पत्रकारितेतील मूल्य कायम राहणार-अतुल तेरखेडकर (इंदापूरचा आवाज )इंदापूर प्रतिनिधी: बदलत्या काळानुसार पत्रकारितेसमोर आव्हाने असली तरी पत्रकारितेतील मूल्य कायम राहणार असे मत ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर यांनी व्यक्त केले. इंदापूर येथील राधिका रेसिडेन्सी क्लब मध्ये "लोकशाही उत्सवा" निमित्त आम्ही 'बी' घडलो आणि 'पत्रकारितेसमोरील आव्हाने' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर बोलत होते. कार्यक्रमास साथी सलीम शेख, डॉ. विकास शहा, ज्येष्ठ पत्रकार मधुकर गलांडे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे, इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक गफूर सय्यद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संघटक सचिव शिवाजी मखरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे,नीलकंठ मोहिते, सुरेश जकाते, महेश स्वामी, राहुल ढवळे, सागर शिंदे,सुरेश मिसाळ, देवीदास राखुंडे, काकासाहेब मांढरे, धनंजय कळमकर, दीपक खिलारे, संतोष दहिदुले, सत्यजित रणवरे, श्रेयश नलवडे, जितेंद्र जाधव, सिद्धार्थ मखरे, ...