रुग्ण हक्क परिषदेने शिवजयंती निमित्ताने केला तब्बल एकशे अकरा कार्यकर्त्यांचा सत्कार! (इंदापूरचा आवाज पुणे प्रतिनिधी )अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या मंचावर उपस्थित असणारे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आज एकत्र आले होते. कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा किंवा स्नेहसंमेलन असल्याचे आनंददायी चित्र निर्माण झाले होते. निमित्त होते रुग्णहक्क परिषदेने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाचे! यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सामाजिक - राजकीय संघटना आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समारंभपूर्वक मानपत्र प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला. रुग्णहक्क परिषदेने हा आगळावेगळा सत्कार समारंभ आयोजित केला होता. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते तब्बल एकशे अकरा सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, केंद्रीय सचिव दीपक पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, केंद्रीय सल्लागार प्राचार्य वृंदा हजारे, प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई चव्हाण उपस्थित होत्या. ...