Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

खुसखुशीत प्रेम कहाणी आणि गोड गाणी असलेला "अशी ही भन्नाट भिंगरी" मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

 खुसखुशीत प्रेम कहाणी आणि गोड गाणी असलेला  "अशी ही भन्नाट भिंगरी" मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार  पुणे वि.प्र.(शौकतभाई शेख) - अशी ही भन्नाट भिंगरी हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच अभिनेत्री आशू सुरपूर यांच्या मातोश्री जयश्री यांचं कोरोनानं निधन झालं, आपल्या कन्येला अभिनेत्री बघायचं त्यांचं स्वपन अर्धवटच राहिलं, आशुला  आभिनेत्री म्हणून बघायची त्यांची खुप इच्छा होती मात्र नियतीने अवेळी त्यांना हिराऊन घेतलं, "अशी ही भन्नाट भिंगरी" ही धम्माल प्रेम कहाणी असलेला मराठी चित्रपट आहे, उरणच्या निसर्गरम्य वातावरणात सोबतच समुद्रकाठी चित्रित झालेली ही प्रेम कहाणी, प्रेक्षकांना खूप आवडेल असे अभिनेत्री आशु सुरपुर यांनी सांगितलं, खुसखुशीत प्रेम कहाणी आणि गोड गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास, जनार्धन म्हसकर निमाते यांनी व्यक्त केला.   श्रीसाई समर्थ चित्र प्रस्तूत जनार्दन म्हसकर निर्मित तथा   संजीव यशवंत कोलते दिग्दर्शित हा चित्रपट मोठी धम्माल करणार असल्याचेही त्या म्हणाल्या,  आशु सुरपुर लहानपणा पासुन खुप ह...

इंदापूर पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई ; वाळू उपसा करणाऱ्या बोटी उद्धवस्त

 इंदापूर पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई ; वाळू उपसा करणाऱ्या बोटी उद्धवस्त धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले इंदापूर : प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील गंगावळण भागात  अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिकी बोटी इंदापूर पोलीस व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत शनिवारी (दि.३१) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उद्धवस्त करण्यात आल्या असून सदरील कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. सदरील करवाईमध्ये एकूण ४० लाख रुपये किंमतीच्या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिकी बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. वाळू माफियांवर धडक कारवाई चालू असून संबंधितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. निर्ढावलेल्या वाळू माफियांकडून उजनी पाणलोट क्षेत्रात महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ टाकत अवैधरित्या वाळू तस्करी निर्धास्तपणे चालू होती. अवैद्य वाळूचा उपसा करणाऱ्यांच्या बोटी जिलेटिन च्या साह्याने उडवल्या जातात मात्र संबंधित प्रशासनासह पोलिसांनी वाळूचा उपसा करणाऱ्या बोटीचे मालक, बोटीचे चालक यांसह वाळू उपशाला प्रोत्साह...

विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर पे अँड पार्किंग च्या ठरावाची होळी करणार - अपना वतन*

विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर पे अँड पार्किंग च्या ठरावाची होळी करणार - अपना वतन* ⭕ *जनतेची आर्थिक लूट होताना विरोधी पक्ष गप्प का?* पिंपरी चिंचवड शहरामध्ये जनतेचा व अनेक नगरसेवकांचा अंतर्गत विरोध जुगारून सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षाच्या मिलीभगतीने पे अँड पार्किंग धोरण लागू केले . राज्यकर्त्यांच्या या मनमानी मुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे. *पे अँड पार्किंग धोरणाचा परिणाम इंडस्ट्रियल कामगार , नोकरदार महिला , सेल्समन , झोमोटो सारख्या ठिकाणी काम करणारे कामगार , अपंग नागरिक, विधवा व निराधार महिला ,टुरिस्ट काम करणारे वाहनचालक यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने १५ जुलै २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. आयुक्त राजेश पाटील , महापौर उषाताई ढोरे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके ,विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासहित शहराचे भाजपचे अध्यक्ष व आमदार मा. महेश लांडगे , आमदार लक्ष्मण जगताप या सर्वाना लेखी निवेदन देऊन पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षांनी कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे  अप...

शुक्रवारच्या नमाज पठणवेळी पुरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन

 शुक्रवारच्या नमाज पठणवेळी पुरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन ( इंदापूराचा आवाज वैभव सोनवणे याजकडुन) राहाता (शौकतभाई शेख ) - सध्या नियमित होत असलेल्या अतिवृष्टीमुळे देशाच्या अनेक भागात विशेष करुन राज्याच्या रत्नागिरी,रायगड,सांगली, कोल्हापूर,मिरज आदी भागात महापूराने प्रचंड प्रमाणात थैमान घातले आहे,निसर्ग कोपल्याने पुराच्या पाण्यात अनेकांचे घर दार,संसार,दुकाने अक्षरशः उध्वस्त झाले आहे,असा भयानक प्रसंग त्या परीसरातील नागरीकांवर ओढावला आहे, यासमयी त्यांना आपल्या मदतीची नितांत गरज आहे, याकरीता कुठलाही जाती-धर्म भेदभाव न बाळगता मदतीसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे,या संकट समयी पुरग्रस्तांना धीर देत त्यांना आवश्यक असलेले खाण्या, पिण्यांच्या सामग्रीसह अत्यावश्यक वस्तूं आणि घरांच्या पुनर्वसनकामी पुढे येणे हे आपले कर्तव्यच आहे,कारण त्यांच्यावर ओढावलेल्या अशा कटू प्रसंगा प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येत मदतीचे हात पुढे करणे नितांत गरजेचे आहे आणि हाच सर्वात मोठा माणूसकीचा धर्मही आहे, याकरीता येत्या शुक्रवारी (दिनांक ३०/०७/२०२१)  दुपारच्या जुमा नमाज पठणवेळी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच लहान- मोठ्या मशिद...

श्रीरामपूर* आयुष्यमान अण्णासाहेब दाभाडे यांच्या राहत्या घरी वर्षवास कार्यक्रम पुणे येथे पाली भाषेचे अध्ययन करीत असलेले आदरणीय भंतेजी सुमेधजी बोधी यांच्या हस्ते विधीवत पूजेने संपन्न झाला

 *श्रीरामपूर* आयुष्यमान अण्णासाहेब दाभाडे यांच्या राहत्या घरी वर्षवास कार्यक्रम पुणे येथे पाली भाषेचे अध्ययन करीत असलेले  आदरणीय भंतेजी सुमेधजी बोधी यांच्या हस्ते विधीवत पूजेने संपन्न झाला वर्षावास निमित्ताने आदरणीय भंतेजींनी धम्मदेसना दिली धम्मदेसना मध्ये वर्षा वासाचं महत्त्व काय ,वर्षावास म्हणजे काय, वर्षा वासात काय काय बुद्धधम्मामधे करतात ,त्याची माहिती, बुद्ध धम्मा मध्ये दान पारमिता ला काय महत्व आहे, दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान काय , यासंबंधी उपासक-उपासिका बाल बालिका यांना आपल्या सुमधुर वाणी मधून देसना देतांना खूप चांगल्या प्रकारे बौद्ध धर्माचे नियम आणि आपल्या जीवनशैलीमध्ये वेळोवेळी काय बदल करायला हवा याबाबत अवगत केले त्याच प्रमाणे दत्तनगर येथील तक्षशिला बुद्ध विहार त्या ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाची सुरुवात भंतेजींनी  केली याप्रसंगी दोन्ही कार्यक्रमांमध्ये आयुनी सुशीला सात दिवे, परीघाबाई ,छायाताई दाभाडे ,हिराबाई दाभाडे ,सुनंदा खरात ,मस्के ताई ,शिरसाठ ताई भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आहिरेताई ,अलका गायकवाड ,प्रतिभाताई पवार, रत्न...

दौंडमध्ये ओमिनी सह 2 लाख 49 हजाराचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, दोन आरोपींना अटक

 दौंडमध्ये ओमिनी सह 2 लाख 49 हजाराचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, दोन आरोपींना अटक दौंड (प्रतिनिधी) दौंड शहरातील पाटील चौक व गोपाळवाडी रोडवरील देवप्लाम याठिकाणी असलेल्या गोल्डन जनरल स्टोअर्स नावाच्या दुकानांमध्ये विमल कंपनीचा गुटखा सापडला,ओमिनी गाडीसह 2 लाख 49 हजाराचा गुटख्याची किंमत आहे,                 स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पोलिस निरीक्षक सचिन काळे यांना गुप्त माहिती मिळाल्याने दौंड सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मदतीने छाप्पा टाकण्यात आला,यामध्ये गुटखा विक्री करणारा सराईत गुन्हेगार नरेश रोहिडा रा.देवप्लाम गोपाळ वाडी रोड दौंड व सुनिल मारुती यादव रा.पाटील चौक दौंड यांना अटक करण्यात आली आहे,यांच्या विरोधात पो.हवा.सचिन गायकवाड यांनी दौंड पोलिस स्टेशनला भा.द.वि कलम 328,188,269,272,273,34सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 30(2)(i),26,(i),26(2),(iv),59प्रमाण दाखल करण्यात आले आहे,यापुर्वीही अनेक वेळा नरेश रोहिडा यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत,दौंड पोलिस निरीक्षक ना...

कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणात मदत रवाना

 कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि  इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणात मदत रवाना पुणे: प्रतिनिधी  कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात आठ गाड्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते रवाना करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या शासकीय बंगल्यासमोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वनराज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात, आमदार अतुलजी बेनके, दिलीप अण्णा मोहिते पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष सचिन बोगवत, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सचिन सपकळ, गणेश थोरात  श्रीराज भरणे, अनिकेत भरणे, अक्षय भरणे आदी उपस्थित होते. एक हजार पाचशे साड्या, दोन हजार ब्लँकेट, एक हजार पाचशे टॉवेल, लहान मोठ्या मुली आणि मुलांसाठी प्रत्येकी पाचशे कपडे, पाण्याचे एक हजार बॉक्स, पाचशे बिस्किटांचे बॉक्स, इतर खाद्यपदार...

मुहम्मदिया कॉलनी-मोमीनपुऱ्याला पुन्हा चिखलपूरा बनवू नका - सय्यद इलयास

 मुहम्मदिया कॉलनी-मोमीनपुऱ्याला पुन्हा चिखलपूरा बनवू नका - सय्यद इलयास  बीड (प्रतिनिधी) - शहरातील मुस्लिम बहुल भागात असलेल्या मुहम्मदिया कॉलनी आणि मोमीनपुरा येथील कच्च्या रस्त्यांवर बीड नगर परिषदेने कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुरूम टाकून तात्पुरती का होईना रस्त्यांवरील चिखलापासून नागरिकांची सुटका केली. परंतु मुरूम टाकताना नाल्यांकडे लक्ष ठेवले नसल्याने टाकलेला मुरूम रस्त्यांसह नाल्यांमध्ये ही भरपूर प्रमाणात पडला. यामुळे नाल्यात तुंबून नाल्यातील गलिच्छ पाणी रस्त्यांवर येणार असल्याने पुन्हा एकदा या दोन विभागात चिखलपुरा तयार होणार असल्याने येथे बीड नगर परिषद सिमेंट किंवा डांबरी रस्ते तयार तर करीत नाही. निदान टाकलेले मुरूम तरी चांगल्या पद्धतीने रस्त्यांवर टाकावे. ते नाल्यांमध्ये जाणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित असताना याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने या दोन्ही प्रभागातील ज्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आले त्या-त्या रस्त्यांवरील दोन्ही बाजूंच्या नाल्या मुरुमाने भरून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या घरातील नालीमध्ये येणारे सांडपाणी लवकरच रस्त्यांवर येऊन टाकलेले मुरूम पुन्...

*महापौरांच्या आश्वासनानंतर अपना वतन संघटनेचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित*

 *महापौरांच्या आश्वासनानंतर अपना वतन संघटनेचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित*             पिंपरी चिंचवड शहरामध्ये १ जुलै पासून लादलेल्या पे अँड पार्किंग धोरणाला शहरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून या धोरणामुळे सामान्य जनतेची व कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने *पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त मा. राजेश पाटील , महापौर मा. माई ढोरे , आमदार लक्ष्मण जगताप , भाजप शहराध्यक्ष व भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे याना निवेदन दिले होते.* परंतु आज आठवडा उलटून देखील पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्यासंदर्भात कसल्याही हालचाली होत नसल्याने *अपना वतन संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत हे धोरण कुणाच्या हितासाठी रेटून नेण्यात येत आहे?* असा सवाल करीत आज शनिवार दिनांक २४ जुलै २०२१ रोजी महापौर कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु  *मा. महापौर यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत अपना वतन संघटनेच्या वतीने पे अँड पार्क धोरण रद्द करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी केली.त्यावेळी मा. मह...

इंदापूर नगर परिषदेच्या वतीने रमाई आवास(घरकुल) योजनेअंतर्गत एकूण 94 घरकुल मंजूर झाले आहे त्यांपैकी प्रथम आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेल्या व या योजनेत लाभार्थी असलेल्या सविता उत्तम मखरे व हनुमंत मरीबा मखरे यांचे घरकुलाचे भूमिपूजन

 आज शनिवार दिनांक 24.7.2021 रोजी इंदापूर नगर परिषदेच्या वतीने रमाई आवास(घरकुल)  योजनेअंतर्गत एकूण 94 घरकुल मंजूर झाले आहे त्यांपैकी प्रथम आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेल्या व या योजनेत लाभार्थी असलेल्या सविता उत्तम मखरे व हनुमंत मरीबा मखरे यांचे घरकुलाचे भूमिपूजन माननीय नगराध्यक्ष सौ अंकिता मुकुंद शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेविका माननीय सौ राजश्री अशोक मखरे, माननीय श्री मुकुंद शेठ शहा सचिव, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ , माननीय अॕड.श्री राहुल मखरे राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी या मान्यवरांच्या हस्ते झाले याप्रसंगी इंदापूर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक व रमाई आवास योजने चे काम पाहणारे श्री भागवत मखरे,अॕड.श्री किरण लोंढे, प्राध्यापक श्री मयूर मखरे,अॕड.श्री सुरज मखरे, श्री दर्या राज मखरे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

स्व.पतीच्या पुस्तकाचे पत्नीच्या हस्ते प्रकाशन हे स्मृतीनमन होय =पत्रकार प्रकाश कुलथे

 स्व.पतीच्या पुस्तकाचे पत्नीच्या हस्ते प्रकाशन हे स्मृतीनमन होय =पत्रकार प्रकाश कुलथे   श्रीरामपूर/प्रतिनिधी /भारतीय संस्कृती ही कुटुंबवत्सल आहे.पतीपत्नी म्हणजे दोन देहाचा एक श्वास आहे.शिर्डी येथील कुंभार समाजतील स्व.बाबुराव भीमाशंकर वाघचौरे यांनी लिहिलेल्या'अधुरी सोबत 'या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमती बबुताई बाबुराव वाघचौरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले,स्व. पतीच्या पुस्तकाचे पत्नीच्या हस्ते प्रकाशन होणे म्हणजे पतीच्या भावस्मृतीला नमन असल्याचे मत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले.     येथील स्नेहप्रकाश प्रकाशनतर्फे शिर्डी येथील बाबुराव        भीमशन्कर वाघचौरे यांची "अधुरी सोबत"ही कादंबरी मार्च 2021प्रकाशित झाली,वयाच्या 93व्या वर्षी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन मात्र होऊ शकले नव्हते.ते पत्नी बबुताई वाघचौरे यांचे हस्ते व प्रमुख पाहुणे पत्रकार प्रकाश कुलथे,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये तसेच वाघचौरे परिवारांच्या हस्ते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रकाशन झाले, त्यावेळी प्रकाश कुलथे बोलत होते.गोविंदा वाघचौरे ...

सतर्क पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक शमशुद्दीन शेख यांना डॉक्टरेट पदवी बहाल

 सतर्क पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक शमशुद्दीन शेख यांना डॉक्टरेट पदवी बहाल  मुंबई - पोलीस हे कायम चोख कर्तव्य बजावतात. प्रत्येक वेळी कर्तव्य तत्परतर असलेल्या लाखो पोलिसांमध्ये एखाद दुसरा वाईट कृत्य करतो अन् सर्वांना त्याच चष्म्यातून पाहिले जाते. ही मनोवृत्ती लहानपणासून पाहत असलेल्या पोलीस पुत्र शमशुद्दीन शेख यांना खटकली आणि त्यांनी पोलीस खात्यात जाण्याऐवजी पोलिसांचा पाठीराखा होण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी पोलिसांचे हक्काचे व्यासपीठ उभारले. ‘सतर्क पोलीस टाईम्स’  या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक पोलिसांच्या कर्तव्याचा गौरव केला. पोलिसांच्या कार्याचे वृत्त प्रसारित होताच खात्यानेही संबंधित पोलिसांना सन्मानित केले. इतकेच नव्हे तर पोलिसांच्या अडचणी, पोलीस रुग्णालय, पोलीस वसाहतीतील गैरसोय असो व नवी मुंबईतील अवैध धंद्यांना वाचा फोडणे असो वा उल्हासनगरातील अत्याचाºयाच्या घटनांना वाचा फोडणे असो याची वारंवार दखल घेणाºया सतर्क पोलीस टाईम्सचे मालक-संपादक शमशुद्दीश शेख यांचा एकूण कार्याची दखल घेऊन ‘द अमेरिकन युनिव्हसिर्टी, संयुक्त राज्य, यूएसए यांच्या वतीने ...

रुग्ण हक्क परिषद सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने महिलांना व्यवसाय प्रशिक्षण शिबीर संपन्न - बाबा चोबे*

 *रुग्ण हक्क परिषद सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने महिलांना व्यवसाय प्रशिक्षण शिबीर संपन्न - बाबा चोबे* *सांगोला -* रुग्ण हक्क परिषद ही रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी जगातील पहिली संघटना संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी निर्माण केली. रुग्ण हक्क परिषदेच्या स्थापनेपासूनच नागरिकांमध्ये रुग्णांचे न्याय आणि हक्क याबाबतची जनजागृती करणे आणि शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविणे यासाठी रुग्ण हक्क परिषद नेहमीच अग्रेसर कामगिरी केली आहे.            आर्थिकदृष्ट्या गरीब दुर्बल नागरिकांना औषधोपचारासाठी शासनाच्या विविध योजना आणि कायदे - अधिनियम अस्तित्वात असताना देखील अनेक नागरिकांना उपचाराअभावी मरणाला सामोरे जावे लागत होते, त्या अनुषंगाने शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत त्यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने महिला आणि असंघटित कामगारांचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या कामाचा एक भाग म्हणूनच सर्वेक्षण कार्यक्रम संपूर्...

!!! ईद-अल अजहा व प्रेषित मुहम्मद स्व.यांचा जगाला कल्याणकारी संदेश ।।।.

 !!!  ईद-अल अजहा  व   प्रेषित मुहम्मद स्व.यांचा  जगाला कल्याणकारी संदेश ।।।.        लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.               बैतुशशिफा दवाखाना,श्रीरामपूर.                                ९२७१६४००१४,    "" ईद-उल-अजहा '"म्हणजे फक्त आपल्या भारतातच त्यालाच " बकरी ईद '" म्हणतात .   ".कुरबानी ईद "" म्हणून ही बोली भाषेत प्रसिद्धी आहे. आणि भारतातील खुप कॅलेंडर मधे त्याला बकरी ईद म्हणून च प्रसिद्धी देवून टाकतात ,पण असे नाही आहेत ,ईद अल अजहा ही ईद फार पवित्र ईद आहेत .. या दिवसाचे फार महत्त्व पवित्र आहे .          ५पांचहाजार वर्षे पुर्वी प्रेषीत इब्राहिम अलैहिससलाम .यांना अल्लाह ने स्वपनामधे आज्ञा केली की, तुझं सर्वात प्रिय जे काही आहे ते कुरबान करं , तदनंतर हजरत इब्राहिम अलै.यांनी खुप विचार केला. काय आहे अपलं सर्वात प्रिय .तर डोळ्यांसमोर विज कपकपावी तसं झालं , लख्खप्रकाश पडाव तसं झालं , समोरच...

पोलिसांविरूद्ध तक्रार कोठे नोंदवायची..?*

 *पोलिसांविरूद्ध तक्रार कोठे नोंदवायची..?* सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांविरोधात तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये या प्राधिकरणाची स्थापना करून महाराष्ट्र राज्य अशा प्रकारच्या प्राधिकरणाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य ठरले. पोलिसांना कायद्याने दिलेल्या अधिकारांच्या गैरवापराबाबत येथे तक्रार करता येते. कुपरेज परिसरातील एमटीएनएल कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर प्राधिकरणाचे कार्यालय आहे. *याशिवाय ०२२२२८२००४५/४६/४७ हे दूरध्वनी क्रमांक आहेत.  mahaspca@gmail.com या ई-मेलवर तक्रार करू शकतो.*  प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. व्ही. पोद्दार (निवृत्त न्यायाधीश), याशिवाय अतिरिक्त महासंचालक (निवृत्त) आर. आर. सोनकुसरे, प्रेम किशन जैन आणि निवृत्त सनदी अधिकारी रामाराव हे प्राधिकरणाचे सदस्य आहेत. अतिरिक्त महासंचालक (आस्थापना) या प्राधिकारणाचा सदस्य सचिव असतो. प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे ते साक्षीदाराला समन्स पाठवू शकतात, त्यांची तपासणी करू शकतात, प्रतिज्ञापत्रावर साक्ष घेऊ शकतात. त्यानंतर तक्रारीत ...

समाजवादी पार्टीच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी आसिफ रशीद तांबोळी

 समाजवादी पार्टीच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी आसिफ रशीद तांबोळी श्रीरामपूर । प्रतिनिधी    येथील सामाजिक कार्यकर्ते व तांबोळी जमाअतचे श्रीरामपुर तालुका उपाध्यक्ष आसिफ रशीद तांबोळी यांची समाजवादी पार्टीच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचे सामाजिक कार्य तथा उपेक्षित घटकांसाठी असलेली तळमळ पाहता समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी त्यांच्यावर समाजवादी पार्टीच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत त्यांना नियुक्तीपत्र दिले, यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याना अधिक गती प्राप्त होऊन उपेक्षित घटकांना न्याय मिळण्यास अधिक सोपे होणार आहे, समाजवादी पार्टी हा राजकिय पक्ष आपल्या भारत देशात मोठे योगदान देणारा पक्ष असुन या पक्षाची महाराष्ट्र राज्यातील धुरा माननिय आमदार आबु असिम आझमी संभाळत आहेत तथा त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर समाजवादी पार्टीची मोठी पक्ष बांधणी सुरु असुन तमाम बहुजन तथा वंचित सामाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसोसीचे प्रयत्न केले जात आहे, आसिफ रशीद तांबोळी यांच्या नियुक्तीबाबत शहराध्यक्ष समीर शेख,जावीद पठ...

ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट निकृष्ट रस्त्याप्रकरणात पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करणा-या ठेकेदार-प्रशासकीय आधिका-यांवर कारवाईसाठी भगवानबाबांच्या स्मारक स्थळी आंदोलन:-ढाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

 ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट निकृष्ट रस्त्याप्रकरणात पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करणा-या ठेकेदार-प्रशासकीय आधिका-यांवर कारवाईसाठी भगवानबाबांच्या स्मारक स्थळी आंदोलन:-ढाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर  ____________________________  पाटोदा तालुक्यातील ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट(भक्तिगड)निकृष्ट रस्त्याप्रकरणात बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल आकसापोटी ठेकेदार-प्रशासकीय आधिका-यांनी संगनमताने दैनिक कार्यारंभ बीड दैनिकाचे मुगगाव प्रतिनिधी अशोक राजेंद्र भंवर यांच्यावरील दाखल खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात येऊन 4 कोटी 43 लाख रूपये किंमतीच्या 8 किमी रस्तादुरूस्तीची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.26  जुलै सोमवार रोजी सावरगावघाट (भक्तिगड)येथील भगवानबाबांच्या स्मारक स्थळी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन उपविभागीय आधिकारी पाटोदा, तहसिलदार पाटोदा, यांना देण्यात आले आहे.  सविस्तर माहीतीस्तव:-  ______________________________ दि.13 जुन र...

पोपटदादा ढोले आदर्श व्यक्तीमत्व - हर्षवर्धन पाटील

 पोपटदादा ढोले आदर्श व्यक्तीमत्व - हर्षवर्धन पाटील इंदापूर:प्रतिनिधी दि.20/7/21                 पोपट ढोले उर्फ दादा हे समाजासाठी आदर्श व प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी मुलांना उच्चशिक्षित करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. दादांनी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून समाजाला धार्मिक संस्कार देण्याचेही  काम केले आहे, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.           लाखेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पोपट नाना ढोले (वय -81 वर्षे) यांच्या पार्थिवावर लाखेवाडी येथे मंगळवारी (दि.20) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पोपटदादा ढोले यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.            अंत्यसंस्कार प्रसंगी आयोजित शोकसभेत हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, पोपटदादांना शेतीची आवड होती. लाखेवाडी पंचक्रोशीत त्यांनी आपले वेगळे स्था...

हर्षवर्धन पाटील यांचेकडून लोणकर कुटुंबीयांचे सांत्वन - पाटील कुटुंबियांकडू सव्वा लाखाची मदत - पुण्यात लोणकर कुटुंबीयांची घेतली भेट - शासनाकडून युवकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष

 हर्षवर्धन पाटील यांचेकडून लोणकर कुटुंबीयांचे  सांत्वन   - पाटील कुटुंबियांकडू सव्वा लाखाची मदत  - पुण्यात लोणकर कुटुंबीयांची घेतली भेट  - शासनाकडून युवकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष इंदापूर:प्रतिनिधी दि.19/7/21                  भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फुरसुंगी-पुणे येथे स्व.स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सोमवारी सांत्वन केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी  लोणकर कुटुंबियांकडे पाटील कुटुंबियांच्या वतीने सव्वा लाख रुपयांची मदत सुपूर्त केली.                 स्वप्निल लोणकर हे अतिशय हुशार व बुद्धिमान युवक होते. अहोरात्र अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन केले होते. मात्र त्यांना शासनाकडून नोकरीचे नियुक्ती पत्र दिले जात नव्हते. घरची परिस्थिती हलाखीची होती,  आर्थिक अडचणी वाढत होत्या. त्यामुळे शासनाकडून नोकरीच्या नियुक्तीसाठी होणाऱ्या विलंबास कंटाळून निराश झालेल्या स्वप्निल लोणकर यांनी आपले जीवन सं...

श्रीरामपुरात शासकीय कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी राष्ट्र विरोधी दिन साजरा

श्रीरामपुरात शासकीय कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी राष्ट्र विरोधी दिन साजरा श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूरमध्ये शासकीय कर्मचा-यांनी शासनाच्या अन्याय धोरणांचा जाहीर निषेध केला असून 15 जुलै हा राष्ट्र विरोधी दिन म्हणून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आला होता, हा राष्ट्र विरोधी दिन राज्य सरकारी कर्मचारी संघटना नागपूर यांचे अधिपत्याखाली संपूर्ण राज्यभर आयोजित करण्यात आला. त्याची अंमलबजावणी श्रीरामपूर तालुक्यात देखील सरकारी अधिकारी/कर्मचा-यांमार्फत करण्यात आली.अधिकारी व कर्मचा-यांच्या खलील प्रमाणे मागण्या शासनाकडे प्रलंबित असून त्या पूर्ण होण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयांत निदर्शने करून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. *सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत* 1) सेवा क्षेत्रांचे मजबुती करण करण्यासाठी कायमस्वरूपी मनुष्यबळ निर्माण करणे, 2) सर्व शासकीय रिक्त पदे तत्काळ भरणे, 3) कोरोनामुळे मृत झालेल्या पालकांचे मुलांना अनुकंप तत्वावर ताबडतोबीने नियुक्त्या देणे, 4) सर्व अंशकालीन/कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा नियमित करणे, 5) सरकारी कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजवली*. :- *ॲड. राहुल मखरे* ( *लोकशाहीर अण्णा भाऊंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात ५२ व्या स्मृतीदिनी अभिवादन* !)

 *लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजवली*. :- *ॲड. राहुल मखरे* लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजवली*. :- *ॲड. राहुल मखरे* ( *लोकशाहीर अण्णा भाऊंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात ५२ व्या स्मृतीदिनी अभिवादन* !) ( *लोकशाहीर अण्णा भाऊंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात ५२ व्या स्मृतीदिनी अभिवादन* !) *इंदापूर (ता.१८ ) प्रतिनिधी* :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रात एक शाहीर म्हणून परिचित असले तरी त्यांचे साहित्य हे उच्च कोटीचे होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात अण्णांनी राजकीय प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्रात मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीसंग्राम या चळवळीत अण्णांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मोलाचे योगदान दिले. अण्णाभाऊंनी ही चळवळ जनमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे कार्याध्यक्ष ॲड. राहूल मखरे यांनी केले.  भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा ५२ वा...

इंदापूर शहरामध्ये लोकशाहीर डाॅ.अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन..!!*

 *इंदापूर शहरामध्ये लोकशाहीर डाॅ.अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन..!!* इंदापुर (प्रतिनिधी) लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित्त इंदापुर मधील श्रीराम चौक येथील लोकशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे नगर मध्ये प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले...  श्रीराम चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष मा.श्री. प्रदीपदादा गारटकर यांनी पुष्पहार अर्पण केला तर लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे नगर येथे इंदापूर नगरपरिषदच्या  नगराध्यक्षा सौ.अंकिताताई शहा व प्रभागाच्या नगरसेविका सौ.राजश्रीताई अशोक मखरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. विठ्ठल आप्पा ननवरे, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, इंदापुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री.बाळासाहेब ढवळे. माजी नगरसेवक, दादासाहेब सोनवणे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, मा. सुधीरशेठ मखरे, माजी नगरसेवक, प्रशांत शिताप, सामाजिक कार्यकर्ते, दिलीपराव शिं...

खासदारांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित* *अमोल पाटील यांची माहिती : चार दिवसात गाळ्यांचा विषय संपवण्याची ग्वाही*

*खासदारांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित* *अमोल पाटील यांची माहिती : चार दिवसात गाळ्यांचा विषय संपवण्याची ग्वाही* *तासगाव : जनतांडव वृत्तसेवा*       तासगाव पंचायत समितीच्या बचत भवनमधील गाळ्यांचा विषय चार दिवसांत संपवतो, असे आश्वासन खासदार संजय पाटील यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिले आहे. त्यामुळे बांधकाम उपअभियंता वृंदा पाटील यांच्या केबिनसमोर दोन दिवसांपासून सुरू असणारे आमरण उपोषण स्थगित करीत असल्याची माहिती अमोल पाटील यांनी दिली आहे.       तासगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपा बापट, बांधकाम उपअभियंता वृंदा पाटील यांनी दि. 6 जुलै रोजी बचत भवनमधील गाळ्यांना भेट दिली. त्यानंतर अचानक कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता गाळा नं. 6, 7, 8 व 17 हे गाळे सील करण्यात आले. गाळ्यांचा करार न करणे, भाडे थकीत असणे, गाळ्यांमध्ये तोडफोड करणे, पोटभाडेकरू ठेवणे असे मुद्दे पुढे करून हे गाळे अचानकपणे सील करण्यात आले होते.       दरम्यान, हे गाळे सील करताना बांधकाम विभागाने गाळेधारकांना एकही नोटीस दिली नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ सूडबुद्धीने ही ...

माझ्या आमरण उपोषणाची पहिली रात्र...

 माझ्या आमरण उपोषणाची पहिली रात्र... ! - अमोल पाटील, संपादक साप्ताहिक 'जनतांडव' तासगाव (सांगली) मोबा : 9405 55 66 77       गेल्या 16 - 17 वर्षाच्या पत्रकारितेत अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. जिथं - जिथं अन्याय होईल तिथं - तिथं माझी लेखणी तळपली. लोकांवरील अन्याय, अत्याचाराविरोधात तलवारीसारखी लेखणी चालवली. पण, समाजातील शोषित, वंचित, उपेक्षित घटकांना न्याय देता - देता जेव्हा स्वतःवर अन्याय होतो, कट - कारस्थानं करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी मात्र स्वतःलाच आपल्यावरील अन्यायाविरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लागते. तासगाव पंचायत समितीच्या बचत भवनमधील माझा गाळा कोणतीही नोटीस न देता वेगवेगळी कारणे दाखवून 12 दिवसांपूर्वी सील केला. हा गाळा खुला करून मिळावा, त्याचे भाडे भरण्यासाठी चलन मिळावे, कराराची कागदपत्रे मिळावीत, या मागणीसाठी गेले आठ ते दहा दिवस झाले झगडत होतो. मात्र कारवाईच सुडबुद्धीने झाल्याने अधिकारी एकमेकांवर ढकलून मोकळे होत होते.        अखेर आठ - दहा दिवसांचा माझा संयम संपला. पत्रकार असण्...

अपना वतन संघटनेच्या वतीने पेट्रोल , डिझेल दरवाढीच्या विरोधात पेढे वाटून गांधीगिरी* 🛑

 🛑 *अपना वतन संघटनेच्या वतीने पेट्रोल , डिझेल दरवाढीच्या विरोधात पेढे वाटून गांधीगिरी* 🛑 ▪️▪️▪️ देशामध्ये पेट्रोल , डिझेल , घरगुती गॅस यांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ होत आहे . पेट्रोल डिझेल च्या दराने तर शतक पार केले आहे. त्यामुळे *केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ करून पेट्रोल डिझेलला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले आहे. तसेच आतापर्यंत कोणत्याही सरकारला शक्य झाले ते इंधन दरवाढ करून भाजप सरकारने कौतुकास्पद कामगिरी केली आहे त्यामुळे नागरिकांना गांधीगिरी पद्धतीने पेढे वाटून केंद्रसरकारचे उपहासात्मक अभिनंदन केले*               यावेळी *अपना वतन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षावाले , सिग्नल वरील नागरिक , पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेले नागरिक , गॅस सिलिंडर आणण्यासाठी गेलेलं नागरिक, भाजीविक्रेते  याना पेढे वाटून पेट्रोल डिझेल दरवाढीचा गांधीगिरी पद्धतीने निषेध केला.* या माध्यमातून पेट्रोल डिझेल दरवाढीची तीव्रता , इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेवर होणारे आर्थिक दुष्परिणाम याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अनेक नागरिक...

आज्ञा" फाउंडेशन च्या मार्फत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात

 "आज्ञा" फाउंडेशन च्या मार्फत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य  मोफत वाटप करण्यात आले...यावेळी काही गरजू विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला..... ( इंदापूर चा आवाज बातमी सेवा टेभूंर्णी प्रतिनिधी )आज दी 16/7/21रोजीआज्ञा फाऊंडेशन च्या वतीने आज हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आज्ञा फाऊंडेशन चे आमचे मित्र मा.श्री श्रीकांत मासुळे  यांनी अतंत्य स्तुत्य उपक्रम राबवला आहे यावेळी त्यांनी भविष्यकाळात स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाबद्दल माहिती सांगितली व तसेच आज्ञा फाऊंडेशन च्या वतीने सामजिक उपक्रमाबद्दल माहीती सांगीतली यावेळी माढा तालुका शिवसेना नेते मा.श्री संजय बाबा कोकाटे व माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.श्री रावसाहेब नाना देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व ज्येष्ठ पत्रकार मा.श्री अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन व मार्गदर्शन केले.यावेळी माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मा.श्री संभाजी पाटील ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस टेंभुर्णी चे शहरअध्यक्ष मा.श्री मयूर काळे ,टेंभुर्णी ग्रामपंचायत सद...

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड.लंडन तर्फे मूलनिवासी मुस्लीम मंचाचा सन्मान

  वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड.लंडन तर्फे मूलनिवासी मुस्लीम मंचाचा सन्मान (पुणे प्रतिनिधी )मार्च 2020 महिन्यात सर्वात प्रथम पुण्यामध्ये covid-19 आजाराने एक व्यक्ती मरण पावला. परिवाराच्या लोकांनी ते डेड बॉडी ताब्यात घेण्यास मनाई केली. प्रचंड भीतीचा वातावरण निर्माण झाला होता आजार नवीन असल्याने समजत नव्हते.उलट सुलट चर्चा सुरू होती. मेलेल्या माणसापासून पण संसर्ग होण्याची शक्यता आहे असे लोक समजू लागले.अशा बिकट प्रसंगी कुणीही पुढे येण्यास धजत नव्हते त्यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की परिवाराचे लोकांनी अंत्यविधी साठी नकार दिल्यास ते अंत्यविधी आपण करू. तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की अंत्यविधीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मनात भीती आहे म्हणून सामाजिक संस्थेने या कामासाठी पुढे यावा असे आवाहन केले. सर्वात प्रथम मूलनिवासी मुस्लिम मंच हे महापालिकेच्या मदतीला धावली अधिकृतरित्या महापालिकेतर्फे काम सुरू केले. त्या दिवसा पासून तर आज रोजी पर्यंत संस्थेचे काम सुरू आहे. पुणे शहरात कोरोना या आजाराने मरण पावलेल्या 1700 पेक्षा अधिक सर्व ध...

नवी दिल्लीत हर्षवर्धन पाटील यांचेकडून नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी - निवडीबद्दल केले अभिनंदन - विविध विषयावरची चर्चा

 नवी दिल्लीत हर्षवर्धन पाटील यांचेकडून नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी            - निवडीबद्दल केले अभिनंदन              - विविध विषयावरची चर्चा इंदापूर:प्रतिनिधी दि. 16/7/21        भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या भेटीत नूतन केंद्रीय मंत्र्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवरती चर्चा केली.            नवी दिल्ली येथे बुधवार व गुरुवारी (दि.15) हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या नूतन केंद्रीय मंत्र्यांची भेट...

एम_आय एम पक्ष पुणे शहराध्यक्ष महिला आघाडी पदी adv सिमीन अहमद यांची नियुक्ती करण्यात आली तसेच एम_आय_एम पक्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महिला आघाडी पदी रुहिनाज शकील शेख यांची नियुक्ती करण्यात आली

 एम_आय एम पक्ष पुणे शहराध्यक्ष महिला आघाडी पदी adv सिमीन अहमद यांची नियुक्ती करण्यात आली तसेच एम_आय_एम पक्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महिला आघाडी पदी रुहिनाज शकील शेख यांची नियुक्ती करण्यात आली  एम आय एम पक्ष प्रदेश महासचिव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकिल भाई मुजावर , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष धम्मराज साळवे,एम आय एम नेते कलीम भाई कुरेशी,पुणे जिल्हा अध्यक्ष फैयाज शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड शहर  वाहतूक आघाडी शहराध्यक्ष इरफान नैसर्गी, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष मौलाना मोईन मुलानी, मेहबूब शेख,आय एम नेते हलीम कुरेशी , फैजल खान, शाहिद शेख,हलीम शैख फैसल मोमिन  नेते नियाज भाई देसाई, महिला नेत्या जकीया खान प्रमुख उपस्थित होते पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

औरंगाबाद – शिर्डी रस्त्याचे डिपीआर, अखंड उड्डाणपुलाचे तांत्रिक सर्वेक्षण व औट्रम बोगद्यासह पर्यायी रस्त्याचे अहवाल सादर करा – अलोक कुमार* *खासदार इम्तियाज जलील यांनी मागणी व सुचित केलेल्या मुद्दंयाना सकारात्मक प्रतिसाद, एनएचएआय विभागाच्या वरिष्ठांनी त्वरीत दिले कार्यवाहीचे आदेश*

 *औरंगाबाद – शिर्डी रस्त्याचे डिपीआर, अखंड उड्डाणपुलाचे तांत्रिक सर्वेक्षण व औट्रम बोगद्यासह पर्यायी रस्त्याचे अहवाल सादर करा – अलोक कुमार* *खासदार इम्तियाज जलील यांनी मागणी व सुचित केलेल्या मुद्दंयाना सकारात्मक प्रतिसाद, एनएचएआय विभागाच्या वरिष्ठांनी त्वरीत दिले कार्यवाहीचे आदेश* औरंगाबाद : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे केंदीय सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी अलोक कुमार, नागपुर क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल आणि खासदार इम्तियाज जलील यांची चिकलठाणा विमानतळ दालनात औरंगाबाद जिल्ह्यातील एनएचएआय मार्फत प्रस्तावित व प्रगतीपथावरील प्रकल्पावर महत्वपुर्ण बैठक पार पडली. सदरील बैठकीत चर्चेदरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद ते शिर्डी रस्ता चौपदरीकरण, लेमनट्रि हॉटेल चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत अखंड उड्डाणपुल आणि सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड येथील औट्रम बोगद्यासह पर्यायी रस्ता देण्यात यावे अशी मागणी केली. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने आणि नागरीकांची मागणी व गरज लक्षात घेता सदरील प्रकल्प अतिमहत्वाचे असल्याने सविस्तर लेखी पत्रासह इतर संबंधित कागदपत्रे स...

धर्मदाय शिक्षण संस्थांनी यंदाच्या वर्षी फी माफ करावी अन्यथा पालकांच्या सहभागाने ठीक - ठिकाणी रास्ता रोको करू- उमेश चव्हाण*

 *धर्मदाय शिक्षण संस्थांनी यंदाच्या वर्षी फी माफ करावी अन्यथा पालकांच्या सहभागाने ठीक - ठिकाणी रास्ता रोको करू- उमेश चव्हाण* *नारायण पेठ, पुणे दि. ४ जून -* गेली दोन वर्षे शाळांचे दरवाजे उघडले गेले नाही. शैक्षणिक वर्ष सन २०२० हे संपूर्ण वर्ष ऑनलाईन पध्दतीने शिकवण्यात गेले. शिक्षण, शाळा आणि एकूणच शिक्षणाचा खेळखंडोबा निर्माण झाला. शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात घसरला. शिक्षणाची ऐशीतैशी निर्माण झाली. यंदाच्या वर्षी देखील सन २०२१ हे वर्ष शैक्षणिक दृष्ट्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. मात्र तरी देखील पालकांकडून वसुलीचा तकादा सुरू आहे, हे प्रकार धर्मदाय शिक्षण संस्थांनी आणि खाजगी शिक्षण संस्थांनी तात्काळ बंद केले नाही, तर पालकांच्या सहभागाने राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला.        बेरोजगारीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दोन वेळचे पोट भरणे अवघड होऊन बसले आहे. अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक शिक्षणासाठीची फी किती असावी? शिक्षणाच्या बाजारीकरणाबद्दल अवाजवी फी आकारणीच्या विषयी शिक्षण हक्क परिषद वेळोवे...