Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

'महा-रजतकडे'' रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कर्जाचे १०० हुन अधिक अर्ज दाखल - अपर्णा साठे

 "'महा-रजतकडे'' रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कर्जाचे १०० हुन अधिक अर्ज दाखल - अपर्णा साठे पुणे - कोरोनामुळे नोकरी - व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. आर्थिक ओढाताण आणि महिन्याच्या बजेटमध्ये लोकांना काटकसर करावी लागत आहे. अश्या परिस्थितीत भांडवला अभावी लोकांना नवा उद्योग - व्यवसाय उभारता येत नाही, ही बाब लक्षात घेऊन महा-रजत अर्बन बँकेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांना १% व्याजदराने कर्ज देण्याचे जाहीर केले. त्यामुळे आजअखेर पर्यंत १०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी कर्ज मागनीचे अर्ज केले आहेत. अशी माहिती महा-रजत अर्बनच्या संचालक अपर्णा साठे यांनी दिली.         अपर्णा साठे म्हणाल्या की, २ एप्रिल २०२१ पासून महा-रजत अर्बन बँकेच्या गोखलेनगर येथे दुसऱ्या शाखेचे उदघाटन होणार आहे. दोन शाखामध्ये काम चालणार असल्याने लवकरात लवकर लोकांची कामे पूर्ण करण्याकडे आमचा प्रयत्न आहे.          कर्जाची पूर्तता वेगाने व्हावी, यासाठी सर्व संचालक मंडळाचे प्रयत्न असतात. लवकरच विश्रांतवाडी भागात तिसरी शाखा सुद्धा सुरू होईल. इतरापेक्षा र...

थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अपना वतन तर्फे " संविधान जनजागृती अभियान "*

 *थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अपना वतन तर्फे " संविधान जनजागृती अभियान "* *अपना वतन संघट्नेर्फ़े छत्रपती शिवाजी महाराज , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ,विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत  पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षक , संघटित असंघटित  मजूर ,कामगार , पोलीस प्रशासन ,शेतकरी ,वकील ,विद्यार्थी ,महिला , शासकीय अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व सुशिक्षित -अशिक्षित घटकांपर्यंत भारतीय संविधानाची माहिती पोहचवण्याचा अपना वतन संघटनेचा मानस आहे.* त्या नुसार अपना वतन संघटनेच्या वतीने सोमवार दि. २९/०३/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्याना भारताचे संविधान हे सुभाष वारे सरांचे पुस्तक भेटस्वरूपात दिले. त्यावेळी भारतीय संविधानातील काही महत्वाच्या मुद्दयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.       आज *हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत ,अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ ...

दफ्तर दिरंगाई कायदा, 2006

 दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दं...

गेल्या सत्तर वर्षात सरकारी आरोग्य सेवा कमकुवत ठरल्यानेच खाजगी हॉस्पिटलने लोकांची लूट केली - उमेश चव्हाण

 गेल्या सत्तर वर्षात सरकारी आरोग्य सेवा कमकुवत ठरल्यानेच खाजगी हॉस्पिटलने लोकांची लूट केली - उमेश चव्हाण (पुणे प्रतिनिधी ) - देश पारतंत्र्यात असताना सरकारच्या मालकीची चांगली हॉस्पिटल निर्माण झाली. ही सर्व सरकारी रुग्णालये आजही लोकांना उत्तमरित्या सेवा देत आहेत. मात्र गेल्या सत्तर वर्षात ज्या पक्षांची सरकारे सत्तेवर आली त्यापैकी कोणीही आरोग्य सेवेला केंद्रबिंदू मानून काम केले नाही म्हणूनच खाजगी हॉस्पिटल चे देशात पेव फुटलेले दिसते त्यामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांना आपली घरे आणि संपत्ती विकल्या शिवाय पर्याय उरत नसल्याचे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.  रुग्ण हक्क परिषद या संघटनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्यासह किसान काँग्रेसचे हनुमंत पवार आदर्श सरपंच सुहास पांचाळ सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय लोहार, सल्लागार प्राचार्य वृंदा हजारे, नाशिक जिल्हा अध्यक्ष सारिका नागरे पुणे शहर उपाध्यक्ष यशस्विनी नवघणे उपस्थित होत्या.       उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, सरक...

नेहरूचौक ते दर्गा मस्जिद शहिद भगत सिँग चौक हा नव्याने दुरूस्त हौत असलेल्या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणी व सोशल आॕडिट करावे - नगरसेवक प्रशांत शिताप यांची लेखी तक्रार.

 नेहरूचौक ते दर्गा मस्जिद  शहिद भगत सिँग चौक हा नव्याने दुरूस्त हौत असलेल्या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणी व सोशल आॕडिट करावे - नगरसेवक प्रशांत शिताप यांची लेखी तक्रार. नगरसेवक सिताफ यांचा नगरपरिषदेला घरचा आहेर इंदापूर नगरपरिषदने ठेकेदाराला दिलेल्या कामाचा दर्जा चांगला नसल्याचा आरोप , सिताफ सारखे आणखी नगरसेवक मिळतील का अशी सूज्ञ नागरिकांची भावना  इंदापूरात भाजप राष्ट्रवादी एकत्र ?  निकृष्ट कामाबात मेरी भी चूप तेरी भी चूप ? नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा  (इंदापूर प्रतिनिधी )गेले महिना भर अत्यंत रटाळ व सावकाश पद्धतीने हे काम चालू आहे.  खर तर नेहरू चौक  मुख्य बाजार पेठ ते टेंभुर्णी नाका हा अतिशय वर्दळीचा व व्यापारी दृष्टीकोनातून महत्वाचा रोड. गेले 10 वर्षात या रस्त्याची डागडूजी झाली नाही. सर्व महापूरुषांच्या  जयंत्या गणेश विसर्जन ताबुत मोहारम या  मिरवणुका याच रोडने जातात. चांगल्या व दर्जेदार कामाची अपेक्षा नागरीक बाळगून होते. गेले महिनाभरचालू आसलेले संथ गतीच्या कामामूळे या ठिकाणच्या व्यापार वर  र्घोषित लाॕकडाऊनच या ठेकेदाराने लादली अस...

बारामती उपविभागीय अधिकारी कांबळे साहेब यांना राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्याची मराठी पत्रकार न्याय संघ सह AIMIM इंदापूर तालुका पक्षाची राष्ट्रपती महोदयाकडे निवेदनाद्वारे मागणी

 बारामती उपविभागीय अधिकारी कांबळे साहेब यांना राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्याची मराठी पत्रकार न्याय संघ सह AIMIM इंदापूर तालुका पक्षाची राष्ट्रपती महोदयाकडे निवेदनाद्वारे मागणी  (इंदापूर प्रतिनिधी )  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अनेक अधिकारी यांच्या निवड करण्यात येत असतात. शासकीय वेळेत शासकीय काम करणे हे प्रत्येक अधिकारी यांचे काम असते. असेही काही अधिकारी असतात.जे जनतेला न्याय मिळावा त्यांंची कामे व्हावी यासाठी ते शासकीय वेळ यांचे मर्यादा न ठेवता लोकभिमुख कामकाज करून जनतेला त्यांंचे हक्क मिळवून देत असतात. महाराष्ट्र राज्य मध्ये एक असाही माणूस आहे की त्यांना एका ठिकाणी  नियमानुसार तीन वर्षे शासन काम करून देत नाही. ते म्हणजे आयपीएस अधिकारी तुकाराम मुंडे . महाराष्ट्रतील जनतेने त्यांंच्या कामाची पध्दत पाहायली आहे .महाराष्ट्र राज्य मध्ये खूप आयपीएस अधिकारी असतील परंतु तुकाराम मुंडे नावाची चर्चा असते  बारामती प्रांत अधिकारी म्हणून कामकाज करताना त्यांनी खूप निर्णय चांगले घेतले. इंदापूर सह बारामती या ठिकाणी त्यांंनी  भोगस जातीचे दाखले तयार होव...

रुग्ण हक्क परीषदेच्या कार्यकर्त्याला तात्काळ एक लाख रुपयांचे कर्ज देऊ - नम्रता पवार

 रुग्ण हक्क परीषदेच्या कार्यकर्त्याला तात्काळ एक लाख रुपयांचे कर्ज देऊ - नम्रता पवार (पुणे प्रतिनिधी ) -दि. 22 उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण हक्क परीषदेचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे लोकसेवेचे काम करत असतात. रुग्णांची सेवा आणि मदत करत असतात. राज्यात ठिकठिकाणी शाखा आणि विविध कार्यक्रम - उपक्रम राबवित असल्यानेच, आज रुग्ण हक्क परिषद चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. रुग्ण हक्क परिषदेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, अश्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. आणि म्हणुनच रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्याला एक टक्का व्याजदराने एक लाखाचे कर्ज आम्ही महा-रजत अर्बन बँकेकडून जाहीर करत आहोत, असे महारजत अर्बन बँकेच्या संचालक नम्रता पवार म्हणाल्या.        वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बैठकीत नम्रता पवार बोलत होत्या. रुग्ण हक्क परिषदेने या चार वर्षात पृथ्वी मेडिकल फाउंडेशन, आरएचपी मीडिया अँड प्रॉडक्षन हाऊस प्रा. लि. आणि आपल्या हक्काची वित्तसंस्था म्हणून महा-रजत अर्बन बँक लि. या संस्था यशस्वीपणे उभ्या केल्या. रुग्ण हक्क परिषदेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्य...

नीरा-भीमा कारखान्याचे संचालक मा. राजवर्धनदादा पाटील यांनी केले सय्यद आणि आवटे कुटूंबियांचे सांत्वन..

  नीरा-भीमा कारखान्याचे संचालक मा. राजवर्धनदादा पाटील यांनी केले सय्यद आणि आवटे कुटूंबियांचे सांत्वन. (इंदापूज प्रतिनिधी )दि. १८ मार्च २०२१ रोजी कळंब(लक्ष्मीनगर) येथे राहणारे  इस्माईल अली सय्यद व भवानीनगर (भाग्यनगर) येथे राहणारे श्री. बापू बाजीराव आवटे यांच्या मुलांचे काल सोलापूर- विजापूर रस्त्यावर दि. १७ मार्च २०२१ रोजी अपघाताने निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहुन मा.राजवर्धनदादा पाटील यांनी कुटूंबियांचे सांत्वन केले.                 इस्माईल अली सय्यद यांचा मुलगा पै. सोहेल इस्माईल सय्यद (वय २२) व श्री. बापू बाजीराव आवटे मुलगा कै.महादेव बापू आवटे (वय २०) दोघे ही कब्बडीचे महाराणा संघाचे खेळाडू होते. त्यांचे प्रशिक्षक व खेळाडू राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन कै. महादेव आवटे  व पै. सोहेल सय्यद व यांच्या सह १३ खेळाडू कर्नाटकात बेडगी या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डीचे सामने खेळण्यासाठी जात होते. परंतु काळाने घाला घातला, इंदापूर तालुका या दोन गुणवंत खेळाडूंना मुकला. या दोघांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वत्र दुःखाची शोककळा पसरली असून,...

पुणे जिल्ह्यातून एक खासदार आणि तीन आमदार निवडून आणणार - माऊली सलगर.

(इंदापूर प्रतिनिधी )राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा आढावा बैठक आज पार पडली सदर बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर बोलताना म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून जानकर साहेबांना लोकसभेत पाठवायचे आहे आणि जिल्ह्यातून तीन आमदार निवडून आणायचे आहेत त्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने काम वाढवायचे आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात विविध विषयांवरती आंदोलने करावीत तसेच प्रत्येक बुथवर कमीत कमी दहा कमिटीचे सदस्य तयार करायचे आहेत, गाव तिथे शाखा व एक बूथ दहा युथ हा उपक्रम संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबवायचा आहे. सदर बैठकीला पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजित पाटील, अल्पसंख्यांक आघाडी प्रभारी शाहीद मुलाणी, पुणे जिल्हा प्रभारी किरण गोफने, बारामती तालुका अध्यक्ष अॅड. अमोल सातकर, पुरंदर तालुका अध्यक्ष संतोष खोमणे, दौंड तालुका अध्यक्ष किसन हंडाळ, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बंडगर, राष्ट्रीय समाज कर्मचारी आघाडी चे संतोष कोकरे, अभिजीत बाळे, गणेश हेगडकर, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, महिला आघाडी अध्यक्ष नि...

युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

 (इंदापूर प्रतिनिधी )दिनांक ११/०३/२०२१ रोजी युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन मा.डाॕ.एम के  इनामदार यांच्या हस्ते व इंदापुर नगरीच्या नगराध्यक्षा सौ. अंकिताताई शहा  मा. योगेश मालखरे स्माईल प्लस सोशल फाँडेशन महाराष्ट्र व गिर्यारोहक अनिल वाघ   हाजी रज्जाकभाई पठाण आदर्यांश गोपालक व जेष्ठ नागरीक संघाचे दत्तात्रय गुजरसर च्या प्रमुख उपस्थितीत पार पडले व या रक्तदान शिबिरामधे. युवा क्रांती प्रतिष्ठाणचा १० वा वर्धापन दिन व छत्रपती संभाजी राजांच्या बलिदान दिना निमित्ताने युवक मिञांनी  व  नागरिकांनी १५३ बाटली रक्तदान केले. व २५ तरूणांनी प्लाझ्मा डोनेशन साठी सँम्पल दिल.   सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड सेंटर सोलापूर यांचेकडुन रक्तदान संकलित करण्यात आले. .तसेच .यु वा क्रांती  प्रतिष्ठान :- सन २०२१-२२ साठी नविन कार्यकारिणीतील पदाधिकारी यांची निवड संस्थापक-अध्यक्ष सन्माननिय प्रशांतदादा शिताप व संस्थापक उपाध्यक्ष श्री धरमचंदजी लोढा यांनी जाहिर केली...अध्यक्ष - दशरथदादा भोंग,उपाध्यक्ष -बाळासाहेब क्षिरसागर....महिला अध...

बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर साहेब यांच्या कामाचे लोकांमधून कौतुक

 (इंदापूर चा आवाज संपादक जावेद शेख ) बारामती आरटीओ  परीवहन अधिकारी म्हणून राजेंद्र केसकर यांनी सूत्रे हाती घेताच बारामती आरटीओ कार्यालयात शनिवारी व रविवारी कच्चे लायसन्स साठी कार्यालय सूरू ठेवून एक प्रकारे बारामती , इंदापूर , दौंड या ठिकाणातील जनतेला  सुखद धक्का दिला. इंदापूर , बारामती व दौंड या तीनही तालुक्यातील जनतेला कच्चे लायसन्स साठी अंदाजे दोन महीने ताटकळत थांबावे लागत होते. लायसन्स नसल्याने पोलीस कारवाई रामुळे नागरिक हैराण झाले होते. बारामती ही अजितदादा पवार यांच्या लोकभिमुख कारभारामुळे ओळखली  जाते.बारामती मध्ये अनेक अधिकारी कार्यक्षम असल्याचा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी प्रांत अधिकारी संतोष जाधव ,तसेच तत्कालीन प्रांत अधिकारी कांबळे तसेच बारामती मध्ये तहसीलदार म्हणून काम केलेले हनुमंत पाटील तसेच DYSPम्हणून सध्या काम पाहत असलेले नारायण शिरगांवकर यांच्या ही कामाचे ठसे जनतेच्या मनात निर्माण झाले ले आहे.वरील काही अधिकारी सध्या शासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहे तर काही अधिकारी कार्यकाळ संपल्याने इतर ठिकाणी बदली झालेली आहे. परंतु आज ही बदली झालेल्या अधिकारी वर्गा...
 इंदापूर नागरी सुविधा सह बाभूळ गांंव

स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धे अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेला देश पातळीवर सलग चौथ्या वर्षी ODF मानांककन

  (इंदापूरचा आवाज संपादक जावेद शेख ) स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धे अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेला देश पातळीवर सलग चौथ्या वर्षी ODF मानांककन मिळत आहे. यावर्षी *ओ डी एफ ++ (Recertification)*  हे मानांकन प्राप्त झाल्यामुळे इंदापूर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माननीय सौ अंकिता ताई शहा यांनी इंदापूर शहरातील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई स्वच्छता उत्कृष्ट पणे ठेवल्याबद्दल त्या ठिकाणी नियुक्त असलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यामध्ये राहुल वाघेला दीपक सोलंकी रोहन चव्हाण कुणाल चव्हाण शैलेश सोलंकी सौ शीतल वाघेला तान सिंग सोलंकी महावीर मिसाळ दिनेश वाघेला  व इतर कर्मचाऱ्यांचा माननीय नगराध्यक्ष अंकिताताई शहा व माननीय श्री मुकुंद शेठ शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला  याप्रसंगी यांच्याबद्दल गौरवोद्गार  काढताना सांगितले कि *चला हातात हात मिळवूया, दुर्गंधीला इंदापूर शहरातून बाहेर पळवूया*.  हे जे इंदापूर नगर परिषदेस मानांकन मिळाले आहे ते केवळ आपल्या प्रयत्नामुळे , हे नक्कीच आपल्या अपार कष्टाचे फळ आहे एवढ्या उन्हा वाऱ्याचे तुम्ही शौचालयाची ...

इंदापूराचा कँम्प कधी असणार याबाबतची महीती 3 दिवस आधी आरटीओ नोटीस फलकावरती लावणार -केसकर साहेब उपप्रादेशिक कार्यालय अधिकारी बारामती

  इंदापूरचा  कँम्प कधी असणार या बाबतची माहिती आरटीओ कार्यालयात  नोटीस फलकावर ती 3 दिवस अगोदर लावणार- केसकर साहेब उपप्रादेशिक परीवहन अधिकारी बारामती  (इंदापूराचा आवाज संपादक जावेद शेख )  इंदापूरात आरटीओ कँम्प कधी होतो या बात काही दिवसापासून सावळा गोंधळ चालू होता. रविवारी सकाळी ओपन होणारा कँम्प अचानक पणे मागील दोन आठवडे  रविवारी न सोडता एक सोमवारी सोडला व दुसरा कँम्प शुक्रवारी सोडला याबाबत जनतेला कोणत्याही प्रकारची माहिती दिली गेली नव्हती. याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी बारामती आरटीओ कार्यालयाचे अधिकारी धायगुडे साहेब हे काम पाहत होते. ते 26  तारखेला सेवानिवृत्त झाल्यानंतर केसकर साहेब यांनी कार्यभार घेताच इंदापूर कँम्प बाबत या पुढे असा सावळा गोंधळ होणार नाही. इंदापूरात होणाऱ्या कँम्प ची माहिती तीन दिवस अगोदर बारामती आरटीओ कार्यालयाच्या नोटीस फलकारती लावली जाणार असून  बारामती आरटीओ कार्यालयाचा कारभार लोकभिमुख कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केसकर यांनी सांगितले.बारामती आरटीओ कार्यालयाचा कार्यभार हाती घेताच ...

माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांतजी हंडोरे साहेब वाढदिवसानिमित्त इंदापुरात मोफत शिवभोजन थाळी बस स्टँड इंदापूर व उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण येथे फळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला

( इंदापूरचा आवाज संपादक जावेद शेख )आज 13 मार्च माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य .तथा. कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, काँग्रेस प्रभारी मुंबई काँग्रेस संस्थापक अध्यक्ष भिमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापुरात मोफत शिवभोजन थाळी बस स्टँड इंदापूर व उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण येथे फळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी उपस्थित मेडिकल ऑफिसर डॉक्टर चंदनशिवे सर युवराज मामा पोळ तालुकाध्यक्ष भीमशक्ती, शरदराव मखरे, दिगंबर चव्हाण ,  बाळासाहेब जामदार ,दादासाहेब पोळ, पांडुरंग मिसाळ, कल्याण घाडगे ,सुमित चंदनशिवे ,अनिल साबळे ,बाबा शिकलकर, तया मोमीन ,मनीष पवार, बबलू गायकवाड, राजेंद्र झेंडे,अक्षय झेंडे व इतर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

वंचित बहुजन आघाडीच्या बेमुदत धरणे आंदोलनाला यश

 वंचित बहुजन आघाडीच्या बेमुदत धरणे आंदोलनाला यश        (इंदापूरचा आवाज  संपादक जावेद शेख )आज वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्याच्या वतीने मौजे आनंदनगर ता.इंदापूर येथील दलित वस्तीच्या रस्त्या प्रकरणी करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मा.गटविकास अधिकारी साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर हे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.          यावेळी पुणे जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आयु.विनोद भालेराव साहेब यांनी जर दिलेल्या वेळेत कारवाई केली नाही तर संबंध जिल्ह्यात आंदोलन करू असे ठणकावून सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हनुमंत तात्या कांबळे, माऊली नाचण, हमीद भाई अत्तार, भिमसेन चव्हाण, ऍड. बापूसाहेब साबळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौ.राणी ताई कोकाटे, माढा लोकसभा अध्यक्ष राहुल चव्हाण, प्रमोद भाऊ चव्हाण, पवन पवार,हनुमंत बनसोडे, सागर लोंढे, विकास गायकवाड, अविनाश गायकवाड, प्रसाद लोखंडे,राहुल सोनवणे, बाळासाहेब सरवदे, संदीप मोहिते, तानाजी धोत्रे, बाळासाहेब लोखंडे, महादेव लोंढे,पंकज बनसोडे, इलाही शेख...

इंदापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती इंदापूर आज समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.

  इंदापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती इंदापूर आज समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.       मौजे आनंदनगर ता. इंदापूर येथील दलित समाजात ये जा करणारा रस्ता हा तेथील धनदांडग्या, राजकीय पुढाऱ्यांकडून जाणीव पूर्वक अतिक्रमण करून अडवला गेला आहे.  यासंबंधी वेळोवेळी पत्र व्यवहार करून, कागदपत्रे सादर करून देखील व मा.उपविभागीय अधिकारी सो.बारामती,मा.तहसीलदार सो. इंदापूर यांचे कारवाईचे आदेश दिले  असताना देखील मा.गटविकास अधिकारी इंदापूर व त्यांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हे या प्रकरणात जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अधिकारी वर्गाकडून मदतच करीत आहेत असे दिसते आहे.        त्यामुळे संबंधित दोषींवर व अधिकारी, कर्मचारी यांच्या दलित अत्याचार विरोधी कायदा (अट्रोसिटी ऍक्ट) नुसार कारवाई करण्यात यावी ही मागणी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी इंदापूर शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आली यावेळी बहुजन ब्रिगेड महासंघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संदीप मोहिते, भटक्या व...
 *मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी तात्काळ उपलब्ध करुन देन्यात यावे व अल्पसंख्याक समाजा च्या इतर मागण्या त्वरीत मंजुर करुन चालु असलेल्या अधिवेशनात तरतूद करावी- एम आय एम*  एम.आय.एम. व अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने औसा तहसीलदार द्वारा मा. मुख्यमंत्री यांना खालील मागण्या चे निवेदन देण्यात आले, या वेळेस *एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली ईनामदार* *एमआयएम नेते Adv गफरुल्लाह हाशमी*  *कायदे सल्लागार Adv रफीक शेख* व आदि उपस्थित होते मागील 6 वर्षापासुन मौलाना आझाद विकास महामंडळाचा कसलाही निधी वाटप झाला नाही. वास्तविक अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मागील सरकारने अल्पसंख्यांक समाजासोबत दुजाभाव करुन अल्पसंख्यांक समाजाला योजनेपासुन वंचित ठेवले. मागील दिड वर्षात महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आले परंतु मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची निवड करण्यात आली नाही. परिणामी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, सामाजिक सुशिक्षीत बेरोजगार युवकांच्...

आम्ही महिलांनी जायचं कुठं ? असा सवाल करत स्वच्छ ता गृहांसाठी रूग्ण हक्क परीषद ने केले आंदोलन

  आम्ही महिलांनी जायचं कुठे ?असा सवाल करत स्वच्छतागृहांसाठी रुग्ण हक्क परिषद ने केलेले आंदोलन!   (पुणे -प्रतिनिधी )महिला आरोग्यासारख्या अतिमहत्वाच्या प्रश्नावर झोपेचं सोंग घेतलेल्या पुणे महानगर पालिकेला जागं करण्यासाठी, आज दिनांक ८ मार्च २०२१ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरासमोर झाशी राणीच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन केले. आणि महिला स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.        पुण्यामध्ये दिवसभर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांना आम्ही जायचं कुठे? असा आक्रोश करावा लागतो तेंव्हा,  सुसंस्कृत पुणे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे. फक्त कागदावरच, आणि दिखाव्यासाठीच आहे काय? असा खडा सवाल यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने उपस्थित केला गेला. पुणे महानगरपालिका आणि आरोग्य खात्याला महिला आरोग्य आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाचं काही सोयर- सुतक नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहही अस्वच्छतागृह जास्त आहेत त्यामुळे महिलांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागत आहे. दिवसभर घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे आरोग्य धोक्या...

भिमाई आश्रमशाळेत बहुजन महामातांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महिला दिन साजरा

 भिमाई आश्रमशाळेत बहुजन महामातांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महिला दिन साजरा.                    महिलादिन हा स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा गौरवशाली दिवस : प्राचार्या अनिता साळवे यांचे प्रतिपादन. इंदापूर : प्रतिनिधी ( ८मार्च २०२१* )  येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने (दि.८) जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते, त्याप्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे मॅडम  बोलत होत्या .त्या म्हणाल्या की,प्रत्येकाच्याच  जीवनात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुषंगाने महिला दिनाचे विशेष महत्व असल्याने साजरा करण्यात येतो. आपल्या घरातून ते  देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे.या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात.असे प्राचार्या अनिता साळवे मॅडम कार्यक्रमा प्रसंगी म्हणाल्या.यावेळी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते बहुजन महामातांच्या प...

पैशाअभावी रुग्ण तडफडून मरत आहेत, मात्र अर्थसंकल्पात स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात अजित पवार व्यस्त - उमेश चव्हाण

 पैशाअभावी रुग्ण तडफडून मरत आहेत, मात्र अर्थसंकल्पात स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात अजित पवार व्यस्त  - उमेश चव्हाण आरोग्य क्षेत्रासाठीची तरतूद अपुरी आणि तुटपुंजी (पुणे प्रतिनिधी ) -करोनाच्या काळात राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट होती. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन हॉस्पिटल बांधली जातील, असे वाटले होते. मात्र साडेसातशे कोटी रुपयांची घोषणा करून तमाम रुग्णांच्या तोंडाला अर्थमंत्री अजित पवार यांनी पाने पुसली आहेत. अशी टीका रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी आज बोलताना केली.         केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे राज्यात लागू होणार नाही. असे म्हणत असताना शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देण्याचे राज्य सरकारला का जमत नाही? हा मूळ प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या मूळ जखमेवर उपाययोजना शोधण्याऐवजी बाजार समित्यांना दोन हजार कोटी रुपये आणि आरोग्य क्षेत्राला साडे सातशे कोटी रुपये घोषणा करणे, ही नागरिकांची फसवणूक आहे. शेतकऱ्यांचीही फसवणूक आहे. आणि जे जे रुग्ण उपचाराअभावी मरणाची वाट बघत आहेत, त्यांचा देखील अपमान आहे. असे असले तरी आजच्या अर्थसंकल्पमध्ये अजित पवारांनी स्वत...

आरोग्य सभापतींचा इंदापूर शहरातील महिलांसाठी महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम

आरोग्य सभापतींचा इंदापूर शहरातील महिलांसाठी महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम...  राधीका महीला बचत गटाकडून मोफत मधुमेह तपासणी शिबीर (इंदापूरचा आवाज संपादक जावेद शेख ) जागतिक महिला दिनाचे औचित्य  साधून इंदापूर शहरातील महीलासांठी मधुमेह तपासणी शिबीर राधीका महीला बचत  गटाकडून 8 मार्च रोजी आयोजित करण्यात आले  असल्याची   माहिती नगरसेवक तथा सभापती आरोग्य अनिकेत वाघ यांनी माहिती दिली. 8 मार्च रोजी 11 ते 5  या वेळेत मधूमेह तपासणी साठी दोन तस अगोदर जेवन करून यावे तसे कोरोनाचे नियम पाळावेत असे ही आयोजकाकडून सांगण्यात आले आहे. तरी  महिलांनी लाभ घेवे असे आयोजकाकडून आवाहन करण्यात आले आहे.
 प्रति.... माननीय संपादक साहेब. दैनिक............... कृपया खालील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक मध्ये प्रसिद्ध करावी. विनंती दिनांक. 6 मार्च 2021 मिलिंद एकबोटे सदरचे व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम द्वेष मनात ठेवून काम करतात गेल्या तीस वर्षाचा जर या माणसाचा इतिहास पाहिला तर असे आढळून येते की सदर व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे जिल्ह्यात व महाराष्ट्रात हिंदू व मुस्लिमांचे दंगल कशी घडवावी यासाठी ते प्रयत्नशील असतात सातारा वाई येथे झालेल्या दंगलीत सुद्धा त्यांचा मोठा हात होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगून मुस्लिमांना टार्गेट करतात व हिंदूंचे डोके फिरून मुस्लिमविरोधी करण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलेले आहे.  भाकड जानवर घेऊन जाणारे मुस्लिम कुरेशी बांधवांकडून किंवा विकायला आलेल्या हिंदू शेतकरी कडून ती भाकड जानवर बळजबरीने चोरून पांजरपोळ येते ठेवण्याचे काम व नंतर पांजरपोळ येथून त्या भाकड जानवर लंपास करून पुन्हा शेतकरी किंवा कुरेशी बांधवांना विकण्याचे काम त्यांनी केल्या बाबतचे ही तक्रार पुणे पोलीस ठाणे मध्ये आहे. ज्या कोंडवे याबाबत ते नेहमी बोलतात मिनी पाक...

संभाजी ब्रिगेड च्या वतीने मिलिंद एकबोटे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

संभाजी ब्रिगेड च्या वतीने मिलिंद एकबोटे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.             पूणे महानगर पालिकेने कोंढवा हज हाऊस निर्माण करण्यासाठी निर्णय घेतला. या विरोधात  दि.०२. ०३.२१ रोजी नामे मिलिंद रमाकांत एकबोटे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष यांनी जाणीवपूर्वक व हेतुपुरस्कर पणे बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून मनुष्यहानी आणि वित्तहानी करण्याच्या उद्देशाने व हेतूने लोकांना जमवून एकत्रित संघटित करून गैरमार्गाने बेकायदेशीररित्या राष्ट्रीय एकात्मतेचा बादक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछूट बेताल वक्तव्य करून एका विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामी केली आहे व सदरील भाषणे आरोपीने दंगली घडवून दहशत माजविण्याचा हेतूने हेतूपुरस्सर सदरील भाषणाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारित केले आहे तसेच एक आक्षेपार्ह मजकुराचे पत्र पुणे महानगर पालिका आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे सदर गंभीर प्रकाराबाबत  संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी  दि. ०५.०३.२०२१ रोजी या संदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न...

पाणी प्रश्नावर रत्नाकर मखरेंच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

 पाणी प्रश्नावर रत्नाकर मखरेंच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण *इंदापूर* प्रतिनिधी (दि. ५/३/२१) :- माझं उपोषण सत्तेच्या विरोधात नसून खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यां विरोधात आहे.असे  भिमाई पाणी वापर सहकारी संस्था मर्या. गलांडवाडी नं.२ चे  चेअरमन आणि इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी स्पष्ट केले आहे. मखरे म्हणाले की, खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.चोपडे आणि  कार्यकारी अभियंता श्री.पाटील हे  नियमबाह्य पद्धतीने पाण्याची विक्री करतात. उन्हाळ्याच्या नियंत्रणाच्या काळात लाखो रुपये कमावतात  असा गंभीर आरोप मखरे यांनी केला आहे. या संदर्भात शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदनाच्या प्रती सबंधितांना स्पीड पोस्ट द्वारे यापूर्वीच पाठविलेल्या आहे. पाटबंधारे खात्याचा पाणीवाटपाचा नियम टेल टू हेड असा असताना ते हेड टू टेल असे पाणी वाटप करतात व पुन्हा टेल टू हेड पाणी वाटप करतात. मखरे  म्हणाले की,माझी भिमाई पाणी वापर सहकारी संस्था असून ती गलांडवाडी नं.२ च्या हद्दीत येत असून माझ्या सोसायटीच्या हद्दीतील  शेतकऱ्यांना गेल्या १५ ...

विश्वास डॉ. आसबे ल.म. अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार. मो.नं.9822292713

 *विश्वास*         मानवी जीवनामध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या जीवनातील निर्भयता, ही विश्वासावर अवलंबून असते. आपला कोणावरच विश्वास नसेल, तर आपल्या मनातील भीती कशानेही जात नाही.       आपण गाडीत बसलो तर ड्रायव्हरवर विश्वास ठेवावा लागतो. केस कापायला बसलो तर धारदार शस्त्र हातात असलेल्या केस कापणाऱ्या माणसावर विश्वास ठेवावा लागतो. आपल्या जीवनातील कोणताही पैलू हा विश्वासा शिवाय निर्भय राहूच शकत नाही. थोडक्यात आपले जीवन विश्वासाशिवाय तग धरू शकत नाही.        आपल्या जीवनात कोणताही संबंध आणि नाते हे विश्वासावर टिकून असते. जेथे संशय निर्माण होतो, तेथे विश्वासाचा अंत होत असतो. आपल्या जीवनात संशय आणि विश्वास यांच्या जागा निश्चित करून घ्याव्या लागतात.        संशय माणसाला सावध करतो आणि विश्वास माणसाला निर्भय करतो, परंतु विश्वासामुळे कधीकधी बेसावधपणा निर्माण होतो. अशा बेसावध अवस्थेत आपला विश्वासघात निश्चित होत असतो. अखंड सावधान असून विश्वास ठेवणारी माणसे जीवनात यशस्वी होतात.       एखाद्यावर वि...

छत्रपती युवराज संभाजीराजे यांच बलिदान दिन निमित्त.. तसेच आमचे मित्र व युवा क्रांती प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतदादा शिताप यांचा वाढदिवस व युवा क्रांती प्रतिष्ठाणचा १० वा वर्धापन दिन निमित्त..

 छत्रपती युवराज संभाजीराजे यांच बलिदान दिन निमित्त.. तसेच आमचे मित्र व युवा क्रांती प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतदादा शिताप यांचा वाढदिवस व युवा क्रांती प्रतिष्ठाणचा १० वा वर्धापन दिन निमित्त..  रक्तदान व प्लाझ्मा डोनेशन कॕम्प 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏    छत्रपती युवराज संभाजीराजे यांच बलिदान दिन निमित्त.. तसेच आमचे मित्र व युवा क्रांती प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतदादा शिताप यांचा वाढदिवस व युवा क्रांती प्रतिष्ठाणचा १० वा वर्धापन दिन निमित्त.. 💚 गुरूवार दि..11मार्च रोजी सकाळी १० ते ५.००  पर्यंत   ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *रक्तदान शिबीर प्लाझ्मा डोनेशन (एॕन्टी बाॕडीज टेस्ट)* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ ❤️ स्थळ.   शिक्षक सोसायटी मंगल कार्यालय कालठण रोड इंदापूर. 🤍 प्रत्येक रक्तदात्यास एक युवा क्रांती प्रतिष्ठाणचा *प्राऊड इंडियन टी शर्ट* , सर्टिफिकेट   व रक्तदात्याच्या नातेवाईकास रक्ताची आवश्यकता लागलेस विशेष  कार्ड. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🧡 गोर गरीब गरजु पेशंट साठी मोफत रक्त बॕग. कृपया ज्या रूग्णाचा  कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट येवून...

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून दंड वसूल करण्याची मागणी अपना वतन संघटनेच्या शेख यांची सोशल मिडिया माध्यमातून मागणी

" लोका सांगे ब्रह्मज्ञान , आपण कोरडे पाषाण "  पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून दंड वसूल करण्याची मागणी एखादी गोष्ट दुसऱ्याला व्यवस्थित समजून सांगणे, व ती करण्यास सांगणे, पण आपण ते न करता दुसरंच करणे. म्हणजेच " लोका सांगे ब्रह्मज्ञान , आपण कोरडे पाषाण " असाच प्रकार मंगळवारी एका पत्रकार परिषदेत घडला . कोरोनाचा फैलाव  नये म्हणून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  जीव तोडून सांगत असताना काही नागरिक त्याचे पालन करताना आढळत नाहीत ,त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु एका जबाबदार पदावर असणारे *पुणे शहराचे पोलीस आयुक्तच मास्क न घालता वावरतात तेंव्हा त्याना मोकळीक व सूट दिली जाते. त्यामुळे कायदा केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच का ?* असा प्रश्न जनता विचारात आहे.            मंगळवारी पत्रकार परिषदेत पुणे शहराचे *पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर वरिष्ठ अधिकारी मास्क न वापरता वावरताना आढळून आले आहेत.याबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी मास्क न वापरल्याने सामान्य नागरिकांना दंड आकारला जातो तसा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर ...

वंचित बहुजन आघाडी कडून इंदापूर तहसील कचेरी वर धरणे आंदोलन करणार

 (इंदापूर प्रतिनिधी )वंचित बहुजन आघाडी , वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते  इंदापूर तहसील कचेरीवर , वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आज दिनांंक.5/3/2021 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून इंदापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. असे वंचित बहुजन आघाडी कडून सोशल मिडिया वर प्रकाशित करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीतील सर्व जेष्ठ, युवक, महिला , पदाधिकारी  कार्यकर्ते यांनी इंदापूर तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

समर्पण* डॉ.. आसबे ल.म. अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार

 *समर्पण*           हे आपल्या जीवनातील वैराग्याची खरी कसोटी असते. जोपर्यंत आपल्या मनामध्ये स्व किंवा मी जिवंत आहे, तोपर्यंत आपल्याला पूर्णतः समर्पित होता येत नाही. समर्पणासाठी मी ची भावना पूर्णपणे नष्ट व्हावी लागते.       पती-पत्नीच्या जीवनामध्ये समर्पित भाव, हा त्यांच्या वैवाहिक जीवनाचा भक्कम पाया असतो. एकमेकावर अवलंबून राहणे वेगळे, आणि एकमेकावर समर्पित होणे वेगळे, हा फरक आपल्याला संसाराच्या सुरुवातीलाच कळायला हवा.       आपण एकमेकावर अवलंबून आहोत, या भावामध्ये परावलंबन आहे आणि कोणत्याही परावलंबनाच्या तळाशी भीती असते आणि ही भीती आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदा मधला सर्वात मोठा अडथळा असतो.         समर्पित भावामध्ये विश्वास असतो आणि विश्वास हा नेहमी निर्भय असतो. आपण पण खरोखर समर्पित आहोत का ? हे तपासायचे असेल तर त्याची एकच परीक्षा आहे, पतीच्या जीवनातील वेदना आणि दुःख, हे पत्नीला स्वतःचे वाटले पाहिजे आणि पत्नीच्या जीवनातील वेदना व दुःख पतीला आपले वाटले पाहिजे.        समर्पणामध्ये स्...

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने इंदापूर शहरातील भार्गवराम बगीच्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव इंदापुरात होऊ नये याकरिता उपाययोजना व आढावा घेणेसाठी मिटिंग आयोजित करण्यात

  (इंदापूरचा आवाज संपादक जावेद शेख )  इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने इंदापूर शहरातील भार्गवराम बगीच्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या इंदापुरात होऊ नये याकरिता उपाययोजना व आढावा  घेणेसाठी  आज सोमवार दिनांक 1 मार्च 2021 रोजी  आयोजित करण्यात आली होती यावेळी नगरपरिषदेच्या सन्माननीय नगराध्यक्ष मा.सौ. अंकिता ताई शहा उपनगराध्यक्ष मा. श्री धनंजय पाटील ,नायब तहसिदार मा.श्री अनिल ठोंबरे, इंदापूर पोलीस स्टेशनचे       ए.पी.आय.मा.श्री. अजित जाधव,इंदापूर उपजिल्हा रुग्णालय चे रुग्णालय अधिक्षक मा. डॉ. एकनाथ चंदनशिवे, गटनेते मा. श्री कैलास कदम, नगरसेविका मा.सौ.मीना मोमिन,नगरसेवक व इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन मा.श्री.भरतशेठ शहा, नगरसेवक मा.श्री. प्रशांत सिताप, सामाजिक कार्यकर्ते श्री.जावेद शेख, श्री रमेश धोत्रे तसेच इंदापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर सभा अधिक्षक श्री गजानन पुंडे पाणी पुरवठा पर्यवेक्षक श्री सहदेव व्यवहारे व इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष सौ अंकिता शहा यांनी सांगितले क...