Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

अनेक मंडल अधिकारी निवासस्थान मंडल अधिकारी विनाच ?

मंडल अधिकारी निवासस्थान  मंडल अधिकारी विनाच ?  (इंदापुर प्रतिनिधि )इंदापुर तालुक्यातील अनेक ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मंडल अधिकारी यांना शासकीय निवास स्थान  बांधून दिलेले आहे.  परंतु इंदापुर तालुक्यातील  मंडल  अधिकारी शासनाने बांधून दिलेला शासकीय मंडल अधिकारी शासकीय निवास स्थान न राहता खाजगी ठिकाणी राहत आहेत काही ठिकाणी शासनाने लाखो करोडो रुपये खर्च करून मंडल अधिकारी यांना शासकीय निवासस्थान बांधून दिलेले आहे. परंतु काही अपवाद वगळता शासकीय मंडल अधिकारी निवासस्थान नसेल परंतु अनेक ठिकाणी मंडल अधिकारी यांना शासकीय निवासस्थान बांधून देवून सुध्दा त्या ठिकाणी राहत नाही.        ...काही मंडल अधिकारी शासकीय कामाच्या नावांखाली फिरताना दिसत आहे. काही मंडल अधिकारी अमावस्या ,पूर्णेमालाच शासकीय मंडल अधिकारी कार्यालयात उपस्थित असतात. ते शासकीय नियमानुसार वागत नाहीत.तसेच शासकीय वेळेत म्हणजे सकाळी 9.45  वाजता न येता मागील नियमानुसार 11.00 वाजता शासकीय कार्यालयात येताना दिसत आहे. शासनाने मंडल अधिकारी यांना ज्या ठिकाणी नोकरी करत आहे. त्या गावात शासनाने...

श्रीरामपूरतही घडले माणूसकीचे दर्शन" हिंदु धर्मिय कोरोनाग्रस्त भगीनीच्या अंत्यविधीस मुस्लिम बांधवांचा पुढाकार !

  "श्रीरामपूरतही घडले माणूसकीचे दर्शन" हिंदु धर्मिय कोरोनाग्रस्त भगीनीच्या  अंत्यविधीस मुस्लिम बांधवांचा पुढाकार ! श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये एका हिंदु धर्मिय भगीनेचे आपल्या राहत्या घरातच कोरोनाने निधन झाले, मात्र शेजारी व परिसरातील तीचे कोणीही नातेवाईक वैगरे नाही, याचे जेव्हा माजी नगरसेवक नजीरभाई मुलानी यांना समजताच त्यांनी आपल्या समाजातील मित्र,तरुणांना सांगीतल्याने परीसरातील मुस्लिम बांधव एकत्र आले आणि या हिंदू भगीनीस अंत्यविधीसाठी अमरधाम (स्मशानभूमी) मध्ये घेऊन गेल्याने श्रीरामपूरातही माणूसकीचे दर्शन घडल्यास बघावयास मिळाले. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीला जेथे रक्तातील नाते नाकार देत असताना इतर सामाजातील लोकांनी पुढाकार घेऊन अंत्यविधी करावी यापेक्षा मोठं माणूसकीचं नातं ते काय ? अशी परीसरात चर्चा होत आहे.

पाडुरंग तात्या शिंदे मित्र परिवार कावड सोहळा यांच्या वतीने नगर परिषदेतील आरोग्य खात्यातील कामगारांना प्रसाद देण्यात आला.

   पाडुरंग तात्या शिंदे मित्र परिवार कावड सोहळा यांच्या वतीने नगर परिषदेतील आरोग्य खात्यातील कामगारांना प्रसाद देण्यात आला.     (इंदापूर प्रतिनिधी )  इंदापूर शहरातील पाडूरंग शिंदे मित्र परीवार कावड सोहळा यांच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी यांना प्रसाद वाटत करण्यात आला .          या प्रसाद वाटपाचे आयोजन पाडुरंग तात्या शिंदे मित्र परिवार कावड सोहळा यांच्या  कडून करण्यात आले होते. यावेळी  क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष व इंदापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेता  पाडूरंग शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. देशावरील  कोरोना संकट दूर करण्यासाठी साठी  जे   काम  करीत आहेत .त्यांंना  सरकारने 1 कोटीचा विमा दिला पाहिजे. इंदापूर नगरपरिषदेचे कामगार जीवाची पर्वा न  करता इंदापूरात जे कष्टाची कामे करीत आहेत.त्यांच्या पाठीशी हा तात्या खंबीर पणे उभा राहणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,विशाल...

कडक उन्हाळ्याच्या महिन्यात सुहा ने केला रोजा पूर्ण

सूहा पठाण ने रमजान महिन्यात ला रोजा केला  पूर्ण ,  (इंंदापूरचा आवाज बातमी सेेवा  )  इंदापूर शहराती ल वाहीद पठाण यांची मुुुलगी सुहा पठाण वय 4 वर्षे हीने आज या लहान वयात रोजाा पूर्ण केला. सुहानेे रोजा पूर्ण केेेल्या नंतर एम आय   एम चे पुणेे जिल्हा अध्यक्ष  फैयाज  भाई शेख  यांनी फोन करून सुहा ला शुभेच्छा दिल्या.        मुस्लिम समाज बांधव तीस दिवसाचे उपास पूर्ण करत असतात. उपास करीता पहाटे खावूूू न उपवास  ठेवला जातो. त्या नंतर दिवसभर काही ही खात नाही.  कसलेही पाणी ही पित   नाही.         कडक उन्हाळ्यात माणसाला देखील उपवास कडक जात आहे. सुहाने याा कडक उन्हाळ्यात देखील उपवास पूर्ण केेेला.सुहाचेे सर्व् समाज बांधवांकडून कौतुक होत आहे. आपल्या भारत देशाला रमजान महिन्यात  स्वतंत्र मिळाले होते .     सुहाने आल्लाह कडे   देशभरातील कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना करावी . अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .  सुहाचे वडील व आजी आजोबा यांनी देखील सुहाच्या या उपवास बद्दल ...

कोवीड सेंटरसाठीचे दरपत्रक, नियमावली जाहीर करा, गोर-गरीबांची लुट थांबवा; अन्यथा सपातर्फे आंदोलन - जोयफ जमादार

 कोवीड सेंटरसाठीचे दरपत्रक, नियमावली जाहीर करा, गोर-गरीबांची लुट थांबवा; अन्यथा सपातर्फे आंदोलन - जोयफ जमादार श्रीरामपुर (प्रतिनिधी) - कोरोना महामारीने संपूर्ण देशात हांहाकार माजविला असून, त्यातच आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, श्रीरामपूर तालुक्याततर वैद्यकीय सेवेच्या नावाखाली भरपूर खाजगी कोविड सेंटर निर्माण झाले आहेत, परंतू डिपॉझिटच्या नावाखाली गोर- गरीबांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्याचा गोरखधंदा सध्या यातील अनेकांनी मांडला आहे, पहीलेच लॉकडाऊनमुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक टंचाईने भरडत असलेल्या लोकांच्या हाताला काम-धंदा नाही,मुबलक बेरोजगारीही वाढली आहे, यामध्ये कोविड सेंटरवाले महागडी औषधे, ऑक्सिजन आणावयास सांगत असल्याने लोकं सोने /मौल्यवान वस्तू गहाण ठेवून तर  कोणी व्याजाने पैसे घेऊन पूर्तता करत आहे, एवढे करून सुद्धा पैसे संपल्यावर कोविड सेंटरवाले सांगतात रुग्ण दुसरीकडे हलवा,अशातच पैशाअभावी दुसरीकडे ट्रीटमेंट न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत, त्यासाठी राज्य शासनाने खाजगी कोविड सेंटरसाठी जी नियमावली,जे दरपत्रक लागू केले आहे, ते त्यांनी कोविड सेंट...

मुस्लिम युवकाने विकली गाडी ,आँक्सिजन साठी

 ऑक्सिजन पुरवण्यासाठी त्याने विकली स्वतःची गाडी एकीकडे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असताना आणि अक्षम्य बेपर्वाईने ऑक्सिजन गळती करून रुग्णांचे हकनाक जीव जाण्याच्या घटना समोर येत असताना एका तरुणाने मात्र समाजासमोर आदर्श उभा केला आहे.     स्टेटस सिम्बॉल' असलेली 22 लाखाची एसयुव्ही त्याने विकून टाकली आणि त्यातून लोकांसाठी 160 ऑक्सिजन सिलेंडर विकत घेतले. ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना योग्य वेळी पोचवले आहेत.    जगण्याचे खरे 'स्टेटस' आपण माणुसकीने जगण्यात आहे हे त्याला नेमकेपणाने कळलंय असंच म्हणायला हवं.    मुंबईतील मालाड भागात राहणाऱ्या *शाहनवाज शेख* या तरुणाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्याला आता सारेजण *'ऑक्सिजन मॅन'* म्हणून ओळखू लागले आहेत.    शाहनवाज या तरुणाच्या पत्नीचे गेल्यावर्षी ऑक्सिजन न मिळाल्याने निधन झाले होते तेव्हापासून त्याने ऑक्सिजन पुरवण्याची यंत्रणा उभी केली. लोकांच्या मदतीसाठी मित्रांच्या मदतीने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्याने आणि त्याच्या टीमने आत्तापर्यंत 4 हजार लोकांना ऑक्सिजनची मदत केली आहे.   आता तर नितांत गरजेच्या...

अन् तो देवदूत म्हणून धावत आला.

 इंदापूर करांनी अनुभवले वर्दीतील सामाजिक दायित्व. ( इंदापूर प्रतिनिधी )आज दिनांक 24 रोजी इंदापूर येथील मुक्ताई ब्लड सेंटर यांनी डिजिट ल मीडिया द्वारे 'बी' पॉझिटिव प्लाझ्मा ची अत्यंत आवश्यकता असल्याचे आव्हान केले व या आवाहनास इंदापूर पोलीस स्टेशन मधील पोलीस माननीय श्री प्रमोद धंगेकर त्यांनी लागलीच प्रतिसाद देऊन स्वतः ड्युटी वर असताना माननीय पोलीस निरीक्षक श्री धन्यकुमार गोडसे यांची परवानगी घेऊन इंदापूर येथील मुक्ताई ब्लड सेंटर येथे प्लाझ्मा दान केले आज याचि देही याचि याची डोळा अशी अनुभूती इंदापूर करांनी अनुभवली जणू काही वर्दीतील सामाजिक दायित्व हे यातून अनुभवास मिळाले . इंदापूर मधील श्री प्रमोद धंगेकर या पोलीस शिपाई यांनी केलेले प्लाझ्मा दान हे खरंच त्या कुटुंबियांसाठी वरदान ठरेले. या प्लाझ्मा दाना नंतर मुक्ताई ब्लड सेंटरचे चेअरमन श्री अविनाश ननवरे यांनी वर्दीतील सामाजिक दायित्व व समाजाप्रती दाखवलेले प्रेम आणि सामाजिक दायित्व या दोन्हीशी आम्ही कसे कटिबद्ध आहोत याबद्दल श्री प्रमोद धंगेकर यांचे आभार मानले व इतर लोकांनीही यांचा आदर्श ठेवून प्लाझ्मा डोनेशन साठी पुढे यावे असे आवाहन क...

शेवटी रामाने वडिलांची इच्छा पूर्ण केली रामाने वडिलांची आज्ञा पूर्ण केली .इंदापूर येथे हिंदू मुस्लिम ऐक्य चे प्रतीक मुस्लिम रीतिरिवाज नुसार हिरालाल गणपत सुर्यवंशी यांचे ( अंत्यविधी ) करण्यात आला.

 इंदापूर येथे हिंदू मुस्लिम ऐक्य चे प्रतीक मुस्लिम रीतिरिवाज नुसार हिरालाल गणपत सुर्यवंशी यांचे ( अंत्यविधी ) करण्यात आला. (इंदापूर प्रतिनिधी ) इंदापूर शहरातील व्यंकटेश नगर या ठिकाणी राहणारे हिरालाल सुर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांंचा मुलगा राम सुर्यवंशी यास  असे सांगितले की , " मी मेल्या नंतर मला मुस्लिम समाजाच्या रीतिरिवाज नुसार मला दफन ( अंत्यविधी )करावे "  असे  हिरालाल सुर्यवंशी यांनी त्यांंचा मुलगा रामकडे त्यांची ही अंतिम इच्छा सांगितले होती. सदर या घटनेला काही दिवस जाताच  त्यांंचे काल निधन झाल्यानंतर  सदर बाब  राम सुर्यवंशी  यांनी मुस्लिम समाजाच्या बांधवांना सांगितली. हिरालाल सुर्यवंशी यांचा अंत्यविधी साठी मुस्लिम समाजाच्या वतीने  इंदापूर या ठिकाणी दफन करण्यात आले                                                               इंदापूर शहरात  मोहरम सणा मध्ये हिरा सुर्यवं...

इंदापूर नगर परिषदेच्या वतीने कोरोना महामारी ब्रेक द चैन या अंतर्गत आरोग्य सर्वे

 (इंदापूर प्रतिनिधी ) इंदापूर नगर परिषदेच्या वतीने कोरोना महामारी ब्रेक द चैन या अंतर्गत आरोग्य सर्वे सुरू करण्यात आलेला आहे माननीय शासनाच्या आदेशान्वये तसेच उपविभागीय अधिकारी माननीय श्री दादासाहेब कांबळे यांच्या सूचनेनुसार इंदापूर नगरीच्या नगराध्यक्ष माननीय सौ अंकिताताई शहा व इंदापूर शहराचे तहसीलदार माननीय श्री अनिल ठोंबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला या सर्वे ची सुरुवात सकाळी आठ वाजता करण्यात आली यामध्ये कर्मचाऱ्यांच्या 30 टीम करण्यात आलेल्या असून इंदापूर शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक वर्ग नारायणदास रामदास हायस्कूल राधिका माध्यमिक स्कूल मूकबधिर शाळेचे व सर्व प्राथमिक शिक्षक यामध्ये इंदापूर नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बरोबर काम करीत आहेत नगरपरिषदेने हा सर्वे  करण्यासाठी या सर्वे धारकांना एक फॉर्म दिला असून त्यामध्ये नागरिकांचे तापमान ऑक्सिजन व सहव्याधीदी रुग्ण याबाबतची माहिती घेणे तसेच या रोगाची काही लक्षणे असल्यास त्याची नोंद घेऊन त्यानंतर असे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना तपासणीसाठी त्वरित पुढे पाठवले जात आहे संपूर्ण शहरांमध्ये हा सर्वे ह...

शेवटी लक्ष्मी ने केली आईची इच्छा पूर्ण रमजानच्या पवित्र उपवासाच्या दिवशी जर मला मरण आले तर कृपया तू माझ्या शरीराला समशानभूमी येथे दहन करू नको मला मुस्लिम धर्म रितीरिवाजानुसार अंतिम संस्कार नमाज अदा करून मुस्लिम दफनभूमी येथे कर.शेवटी लक्ष्मीने केले आईची अंतिम इच्छा पूर्ण.

  शेवटी लक्ष्मीने केले आईची अंतिम इच्छा पूर्ण. (इंदापूरचा आवाज बातमी सेवा पुणे प्रतिनिधी अंजूम ईनामदार  )चार वर्षापूर्वी छगनबाई किसन ओव्हाळ या महिलेने आपली एकुलती एक मुलगी लक्ष्मी याला सांगितले की रमजानच्या पवित्र उपवासाच्या दिवशी जर मला मरण आले तर कृपया तू माझ्या शरीराला समशानभूमी येथे दहन करू नको मला मुस्लिम धर्म रितीरिवाजानुसार अंतिम संस्कार नमाज अदा करून मुस्लिम दफनभूमी येथे कर. असे चार वर्षांपूर्वी आईने आपल्या मुली समोर इच्छा व्यक्त केली होती. नेमका रमजानचा पवित्र महिना सुरू असताना छगनबाई यांचे कोरोना या आजाराने निधन झाले. आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रभर मुलगी लक्ष्मी यांनी खूप परिश्रम घेऊन शेवटी आईची अंतिम इच्छा पूर्ण करून येरवडा येथील जय जवान नगर मुस्लिम कब्रस्तान येथे मुस्लिम धर्म रितीरिवाजानुसार दफन केले. छगनबाई किसन ओव्हाळ राहणार बर्मा शेल कंपनी इंद्रा नगर लोहगाव रोड पुणे वय वर्ष 72 एक दिवसापूर्वी संधिवातचा त्रास होत असताना घरात राहून औषध उपचार घेत असताना अचानक पणे जास्त त्रास होऊ लागला छगनबाई या महिलेला शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल येथे रुग्णालयात दाखल ...

इंदापूर नगर परिषदेच्या वतीने कोरोना व्हायरस महामारी आजाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शहर व परिसरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून लसीकरण मोहीम जनजागृती हाती

 ( इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर नगर परिषदेच्या  वतीने कोरोना व्हायरस महामारी आजाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शहर व परिसरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून लसीकरण मोहीम जनजागृती हाती घेऊन प्रभाग क्रमांक एक पासून सुरुवात करून इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता ताई शहा व त्या प्रभागातील सर्व सन्माननीय नगरसेवक आणि  प्रभागातील नगरपरिषदेचे वसुली कर्मचारी व इतर अधिकारी कर्मचारी यांना बरोबर घेऊन प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी भेटी देऊन कुटुंबातील 45 वर्ष वया वरील सदस्यांनी कोरोना व्हॅक्सीन लसीकरण करून घेतले आहे का? घेतले नसेल तर लवकरात लवकर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन आपले नाव नोंदवून लसीकरण करून घ्यावे, लसीकरण करून घेणे किती महत्वाचे आहे याबाबत जनजागृती करून नागरिकांना लसीकरण करण्यास प्रवृत्त केले. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे बाबत तसेच सदर आजाराची एखाद्या कुटुंबातील व्यक्तीस लागण झाली असली तरी घाबरून न जाता वेळेत औषध उपचार करून घ्यावा कोणतेही दुखणे अंगावर न काढता त्वरित औषधोपचारासाठी दवाखान्यात जाऊन तपासणी करू घ्यावी त्यामुळ...

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांप्रमाणे, विना अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना देखील संचारबंदी काळात वार्तांकन करण्याची अनुमती मिळणेबाबत,पत्रकार संघटनांचे मुख्यमंत्र्यांना पत्र श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या कोरोना संकटाने सर्वांनाच पछाडले असुन कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने शासनाने खंबीर भुमिका घेत १ मे पर्यंत संचारबंदी आदेश जारी केले आहे,अत्यावश्यक सेवेसाठी देखील वेळ मर्यादा ठरवून दिली तथा शासनाकडून कोरोना आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न चालु आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, मात्र मा.मुख्यमंत्री महोदयांकडून दिनांक १३ एप्रिल २०२१ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात इतर अत्यावश्यक सेवेत अधिस्वीकृती धारक पत्रकारांना वार्तांकनाची मुभा देण्यात आलेली असून त्या प्रमाणेच ग्रामीण भागातील विना अधिस्वीकृती धारक दैनिक वर्तमानपत्रांचे वार्ताहर, केंद्र शासनमान्य आर.एन.आय. रजिस्ट्रेशन धारक वर्तमानपत्रांच्या संपादक (पत्रकार)/वार्ताहरांना देखील याबाबतचे आश्यक ते सर्व कागदपत्रे तपासून स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे संचारबंदी काळात संबधीत कालावधी दरम्यानं "कर्फ्यू पास" देण्यात यावा,कारण सध्याच्या या भयानक परिस्थितीत शासनाचे आदेश जनसामान्यांपर्येंत पोहोचविण्यासाठी अधीस्विकृती धारक पत्रकारांना मंत्री महोदयांचे/वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदास उपस्थित राहणे अनिवार्य असल्याने ग्रामीण भागातील ज्वलंत समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे पुरेसा वेळ राहणार नाही, आणि आजच्या या गंभीर परिस्थितीत ग्रामीण भागाच्या विविध समस्यांना वाव मिळणार नाही,जी आज काळाची गरज आहे,तथा शासनमान्य यादीवरील विविध दैनिक/साप्ताहिक वर्तमानपत्रांच्या सर्वच वार्ताहरांना अधिस्वीकृती आहेच असेही नाही,म्हणून विना अधिस्वीकृती धारक संपादक (पत्रकार) वार्ताहरांना संबधीत कालावधी दरम्यानं किमान करफ्यू पासच्या माध्यमातुन का होईना वार्तांकणसाठी परवानगी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकतअली आणि स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शौकतभाई शेख तथा अनेक संपादक,वार्ताहरांच्यावतीने मा.मुख्यमंत्री महोदयांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे,

 अधिस्वीकृतीधारक पत्रकारांप्रमाणे, विना अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना देखील संचारबंदी काळात वार्तांकन करण्याची अनुमती मिळणेबाबत,पत्रकार संघटनांचे मुख्यमंत्र्यांना पत्र श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या कोरोना संकटाने सर्वांनाच पछाडले असुन कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने शासनाने खंबीर भुमिका घेत १ मे पर्यंत संचारबंदी आदेश जारी केले आहे,अत्यावश्यक सेवेसाठी देखील वेळ मर्यादा ठरवून दिली तथा शासनाकडून कोरोना आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न चालु आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, मात्र मा.मुख्यमंत्री महोदयांकडून दिनांक १३ एप्रिल २०२१ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात इतर अत्यावश्यक सेवेत अधिस्वीकृती धारक पत्रकारांना वार्तांकनाची मुभा देण्यात आलेली असून त्या प्रमाणेच ग्रामीण भागातील विना अधिस्वीकृती धारक दैनिक वर्तमानपत्रांचे वार्ताहर, केंद्र शासनमान्य आर.एन.आय. रजिस्ट्रेशन धारक वर्तमानपत्रांच्या संपादक (पत्रकार)/वार्ताहरांना देखील याबाबतचे आश्यक ते सर्व कागदपत्रे तपासून स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे संचारबंदी काळात संबधीत कालावधी दरम्यानं "कर्फ्यू पास" देण्यात यावा,कारण सध्याच्या या भयानक परि...

कै शिवलाल हिराचंद बोरा यांचे स्मृतीप्रित्यर्थ ऊपजिल्हा रूग्णालय इंदापूर येथील कोरोणा पेशंट साठी मदतीचा हात.

 कै शिवलाल हिराचंद बोरा यांचे स्मृतीप्रित्यर्थ ऊपजिल्हा रूग्णालय इंदापूर येथील कोरोणा पेशंट साठी  मदतीचा हात.  ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ इंदापूरचे सुप्रसिद्ध  व्यापारी व युवा क्रांती परिवाराचेमार्गदर्शक कै शिवलाल बोरा यांच्या पुण्य स्मरणा निमित्त त्यांच्या दोन्ही कन्या सौ. अनिता लोढा व सौ सुनिता मुथा यांनी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांच्याशी चर्चा  केली. सन्मानिय तहसिलदार साहेब अनिलजी ठोंबरे व ऊपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी  डाॕ शेळके  डाॕ  एकनाथ चंदनशिवे  डाॕ  विनोद राजापूरे यांच्या  मार्गदर्शनाखाली   कोरोना पेशंट साठी पीण्याच्या गरम पाण्या साठी व्होल्टास मशिन बसवायची मागणी केली. लाॕकडाऊन पडलेल असताना आमच्या ताई सौ अनिता व सुनिता  यांनी पुणे येथून हे मशिन ऊपलब्द्ध करून इंदापूरला पाठवून द्यायची सोय केली. म्हणतात मुल ही वंशाचा दिवा असतात..पण ती  जेव्हा *पणती* बनते तेव्हा आपल्या आई वडीलांचे संस्कार व दोन्ही घराण्याच नाव ऊज्वल करते.  सौ अनिता लोढा व सुनिता मूथा या दोन्ही कन्यानी आपल्या वडिलांच...

नवापूरला घडले तसे अहमदनगर जिल्ह्यात घडणार का ? विना मास्क फिरणाऱ्यांना पोलिस तुरुंगात धाडणार का ? - नवापूरला विना मास्क फिरणाऱ्यास, न्यायालयाने ठोठावली ५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा - श्रीरामपूर - मास्क न लावता फिरतांना आढळून आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे जहांगीर उस्मान मिर्झा यास नवापूर प्रथमवर्ग वर्ग न्यायालयाने पाच दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. नवापूरातील लाईट बाजार भागात १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जहांगीर उस्मान मिर्झा हा व्यक्ती मास्क न लावता फिरत होता,त्याला पोलिसांनी हटकले असता त्याने कोरोना हवेतून पसरत नाही म्हणून मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणार नाही असे सांगितले, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होईल अशा पद्धतीने वागल्यामुळे त्याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,सदरील प्रकरणी त्यास न्यायालयात हजर केले असता नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांनी जहांगीर मिर्झाला ५ दिवसांच्या साध्या कारावास तथा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली, सोबतच दंड न भरल्यास पुन्हा २ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली,

 नवापूरला घडले तसे अहमदनगर जिल्ह्यात घडणार का ? विना मास्क फिरणाऱ्यांना पोलिस तुरुंगात धाडणार का ? - नवापूरला विना मास्क फिरणाऱ्यास, न्यायालयाने ठोठावली ५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा - श्रीरामपूर - मास्क न लावता फिरतांना आढळून आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे जहांगीर उस्मान मिर्झा यास नवापूर प्रथमवर्ग वर्ग न्यायालयाने पाच दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. नवापूरातील लाईट बाजार भागात १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जहांगीर उस्मान मिर्झा हा व्यक्ती मास्क न लावता फिरत होता,त्याला पोलिसांनी हटकले असता त्याने कोरोना हवेतून पसरत नाही म्हणून मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणार नाही असे सांगितले, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होईल अशा पद्धतीने वागल्यामुळे त्याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,सदरील प्रकरणी त्यास न्यायालयात हजर केले असता नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांनी जहांगीर मिर्झाला ५ दिवसांच्या साध्या कारावास तथा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली, सोबतच दंड न भरल्यास पुन्हा २ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनाव...

राज्यमंत्री ना.दत्तात्रय (मामा)भरणे यांची संस्थेच्या कार्यकारी मंडळावर विशेष निमंत्रित पदी निवड.- संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे

 राज्यमंत्री ना.दत्तात्रय (मामा)भरणे यांची संस्थेच्या कार्यकारी मंडळावर विशेष निमंत्रित पदी निवड.- संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे इंदापूर :- (प्रतिनिधी )  येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या कार्यकारी मंडळावर  विशेष निमंत्रित पदी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांची त्यांच्या पूर्व परवानगीनेच एक मताने निवड केल्याचे इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष श्री.रत्नाकर मखरे यांनी (दि.१४)  ट्रस्टच्या बैठकीत घोषित केल्याची माहिती संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी पत्रकारांना दिली. ना.दत्तात्रय भरणे हे कामाच्या व्यस्ततेमुळे उपस्थित राहू शकले नाही.त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार ट्रस्टी त्यांचा यथोचित सत्कार करणार असल्याचे ॲड. समीर मखरेंनी म्हटले आहे.          महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेने संस्थेच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती, त्यावेळी संस्थेच्या कार्यकारी मंडळावर काही नियुक्त्या एकमताने केल्या. त्यात राज्यमंत्री मा.ना.दत्तात्रय भरणे (मामा) विशेष निमंत्रित, ...

पुण्यनगरी'चे प्रतिनिधी महेश स्वामी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

 'पुण्यनगरी'चे प्रतिनिधी महेश स्वामी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड इंदापूर प्रतिनिधी: मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पुण्यनगरीचे इंदापूर प्रतिनिधी महेश सिद्धेश्वर स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाचे राज्याध्यक्ष रणधीर कांबळे यांनी नियुक्ती पत्र दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी महेश स्वामींना दिले.  महेश सिद्धेश्वर स्वामी यांनी पुण्यनगरी वृत्तपत्रांमध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपली.याचा विचार करून जिल्हाध्यक्ष पदांची जबाबदारी देण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

डाॅ. आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

( इंदापूर प्रतिनिधी ) : येथील डाॅ. आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेविका राजश्री अशोक मखरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.       डाॅ. आंबेडकर जयंती निमित्त प्रदिप गारटकर यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले.      यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, पुणे जिल्हा आर. पी. आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे, बारामती लोकसभा मतदार संघ आर.पी.आय कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर.पी.आय.तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, गटनेते कैलास कदम, नितीन मखरे, प्रा.अशोक मखरे, बाळासाहेब मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, प्रा.बाळासाहेब मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध...

शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर येथे अभिवादन करण्यात आले

(इंदापूर प्रतिनिधी ) पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर येथे अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.संजय भैय्या सोनवणे , इंदापूर नगरपालिकेचे आरोग्य सभापती मा.अनिकेत वाघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे इंदापूर शहराध्यक्ष मा.शिवाजी मखरे, तालुका सरचिटणीस मा.सुहास मखरे,मा.नितीनराव आरडे, मा.आनंद गायकवाड , महेश वाघमारे,

गावोगावी वृक्ष लागवड ही काळाची गरज- किरण गोफणे,राष्ट्रीय समाज पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व स्वर्गीय गुनाई जगन्नाथ जानकर यांच्या स्मरणार्थ आज दिनांक 14 एप्रिल रोजी वृक्षारोपण कार्यक्रम साजरा झाला,

 गावोगावी वृक्ष लागवड ही काळाची गरज- किरण गोफणे,राष्ट्रीय समाज पक्ष  डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व स्वर्गीय गुनाई जगन्नाथ जानकर यांच्या स्मरणार्थ आज दिनांक 14 एप्रिल रोजी वृक्षारोपण कार्यक्रम साजरा झाला, (इंदापूर प्रतिनिधी )    डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व स्वर्गीय गुनाई जगन्नाथ जानकर यांच्या स्मरणार्थ आज दिनांक 14 एप्रिल रोजी वृक्षारोपण कार्यक्रम साजरा झाला,     यावेळी पुणे जिल्हा प्रभारी श्री किरण गोफणे म्हणाले की लाखो वर्षाची वसुंधरा मानवाच्या हव्यासापोटी रास होत चाललेली आहे त्यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज झालेली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून चालू वर्षी इंदापूर तालुक्यात नऊ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून हि वृक्ष लागवड करून आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेवजी जानकर साहेबांच्या मातोश्री गुनाई जगन्नाथ जानकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून रासप शाखा चाकाटी च्या वतीने चाकाटी या गावात नऊशे वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यावेळी चाकाटी गावचे ग्रामसेवक स्वप्नील जी गायकवाड. रा स प तालुकाध्यक्ष सतीश तर...

समता सैनिक दलाचे विद्यमान पुणेजिल्हा अध्यक्ष आयु. अशोकराव पोळ यांचे हस्ते विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर इंदापूर टायर असोसिएशनचे अध्यक्ष मा. विठ्ठल (नाना) कुलते व इंदापूर टायर असोसिएशनचे खजिनदार रुपेशभाऊ शिंदे यांच्या हस्ते कुळवाडी भूषन शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

( इंदापूर प्रतिनिधी )आज दि.१४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ : ०० वाजता विश्वरत्न प.पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ मार्च १९२७ साली स्थापित केलेलं राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटन समता सैनिक दल व इंदापूरशहर आणि परिसरातील टायर व्यवसायिक यांनी एकमताने स्थापन केलेलं संघटन इंदापूर टायर असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने आज संपूर्ण इंदापूरशहरामध्ये १४ एप्रिल या दिनाचे औचित्य साधुन कुळवाडी भुषण शिवछत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, विश्वरत्न, बोधिसत्व प. पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, माता अहिल्यामाई होळकर, साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.       संपूर्ण जगामध्ये कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असून महाराष्ट्र शासनाच्या नियमाचे उल्लंघन न करता तंतोतंत पालन करीत हा कार्यक्रम सर्वानुमते प्रमुख कार्यकर्त्याच्या उपस्थितिमध्ये पार पडला.           इंदापूर टायर असोसिएशनचे विषेश सल्लागार आणि समता सैनिक दलाचे विद्यमान पुणेजिल्हा अध्यक्ष आयु. अशोकराव पोळ यांचे हस्ते विश्वरत...

जामखेड युवक काँग्रेस कडून आरोळे हाँस्पिटला आठ दिवसाचा भाजीपाला

 एक हात मदतीचा (जामखेड प्रतिनिधी इंदापूर चा आवाज बातमी सेवा (आज रोजी गुढी पाडवा,डॉ. आंबेडकर जयंती आणि रमजान च्या निमित्ताने जामखेड शहर काँग्रेस व युवक काँग्रेस तर्फे आरोळे हॉस्पिटल च्या कोविड सेंटर येथे ८ दिवसाचा भाजीपाला देण्यात आला. यावेळी हॉस्पिटल च्या विश्वस्त डॉ. शोभा आरोळे, युवक काँग्रेस चे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष राहुल उगले, शहर काँग्रेस चे अध्यक्ष देवीदास भादलकर, जिल्हा सचिव सुनील शिंदे, ओबीसी काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल खेत्रे, शहर उपाध्यक्ष महादेव कोल्हे, शहार उपाध्यक्ष अस्लम आतार, अल्पसंख्याक काँगेस अध्यक्ष फिरोज पठाण तसेच हॉस्पिटल चे कर्मचारी उपास्थित होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भिमाई आश्रमशाळेत जयंती उत्साहात साजरी ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर समस्त मानव जातीचे प्रेरणास्रोत*.. - माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांचे प्रतिपादन)

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भिमाई आश्रमशाळेत जयंती उत्साहात साजरी ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर समस्त मानव जातीचे प्रेरणास्रोत*..                 -   माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांचे प्रतिपादन) इंदापूर :- ( दि.१४) मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती आयोजित करण्यात आली होती.  सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गलांडवाडी नं.२ चे माजी सरपंच श्री.गोपीचंद गलांडे व संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी रत्नाकर मखरे म्हणाले की, १४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे महत्त्व अद्वितीय आहे. उपेक्षित,वंचित, शोषित,पीडित आणि समस्त मानव जातीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस १४ एप्रिल हा होय.   मखरे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी कष्ट आणि संघर्षातून प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अनेक पदव्या मिळवून विविध विषयांचा सखोल अभ्...

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) दि. १३ एप्रिल २०२१ *राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू*

 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) दि. १३ एप्रिल २०२१ *राज्यात १ मेपर्यंत  कडक निर्बंध लागू*  *दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज* *कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी* *कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*  *एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार* *कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा* मुंबई, दि. १३ : - कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे  ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.  राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.    राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये ...

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

   पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी  (   पुणे प्रतिनिधी ) महाराष्ट्रात कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे त्याचा संसर्ग होवून वाढत्या कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या अतिशय चिंताजनक आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात सदर रोगाने संक्रमित झालेल्या नागरिकांना उपचाराकरीता रुग्णालयात बेड मिळत नाहीत. तर त्याच्यावर असलेले औषध रेमडीसिविर याचा तुटवडा निर्माण झाल्याने आता सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.      याबाबत उपायोजना करीत असताना राज्यसरकारने साथ रोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि विविध असलेले प्रतिबंध कायदे लागू करुन नागरिकांवर विविध स्वरुपाचे निर्बंध लागु केले आहेत. याच बरोबर प्राथमिक, माध्यमिक,उच्चमाध्यमिक  आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. एवढेच नव्हे तर इ.१०वी व १२वी बोर्ड परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा नियोजित तारखेच्या रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत.           कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या ...

अखेर कोंढवा मुस्लिम कब्रस्तानचा आजचा प्रश्न मार्गी लागला

अखेर कोंढवा मुस्लिम कब्रस्तानचा आजचा प्रश्न मार्गी लागला ( पुणे प्रतिनिधी )कोरोना चा पहिला रुग्ण 4 मार्च 2020 रोजी पुण्यात आढळला पहिला मृत्यू आढळलं पहिला मृत्यू 30 मार्च रोजी पुण्यात झाले. एक एप्रिल 2020 रोजी कोंढवा या भागातील एक मुस्लिम व्यक्तीचा कोरोना आजाराने निधन झाले व त्या व्यक्तीला राहत बाग कौसर बाग मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यविधी करण्यात आले. एक एकर असलेल्या सदरच्या जागेवर साधारण साडेतीनशे पेक्षा अधिक मृत्यू दे या ठिकाणी दफन करण्यात आले सर्वे नंबर 13 एक एकर असलेली जागा गेल्यावर्षी 11 जून 2020 रोजी सदर जागेचा कबरस्थान साठी महापालिकेने उपलब्ध करून दिले होते गेल्यावर्षी 12 जून रोजी पहिला मृत्यू त्या जागेवर दफन करण्यात आले होते तेव्हापासून तर आज रोजी पर्यंत साधारण साडेतीनशे पेक्षा अधिक मुस्लिम बांधवांचे त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आले बघता बघता सदरची असलेली एक एकर जागा हे पूर्णपणे भरून गेल्याने स्थानिक कोंढवा भागातील रहिवासी मुस्लिम बांधवांचे प्रचंड हाल होत होते. राहत बाग कब्रस्तान चे मुख्य ट्रस्टी शफी पठाण सतत शेजारी असलेल्या............... जागेसाठी पाठपुरावा करत होते. नुकताच क...

उजनी जलाशयातील अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या चार बोटी

 (इंदापूर प्रतिनिधी )उजनी जलाशयातील अवैद्य वाळू वाहतूक  करणाऱ्या चार बोटी उध्वस्त इंदापूरचे तहसीलदार ठोंबरे साहेब पोलीस निरीक्षक गोडसे साहेब पोलीस नाईक चौधर पोलीस नाईक झरेकर पोलीस कॉन्स्टेबल बालसिंग पोलीस कॉन्स्टेबल पोलीस पाटील राऊत पोलीस पाटील कांबळे त्यांनी मिळून कार्यवाही केली

केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य मंत्री टोपे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

  केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य मंत्री टोपे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित जालना - कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य परिस्थिती कौशल्याने हाताळल्या बद्दल आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांचा केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने कोराना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांच्या आदेशाने आरोग्य मंत्री डॉक्टर राजेश टोपे यांना नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील आरोग्य परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून डॉ. टोपे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. राज्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच सामान्य जनतेला त्यांनी दिलासा दिला. आरोग्य मंत्री म्हणुन डॉ. राजेश टोपे यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रेवनाथ नजन, राज्य प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत कांबळे, खुलताबाद तालुका अध्यक्ष राजेंद्र कसारे, नेवासा त...

जोएफ जमादार यांची समाजवादी पार्टीच्या उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड !

 जोएफ जमादार यांची समाजवादी पार्टीच्या  उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड ! श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.जे. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जोएफ युनूस जमादार यांची समाजवादी पार्टीच्या उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वच स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असिम आझमी यांनी नुकतेच त्यांना पद निवडीचे पत्र दिले असून यामुळे श्री.जमादार यांच्या सामाजिक कार्यांना अधिक गती मिळून मोठे बळ मिळणार आहे. श्री.जोएफ जमादार यांनी आपल्या जे.जे.फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य तळागळातील उपेक्षित घटकांसाठी नेहमीच विविध सामाजाभिमूख उपक्रम राबविले असून श्रीरामपूरच्या सामाजिक कार्यक्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे तथा त्यांनी याकक्षेत्रात मोठे नावलौकिक मिळविले आहे, गोर-गरीबांच्या न्याय हक्का प्रसंगी आहोरात परीश्रम करणारा एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांच्या याच सामाजाभिमुक कार्यांची दखल घेऊन समाजवादी पार्टीने उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना सोपवली आहे,आपल्या शिस्तप्रिय ...

शेख सुभान अली अध्यक्ष -दंगामुक्त महाराष्ट्र अभियान मानव कल्याणकारी महात्मा फुले आणि आजचा बहुजन समाज..

 मानव कल्याणकारी महात्मा फुले आणि आजचा बहुजन समाज.. *प्लेगच्या महामारीत सावित्री मायचे बलिदान आणि कोरोना महामारीत बहुजन समाजाची संशयास्पद भूमीका...* *(महात्मा फुले जयंती निमित्त विशेष लेख)* *दुष्काळात(उपासमारीत )महात्मा फुले व सावित्री माय फुलेचे कार्य...* *१८७६-७७ जेव्हा महाराष्ट्रात दुष्काल पडला होता तेव्हा उपासमारीने हजारों च्या संख्येने लोक मृत्यु मुखी पडत होती ...* *त्याकाळी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या वतीने ठीक ठीकानी अन्न छत्र सुरू केले होते .* *एका केंद्रात २००० निराश्रितांची   जेवणाची व्यवस्था होती.* *महात्मा फुलेंनी डॉ.शिवप्पासारख्या आपल्या मित्रांच्या मदतीने धनकवडी येथे विक्टोरिया बालाश्रम सुरू केले.* *तेथे दररोज १००० गरीब मुलांना जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती ...* *आणि सावित्री माता फुले स्वतः  या सर्व मुलांचे जेवण आपल्या मैत्रिणींच्या मदतीने करायच्या....* *आणि याच काळात विष्णु शास्त्री चिपळूणकर पंत बहुजनांची मुले उपासमारीने मरत असताना व्याकरणावर निबंध लीहण्यात व्यस्त होते ...*  *सावित्री माय फुलेंनिही दुष्काळात महत्वाची भूमिका पर पडली..* ...

महात्मा फुलेंच्या त्यागामुळेच बहुजन समाजात परिवर्तन . माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरेंचे प्रतिपादन

 महात्मा फुलेंच्या त्यागामुळेच बहुजन समाजात  परिवर्तन .            माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरेंचे प्रतिपादन ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महात्मा फुलेंना अभिवादन !!)  इंदापूर: प्रतिनिधी ( दि.११) महात्मा फुलेंच्या समर्पण व त्यागातून बहुजन समाजात शैक्षणिक, आरोग्यविषक आणि सामाजिक परिवर्तन झाले , अशा शब्दांत इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रत्नाकर मखरे यांनी राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या १९४ व्या जयंती दिनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल (जिजाऊनगर) इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. "रत्नाकर मखरे म्हणाले की, समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, विषमता, गुलामगिरी यासारख्या समाज विघातक चालीरीतींना विरोध करून सामाजिक न्यायाची आणि सामाजिक पुनर्रचनेची मागणी करण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापन...