरिकांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच्या कृतीचे कौतुक केले.

शहरातील अस्वच्छतेप्रश्नी जोएफ जमादार यांचा आज उपोषणाचा तीसरा दिवस

 शहरातील अस्वच्छतेप्रश्नी जोएफ जमादार  यांचा आज उपोषणाचा तीसरा दिवस श्रीरामपूर (प्रतिनिधी) - पहिलेच नागरीक कोरोना महामारीने  त्रस्त झालेले आहेत त्यावर शहरातील  अस्वच्छतेमुळे संभाव्य रोगराई आणि साथीच्या आजाराची साथ फैलाऊ शकते, श्रीरामपूर नगर पालिकेच्या मार्फत घन-कचरा ठेकेदारास दर महिन्याला तब्बल ३० लाख रुपये मोजले जातात, मात्र शहरातील अस्वच्छता जशीच्या तशीच आहे,मग इतकी मोठी रक्कम मोजूनही जर कोणताच फायदा होत नसेलतर नगर पालिकेने हा ठेका रद्द करुन इतर दुसऱ्यास द्यावा, जेणे करुन शहरातील स्वच्छतेने नागरीकांचे आरोग्य आबाधित राहील,मात्र नगर पालिका प्रशासनासह संबंधित काही नगरसेवक आणि विद्यमान नगराध्यक्षांना केवळ ठेकेदार पोसण्याचे कामे करुन जनतेच्या करापोटी वसूल करण्यात आलेली रक्कम ठेकेदारांच्या घशात टाकायची असल्याचे दिसून येत आहे,मग यामध्ये संबंधित कोणाचे कमिशन तर ठरलेले नाहीना ?, याचा संशय देखील बळावत आहे. शहरवासियांच्या ज्वलंत सामाजिक आरोग्याप्रश्नी तथा संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी  समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा जे. जे. फाऊंडशनचे...

पीपीई किट घालून आंदोलन करण्यास परवानगी देणेबाबत. २) जेल भरो आंदोलन करण्यास परवानगी देणे बाबत. संदर्भ - आपली दि. ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राप्त झालेली जा. क्र. ८८१७ नुसार कलम १४९ अन्वये प्राप्त झालेली नोटीस

 प्रति, मा. भूषण बेळणेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,  आझाद मैदान पोलीस ठाणे,  मुंबई 'यांना सविनय सादर' विषय - १) पीपीई किट घालून आंदोलन करण्यास परवानगी देणेबाबत.             २) जेल भरो आंदोलन करण्यास परवानगी देणे बाबत. संदर्भ - आपली दि. ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राप्त झालेली जा. क्र. ८८१७ नुसार कलम १४९ अन्वये प्राप्त झालेली नोटीस महोदय,       सप्रेम नमस्कार, रुग्णांचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी फौजदारी संहीतेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे, महिलांवर दररोज होणारे बलात्कार तात्काळ थांबलेच पाहिजेत, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजाराची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, विद्यार्थ्यांची फी कपात तात्काळ झाली पाहिजे, लोकांनी भरलेल्या  कोरोनाच्या बिलांचे फेर लेखापरीक्षण राज्यात सर्वत्र झालेच पाहिजे, या लोकहिताच्या मागण्यांसाठी महात्मा गांधीजींच्या वैचारिक मार्गाने रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आम्ही सेंट झेवियर्स कॉलेज ते मंत्रालय अशा पायी मोर्चाचे आयोजन रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २ ऑक्...