महिला_कल्याणासाठीचे_कायदे अॅड सुप्रिया विशाल बर्गे 7719050353 आजही महिलांना अन्याय अत्याचारास सामोरे जावे लागते
💐💐#महिला_कल्याणासाठीचे_कायदे अॅड सुप्रिया विशाल बर्गे 7719050353 आजही महिलांना अन्याय अत्याचारास सामोरे जावे लागते #आई, #बहीण #मुलगी #मैत्रीण या नात्यांना आपण नेहमीच मदत केली आहे. महिलांसाठी अनेक चांगले कायदे आहेत त्याची अंमलबजावणी देखील तितक्याच जलदगतीने होऊन महिलांना न्याय मिळवा. समाजात त्यांना मानाचे स्थान दिले जावे यासाठी समाजप्रबोधनाची, जनजागृतीची, सहकार्याची अपेक्षा मी समाजातील प्रतेक व्यक्तींकडून करते. जसा गुन्हा असेल त्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे. #हुंडा_प्रतिबंधक_कायदा : १९६१'च्या या कायद्यान्वये हुंडा मागणे आणि हुंडा देणे गुन्हे आहेत. हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमधे ३०४ (ब) आणि ४९८ (अ) ही नवीन कलमे अंतर्भूत आहेत. #महिला_संरक्षण_कायदा : कौटुंबिक छळ (महिला संरक्षण) प्रतिबंधक कायदा स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आथिर्क व शारीरिक संरक्षण देतो. हा कायदा फक्त पुरुषांविरुद्धच लागू होतो. यात अंतरिम आदेश देणे, नुकसान भरपाई देणे, संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, भागीदारीच्या घरात राहण्याचा अधिकार, कायदेशीर व वैद्यकीय मदत देण्या...